Kankachya svapratil kalpnechi katha - 3 books and stories free download online pdf in Marathi

कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 3

भाग-3

कणक ची परभणीला जाण्याची गोष्ट आठवताच वत्सलाबाई थोड्या संकोचून बाबांना म्हणतात, "अहो बाबा काय बात करताय?? कनक चा आज शेवटचा भुगोलचा पेपर आहे. तिचे पेपर संपताच ती दोन-तीन दिवसात परभणी ला जाणार आहे....मागच्या एक महिन्यापासून परभणीला जाण्याचं तिच्या डोक्यात आहे. त्यामुळे ती पुढच्या दोन-तीन दिवसात लगेच परभणी गाठेल .आणि मी देखील तिला वचन दिल होतं की, तुझे पेपर झाल्यानंतर तुला मी परभणीला मावशीकडे एक-दोन महिने नाही तब्बल चार- पाच महिने पाठवेल .आणि मग काय ठरल्याप्रमाणे ती दोन-तीन दिवसात जाईल परभणीला.. आता मी काय करू????"
बाबा थोडे विचार करून म्हणाले , "बरं जाऊ दे ताई जे झालं ते झालं..तुझं वचन मोडता कामा नये. तू एक काम कर, परभणीला तिला तू पाठव पण एकटी नाही....! एक तर तू तिच्या सोबत जा नाहीतर तिच्या आजींना तरी पाठव.जेणेकरून तुमच्या दोघांचं तिच्यावर लक्ष राहील.मी सांगितल्याप्रमाणे तिला या दिवसात एकट सोडणं योग्य नाही."
"पण बाबा मी तर कणकच्या बाबांसोबत त्यांच्या आत्याच्या मुलीच्या लग्नाला जाणार आहे... तर मी कस काय जाऊ तिच्यासोबत??"
बाबा हसून म्हणाले,"आता ते तुम्हीच बघा ही जबाबदारी तुमची आहे. तुम्ही जाल का, आजींना पाठवाल?" शंकेचं निवारण झाल्यावर वत्सलाबाई आणि कनक ची आजी दोघीही सांजेला घरी परततात. घरी परतताच कणकेच्या तोंडावरचा आनंद बघताच वत्सला बाईंना थोडस दुःख होतं.
"आता या पोरीला काय सांगू?इला नाही देखील म्हणता येणार नाही ..आणि मला देखील तिच्यासोबत जाता येणार नाही... मग मी आता काय करू??
वत्सलाबाई सारखा विचारच करत असतात. रात्री झोपायच्या वेळेस कणकची आजी आणि वच्‍छलाबाईंच ठरतं की ,कणकच्या आजीने च परभणीला जावं... जेणेकरून त्यांचं कनक वर लक्ष राहील आणि इकडे लग्न देखील पार पडेल.दोघेही विचार करून झोपी जातात.

दुसऱ्यादिवशी वत्सलाबाई त्यांच्या बहिणीला फोन लावून कणकची आणि आईची येण्याची खबर देतात. इकडे कनक तर खूपच आनंदात असते.जणू तिला आभाळ ठेंगणे वाटू लागते. एवढ्या दिवसांची आपली स्वप्न उद्या सत्यात उतरणार असा विचार करून ती आपली बॅग भरून लागते. चार-पाच महिने म्हंटल्यावर काय-काय घेऊ आणि काय-काय नाही असा विचार करणारी कणक त्याप्रमाणे वागून मैत्रिणींसोबत खेळायला जाते.वत्सलाबाई मात्र कणकच्या आजीला कणकला जपण्यासाठी च्या सूचना देत असतात.

सकाळ होताच 9 च्या गाडीने कणक, कणक चे बाबा आणि आजी तिघेही स्टेशनला पोहोचतात. कणक ला आणि आजींना कणक चे बाबा गाडीत बसून निघून जातात. परभणी ला जायचं म्हणजे सहा-सात तासांचा प्रवास...! अखेर प्रवास सुरू झाला. कणक मस्त मजेत प्रवासाचा आनंद घेत होती. इकडे मात्र वच्‍छलाबाई चा जीव लागत नव्हता.
"देवा माझं लेकरू आणि आई सुखरूप पोहोचु दे रे बाबा..! बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यासोबत काही प्रसंग उद्भव व्हायला नको."

फक्त एक दीड तास वेळ घालून कनक झोपी जाते.बसचा ड्रायव्हर अचानक एका ठिकाणी गाडी थांबवतो. त्यावर बसमधील लोक त्याला विचारपूस करतात त्यावर तो म्हणतो, "अरे बाबा किती वर्ष झाले गाडी चालवायला, पण मात्र अशी प्रवासात कधीच गाडी बंद पडली नाही. काय झालं काय माहिती? गाडी बंद झाली... त्यामुळे मी खाली उतरलो आणि पाहतो तर काय गाडीचा चाक पंचर झालयं...कनक ची आजी इकडे वत्सलाबाईंना फोन करते आणि सर्व घडलेला प्रकार सांगते. त्यावर वत्सलाबाई म्हणतात, "अगं आई म्हणून देवाने संदेश दिला आहे. परभणी ला जाऊ नका मला वाटलं होतं. माझ्या कणकेच्या जीवाला धोका आहे.मी तिच ऐकायलाच नव्हतं पाहिजे.तिला जाऊच दिलं नव्हत पाहिजे."
"शांत होस नी असं काही नाहीये हे असंच झालं असेल.पंचर वगैरे काही नाही जाऊदे आता ठेवते फोन. परभणी ला गेल्यावर फोन करेन.."
एक-दीड तासाने पंचर वगैरे काढून झाल्यानंतर नऊ वाजेची निघालेली बस पाच वाजता परभणीला पोहोचते.
स्टेशन पासून खाली मळ्यात बारा किलोमीटरचा रस्ता होता.फोन केल्याप्रमाणे कणकचे काका स्टेशन जवळच उभे असतात.लगेच कणक आणि कणक ची आजी गाडीवर बसून मळ्यातल्या घरी पोहोचतात.घरी गेल्याबरोबर वत्सलाबाईंना फोन होतो. दोघे दमून आल्यामुळे दोघी थोड्यावेळ आराम करतात.आणि रात्रीचे रस-पुरणपोळीचे पोटभर जेवण होताच सगळे कुटुंब सवयीप्रमाणे बाहेर व्हरांड्यात खाटा टाकून थंड हवेचा आनंद लुटत असतात,आणि इकडच्या-तिकडच्या गप्पा मारत असतात. रात्री सगळे झोपी जातात. तेवढ्यात जोरात वाऱ्याने व्हरांड्यातलं नारळाचे दनगट झाड चुटकीसरशी खाली पडतं. सगळे घाबरून गेले. एवढं 18 वर्षापासून उभं असलेलं नारळाच दनगट झाड खाली पडलं. तेही वाऱ्याने....असे सगळे आश्चर्यजनक गोष्टी व्यक्त करत होते.काकांनी आणि काही लोकांनी ते नारळाचे झाड बाजूला सारलं. "याची खबर आता आपण उद्या घेऊ" असं म्हणून सारे घरदार झोपले. मात्र कनक ला काही झोप येत नव्हती.सकाळची आजी आणि आईची बोललेली गोष्ट तिला आठवते ती जेव्हा लपून-छपून आजी आणि आईची गोष्ट ऐकत असते तेव्हा तिला असं लक्षात येतं की, आईने मुद्दामच आजीला माझ्यासोबत पाठवला आहे कारण आजी माझ्यावर लक्ष ठेवू शकेल भुतांच्या आत्म्यापासून...!म्हणजे आई जे बोलते आहे ते खर आहे.... माझ्या पाठीशी अत्रुप्त आत्म्याची साथ आहे..आणि एवढेच नाही तर परवा देखील आपण आजी आणि आईच्या तोंडाने त्या गुहेतल्या बाबाची सारी गोष्ट ऐकली होती. मला खूप भीती वाटते आहे . खरंच तर नाही ना आपल्या मागे एवढे पाच भूत ? म्हणूनच परभणीला येण्याआधी बस बंद पडली आणि आता हे दनगट नारळाचे झाड एवढ्याशा वाऱ्याने जमीनदोस्त झालं....आजी मला जे गोष्टी सांगते त्या खर्‍या तर नाहीत ना? खरच माझ्या मागे भुतांचा सहवास आणि संचार असेल तर ??? तिच्या मनात असे भयानं विचार येत होते तोच तिचा छोटा भाऊ नयन झोपेतून उठला आणि मळ्या च्या दिशेने चालू लागला. तिला वाटलं, अरे एवढ्या रात्री भरगच्च अंधारात नयन कुठे चाललाय?पण तिला वाटलं जाऊदे याला झोपेत चालण्याची सवय असेल....मात्र पाऊणतास गेला तरी नयन परत झोपायला आला नाही.शेवटी कनक उठली आणि नयन च्या शोधात मळ्याच्या दिशेने निघाली तिने खूप शोधाशोध केली ,पण नयन काही तिला सापडला नाही. आपण काकांना जाऊन सांगू या विचाराने जेव्हा कनक परत येत होती तेव्हाच......!!
- ज्ञानेश्वरी ह्याळीज

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED