Kankachya svapratil kalpnechi katha - 2 books and stories free download online pdf in Marathi

कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 2

भाग-2

वत्सलाबाई यांच्या मनात इकडे तारांबळ उडत होती. मात्र कणक च्या मनात मस्त पाचगणी ला जायचा प्लॅन पिंगा घालत होता. यातच सकाळच्या सूर्याने हजेरी लावली. कणक मात्र आज आनंदात होती......

त्या आनंदाचे कारण असं की, तिला इतिहासाचा पेपर सोपा तर गेलाच होता आणि आज तिचा शेवटचा आणि आवडता भूगोलाचा पेपर होता...! आणि या सगळ्यांमध्ये तिच्या आनंदाला आणि उत्साहाला भर घालणारी गोष्ट म्हणजे यानंतर तिला पाचगणीला गावाकडे जायचे होते ना,मावशीकडे!!! म्हणून तिच्या आनंदाला पारवारच नव्हता..!

पण वत्सलाबाई खूप चिंतेत होत्या.त्यांच्या मनात नुसता काहूर माजतं होता. अखेर कणक ला शाळेत पाठवून घरातील कामे आटोपून वत्सलाबाई आणि कनक ची आजी दोघी दुपारच्या कडक कुणाला मागे टाकता गुहेत पोहोचल्या. काल आणायला सांगितलेलं सामान त्या बाबाला देत वत्सलाबाई उत्सुकतेने म्हणाल्या," बाबा तुम्ही जे सांगितलं होतं ना ते सर्व आणले बघा.आता मला पटकन उपाय सांगा." बाबा सर्व साहित्य सावरत म्हणाले," अहो थांबा,, आधी यांची माहिती घ्यावी लागणार ,यावर थोडा अभ्यास करायला हवा, आणि मग होम करून हे कळेल की, तिच्या मागे कोणत्या शक्ती आहेत. आणि मग त्या शक्तींचा प्रभाव आणि ताकद बघून मला त्या शक्तीला संपवण्याचा विचार करावा लागणार....
"काहीपण करा तिकडे पण मला माझ्या मुलीच्या जीवनातून ही शक्ति काढायची आहे... कळलंय तुम्हाला.." वच्‍छलाबाई थोड्या रागातच म्हणाल्या.
"हो, हो करतो."
थोड्यावेळ दोघी तिथेच वाट पाहत थांबल्या .काहीश्या वेळाने होम करून बाबा म्हणाले.."अशक्य, अशक्य" वत्सलाबाई व्याकुळतेने म्हणाल्या,"काय हो बाबा काय झाले?".
"अगं ताई हिच्या मागे एक नाही जवळ-जवळ पाच भूतांचा संचार आहे. यात तर अगदी टोकाची गोष्ट म्हणजे भूतांचा राजा वेताळ आणि मुंजा देखील सामील आहेत आणि तीन अतृप्त आत्मे जे की, मागच्या शंभर वर्षापासून कोणाच्या तरी शरीरात प्रवेश करण्यासाठी अपेक्षित शरीराच्या शोधात आहेत.यांना मारण ,संपवनं जवळजवळ अशक्य गोष्ट आहे."
"बाबा अहो असं बोलू नका माझ्या लेकराला वाचवा. मी ...मी ..मी तुम्हाला लागेल तितके पैसे$$ पाहिजे ना... हो..हो देईल..पाहिजे हो देईल... नाही ..सोनं सोनं.... हां पाहिजे तर सोनं देते...पण माझ्या मुलीला वाचवा हो...!! बाबा एक शेवटचे आशा आहे तुमच्याकडून मला.." वत्सलाबाई आक्रोश करून रडू लागल्या.
"अहो ताई ,सावरा स्वतःला.. मी ही पीडा काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करेल.नक्की करेल. तुम्ही फक्त माझ्यावर, देवावर आणि स्वत:वर विश्वास ठेवा. मी याच्यावर नक्कीच उपाय शोधून काढणार." त्यावर कनक ची आजी वत्‍सलाबाईं ना सावरत बाबांना म्हणाली, "बाबा काही पण करा पण यावर तोडगा काढा.माझा आणि वत्सले चा जीव टांगणीला लागला..किती वेळ लागणार अजुन? किती दिवस थांबायचं? काय करू? कोणाकडे जाऊ??? आम्हाला काही माहीत नाही..!आणि त्यावर तुम्ही आम्हास्नी अशी खबर देता की, कणक च्या मागे पाच शक्ती आहेत.. देवा.. रे !देवा..!"
"ते काही सोपं नाही जवळपास सहा-सात महिने लागणार, मला यावर उपाय शोधायला. एखादं भुत असतं तर ठीक होतं, पण पाचचचचचच......! तुम्हाला सहा-सात महिने वेळ द्यावाच लागणार...! बरं ऐका आता मी काय सांगतो, मी जे सांगतो ,जसं सांगतो अगदी तुम्ही तसंच करायचं यात थोडी जरी कमतरता भासली तर याला जबाबदार तुम्हीच...मी सांगतो ते कान देऊन ऐका, "हे बघा कणकला जवळपास मी जोपर्यंत उपाय शोधत नाही म्हणजे सहा-सात महिने तुमच्या पासून लांब करू नका .तुम्ही तिच्याजवळच राहा.तुम्ही तिला एकटे सोडू नका. कारण इकडे मी वेगवेगळे उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करत राहील..कदाचित त्या शक्त्या तिला त्रास देऊ शकतात ...! तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू शकतात. पण तिला कुठेही एकटं जाऊ न देण्याचं काम तुमचं."
बाबांच्या सर्व गोष्टी वत्सला बाईंना लक्षात येत होत्या आणि त्यांना कनक ची पाचगणी ला जाण्याची गोष्ट आठवली...!
-ज्ञानेश्वरी ह्याळीज

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED