असा हि हा अघोरी - 4 (अंतिम) Deepali Hande द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

असा हि हा अघोरी - 4 (अंतिम)

गणेश, त्याचे आई-वडील आणि त्याच्या वडिलांचा तो शेजारचा मित्र सगळेजण साधू बाबांकडे जायला निघाले. इकडे त्या अघोरीला त्याची भनक लागली आणि त्याच्या ठेवणीतला भयंकर अश्या आवाजात भविष्यवाणी कि जर त्यांनी त्याचा ऐकलं नाही तर सगळ्या घराचा सर्वनाश तर होईलच आणि त्यांच्या मुलाच्या जीवाला देखील धोका आहे. गणेशच्या आई मन आता काच खाऊ लागलं, तिने परत फिरण्याचा हट्ट केला इथे मात्र गणेशच्या वडिलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि तिच्या आईच्या हट्टाला न जुमानता पुढे चालत राहिले. मांत्रिकाची शक्ती अजून अपुरी होती त्यामुळे तो जास्त काही करू शकत नव्हता त्यांना घाबरवण्याशिवाय. ते ऐकत नाही म्हणून त्याने एक काळी बाहुली घेलती आणि त्याला मंत्रित करायला सुरवात केली, त्याला गणेशचा त्याने त्या दिवशी डोळा चुकवून काढून घेतलेला रुमाल बांधला आणि तो काही करणार त्याच्या आत हे सगळे जण मठात पोहचले. आता जो पर्यंत ते बाहेर पडत नाही तो पर्यंत त्याची कोणतीच जादू चालणार नव्हती.

इकडे सगळेजण साधूमहारांजाना भेटले. महाराजांना त्यांना बघितल्या बघितल्याच जाणीव झाली काय झाला असावं ह्याची. गणेशाचे वडील काही बोलणार त्याआधीच त्यांनी इशाऱ्याने त्यांना शांत राहण्यास सांगितलं. आणि ते स्वतः घ्यान लावून बसले. बराच वेळ गेला जवळपास दोन प्रहार उलटून गेले पण महाराज ध्यानात बाहेर येत नव्हते. इकडे सगळ्यांची चुळबुळ वाढली होती. छोटा गणेश खूपच कंटाळला होता तो इतका वेळ त्या खोलीतच खेळत होता आता मात्र तो तिकडे खेळून खेळून कंटाळला होता आणि तो सगळ्यांची नजर चुकवून बाहेर निघालाच होता कि साधूंनी आपले डोळे उघडले आणि जोरात गरजले "गणेश बाळ इकडे ये, गणेशाचे आई वडील आणि त्यांचा मित्र दचकले मात्र गणेश अगदी भारावल्या सारखा त्यांच्या जवळ गेला त्यांनी त्याच्या मोठ्या वर हात ठेवून काही तरी मंत्र पुटपुटले. जसे त्यांचे मंत्र बोलून झाले तास गणेश बेशुद्ध पडला त्यासरशी त्याची आई त्याच्या जवळ धावली आणि ती त्याला हात लावणार साधूंनी तिला तसं करण्यास रोकल आणि त्यांनी बोलायला सुरवात केली.

