Different Aghori - 3 books and stories free download online pdf in Marathi

असा हि हा अघोरी - 3

पण तरी देखील अमोघने दिलेल्या पर्यायाने तो प्रश्न सुटला होता म्हणून खूपच कौतुक करत होते सगळे आणि अमोघला एक नवीन ओळख देखील मिळाली होती अगदी त्याला हवी होती तशी. अमोघ ला फारच मजा वाटत होती. तो मनातून वाईट नसला तरी हे सगळं कौतुक आणि यश त्याला देखील हवंहवंस होतं. आणि महत्वाचं म्हणजे नंतर त्या वक्तीचं काय होतं ह्या कडे अमोघचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं. आता त्याने एका मागून एक सपाटाच लावला सगळ्या एक्सपर्टस बरोबर तसं करण्याचा. आणि आता त्याला सगळ्याच एक्सपेरिटीएस मिळत होत्या त्या मुळे तो फार बिझी देखील राहू लागला होता. त्यातुनच त्याच्या लग्नाची देखील तयारी चालूच होती एकीकडे. आता जवळपास सगळ्याच फील्ड मधला एक्सपर्टइज त्याला मिळालं होतं फक्त खूपच कॉम्प्लिकेटेड अश्या मानपसोचार स्पेशिअलिटी सोडून. सायकॅर्टिस्ट म्हणून नावाजलेला त्याचाच अगदी जवळचा असा मित्र होता तो म्हणजे सुनील. सुनील फिरायला गेला असल्यामुळे तो सुट्टीवर होता म्हणून ते राहून गेला होतं. आज तो परत कामावर रुजू होणार होता. मग अमोघने ठरवून टाकला आजच ते काम करायचं. अमोघ ला प्रसिद्ध होण्याची फारच घाई झाली होती. अर्थात प्रसिद्ध व्हायला कोणाला आवडणार नाही. पण सुनील आजच रुजू झाल्या मुळे त्याला फारच काम होतं. आणि तो अमोघ ला भेटूच शकत नव्हता. त्यामुळे अमोघचे फारच चिडचिड होतं होती. त्याने त्याचा मन रामावण्या साठी सिद्धीला कॉल केला पण नेमकी ती देखील कॉल उचलत नव्हती.

अमोघच आज कशातच मन लागत नव्हतं. म्हणून तो त्याच्या हॉस्पिटसचं रजिस्टर चालत बसला होता. रजिस्टर चाळत असताना त्याच्या लक्षात आलं कि सगळे स्पेशियलीस्ट ज्यांच्यावर त्याने प्रयोग केला होता. ते लोक प्रयोग झाली नंतर २-३ दिवसांपासून येतच नव्हते. त्याने मग त्याचा असिस्टंट राजेशकडे तशी चौकशी देखील केली त्याने सांगितले कि त्यांनी तशी रीतसर सुट्टी देखील टाकली आहे आणि डॉक्टर देशपांडेनी राजीनामा देखील दिला होता. पण अमोघ ला आचर्या वाटत होता कि डॉक्टर देशपांडें सारखे नावाजलेले आणि यशाच्या उंचीवर असलेल्या डॉक्टरांनी अचानक राजीनामा का दिला असेल? त्याने विचार केला आज संध्याकाळी घरी जाताजाता त्याच्या घरी जाऊन त्यांना भेटून येण्याचा. एक अर्जेन्ट केस आल्यामुळे तो त्याच्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला. आणि केस बघण्यासाठी गेला. केस खूपच कॉम्प्लिकेटेड होती. तो सॉल्व्ह करता करता त्याला खूपच उशीर झाला. आणि तो फार थकला देखील होतं. सकाळी त्याचा कॉल उचलता ना आल्यामुळे आणि नंतर तिने केल्या वर तो बिझी असल्यामुळे त्यांचा बोलणं नव्हता झालं म्हणून त्याला भेटण्यासाठी आणि सर्प्राइझ देण्यासाठी म्हणून सिद्धी हॉस्पिटल मध्ये आली होती.

काम झाल्यामुळे अमोघहि तिच्या बरोबर निघून गेला आणि डॉक्टर देशपांडेंना भेटण्या विषयी तो अगदीच विसरून गेला होता. दोघांनीही बाहेरूनच जेवून जायचा प्लॅन केला. आणि जेवण झाल्या वर सिद्धीने त्याला घरी ड्रॉप करून स्वतःच्या घरी निघून गेली. पुढच्या आठवड्या पासून अमोघ लग्नाच्या सुट्टी वर असल्यामुळे तो त्याची काम पटापट संपवण्याच्या मागे लागला होता. आणि या सगळ्यात डॉक्टर देशपांडे आणि बाकी डॉक्टर्स त्याच्या डोक्यात मागे कुठे तरी राहून गेला. सुनीलचा पण सध्या त्याने होल्ड वर टाकलं. बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. अगदी धुमधडाक्यात लग्न झालं अमोघच सगळ्यांनी अगदी आवर्जून हजेरी लावली होती हॉस्पिटल मधले देखील सगळे जन उपस्तित होते. अगदी जे लोक सुट्टी वर होते ते देखील. डॉक्टर देशपांडे तेव्हडे नव्हते. अमोघच्या ते लक्षात आले पण त्याला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला आज वेळ नव्हता. लग्नानंतरचे सगळे विधी आटोपल्या वर अमोघ आणि सिद्धी फिरायला निघून गेले. दोघांनाही बीच फार आवडत असल्या मुळे मालदीव सारखा उत्तम ठिकाण नव्हतं त्यांच्यासाठी. चांगले १५ दिवस फिरून आले होते दोघेही. आता येऊन पण त्यांना २ दिवस झाले होते अराम करून झाल्या वर आता अमोघ परत हॉस्पिटल मध्ये रुजू होणार होतं आज पासून. सिद्धीने मराठी लिटरेचर केला होतं. आणि तिला कविता करण्याचा छंद होता. तिने तो छंद जोपासायचं ठरवलं होतं. अमोघ खूप दिवसांनी हॉस्पिटल ला जाणार होतं म्हणून त्याला खूप काम होती.

हॉस्पिटल मध्ये गेल्या वर कळलं कि त्याला एका इंटरनॅशनल कॉन्फरेन्स साठी इन्व्हिटेशन होतं. ती कॉन्फरेन्स २ आठवड्याने फ्रान्स येथे भरणार होती. ते वाचून अमोघच्या चेहर्या वर एक प्रकारचं हास्य आलं तिकडे त्याला ऑल राऊंडर म्हणून झळकायचं होतं. म्हणून त्याने लवकरात लवकर सुनील वर प्रयोग करायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्याने सुनीलला बोलावलं आणि त्याच्या बरोबर पण अगदी तसाच घडला जसं बाकीच्या बरोबर घडलं. आणि २-३ दिवसांनी सुनील ने देखील सुट्टी टाकली. असिस्टंट राजे ने तशी कल्पना अमोघला दिली. अमोघ ला आश्चर्याचा धक्काच बसला होता. पण त्या कॉन्फरेन्सची तयारी कार्याचाही असल्या मुळे अमोघने नंतर त्याला भेटण्याचा विचार केला आणि त्याच्या प्रेसेंटेशन मध्ये तो गुंतला. २ आठवडयांनी तो आणि सिद्धी दोघेही फ्रान्सला जायला रेडी झाले. इच्चीत शाली ते दोघे पोहचले तो दिवस प्रवासाचा शीण घालवण्यासाठी अराम करण्या साठी ठेवला त्यांनी. ३ दिवस कॉन्फरेन्स चालणार होती आणि नंतरचे ५ दिवस ते फ्रान्स फिरणार होते. अपेक्षे प्रमाणे अमोघने स्वतःचं नाव चांगलंच गाजवलं आणि जगभर आता अमोघ हे नाव माहिती झालं होता. अमोघ आणि सिद्धी परत आले आणि आपापल्या रुटीन मध्ये व्यस्त झाले.

सिद्धी आणि अमोघ मध्ये १ गोष्ट कॉमन होती ती म्हणजे दोघेही गणपती ची नस्सीम भक्ती करायचे. हि वेगळी गोष्ट कि अमोघने हल्ली गणेश भक्ती सोडून अघोरी शक्तीची उपासना करण्यात जास्त इंटरेस्ट होता. अर्थात अमोघने हि गोष्ट सिद्धी पासून लपवून ठेवली होती. १ - २ वेळा सिद्धीने विचारण्याचा प्रयन्तही केला होतं. अमोघने उत्तर द्यायला फारच टाळाटाळ केली, पण एकदा सिद्धी मागेच लागली त्याच्या तर तो फार चिडला तिच्यावर. सिद्धी फारच दचकली तो पहिल्यांदाच तिच्या वर चिडला होता, तिला फार वाईट वाटलं आणि चेहरा पडला तिचा ती तिकडून निघून गेली. अमोघला ह्याच काहीच वाटलं नाही. सिद्धी आणि तिच्या सासू अगदी मैत्रिणीं सारख्या राहत होत्या. एकदा सिद्धीने बोलता बोलता तिच्या सासूला विचारलं अमोघच्या उपासने बद्दल. सासूने जे काही सांगितलं ते ऐकून सिद्धीला फारच धक्का बसला. सासूबाईंच्या सांगण्यानुसार अमोघ हासुद्धा गणपती भक्तच होता आणि त्याची गणपतीवर निस्सीम भक्ती होती, वेळ मिळेल किंव्हा त्याच मन होईल तेव्हा तो गणपतीच्या देवळात जाऊन येत असे. त्याला तिकडे फारच शांती मिळत असे आणि मनावरचा सगळं ताण तो विसरून जात असे. १०वी नंतर जेव्हा ते सगळे कोकण ट्रिप वरून परत आले तेव्हा अमोघ जास्तच वेळ उपासनेला देत असे. पण त्यात काही वाईट नाही म्हणून त्यांनी त्या कडे पहिले दुर्लक्ष केलं. १२वी नंतर वैगेरे त्याने गणपती मंदिरात जण कमी केला. अगदी रोज म्हटलं तरी गणपतीच्या मंदिरात जाणारा अमोघ मंदिरात जायला टाळाटाळ करत होतं म्हणून त्याच्या आई वडिलांना पहिले आश्चर्य वाटलं पण तो उपासना करतो आहे म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. अजून पुढच्या ३ - ४ वर्षात अमोघ खूपच विचित्र वागू लागला होता. त्याने कधी कोणाला विरोध नाही केलं पण तो स्वतः अगदी गणपतीचा नाव घ्यायचं पण जसं काय त्याच्या जीवावर येत होतं. आता रात्रीचं उशीरा त्याच्या रूम मधून विचित्र असे मंत्रांचे आवाज येत असत आणि त्याच्या रूम बाहेर अतिशय कोंदट असा वातावरण निर्माण होत होतं. एकदा आईने त्याला विचारण्याचा प्रयन्त केला. पण तो आईवर चिडला आणि त्याने आईला ओरडून म्हटलं माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसन बंद कर आता मी काय लहान राहिलेलो नाही. आईला फार वाईट वाटलं ती रडत आत निघून गेली. त्यानंतर आई आणि त्याच्या मध्ये एक तणाव निर्माण झाला. आता सिद्धीला जाणीव झाली कि अमोघ तर बोलला होता आमच्या घरात खूपच मोकळं वातावरण आहे पण ती घरात आल्या पासून त्याच्या आणि त्याच्या आई मध्ये फारच तणाव जाणवत होतं. अमोघ मन मोकळ्या प्रमाणेच वागत होतं पण आई जरा हाताचं राखून असाच वागत होत्या. अमोघच्या कदाचित हे कधीच लक्षात नाही आलं. कारण तो अगदी नेहमी सारखाच वागत होतं. आईला देखील त्याच आश्चर्य वाटत होतं, कि हा असा का वागतो. हाच खरा अमोघ आहे कि त्या दिवशी आपल्या वर ओरडणारा अमोघ खरा आहे. खरं तर त्या दिवशी आई वर ओरडणारा अमोघ खरा नव्हताच तो त्या शक्तीच्या अधिपत्या खाली होतं. जेव्हा जेव्हा अघोरी शक्तीला वाटत होते कि आपले भांडे फुटेल तेव्हा तेव्हा अघोरी शक्ती त्याच्या वर हावी होत असे आणि अमोघला हे जाणवतही नसे.

