कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 1 मुक्ता... द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 1

भाग-1
बर्‍याच दिवसांची परीक्षेला कंटाळलेली कणक मावशीचा फोन आल्याची चाहूल लागताच आनंदाने नाचू लागली."आपण आता मस्त मावशीकडेे पाचगणीला जाणार तेथेे राहणार ,मस्त मस्त पदार्थ खाणार ,खेळणार ,काकांसोबत शेतात जाणार,सई, ईशा ,कनिष्का सोबत खेळणार, रात्री जेवण झाल्यानंतर आजीची गोष्ट ऐकणार तीही भुताची,आमरसात तूप टाकून पुरण पोळी बरोबर खाणार सोबत सार भात आणि कुरडया वाह...! हे किती छान ,सगळं मनासारखं होईल..... मज्जाच मज्जा.... हुर्रे!!! आता आपली ही सारी स्वप्न सत्यात उतरण्यासाठी फक्त काही दिवसांची मुुदत हवी.एकदा की नई आपली परीक्षा संपली का....................,
मी कशाचाच विचार न करता सरळ आपलं परभणी गाठणारं. पुढचा विचार आपण नंतर करूया आधी आपण परीक्षा सन्मार्गी लावुया...." असा विचार करुन कणक अभ्यासाला बसली.
तिचे फक्त दोन पेपर राहिले होते ते म्हणजे , इतिहास आणि भूगोल . दोघी विषय तिचे आवडीचे आणि हातातले विषय की ज्यांच्यात ती पूर्ण गुण मिळू शकत होती...अशी ही खेळकर, आनंदी ,उत्साही , धाडसी, मनमिळावूू स्वभावाची ,चंचल मन असणारी आणि नेहमी रात्री झोपेत निरनिराळी भुतांची ,अत्रुप्त आत्म्यांची ,काळ्या जादूची थोडक्यात भुताटकिची स्वप्न बघणारी...तेरा वर्षांची कणक!!! आईला म्हणजे वत्सलाबाईंना (ज्यांना जवळजवळ सार गाव वत्सलाबाई म्हणायचं व याच नावाने ओळखायचं) यांंना कणकची नेहमीच चिंता लागलेली असायची. वत्सला बाईंचा तसा या गोष्टीवर खूप विश्वास होता .भूत ,प्रेत ,आत्मे या गोष्टी असतात यावर वत्सला बाईंचा आणि कणकच्या आजीचा अतोनात विश्वास होता. वत्सला बाईंना हे आवडायचं नाही की ,कणकला अशी स्वप्न पडायचे ,तेही रोज.. एकदा वत्सलाबाई आणि कणकची आजी दोघेही बाबाकडेे गेल्या.
हा बाबा माणसांची कुंडली भविष्‍य, भूत सांगायचा .या बाबांनी कनक च्या जीवनात स्वप्नदोष आहे असे तर सांगितले च पण आणखीन "या मुलीच्या जीवनात भुतांचा सहवास आणि अतृप्त आत्म्यांचा संचार आहे."असे स्पष्टपणे सांगितले.. हे ऐकता एखाद्या झाडाची पानं गळून पडावी तसे वत्सलाबाई आणि कनक च्या आजीची दशा झाली. या वर क्षणाचाही विचार न करता वत्सलाबाई म्हणाल्या , "पण बाबा यावर काहीतरी उपाय नाहीतर तोडगा नक्कीच असेल ना हो... मी जे पाहिजे ते करायला तयार आहे, पण फक्त माझ्या मुलीच्या जीवनातून ही पीडा काढा हो... मला नाही चालणार आणखी हे सगळं...मला सारखी तिची चिंता मनात दाटत असते.आईच्या जीवाला नुसती भय वाटते हो...काही तरी करा आणि ही भुताटकी काढा.... माझ्या कणकेच्या जीवनाला लागलेला गंज काढा हो बाबा..!!!" यावर तो बाबा म्हणाला ,"अगं ताई ,,,तु एवढी चिंता करू नकोस ..माझ्यावर विश्वास ठेव सगळं चांगल होऊन जाईल... "मला तुमच्यावर विश्वास आहे म्हणूनच तर मी तुमच्या या गुहेची वाट धरली ना हो.." वत्सलाबाई डोळ्यातील पाणी पदराने टिपत म्हणाल्या, "बाबा म्हणाले ते सगळं ठीक पण, ताई तुला एक काम करावा लागेल ते असं की, तुला कणक ची जन्मतारीख जन्म वेळ- काळ ,स्थान आणि डोक्याचा एक केस घेऊन माझ्याकडे यावं लागणार..." त्यावर वत्सलाबाई उत्सुकतेने म्हणाल्या ,"हो ठीक आहे चालेल ,पण यामुळे सगळं ठीक होईल ना हो मी हे.. हे सगळं सामान घेऊन कधी येऊ ते पण मला सांगा बाबा.." बाबा धीर देत म्हणाले ,"अगं ताई, तू याची चिंता करू नकोस. फक्त मी सांगतो अगदी तसेच कर. उद्या तू ठीक दुपारी दोन वाजेच्या दरम्यान माझ्याकडे ये..." यावर वत्सलाबाई आणि कनक ची आजी दोघांनी होकारार्थी मान डोलावली आणि दोघी गुहेच्या बाहेर पडल्या, आणि थेट वाड्यात आल्या.. वत्सलाबाई मनात विचार करत असतांना त्या आवारातील काम आटोपत होत्या," देवा काय रे ,माझ्या लेकराच्या मागे तू हे थोतांड लावलं ,, लावलस तर असू दे ते आता लवकर काढ रे बाबा.."
-ज्ञानेश्वरी ह्याळीज

क्रमशः
....