Before marriage sex..?? books and stories free download online pdf in Marathi

Before marriage sex..??

आज तु फारच छान दिसत आहेस संजना... संजनाकडे बघत अक्षय म्हणाला.

Thank you... संजना लाजत म्हणाली.

तुझे हे सौंदर्य मी अजून जवळून बघू शकतो का संजना...संजनाच्या जवळ जात अक्षय ने विचारले.

अक्षयला आपल्या इतक्या जवळ येताना बघून संजना गोंधळली.. जसे अक्षयची पाऊले संजनाकडे वळली तसे आपसूकच संजनाची पाऊले मागे झाली.

अक्षयला कसे थांबवावे हे तिला कळत नव्हते. तर तिचे मागे सरकणे म्हणजे ती आपल्याला पुढच्या गोष्टींसाठी परवानगी देत आहे असे अक्षयला वाटले.

अक्षय संजनाच्या जवळ गेला. त्याने तिच्या कमरेत हात टाकून झटक्यात तिला आपल्याजवळ ओढले. अक्षयच्या ह्या कृतीने संजना बावरली. अक्षय असे काही करेल हे तिला अपेक्षित नव्हते.

अक्षय काय करताय हे तुम्ही.. सोडा ना प्लीज... संजना अक्षयच्या राकट पकडीतुन सुटायचा प्रयत्न करत म्हणाली.

अक्षयने काही सेकंद विचार केला आणि मग त्याने संजनाला सोडले. संजना क्षणाचा विलंब न करता लगेच अक्षयपासून लांब झाली. अक्षयला वाटले संजना लाजली. पण खरे पाहता संजना मुळात थोडी घाबरली होती आणि त्याला कारण ही तसेच होते. ह्या आधी कधी ती कुणाच्या इतक्या जवळ गेली नव्हती.

संजना स्वतःला शांत करत होती कि इतक्यात अक्षयने तिला उचलून घेतले व सरळ बेडवर टाकले.

सर्वप्रथम संजनाला कळलेच नाही की काय झाले जसे तिला कळले की आता पुढे काय होईल तशी ती पटकन बेडवर उठून बसू लागली तसे अक्षयने तिच्या दोन्ही खांद्याना पकडून तिला झोपवले. आता संजना खूपच घाबरली होती..गोंधळली होती.

अक्षय काय करताय तुम्ही.. डोक ठिकाणावर आहे का तुमचे... चिडून संजना म्हणाली. संजनाच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत अक्षयने आपला शर्ट काढून बाजूला टाकला व तो संजनाला kiss करणार इतक्यात संजनाने त्याला थांबवायचा प्रयत्न केला.

आता संजनाची भीती अधिकच वाढली होती.

अक्षयने संजनाच्या गळ्यातील ओढणी काढून टाकली व तो पुढे काही करणार इतक्यात संजनाच्या भीतीच्या जागी आता रागाने जागा घेतली.

शरीरात होती नव्हती तितकी सगळी ताकद लावून संजनाने स्वतः वरून अक्षयला बाजूला ढकलले व क्षणाचा विलंब न करता आपली ओढणी घेऊन ती बेडवरून खाली आली.

अक्षय संजनाकडे आश्चर्याने बघत होता कारण संजना आपल्याला स्वतःवरून बाजूला ढकलेल हे त्याला अजिबात अपेक्षित नव्हते.

काय झाले संजना... अक्षयने विचारले.

लाज नाही वाटत का तुम्हाला तोंड वर करून विचारायला काय झाले... संजनाने रागाने अक्षयलाच उलट प्रश्न केला.

का ह्यात काय लाज वाटण्यासारखे आहे..?? तु माझी होणारी बायको आहेस.. आपला साखरपुडाही झाला आहे मग हे सगळे साहजिकच आहे ना... अक्षय म्हणाला.

आपले लग्न ठरले आहे अजून झाले नाहीये... संजना रागात अक्षयला म्हणाली.

What do you mean संजना..?? तुला माझ्यावर विश्वास नाहीये का..?? आता अक्षयही चिडला होता.

विश्वास... संजना उपहासात्मक हसली तिचे हे हसणे अक्षयला बरेच टोचले कारण कुठे ना कुठे तरी संजनाने कळत नकळत त्याचा so called पुरुषी अहंकार दुखावला होता.

तुमच्यावर विश्वास ठेवूनच तर इथे आले होते मी... संजना म्हणाली.

अग पण अस इतक केल तरी काय मी..?? फक्त थोडी शरीरसुखाची अपेक्षा तुझ्याकडून केली. ह्यात काय चुकीचे आहे..??

मी तुम्हाला इतक्या वेळा थांबवायचा प्रयत्न करत होते तरीही तुम्हाला थोडेतरी कळले नाही का..?? संजनासंजनाने विचारले.

अगदी पण ह्यात काय चुकीचे आहे..?? मी लग्नानंतर तुझ्याजवळ आलो की तेव्हाही असेच मला थांबवणार आहेस काय तु..?? अक्षयने उलट प्रश्न केला.

अर्थातच अक्षय. लग्नानंतर माझी इच्छा नसताना तुम्ही माझ्या जवळ आलात तर तुमच्या आणि एका rapist मध्ये फरकच काय राहिला..?? आणि राहीला प्रश्न ह्या सगळ्यात चुकीचे काय आहे.. हे सगळे साहजिकच वगैरे जे काही तुम्ही म्हणालात तर हो मला वाटते लग्नाआधी sex करणे चुकीचे आहे कारण practically विचार केला तर लग्न झाले नाहीये. लग्नाआधीच sex ची घाई का..?? आणि sex नंतर तुमचे लग्न त्या व्यक्तीबरोबर झाले नाही तर..?? शक्य आहे का मग तुम्हाला त्या व्यक्तीला विसरणे..?? शरीराने एकत्र आल्यावर माणसाचे मन आपसूकच समोरच्या व्यक्तीमध्ये गुंतले जाते. पुढे भविष्यात ज्या व्यक्तीबरोबर लग्न होईल त्या व्यक्तीवर हा अन्याय होणार नाही का.?? पुढे आयुष्यात आपल्याला सतत हि खंत वाटणार नाही का की आपण समोरच्या व्यक्तीची फसवणूक करीत आहोत.

अक्षयच्या प्रतिक्रियेची वाट न बघता संजना एकदाही मागे वळून न बघता निघून गेली.


समाप्त


वाचकमंडळी तुम्हाला काय वाटते लग्नाआधी sex करणे योग्य आहे का..?? आणि योग्य आहे तर कारण काय..??

इतर रसदार पर्याय