खरी मैत्री राजश्री द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

खरी मैत्री

सोनाली एका आयटी कंपनीत बंगलोरला कामाला होती. तिचे आईवडील, छोटा भाऊ मुंबईत होते. सोनाली लहानपणापासून अभ्यासाव्यतिरिक्त इतर बाबतीतही हुशार होती.त्यामुळे काॅलेज संपायच्या अगोदरच तिला एका आयटी कंपनीत नोकरीचा काॅल आला.खूप चांगली अपाॅरच्युुुुनिटी असल्याने तिने हि संंधी सोडली नाही.
आईवडील दोघांनीही तिला समजवायचा खूप प्रयत्न केला.पण सोनालीला डोळ्यासमोर बंगलोरच दिसत होते. शेवटी तिने आपल्या शिक्षकांचा सल्ला घेतला. शिक्षकांनीही तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. त्यांची एक नातेवाईक बंगलोरला रहात होती.तिच्याकडे सोनालीची सोय होण्यासारखी होती. आईवडील आता निर्धास्त होते. पण अचानक त्या नातेवाईकांना परगावी जावे लागले.
सोनालीने नेटवर सर्च करून एका अपार्टमेंंटमध्ये जागा मिळविली. तिच्याबरोबर अजूनही तिघीजणी होत्या. तश्या त्या जवळपास रहात होत्या. पण कामाच्या अनियमित वेळा असल्याने त्यांना इथे रहाणं सोयीस्कर पडत होते.
घरमालकाच्या ओळखीने त्यांना कामाला एक बाई मिळाली. त्यामुळे तिघीजणी आता पूर्ण लक्ष आपल्या कामावर देवू शकत होत्या. तिच्याबरोबर तिची लहान मुलगी पण येत होती. सोनालीने तिची चौकशी केली.तिला शाळेत अॅडमिशन घेवून दिले.अशाप्रकारे सोनाली नेहमीच दुसर्यांचा विचार करत असे.
सोनालीचा सर्व वेळ कामात जात असे.ति नेहमी पुढच्या परीक्षा देत होती.तिच्या कामाच्या हुशारीने तिला एकामागोमाग एक बढती मिळत गेल्या. आता ती एका हायर लेवलला काम करत होती.
सर्व काही व्यवस्थित सुरू होते. मार्च महिना उजाडला. सगळीकडे कोरोनाचे वारे वाहू लागले. त्याची खबर यांना अगोदरच लागली होती. कारण भारताअगोदर अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार माजला होता.कंपनीने सर्वांना वर्क फ्राॅम होमची फॅसिलिटी दिली.
सोनालीबरोबरीच्या तिघीजणी आपल्या आपल्या घरी परत गेल्या. सोनालीला तर ते शक्य नव्हते. वाहने सर्व बंद होती.लाॅकडाउन 1 सुरू झाले होते. कधी नव्हे ते सोनालीच्या अंगावर काटा उभा राहिला.
. पहिल्या प्रथम तिने घरात सामान भरलं. आता पूर्ण घरात ती एकटीच होती. तिला आपल्या आईवडीलांची भावाची प्रकर्षाने आठवण येत होती. भावाबरोबरची भांडणे ,बाबांचे रागावणे ,आईचं काळजी करणे सगळे तिला आठवत होते.काम नसेल तेव्हा तिला घर खायला उठायचे.तासनतास ती खिडकीत विचार करत बसुन रहायची.
सोनालीच्या ऑफिसात रिया काम करत होती. दोघांमध्ये कामात नेहमीच स्पर्धा व्हायची.कधी सोनाली तर कधी रिया भाव मारून जायची. रियाला सोनालीचा खूप हेवा वाटायचा.
एकदातर दोघांमध्ये एका कामावरून तू--तू--मै--मै झाले होते. कंपनी एका ट्रेनिंग साठी एकाला जपान ला पाठविणार होती.त्यासाठी दोघींना एका प्रोजेक्ट वर काम करण्यास सांगितले होते. दोघींनी खूप मेहनत घेतली होती.पण ऐन वेळी रिया आजारी पडली आंणि ती आपला प्रोजेक्ट वेळेवर सबमिट करू शकली नाही. त्यामुळे अर्थातच सोनाली ला जपानला जाण्याची संधी मिळाली. तेव्हापासून दोघींही एकमेकांशी बोलत नव्हत्या.
पण आताशा सोनालीच्या कामात खूप चुका होवू लागल्या होत्या. तिला समजत होते पण मानसिक अस्थिरतेमुळे ती काही करू शकत नव्हती .माणसांत रहायची सवय असल्याने एकटेपणा खायला उठायचा.तासनतास ती घरच्यांशी फोनवर बोलत बसायची.आता वरिष्ठ तिला काम कमी द्यायला लागले. तिचे काम रियाला देण्यात येत होते.त्यामुळे तर ती अधिकच दुःखी झाली.
जेव्हा रियाला सोनालीविषयी समजले ,तिने सर्वप्रथम ही गोष्ट आपल्या आईवडिलांच्या कानावर घातली.सगळ्यांनी मिळून खूप विचार केला आणि दुसर्या दिवशी रियाचे बाबा सोनालीच्या घरी गेले.त्यांनी सोनालीला समजावले आणि तिला आपल्याबरोबर घरी घेऊन आले.
सुरवातीला सोनाली खूप बिचकायची पण रीयाच्या मैत्रीपूर्ण व्यवहाराने सोनालीचा बुजरेपणा कमी होत गेला.तिला सगळी आपलीच माणसं वाटू लागली.आता रिया आणि सोनाली एकत्र काम करू लागल्या.रियाच्या आईवडीलांनी तर सोनालीला दमच भरला की आता पूर्ण ठिक होईपर्यंत तिने कोठेही जाता कामा नये.सोनालीला तर त्यांना काय बोलावे तेे सुचत नव्हते.
सोनालीला आज खरच परगावी पण आपल घर मिळाले होते आणि रियासारखी बहीणपण.............


सौ. राजश्री राजेंद्रकुमार मर्गज
मिरारोड.