छत्रपती संभाजी महाराज - 1 शिवव्याख्याते सुहास पाटील द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

छत्रपती संभाजी महाराज - 1

आज मी लिहिणार आहे ते समाजातील अनेक लोकांना माहीत असेल किंवा नसेल .
लिहिलेला आहे ते अगदी खरं आहे म्हणून प्रत्येकाने शांत मन ठेवून वाचावं आणि मला प्रतिक्रिया सांगावे काय शंका असेल तर माझा भ्रमणध्वनी क्रमांक देतोय नक्कीच मला अवश्य सुचवा आणि त्याबद्दल बोला माझा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 86 68 68 15 47.

नाचू कीर्तनाच्या रंगी एक रंग होऊ जगी असं म्हणत ज्यांनी वारकरी धर्म पंजाब मध्ये प्रत्येक प्रांतात प्रांतांमध्ये पेरला संत श्रेष्ठ नामदेव महाराज
राजे तुमचा सावली न सूर्य सुद्धा झाकला असता पाहून पराक्रम तुमचा मुजरा करण्यासाठी चंद्रही वाकला असता
आमच्या डोळ्या पुढे तुमच्या स्वागताच्या कथा रंगविल्या गेल्या ज्याने पाहिला पराक्रम इंद्रा भीमा भंगवल्या गेल्या राजे आम्ही तुमच्या रक्ताचे असुन सुद्धा फितुरांचा जयघोष केला तुम्ही मातीसाठी मरुन सुद्धा आम्ही तुम्हालाच दोष दिला कसं कसं सहन केलं राज तापत्या सळ्या डोळ्यात घुसतांना आमच्या तर डोळ्यातुन पाट वाहतो साधा डोळ्यामध्ये कचरा जाताना आमच्या डोक्यात मुंग्यांचा कल्लोळ माजतो साधी जीप दाताखाली आल्यावरती कसं सहन केलं राजं तुमची जीभ कापताना किती किती यातना सहन केल्या तुम्ही कानातून धुराचा लोट निघता अंगावरची कातड सोलाताना , प्रत्येक वेळेस तुमच्या शरीराचे लचके तोडताना , तुम्हाला जखमा केल्या त्यांचा हात सुद्धा थरथरले असतील तुम्हाला यातना पोचवना एवढं सुद्धा असून सुद्धा आम्ही पुजतो 33कोटी दगड धोंड्यांना तुमच्या लक्षात आलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय कुणाबद्दल लिहितो स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी राजे याबद्दल आम्ही आतापर्यंत ऐकलं वाचलं पाहिलं ते काय अगोदर पाहूया(समाजामध्ये ऐकले पाहिले वाचलं जे खोट आहे त्या अगोदर लिहितोय त्यानंतर संभाजी महाराजांबद्दल लिहण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे पूर्ण वाचा मग ठरवा मला काय म्हणायचं आहे ते)

काही इतिहासकार लिहितात
संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांच्या पोटाला जन्माला आलेला एक पोरगा काहीजण तर म्हणतात शिवाजीच्या पोटी साफ जन्माला अरे काय काय लिहिले माझ्या राजा बद्दल
लहान पाण्यात आई वारली आजीने त्याला सांभाळ केला महाराजांसोबत आग्र्याला जाऊन आला तरुणपणात टांगे पणा करणारा तुळसा थोरातांची कमळा गोदावरी यासारख्या पोरींना दादाला लावणारा,