अमोघच्या बहुतेक हे ध्यानीमनी हि नव्हते कि काही तरी चुकलंय पण सिद्धीला आता शांत बसवत नव्हतं तिला जाणवत होत कि पाणी कुठे तरी मुरतंय कारण अमोघ जेव्हा तिच्यावर चिडला तेव्हा तो जसं अमोघ तिकडे नव्हताच दुसराच कोणी तरी होत असं सिद्धीला जाणवला पण सासूबाईंशी बोलल्या नंतर तिची पक्की खात्री झाली. आता तिने ह्याचा शोध लावायचा चंगच बांधला. पन कुठून सुरवात करावी हे मात्र तिला कळत नव्हतं. अचानक तिला आठवलं कि सासूबाई म्हणाल्या होतं कि अमोघदेखील तिच्या सारखा गणेश भक्त आहे पण तिने लग्न झाल्यापासून त्याला गणपती बद्दल काहीच बोलताना ऐकलं नाही उलट ती बोलत असताना देखील त्याच लक्ष नसल्या सारखं तिला जाणवलं म्हणून तिने परत विषय नव्हता काढला. पण तिने आता तिथूनच सुरवात केली. दरम्यान ती तिच्या गुरूंना भेटून अमोघच्या वागण्या बद्दल सांगितलं. तर त्यांनी आधी अमोघचे पत्रिका बघायला मागितली. अमोघची पत्रिका बघून गुरूंच्या चेहर्यावर काळजी स्पष्ट दिसली तिला. गुरूंनी मोठा श्वास घेऊन पत्रिका खाली ठेवली आणि त्यांनी सिद्धीला तिच्या सासू सासर्यांना बोलावून घ्यायला सांगितलं, त्यानुसार तिचे सासू सासरे आले आणि गुरूंनी सांगायला सुरवात केली.

साधारण १०० - १५० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे हि. गणेश नावाचा एक मुलगा होतं. त्याचे वडील गणपतीचे भक्त होते म्हणून त्यांनी मोठ्या हौसेने त्याचे नाव गणेश ठेवले होते.बघता बघता गणेश ६ वर्षांचा झाला होता. गणेश देखील नावाप्रमाणे अगदी गुणी बाळ होता. वडिलांबरोबर तोदेखील आता नित्यनेमाने गणपतीच्या मंदिरात जात असे. आणि गणपती स्तोत्र देखील बोलत असे. जरी त्याला त्याचा अर्थ कळत नसला तरी प्रत्येक लहान मूल जसं आई वडिलांचं अनुकरण करतात तसाच तो देखील करत होता. त्या वेळी गावात एक अघोरी मांत्रिक आलं होता. त्या काळात लोकांमध्ये अंधश्रद्धा फार असे त्यामुळे साहजिकच त्या गावातही होती. मांत्रिकाच्या दर्शनाला सगळे गावकरी गेले होते. त्यानुसार गणेशचा कुटुंबही गेलं होतं. त्यावेळी गणेश आई पुन्हा एकदा पोटुशी होती. तिला पाहताच मांत्रिकाच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. त्याने आपल्या अघोरी शक्तींच्या साहाय्याने जाणून घेतला कि तिचा गर्भ हा मुलीचा आहे अगदी त्या मांत्रिकाला हवं होतं तसा. त्याला त्याच्या शक्ती मिळवण्यासाठी एका पोटुश्या बाईचा बळी द्यायचा होता जी ७ महिने असेल आणि गर्भ हा मुलीचाच असला पाहिजे. गणेशच्या आई ला ३ रा महिना चालू होतं म्हणजे त्याला त्याच्या इच्छित सध्या करण्या साठी बराच कालावधी लाभला होता. तेव्हढ्या वेळात गणेशच्या आई वडिलांना त्याला गंडवायचं होतं.

त्याने आपली अघोरी शक्तीने त्यांच्या घरात अभद्र अश्या गोष्टी घडवायला सुरवात केली होती. कधी गणेश आजारी पडत होता कधी त्याचे वडील. अचानक त्यांची गुरं आजारी पडायला लागली. घरात आर्थिक नुकसान होऊ लागलं. त्याचे आई वडील घाबरले. अगदी साधे होते ते त्यांनी देवाचा धाव सुरु केला. त्यांना कुठे माहिती देवाने काहीच नाही केलं मुळात देव कोणाचाच काहीच वाईट करत नसतो जो तो आपल्या कर्माची फळ भोगत असतो ती कोणालाच चुकत नाहीत अगदी प्रभू रामालाही चुकली नाही. पण ह्यात त्यांच्या कर्माचा काहीच हात नव्हता जे काही होता ते त्या अघोरींची माया होती. शेवटी परिस्थितीला कंटाळून ते दोघे अघोरी कडे गेले आता गणेशच्या आई ला ६ वा महिना लागला होता. अघोरी समोर त्यांनी त्याचा गाऱ्हाणं मांडायच्या आधीच त्यानेच त्यांना सांगितलं घरावर खूप अडचणी आल्या आहेत अचानक त्याला कंटाळून इथे आलं आहात बरोबर असं करून त्याला त्या कुटुंबाचा विश्वास संपादन करायचं होता. त्यांना वाटलं अघोरी अगदी अंतर्यामी आहे त्यांनी अघोरीच्या पाय वर डोकं ठेवला आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी विनवू लागले. अघोरीने हि डोळे बंद करून काही तरी गहन विचार करत असल्याचं दाखवलं. जसे त्याने डोळे उघडले त्याचे डोळे लाल झाले होते. त्याने सांगितलं कि ह्या बाईच्या पोटात जो गर्भ आहे तो एका हाडळीचा आहे आणि तोच हे सगळं घडवून आणतोय. जर तिचा जन्म झाला तर ती सगळ्या घराचा विनाश करेल. गणेश आई वडील घाबरले त्यांनी त्या मांत्रिकाला उपाय विचारला असता. तो म्हणाला एकाच उपाय आहे तो म्हणजे ह्या मुलीला पोटातच संपवलं पाहिजे अन्यथा अनर्थ होईल.

गणेश आई वडील दोघेही अतिशय विचित्र मनस्तीत घरी परतले. गणेशला ते शेजार्यांकडे ठेवून गेले होते. गणेशला शेजाऱ्यांकडून घेऊन यायची सुद्धा शुद्ध नव्हती बराच वेळ झाला तरी गणेशाचे आई वडील आले नाही म्हणून तेच घरी बघायला आले तर त्यांनी बघितलंते दोघे अतिशय उध्वस्त अवस्तेत बसलेले होते. ते शेजारी होते अगदी जीव भावाचे मित्र देखील होते. त्यांनी गणेशच्या आई वडिलांना खूप खोदून खोदून विचारल्या वर गणेश आई रडायला लागली आणि तिने सर्व सांगायला सुरवात केली. त्या शेजार्यांना मांत्रिकाने जे काही सांगितलं ते काही पटलं नाही त्यांनी त्यांच्या ओळखीत असणाऱ्या एका साधूकडे जाण्याबद्दल त्यांना गळ घातली. त्यांनी विचार केला जाऊन बघण्यात काय हरकत आहे. म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी तिकडे जाण्याचं ठरवलं.

****

क्रमशः

****

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED