ए आई मी टॅटू काढू का ग..?? कायराने उत्सुकतेने आईला विचारले.
टॅटू..?? पण टॅटू काढताना दुखत ना ग..?? सुई फिरवतील ना हातावर..?? आणि तुला साध इंजेक्शन घेताना सगळे देव आठवतात मग टॅटू कसा काय काढशील..?? नंतर हात दुखत बसेल ग बाळा... आई काळजीच्या सुरात म्हणाली.
अग आई काही नाही ग जास्त काही Pain होत नाही. आणि मला ना काढायचा आहे ग टॅटू... भारी वाटत हातावर..
ठिक आहे काढ मग टॅटू... पण नंतर मात्र माझा हात दुखतोय... हात दुखतोय अस बोलत बसायच नाही... permission देत आईने समज दिला.
हो माते... हात जोडत हसत कायरा म्हणाली.
काहीवेळाने कायराने अदित्यला घरी टॅटूसाठी permission मिळाल्याचे सांगितले.
Hey कायरा तुला कोण काही बोलणार तर नाही ना... i mean टॅटूमधे हा A कुणाचा आहे तर तु सांगशील कि मित्राच्या नावाचा A आहे तर तुला कोण काही ओरडणार बोलणार तर नाही ना..?? अदित्यने कायराला मेसेज करून ती ऑनलाईन येण्याची वाट बघत बसला.
इकडे कायराच्या मोबाईलवर मेसेजची टोन वाजली. Lock screen वर message from Aditya असे दिसत होते. कामात व्यस्त असलेल्या कायराला मेसेज टोन ऐकूच आली नाही. फ्री झाल्यावर कायराने सहज म्हणून फोन हातात घेतला.
अरे कोण काय बोलेल..?? आणि का बोलेल अदित्य..?? आणि समजा कोणी विचारलच कि K for kayra कळले but A for कोण..?? असे विचारले तर आहे ते सांगेन कि माझ्या buddy च नाव A वरून आहे. त्याचाच A आहे आणि त्यानेही सेम असाच टॅटू काढला आहे. आमच्या मैत्रीचा टॅटू कायराने अदित्यच्या मेसेजला रिप्लाय दिला.
कायराचा रिप्लाय वाचून अदित्यला आनंद झाला.
ठिक आहे... म्हणत अदित्यने संमती दर्शविली.
ए ढापणे आई म्हणत होती कि कियू टॅटू काढणार आहे... खर आहे का..?? खर तर मला टॅटू काढताना तुझा face imagine करून खूप हसायला येतय... राहुल... कायराचा मोठा भाऊ हसत तिला चिडवत म्हणाला.
ए मॅगी तुला कितीवेळा सांगितल आहे कि मला ढापणी वगैरे अस काही बोलू नकोस म्हणून नाहीतर मी पप्पांना नाव सांगेन तुझ... कळल ना मॅगी कुठला... नाक मुरडत कायरा राहुलला टपली मारत म्हणाली.
ए काय ग माझ्या केसांवरून काय मॅगी मॅगी बोलतेस येडपट... ह्या माझ्या curly hair वर लाखो पोरी फिदा आहेत... राहुल आपल्या curly केसात हात फिरवत म्हणाला.
लाखो पोरी..?? दादा काय पण हा... अरे निदान मला पटेल अशी तरी थाप मार रे... कायरा हसू आवरत म्हणाली.
ए जास्त दात काढू नकोस... कळल ना... राहुल थोड वैतागत म्हणाला.
ओके म्हणत कायरा शांत बसली.
बर ते टॅटूच काय..?? खरच काढणार आहेस का टॅटू..?? राहुलने विचारले.
हो दादा मी आणि अदित्य सेम टॅटू काढणार आहोत... कायरा म्हणाली.
कोण अदित्य..?? तो तुझा क्लासमेट का..?? राहुल एक भुवई उंचावत म्हणाला.
हो तोच अदित्य पण माझ्या मित्रांविषयी बोलताना तु तोंड का वाकड करतोस..?? कायराने नाकावरचा चश्मा ठिक करत विचारले.
अग माझ्या आई अस काही नाही. डिझाईन दाखवना मला.. काहीतरी ठरल असेलच ना... राहुलने हुशारीने विषय बदलला.
अरे हो wait हा तुला pic दाखवते... अस म्हणत कायराने A & K असलेला टॅटूचा pic राहुलला दाखवला.
A & K चा टॅटू बघून राहूलचा चेहरा बदलला. कायराच्या ते लक्षात आले.
What happened दादा..?? नाही आवडला का टॅटू..?? कायराने राहुलच्या चेहर्यावरचे बदलते भाव वाचण्याचा प्रयत्न करत विचारले.
कियू हे बघ टॅटू छान आहे पण अदित्यच्या नावातला A हा आयुष्यभर तुझ्या हातावर राहिल... राहुल serious होत म्हणाला.
हो माहितेय मला आणि त्यात चुकीचे काय आहे..?? कायरा सहजतेने म्हणाली.
अग बाळ अस काय करतेस.. आता बघ उद्या तुला मुलगा बघायला आला तर त्याला आवडेल का आपल्या बायकोच्या हातावर तिच्या नावासोबत मित्राच नाव आहे... अस कोणत्या नवर्याला आवडेल..?? तुच सांग... राहुल समजावणीच्या सुरात म्हणाला.
पण दादा मी अशा माणसाबरोबर लग्नच का करू..?? ज्याला माझ्यावर विश्वासच नाही... कायरा म्हणाली.
मी अशा मुलाबरोबर लग्न करेन ज्याला माझ्यावर विश्वास असेल... ज्याला अदित्यवर विश्वास असेल... ज्याला आमच्या मैत्रीवर विश्वास असेल... कायरा अगदी सहजपणे म्हणाली.
अग तुला काय हे सगळ इतक सोप वाटत का..?? चल आपल्या family च ठिक आहे. आई बाबा दोघेही तुला ह्या टॅटूसाठी नाही म्हणणार नाहीत पण कियू बाळा या समाजाच काय..?? भलेही तुमची मैत्री कितीही pure पवित्र असली तरीही ह्या समाजासाठी तु आणि अदित्य मुलगा मुलगी आहात.. समाज तुमच्याकडे मैत्रीच्या नात्याने नाही बघत तर एक मुलगा मुलगी म्हणून बघतात. आणि म्हणूनच मी तुला एकटीला त्या अदित्य बरोबर कुठे पाठवत नाही. Doesn't mean I don't believe in you किंवा माझा अदित्यवर विश्वास नाही. समाजाने तुमच्याकडे एक couple ह्या नजरेने बघू नये हा Intension असतो माझा. राहुल बोलायचा थांबला.
दादा I don't care what society thinks about me..!! माझी family माझ्याबाबत काय विचार करते हे माझ्यासाठी Matter करत दादा. माझ्यासाठी family important आहे समाज नाही. बोलता बोलता कायराच्या डोळ्यात पाणी आले.
हे माहित आहे मला. पण आपण ह्या समाजात राहतो आणि आपल्याला समाजाचे नियम पाळावे लागतील. अदित्य आज तुझ्या सोबत आहे. उद्या असेल. परवा सोबत असेल पण आयुष्यभर तो तुझ्या सोबत नसणार. त्याला स्वतःचे आयुष्य आहे त्या आयुष्यात त्याचे mom dad आहेत उद्या बायको असेल. मुल होतील. त्यात तो गुंतेल. आपल्या आयुष्यात busy होईल. तो तुला आतासारखा वेळ पुढे आयुष्यात नाही देऊ शकणार. कारण तेव्हा तो त्याच्या आयुष्यात busy असणार. तु म्हणतेस तुमच्या मैत्रीला न समजणार्या मुलाबरोबर तु लग्न करणार नाहीस. Suppose in case कोणत्याच मुलाला तुमची इतकी घट्ट मैत्री आवडली नाही तर तु कोणत्याच मुलाशी लग्न करणार नाहीस का..?? अशावेळी तो अदित्य करणार आहे का तुझ्याशी लग्न..?? इतकी हिंमत तेव्हा असेल का त्याच्याकडे..?? तो मुलगा आहे त्यालाही problems येणारच ह्या टॅटूवरून. पण कियू बाळा तो मुलगा आहे. त्याच्यापेक्षा जास्त problems तुला येणार कारण तु मुलगी आहेस. समाज कितीही पुढे जाऊदे. प्रगती करूदे. मुलगी कितीही शिकली. मुलाच्या खांद्याला खांदा लावून काम करूनही आजही मुलींना दुय्यमच स्थान आहे. काही मुल असतात जी मुलींना importance देतात. त्यांना त्यांच आयुष्य हव तस जगू देतात पण अशी मुल खूप rare आहेत ग... राहुल बोलायचा थांबला. त्याने कायराकडे पाहिले. तिच्या डोळ्यात पाणी होत. राहुलला वाईट वाटल.
मला तुला hurt नव्हत करायच कियू... राहुल कायराच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
नाही दादा. मी तुझ्यामुळे नाही दुखावले गेले. मी नेहमी माझाच विचार करत होते. माझ्या मैत्रीचा विचार करत होते. मी कधी ह्या समाजाचा विचार केलाच नाही. ह्या समाजाचे काही नियम आहेत जे सगळ्यांनीच follow करायला पाहिजे. मी ज्याच्यासाठी ह्या समाजाचा विचार करत नव्हते तो माझ्यासाठी future मध्ये समाजाच्या विरुद्ध जाईल की नाही हे मलाही माहित नाही. कायराच्या आवाजात दुःख होते.
अदित्य चुकीचा मुलगा नक्कीच नाही. पण आज तु त्याची priority आहेस. उद्या लग्नानंतर त्याची priority बदलेल. तेव्हा बाळ तुला त्रास होईल. लोक म्हणतात की मैत्री करावी तर निस्वार्थी करावी. मैत्रीत उपकाराची भाषा नसावी. Expectations नसावी. पण माणूस हा प्राणी आशावादी आहे. तो कोणत्याही गोष्टीत आशा धरून असतोच.
I know दादा... कळाल मला तुला काय समजावायचे आहे ते. आणि मी समजले सुद्धा... कायरा आता बरीच सावरली होती. राहुलला लक्षात आले छोटी छोटी म्हणता बरीच मोठी झाली आहे आपली कियू.
अदित्य आपण A & K चा टॅटू cancel करून दुसरा काहीतरी सेम टॅटू काढू... कायराने अदित्यला मेसेज केला.
का ग..?? तु तर ओके म्हणाली होतीस ना..?? I mean तुला काही problem नव्हता ना..?? मग आता अचानक अस का म्हणतेस... अदित्यचा लगेच रिप्लाय आला.
त्यावर राहूनने जस तिला समजावले तसेच तिने अदित्यला समजावले. अदित्यलाही ते बर्यापैकी पटले. दोघांनाही A & K चा टॅटू cancel केला.
समाप्त.