प्रत्येक वेळेस व्यसन करणार दारू पिणारा,.
मोगलांना जाऊन मिळणारा,
महाराजांनी त्याला परत आणून कैद्याचे टाकला पन्हाळा वरती आणि शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तुरुंगाची गज तोडून रायगडावरती येऊन वेताळ सारखा वागणारा अनाजी दत्तो बाळाजी आवजी यासारख्या सस्वराज्याची काळजी घेणाऱ्या महान अशा थोराना हत्तीच्या पायी देऊन,
आपल्या आई सोयराबाई यांना भिंतीमध्ये टाकणार,
हत्ती सत्ता आली थोड्याशा लढाया करणारा आखे र औरंगाबादसारख्या देवासारखे माणसाच्या हातात गाफिर राहून सापडणारा अफजल खान म्हणतो तुम्ही मुसलमान धर्म स्वीकारला मी तुम्हाला आमची मुलगी देतो तो मुसलमान हो (अहो संभाजी महाराजांना कैद केलं त्यावेळी संभाजी महाराजांचा वय होतं 30 मध्ये आणि झिनततूनिसा होतीस 46 वर्षाचे मग सांगा कोणता तिसरीतला मुलगा पन्नाशीतल्या बाई बरोबर लग्न करायला तयार होईल जे पण लिहिला आहे. अगदी मूर्खपणाचा कळस आह.)
आणि नंतर औरंगजेबने त्यांना मारलेला
असा उग्र कृती अविचारी व्याभिचारी शिवरायांचे राज्य बनवणारा सूर्याच्या पोटी शनिश्वर असे आतापर्यंत आम्हाला संभाजी महाराज शिकवला गेला त्यावर ते आम्ही नंदीबैल यासारख्या माना डोलावून ह्यासारखे वस्तुस्थिती काही नाही
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४मे १६५७ रोजी सकाळी दहा वाजता आई सईबाई यांच्या उदरातून झाला गडावरती सगळ्या चौघडे वाजू लागले सगळीकडे आनंदी वातावरण असताना हरहर महादेवची गर्जना झाली सह्याद्रीच्या दर्या खोर्यातून उठली ,अरे मावळ्याच्या यअंगावर मूठभर चढल यवनांना आणि सांगू लागला आला आला तुमचा तुमचा कर्दनकाळ जन्माला आला
ज्या माणसानं आयुष्यभरात कधी सुखाचा तोंड पाहिला नाही पाहिले नाही त्या राजावर .

त्यांच्यावर अन्याय लहानपणापासूनच नियतिने चालू केला लहान वयातही आई असून तीच दूध तिला पिता आलं नाही म्हणून दूध आई झाली ती नसारपूरा कापुरवळ गावच्या गाडे पाटील यांच्या पत्नी धाराऊ त्यांना 26 होण मानधन देऊन त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या दूध आई झाल्या.
वेगळ्या गोष्टी आजीकडून ऐकल्या महाभारत रामायण हे बाळकडू त्यांना त्यांच्या आजी म्हणजेच राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ कडून शिकत गेले.
जसे मोठे होत होते तसतसे शिवरायांच्या विचारांचा पगडा पराक्रमाचा देखावा पाहून माझा शंभू राजा घडू लागला अरे कमळाच्या पाकळ्याप्रमाणे रे प्रल्हादाच्या खंबा सारखे आयाळ विस्तारलेले नेत्र पिंजारलेले अशा स्वरूपामध्ये माझा संभूराजा घडू लागला त्याचबरोबर काव्य करू लागला संस्कृत भाषा शिकू लागला लिहू लागला वाचू लागला साहित्य राजनीति युद्धनीती विचाराने माणुसकीचा वसा ह्यासारखा पैलू आत्मसात करू लागला नव्हे तर 14 भाषा बोलू लागला प्रेमळ मनमिळावू भोळा शिवशंकर होता माझा राजा छत्रपती संभाजी राजे
हा भाग पहिला आहे यानंतर वरील भाग जसा वेळ भेटेल तसा लिहित राहील
जर काही चुकलं असेल तेल मला नक्की कळवा माझा भ्रमणध्वनी क्रमांक मी अगोदर सांगितलं आहे तर अशा करतो की तुम्ही मला लवकरात लवकर रिप्लाय जरूर द्या आणि माझ्या शब्दांना खूपशी ताकद द्याल धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या भागात जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे

शिवव्याख्याते सुहास पाटील (पंढरपूरकर)