कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 7 मुक्ता... द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 7

हा भाग वाचण्यासाठी मागील भागांची कल्पना घ्यावी...

भाग-7

"अरे काही नाही रे.... तुला माहितीये ना मला भूतांची स्वप्न पडतात त्यांचाच प्रकोप असेल हा...."

" म्हणजे?"
नयन थोडा गंभीर आवाजात म्हणाला...

"अरे म्हणजे की, तुला माहिती ना मला........"
तेवढ्यात आजीने कणकला गोळ्या घ्यायला बोलवले.

"बर‍ं जाऊ दे ते सोडा.....! चला... झोपा लवकर. उद्या बोलू आपण. चला ईशा, कनिष्का, सई खाटा टाका लवकर.मी आलेच......"

कणक आजीच्या खोलीकडे आली.

"मला तरी वाटतयं की तिने, काहीतरी भयानक बघितले. मला काहीतरी वेगळ वाटतयं." वत्सलेला आजी फोनवर आजचा घडलेला प्रकार सांगत होत्या.


कणक इकडे गुपचूप दाराच्या मागून कान देवून सर्व ऐकत होती.

"आता बस झालं...... मी.... मी उद्याच परभणीला येते. मी अजून कणकच्या जीवाला धोका होऊ देणार नाही. असं पण यांच्या आत्याचं च्या मुलीचं लग्न आटोपलं आहे. थोड्या काही गोष्टी बाकी आहेत. ते कणकचे बाबा करून घेतील.मी उद्याच निघते.ताईला-घरच्यांना सांग मी उद्या येतेयं...निघेल तेव्हा फोन करेल." फोन मधून आवाज आला.

आत्ताच आली असा वाव आणत कणक खोलीत आली.नंतर गोळ्या घेऊन ती खाटेवर जाऊन झोपली. व्हरांड्यात मस्त गार-गार हवा चालू होती,पण कणकला काही झोप लागत नव्हती .आज इतक्या पटकन सर्व घटना घडल्या होत्या की, तिला विचार करायला वेळच भेटला नाही....

"अरे आज जे पण झाले ना, त्याचं काही तर्क लागत नाही.आज जे घडलं ते स्वप्न होतं कि खरी घटना काय कळलं तर नाही पण जे मी बघितलं ते खरच झालंय.. खरंच सविता मावशी आपल्याबद्दल अशा विचार करायच्या आणि असं असेल तर आईने मला का नाही सांगितलं हे सगळं. हा........अहिश दादाऽऽऽऽऽऽ पण तो आता कुठेयं? काय करतो? कसा आहे? काहीच माहिती नाही.हाऽऽऽऽऽ मी या प्रश्नाचे उत्तर उद्या मावशीकडून घेईल. पण एक गोष्ट बरी झाली की, आजीने मला याबद्दल काही विचारले नाही.... नाहीतर मी तिला काय सांगितलं असतं. अरे हा उद्या आई पण येणार आहे नाही का....."
असा सारा विचार करत कणक अखेर झोपली.

सकाळी झोपेत असतांना कोणीतरी घरात आल्याची चाहूल कणकला लागली.तिने थोडं लक्ष दिलं.... आणि कानोसा घेत म्हणाली.

"अहिश दादा होता का....? बघ.. अजून मी काहीच विसरत नाहीये.माझा भ्रम नाहीतर कदाचित स्वप्न असेल..."

असं म्हणून कणक पुन्हा झोपली... आज वत्‍सलाबाई येणार म्हणून सर्व खुश होते. थोड्या वेळात काका वत्सलाबाईंंना घेऊन घरी आले. वत्सलाबाईंनी आल्या-आल्या कणकला जवळ घेतलं.

"माझं लेकरू गं....काय माहिती कोणाची नजर लागली त्याला? सत्यानाश होतो त्याचा....!"

"गप गं आई.... काही पण बोलते तू.."

"गप्प बसं.. इथे आल्यापासून जणू तुला नजरच लागून गेलीये."

"आता मला काय झालं? चांगली खणखणीत तर आहे मी..."

"होऽऽऽ मला नको सांगू.."

"बरं बाई जाऊ मी आता......."

"मी आत्ताच आली ना बस थोड्या वेळ माझ्याजवळ.... बरं कणक ऐक ना.... उद्या आपल्याला काकांकडे जायचं आहे... बंगल्यावर, काकांना भेटायला."

"अरे वा.... छान....बरं आम्ही घरातच बसून सोंगट्या खेळत आहोत."

मावशी आजीला आणि वत्सलाबाईंंना घेऊन मधल्या घरात जातात.

"काय झालं आहे? ते मला सविस्तर आणि खरं खरं सांगा. उगाचच माझ्याशी लपवण्यात काही अर्थ नाही. खूप दिवस झाले मला माहिती तुमच्या दोघांमध्ये काहीतरी चाललं आहे. सांगाल का काय झालंय ते?" कणकची मावशी चिंतेने म्हणाली.

"आता काय सांगू तुला? खूप मोठी गोष्ट आहे. पण सांगण्यावाचून गत्यंतर नाही."

वत्सलाबाई आणि आजी कणकची सारी हकीकत मावशीला सांगतात.

"हंऽऽऽऽऽऽ असं आहे होय.पण वत्सला तू चिंता करू नकोस या जगात देवाने दुःख आणि संकट दिले तर आहेच पण या सोबत सुखाचा देखील वाटा असतो हे विसरू नकोस.. धीर ठेव सगळं चांगलं होऊन जाईल."

"काय चांगलं होऊन जाईल? मागेच मी दोन दिवसात त्या बाबांकडे जाऊन आले त्यांना कणकच्या सोबत आता घडलेल्या सर्व घटना मी सांगितल्या त्यावर त्यांनी कणकच्या जीवनात त्या आत्म्यांनी कहर माजवायला सुरुवात केली आहे, आणि यापुढे अजून भयानक घटना तिच्यासोबत घडतील अशी चेतावणी देखील दिली आहे."

"हो अगं वत्सला तिच्या जीवाची चिंता आम्हाला पण आहे.पण आता तिला जपणं हाच यावर उत्तम उपाय आहे."

"म्हणजे काल घडलं होतं ते सत्य आहे. सविता मावशी जे बोलताय तसंच अगदी त्या बाबांनी आईला सांगितलं. याचा अर्थ ते सगळं खरं होतं???? मला तरी वाटते काल माझ्यासोबत गोठ्यात जे पण घडलं ना ती घटना ही खूप मोठ्या सं के त होती.... तिही संकटाचा....."
कणक मनात भयाने पुटपुटत होती. तिने सर्व गोष्टी ऐकल्या होत्या, ज्या त्या तिघी बोलत होत्या.

-ज्ञानेश्वरी ह्याळीज

क्रमशः

पुढील भाग लवकरच प्रकाशित होईल त्याआधी आपला अभिप्राय आणि रेटिंग आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की अभिप्राय लिहून सांगा.
धन्यवाद 🙏