तो मांत्रिक म्हणजे साधा सुद्धा नाहीये तो खूपच मोठा अघोरी आहे. त्याला ह्या जगावर राज्य करायचं आहे आणि त्या साठी तो फक्त एकाच पाऊल मागे आहे आणि ते पूर्ण झाल्या वर त्याला कोणीच रोकु शकणार नाही इतकी शक्ती त्याच्याकडे आलेली असेल. तो त्याच्या मानसुब्यात जर यशस्वी झालाच तर मात्र काही खरं नाही तो अख्या सृष्टीत हाहाकार माजवेल आणि त्याला रोकन हे केवळ आणि केवळ अशक्य असेल, त्याला त्याच इप्सित साध्य करण्यासाठी ७ महिन्याच्या मुलीचा गर्भ असलेल्या बाईचा बळी द्यायचा आहे आणि गणेशाची आई हीच तो बळी आहे हे मात्र जेव्हा साधूंनी सांगितलं तेव्हा गणेशाची आई गर्भगळीत झाली तिचे हात पाय लटपटायला लागले. हा धक्का तिच्या साठी खूपच मोठा होता. गणेश वडील देखील डोक्याला हात लावून बसले होते, थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. थोड्या वेळाने गणेशच्या वडिलानांनी साधू महाराजांना आता पुढे काय करायचं विचारला असता साधू महाराज मंद हसले आणि म्हणाले आता जे काही करायचा आहे ते मलाच करायच आहे तुम्ही फक्त माझं काम होत नाही तो पर्यंत इथेच राहायचं आहे कारण त्याला कळलं आहे कि तुम्ही माझ्या कडे मदतीसाठी आला आहात त्याला फार राग आला आहे. त्याने एक काली बाहुली घेऊन त्याला गणेशचा त्या दिवशी तिकडेच राहिलेला रुमाल त्याला बांधला आहे ह्याचा अर्थ तुम्ही इथून बाहेर गेल्यावर तो डायरेक्ट गणेश ला त्रास देऊन तुम्हाला तो सांगेल तास कार्यास भाग पाडणार आहे. हे ऐकताच गणेशाची आई जोर जोरात रडायला लागली. तेव्हा साधू म्हणाले रडू नकोस. येत्या अमावास्येला त्याचा निर्णय लागेल मात्र तो पर्यंत तुम्हाला इकडेच राहावं लागेल इथून बाहेर पडलात कि लगेच तो मांत्रिक हल्ला करेल. त्यांनी तिकडेच रहाण्याची तयारी दर्शवली. अमोवस्येच्या आदल्या दिवशी पासून साधू महाराज ध्यानस्त बसले ते दुसऱ्या दिवशीपर्यंत ध्यानातच होते. जेव्हा ध्यानातून बाहेर आहे तेव्हा त्यांनी गणेशच्या डोक्या वर हात ठेवून मंत्र पुटपुटले आणि त्यांनी त्यांचा प्राण त्यागला. काय झाला कोणालाच कळलं नाही.

थोड्याच वेळात गणेशच्या वडिलांचा मित्र मठाच्या दिशेने येताना दिसला. तो त्या दिवशी गणेशच्या परिवाराबरोबर असल्यामुळे त्याला सगळ्या गोष्टींची कल्पना होतीच. त्याने त्यांना येऊन सागणिताला कि तो मांत्रिक मेला आहे. साधू महाराजांचा विधिवत अंत्य संस्कार करून ते त्याच्या घरी राहायला गेले. पण साधुंकडे जास्त वेळ नसल्या मुळे आणि त्यांना अतिशय महत्वाच असं काम करायचं असल्यामुळे ते कोणालाच काहीच सांगू नव्हते शकले. पण त्या मांत्रिकाने जाता जाता गणेशच्या बाहुलीवर असे काही मंत्र टाकले होते कि त्याचा आत्मा त्या बाहुलीत अडकून जाईल आणि गणेश जसा त्या मठाच्या बाहेर येईल त्याचा आत्मा गणेशच्या शरीरात जाईल आणि तो मांत्रिक जिवंत राहून त्याचं काम करेल. पण साधू महाराजांनी त्याचा मनसुबा आधीच ओळखला आणि त्यांनी गणेशावरचा धोका ह्या जन्मा साठी तरी थोपवून ठेवला होता.

गणेशचा पुनर्जन्म झाला आहे अमोघच्या रूपात आणि योगायोगाने म्हणा किंवा त्या अघोरीच्या इतक्या दिवसांच्या प्रतिक्षेचं फळ म्हणा तुम्ही कोकण फिरायला गेलात आणि रोली गावात वास्तव्याला असताना अमोघ तिकडे गेला, कळत नकळत त्या काळ्या बाहुलीला त्याचा स्पर्श झाला आणि त्या अघोरीचा आत्मा अमोघच्या शरीरात शिरला. गुरूंचे शब्द ऐकताच सिद्धी आणि अमोघचे आई वडील आश्चर्यचकित झाले. ह्याचा अर्थ त्या अघोरीचा आत्मा अमोघ मध्ये आहे अगदी तेव्हां पासून अमोघच्या आईने शंका बोलून दाखवली कि जाणवला नाही कि तो अमोघ नसून दुसराच कोणी तरी आहे असं. गुरूंनी ती देखील शंका दूर केली त्या अघोरीचा आत्मा सुप्त स्वरूपात त्याच्या शरीरात आहे. ह्यावेळेला त्याला कोणतीच जोखीम घ्यायची नाहीये, ह्याही जन्मात त्याच इप्सित तेच आहे जे तो जिवंत असताना होतं आणि हे बोलताच सगळ्यांचा चेहरा काळवंडला होता.

त्याची आई बोलली

“ह्याचा अर्थ त्याला ७ महिने मुलीचा गर्भ असणाऱ्या गर्भवतीचा......... “

पुढे त्यांना काही बोलावेनाच. सिद्धीचा तर पुतळाच झाला होता कारण ती ३ महिन्यांची गरोदर होती तिने अजून हि गोष्ट कोणालाच नव्हती सांगितली कारण तिला सर्वात आधी अमोघ ला हि आनंदाची बातमी द्यायची होती पण अमोघ सध्या फारच व्यस्त असल्यामूळे तिला त्याला सांगता नव्हता येत.

नाही म्हणायला अमोघच्या आईला शंका आली आली होती पण तिने स्वतःहून काही सांगितलं नाही म्हणजे कदाचित नसावं असं काही आणि तिला सिद्धीला काही विचारण प्रशस्थ वाटलं नाही. गुरुजींना सिद्धीच्या गरोदरपणाची कल्पना आली आणि इथे खरी त्यांची चिंता वाढली. कारण गुरूंना कळलं होतं कि जरी अमोघला जरी सिद्धीच्या गरोदरपणाची कल्पना नसली तरी अघोरीला तर नक्कीच आली असणार म्हणजे त्याचे ह्या जगात येण्याचे मार्ग मोकळे होणार होते आणि एकदा कि तो ह्या जगात आला तर त्याला रोखणं फार अवघड आहे, ह्या जगात आल्याआल्या सर्वात पहिले तो अमोघच्या आत्म्याला त्याच्या शरीराच्या बाहेर काढून त्याचा शरीरावर पूर्ण पणे अधिपत्य गाजवणार होता आणि त्याच्या आई-वडिलांना मारून टाकणार हे नक्की.

सिद्धी तर आता फारच घाबरली होती आता तिला कल्पना अली होती कि ७ महिन्यांचं गर्भ असणारी बाई ती असू शकते जर मुलीचा गर्भ असेल तर अमोघ तिला मारून टाकायला मागे पुढे बघणार नव्हता कारण तो पूर्णपणे त्या अघोरीच्या आधिपत्याखाली असणार होता. गुरूंनी तिची घालमेल लक्षात घेऊन आणि तिला सतर्क करण्यासाठी सुद्धा त्यांनी तिच्या पोटात असलेला गर्भ हा मुलीचा आहे हे सांगितलं.

अमोघचे वडील घाबरून बोलले म्हणजे अमोघ सिद्धीचा बळी घेईल? पण कसा शक्य आहे ते? अमोघच फार प्रेम आहे सिद्धीवर!!! गुरूंनी त्यांना रोकत तो अघोरीच्या अधिपत्य खाली आहे हे विसरू नका असा सांगितलं.

बराच वेळ शांतता होती त्यांच्यात. खूप हिंम्मत एकवटून सिद्धीने विचारला कि ह्यावर उपाय काय? कारण तिला तिच्या आयुष्याची काळजी नसली तरी तिच्या बाळाची आणि अमोघची नक्कीच होती. गुरु त्या नंतर डोळे बंद करून ध्यानस्त झाले. जेव्हा ते ध्यानातून बाहेर आले तेव्हा त्यांनी सिद्धीला काय करायचे हे समजावयाला सुरवात केली.

इकडे आज अमोघला बरीच दिवसांनी मोकळा वेळ होता म्हणून त्याने डॉक्टर देशपांडे आणि सुनीलच्या घरी यायचा ठरवलं. तास तो गाडी घेऊन निघाला डॉक्टर देशपांडेंच्या घरी जाऊन बघितल तर डॉक्टर एका खुर्ची वर बसून कुठे तरी एकटक बघत बसले होते. अमोघ त्यांच्या जवळ गेला असता त्यांनी एकवार अनोळखी नजरेने त्याच्या कडे बघितले आणि नंतर परत तिकडेच बघू लागले जिकडे ते आधी बघत होते. अमोघ त्यांच्याशी बोलण्याचा प्रयन्त करत होता पण जणूकाही त्यांना काही ऐकायलाच जात नाहीये असं ते वागत होते. अमोघने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्या बायको कडे बघितला तर तिला रडूच फुटलं. त्यांचा अश्रूंचा ओघ संपल्यानंतर त्यांनी बोलायला सुरवात केली.

एके दिवशी ते घरी दिवशी खूपच थकलेले दिसत होते ते आल्या आल्या झोपी गेले. थोड्या वेळाने ते उठल्यावर त्यांना विचारले तर म्हणाले आज खूपच थकवा जाणवतोय, हॉस्पिटल मध्येही चक्कर आली होती मला. मी त्यांना नारळपाणी देऊन खूप काम असेल म्हणून झाला असेल असा म्हणून दुर्लक्ष केलं होत. दुसऱ्या दिवशी ते हॉस्पिटल जायला निघाले पण मीच त्यांना आराम करा म्हणून जाऊ दिला नव्हतं, त्यांनाही ते पटलं आणि राजेंचा अर्ज पाठवला.

पण त्या रात्रीपासून अतिशय विचित्र वागू लागले. खूप वेळा दचकत होते, सारखे ओरडत होते तो मला पकडायला आलाय तो मला मारून टाकेन आणि घाबरून बसू लागले. मी त्यांना मनोपसाचार तज्ञांकडे देखील नेलं. त्यांनाही काही निदान करता नाही आलं त्यांनी असा निष्कर्ष काढला कि वयोमानामुळे असा होत असेल आता तर त्यांनी बोलणं देखील सोडलं आहे.

अमोघ हे सगळं ऐकून सुन्न झाला. त्याला विश्वास होत नव्हता कि मोठ्या डॉक्टरच्या बाबतीत असा काही होईल. मनात कुठे तरी चाटून गेला कि मी तर कारणीभूत नाहीना ह्या सगळ्याला पण लगेचच त्याने हा विचार झटकला आणि सुनीलच्या घरी निघाला. रस्त्यात तो स्वतःच्या मनाला समजावण्याचा प्रयन्त करत होता मी कारणीभूत नसेलच ह्या गोष्टीला, विचार करता करता तो सुनेच्या घरी पोहचला बघून तो नखशिकांत हादरला. डॉक्टर देशपांडे तर वयस्कर होते पण सुनील आणि अमोघ तर जवळपास एकाच वयाचे होते. मग त्याच्या बाबतीत काय झाले. आता त्यांनी सगळ्यांच्या घरी जाण्याचे ठरवले आणि तो त्यानुसार गेला देखील. सगळीकडे तीच परिस्तिथी, शेवटी तो राहुलच्या घरी गेला तोच ज्याच्यावर अमोघने सर्वात आधी प्रयोग केला होता. त्याची हालत बघून तर अमोघ रडायलाच लागला. शिक्षण सुटलं होत त्याच. काहीच काळात नव्हतं फक्त बसून होता एवढ्या लहान वयाच्या मुलाची हि हालत म्हणजे काय? सगळ्यांसाठी एकाच उत्तर काही कळत नाही काय झाला असेल?

अमोघचे आता खात्रीच झाली ह्या सगळ्याच्या हालतला फक्त तो आणि तोच जबाबदार आहे. बाहेर येऊन तो गाडीत सुन्नपणे बसून होता, अमोघ अतिशय उध्वस्त अश्या मनस्तीतीत घराकडे जायला निघाला. काहीच सुचत नव्हते त्याला. त्याला सगळं हवं होतं तरी ते अश्या पद्धतीने नको होतं. आता जरी तो त्या अघोरीच्या अधिपत्यखाली होता तरी तो मुळात एक खूप चांगला माणूस होता. अघोरीला ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना होती कि त्याची माणुसकी आपल्याला फार भारी पडेल म्हणून त्याने कटाक्षाने ह्या गोष्टी त्याला कळू दिल्या नव्हत्या, पण आता त्याला त्या कळल्याच आणि आता तो नखशिकांत हादरला होता. अघोरीही घाबरला होता आता इकडे कारण जरी तो अमोघच्या शरीरात असला तरी त्याला त्याच्या मनावर आणि शरीरावर पूर्ण ताबा मिळवता नव्हता आला. ह्यामागे मागील जन्मातील साधूंचे आशीर्वाद होते कि त्याने केलेली लहानपानपासूनची गणेश भक्ती हे काही सांगता येणार नाही पण अशी कोणती तरी शक्ती होती त्याच्या मागे जी त्याला त्या अघोरींपासून दूर ठेवून होती.

अशाच मनस्तीतीत अमोघ घरी आला असता त्याला वेगळाच वातावरण बघायला मिळालं जे कि अमोघला अगदीच अनपेक्षित होत. घर फुलांच्या माळांनी सजवला होतं. सिद्धीने जसं तिला गुरूंनी सांगितलं होता अगदी तसच केलं होत. घरात पूजेची तयारी चालू होती, अतिशय मंगलमय अस वातावरण होतं. योगायोगाने उद्या गणेश चतुर्थी होती म्हणून आज हरतालिकेच्या निमित्ताने गुरुजी आणि अमोघच्या घरच्यांनी मिळून घरी अघोरीच्या विरुद्ध पूजा ठेवायचं ठरवलं होतं. ह्यामुळे अमोघला शंकाही येणार नव्हती. त्याने स्वतः गणेश भक्ती करणे सोडून दिली असली तरी तो घरात कोणाला विरोध करत नव्हता. योगायोगाने सिद्धी देखील गणेश भक्त होती. ती घरात आल्या पासून गणेश भक्ती करताच होती त्यामुळे आजच्या पूजेचं अमोघ ला काही नवल वाटलं नाही. मात्र ते सगळं बघून अघोरीला खूप राग येत होता पण आज त्याला काहीच करता येत नव्हतं. कारण आजच अमोघने त्याच्या सहकाऱ्यांची स्तिती पहिली होती आणि त्यातून त्याच्या मनात ज्या भावना उत्पन्न झाल्या त्यामुळे अघोरीची त्याच्या वरची पकड कमकुवत झाली होती. आणि घरात असं काही तरी कार्य असणं आणि अमोघने त्याला उपस्तित असणं म्हणजे अघोरीला त्याच्या मूळ उद्धेशापासून अजून दूर घेऊन जाण्यासारखं होतं आधीच त्याने भरपूर वाट पहिली होती आता त्याचा संयम सुटत चालला होता. आणि ह्याच मनस्तीतीत तो काही तरी चुकीचं करणार हे गुरुजींना चांगलाच ठाऊक होतं, त्याच संधीची वाट बघून ते वर्मा वर घाव घालणार होते.

अमोघ फ्रेश होऊन आला आज खूप दिवसांनी त्याला फारच प्रसन्न वाटत होत. गुरुजींना त्याच्या मधला लगेच कळला आणि हे कसं काय झालं हे सुद्धा त्यांनी ध्यान लावून बघितलं. त्यांची खात्री झाली कि ते योग्य दिशेने पाऊलवाट करतायेत आणि अगदी योग्य वेळ होती त्या अघोरीला अमोघापासून दूर करून कायमच नष्ट करण्याची.

गुरुजींनी कुंकवाचा रिंगण आखून त्यात अमोघ ला बसायला सांगितलं. खरं तर अघोरीचा आत्मा त्याच्या शरीरात असताना त्यांना शंकाच होती कितपत अमोघ त्या रिंगणात प्रवेश करू शकेल ह्याची. पण आज चालून आलेली संधी त्यांना दवडायची नव्हती कारण आजच जो योग्य होता तो परत पुढच्या वर्षीच येऊ शकणार होता आणि तो पर्यंत वेळ निघून गेलेली असणार होती म्हणून जे काही करायचा ते त्यांना आजच करावं लागणार होतं. अमोघ जसजसा त्या रिंगणाच्या जवळ जाऊ लागला तसतशी अघोरींची तडफड होऊ लागली होती आणि तो अमोघच्या मनावर ताबा मिळवून त्याला तिकडे जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयन्त करत होता. मात्र अमोघला त्याच्या साथीदारांबद्दल कळल्या पासून तो फारच बदलला होता त्याची मनशक्ती फारच वाढली होती आणि त्याला त्याच्याही नकळत सुप्त मनाने गणपती बाप्पाची आठवण झाली होती आणि तिथेच अघोरीची पकड सैल होऊ लागली होती आणि घरी येई पर्यंत ती पकड खूपच सैल झाली होती कारण अमोघ सतत गणपती बाप्पाला स्मरून त्यांची माफी मागत होता. त्यातून घरी आल्यावर ते मंगलमय वातावरणात त्याचा काहीच कंट्रोल अमोघ वर राहिला होता तो त्याच्या शरीरात तर होता पण काही करू शकत नव्हता. कदाचित ह्याच मुळे अमोघ गुरुजींनी आखून ठेवलेल्या रिंगणात अगदी सहज पाने जाऊ शकला पण त्या रिंगणात प्रवेश करताच अमोघच्या शरीराला एक झटका बसल्या सारखा झालं आणि अघोरीचा आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर पडला. रिंगणात बसणारा अमोघ हा जुनाच अमोघ होता. अर्धी लढाई तर त्यांनी अगदी सहजपणे जिंकली होती.

गुरुजींच्या चेहर्या वरच स्मित हास्य बघून सिद्धी आणि अमोघच्या आई-वडिलांना हायस वाटलं. गुरुजींनी त्यांच्या पुढच्या कामाला घाईने सुरवात केली. पण त्या आधी त्यांना अमोघला सगळ्या गोष्टीनीची कल्पना देणे अनिवार्य होत. कारण ह्या सगळ्याच त्याच भक्कम मनोबळ आणि सततच नाम स्मरण गरजेचं असणार होत. त्यांनी अमोघला सगळं सांगण्यास सुरवात केली जसा सगळं सत्य अमोघला समजलं तसं त्याला स्वतःचा फार राग येत होता. त्याच्या एका मूर्खपणामुळे सगळ्यांना फारच भोगावं करावा लागलं होतं पण आता नाही त्याने हे सगळं संपवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दर्शवली. तसं गुरुजी त्याला हे ही सांगितलं कि आत्तापर्यंत त्याने जे काही मिळवला आहे ते सगळं जाईल म्हणजे त्याने केलेलं त्याचं स्पेसिऍलिझशन ठीक आहे ते त्याने त्याच्या मेहनतीने मिळवलं होत. पण बाकी इतर जे त्याने दुसऱ्यांकडून कळत नकळत ओरबाडून घेतलं होतं ते मात्र त्याच्या कडून निघून जाईल. ह्या वर अमोघ ने फक्त एकाच शंका गुरुजींना विचारली ती म्हणजे माझ्यामुळे ज्यांचं जीवन उध्वस्त झाला आहे ते परत मिळेल का त्यांना. गुरुजींना हि शंका अमोघचे ऐकून आनंदच झाला आणि त्यांनी आनंदाने मन होकारार्थी डोलावली.

गुरुजींनी अमोघला आधीच चेतावणी देऊन ठेवली होती अघोरी त्यांच्या पूजेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयन्त करेन पण आपल्याला आपला मन स्थिर ठेवायचं आहे कदाचित तो माझ्या आवाजात तुला पूजा संपली आहे आणि रिंगणातून बाहेर पड असा सांगण्याचा देखील प्रयन्त करेल पण तू लक्ष देऊ नकोस पूजा पूर्ण झाल्या वर तुला आपोआप कळेल त्याची काळजी तू करू नकोस जेव्हा तुझं अंतर्मन तुला सांगेल तेव्हाच पूजा पूर्ण झाली असा समज, आता तुझ्या मनावर त्याचा ताबा नाही त्यामुळे तुझ्या मनाशी आता तो आधी सारखा खेळू शकणार नाही हे लक्षात ठेव.

आता जोमाने पूजेला सुरवात झाली होती. जसजशी पूजा पुढे सरकत होती तसतसा अघोरी जास्तच चिडत होता. त्याला काहीही करून त्या पूजेत विघ्न आणायचा होत. त्याने त्याची शक्ती वापरून काळ्या शक्तींना आवाहन करायला सुरवात केली. काळ्या शक्ती मदतीला आल्या; कारण त्याने अनेक वर्ष तपश्चर्या करून त्या सगळ्यांना बांधून ठेवला होत. त्या शक्तीच्या सहाह्याने त्याने वातावरणात बदल करायला सुरवात केली अचानक खूप गरम हवा, सोसाट्याचा वारा, जोराचा पाऊस, हाडं गोठवून टाकणारी थंडी. पण काहीच फरक नव्हता पडत त्यांच्या पूजेवर. अखंडपणे पूजा चालूच होती जणू काय गणपती बाप्पा खरंच मदतीला आले होते त्यांच्या. आता अघोरी फारच चिडला त्याने अमोघ आणि गुरिजींवर वार करण्यापेक्षा सिद्धीवर वार करण्याचा ठरवलं. कारण त्याला वाटलं होत सिद्धीला काही झाल्यावर अमोघ आपोआप पूजा सोडून बाहेर येईल आणि तो त्याच्या शरीरावर परत ताबा मिळवेल. पण असा काहीच झाला नाही कारण गुरुजींनी आधीच तिला आणि अमोघच्या आई-वडिलांना अभिमंत्रित धागा दिला होता. पण हे अघोरीला माहित नव्हतं. तिला हातही लावता येत नाही बघून अघोरी अजूनच चिडला त्याने त्याच शेवटचं अस्त्र बाहेर काढला. त्याने अशी काही वातावरण निर्मिती केली ज्यामुळे सिद्धी आणि अमोघच्या आई-वडिलांना अस दिसेल कि अमोघ आणि गुरुजी रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत आणि ते त्याला वाचवायला म्हणून रिंगणात जातील आणि पूजा भंग होईल. ते दृश्य पाहताच सिद्धी ओरडून उठणार तेच गुरुजींनी त्याचा डावपेच ओळखून सिद्धीला अंतर्मनाने संवाद साधून तिला शांत केलं आणि खरी परिस्तिथी दाखवली.

पूजा संपत आली होती आणि अघोरीच अस्तित्वदेखील. एक शेवटचा प्रयन्त म्हणून अमोघला त्याने विचलित करण्याचा प्रयन्त केला आणि त्याला त्याच भविष्य दाखवला जर त्याने अघोरींची साथ दिली तर त्याचा आयुष्य किती सुखकर असणार आहे. पण गुरुजींनी अमोघला आधीच कल्पना दिली होती जर अघोरी अजून काही काळ त्याच्या बरोबर राहिला तर तो सगळ्यांना मारून टाकून अमोघच शरीर तो वापरणार होता. त्यामुळे अमोघ अजिबात बधला नाही आणि शेवटची आहुती यज्ञात देण्यात आली. त्या आहुती बरोबर अघोरीचा आत्मा पुढच्या प्रवासासाठी निघून गेला आणि अमोघला पूजा संपण्याचा संकेत त्याच्या मानाने दिला आणि त्याच्या आयुष्यातला अघोरी नावाचं सावट नेहमीसाठी दूर झालं.

दुसऱ्यादिवशी गणपती बाप्पा अमोघच्या घरी विराजमान झाले आणि सिद्धीने त्यांची गोड बातमी अमोघला सांगितली. अमोघला अतिशय आनंद झाला होता. आता सगळं नीट होईल अशी त्याला खात्री झाली होती. त्याचे सगळे सहकारी ज्यांना अमोघमुळे खूप काही भोगावं लागला होतं ते सगळे अगदी डॉक्टर देशपांडे पासून राहुल पर्यंत सगळेच आवर्जून गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले अमोघच्या घरी, आनंदाची बातमी म्हणते ते सगळे परत नॉर्मल झाले होते अगदी पूर्वी सारखे आणि आता ते हॉस्पिटल देखील परत जॉईन करणार होते. ह्या सगळताच अजून एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे अमोघला जे काही अघोरी मुळे मिळाला होतं ते त्याच्याकडे तसाच अबाधीत होतं, गणपती बाप्पाची कृपा अजून काय? आता त्याला गावात जाऊन लोकसेवा करण्याचं त्याचा स्वप्न पूर्ण करता येणार होत.

पुढच्या ६ महिन्यात सिद्धीने सुंदर अश्या मुलीला जन्म दिला तेही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी. अतिशय प्रेमाने तिचा नाव मैथिली ठेवला त्यांनी आणि त्यांच्या आयुष्यात रममाण झाले.

समाप्त