छत्रपती संभाजी महाराज - 2 शिवव्याख्याते सुहास पाटील द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

छत्रपती संभाजी महाराज - 2

नमस्कार वाचक मित्रांनो

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे



आता कुठे आवश्यक खोपडीत शिक्षणाचा कोंबडा आरवला आहे , म्हणून आम्ही आता लिहू लागलो वाचू लागलो इतिहास समजून घेऊ लागलो .
ज्या वेळी संभाजी महाराजांचा इतिहास वाचला त्यावेळेस आमच्या लक्षात येतं संभाजी राजांचे चरित्र बिघडवलं आहे आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे त्यामुळे दुसर्‍या भागामध्ये संभाजी महाराजांच्या जीवनावरती मी प्रकाश टाकण्याचे काम करतोय आशा आहे की तुम्हाला ते आवडेल , आणि खरा छत्रपती संभाजी राजा तुम्हाला कळेल हीच अपेक्षा होती मी लिहिण्यास सुरुवात केली आहे

छत्रपती संभाजी महाराज भाग दुसरा (०२)
शिक्षण आणि संस्कार:-
एखादा राजपुत्राला आवश्यक असणारे आणि भावी राजा म्हणून शोभावं असं शिक्षण मासाहेब जिजाऊ आणि शिवरायांनी संभाजी महाराज देण्यात आलं होतं तलवार चालवणे घोड्यावर बसणे मल्लयुद्ध खेळणे धनुष्य बानू चालवणे भाला फेकणे दांडपट्टा चालवणे डोंगर चढणे उतरणे व युद्ध शिक्षणावर भर दिला याशिवाय बौद्धिक शिक्षणाची राज्यकारभाराला आवश्यकता असते त्याच्यासाठी राज्यशास्त्र अर्थशास्त्र न्यायव्यवस्था कवा काव्यालंकार पुराने हेही शिक्षण संभाजी महाराज शिकत होते
भाषाप्रभुत्व:-
अनेक भाषा बोलता येणारा, नुसता बोलता येत नव्हत्या तर , अभ्यास असणारा एक जाणकार राजा होता उदाहरणार्थ पाहूया मराठी येते कन्नड तिथे संस्कृत येते इंग्रजी येते उर्दू येते फारसी येते अशा अनेक भाषांमध्ये समाज भारत पारंगत झाले
आपण संभाजी महाराजांना आदर्श मानतो एवढच काय

अहो संभाजी राजे अण्णा नेपोलियन बोनापार्ट हा सुद्धा संभाजी महाराजांना आदर्श मानत होता
पहिल्याआणि दुसर्‍या महायुद्धात ब्रिटन जर्मनी विरुद्ध युद्ध करताना संभाजीराजांचं युद्धतंत्र अभ्यास वापरलं होतं ब्रिटन जर्मनी फ्रान्स इटली यांनी संभाजी राजांचे युद्ध तंत्र वापरलं तसा उल्लेख इतिहासात आढळतो.
नेपोलीन युद्धभूमीवर हजर असताना बरोबरच्या सैनिकांना एकाच वेळी दहा हजार सैनिक वाढले आहेत असं बळ प्राप्त होत असत अगदी त्याचप्रमाणे संभाजी महाराज युद्ध भूमीवर हजर असताना प्रत्येकी सैन्याच्या अंगामध्ये बारा हत्तीचं बळ संचारला जायचं युद्ध जिंकण्यापेक्षा मनामनातून युद्ध संभाजी महाराजांच्या नावाने सुद्धा आणि उपस्थित असल्याने जिंकलं जायचं संभाजी महाराजांची युद्धनीती ज्याप्रकारे होती त्याप्रकारे नेपोलियन बोनापार्ट त्याने ती स्वीकारली होती (आता सुधा संभाजी महाराज यांचे नाव काढले तरी आमचं रक्त ससळते)

योद्धा संभाजी महाराज तयार होण्यासाठी:-

आज आम्हाला वाटतं आम्ही शूर वीर झालो पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे झालो पाहिजे, छत्रपती शंभू राजांचा सारखा झालो पाहिजे मग त्यासाठी आम्ही काय करतो तर एखादी टोपी घालून कुठल्या तरी रंगाचा झेंडा हाती घेऊन नारा देणारा हा युवकांमध्ये शिवाजीमहाराज आणि संभाजीमहाराज निर्माण होईल का असा प्रश्न मला पडतो अरे शिवरायांनी संभाजी महाराज व्हायचा असेल तर दिशा ध्येय जिद्द धाडस कर्तुत्व आणि समाजासाठी जगणं आमच्या अंगी यायला हवं आमच्या अंगी निश्चय असायला पाहिजे , शिस्त असायला पाहिजे, दिशा ठरवण्यात लक्ष बसलो पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं समर्पण आमच्या अंगी असले पाहिजे मग तेव्हा कुठं त्यांच्या सर्कल बनण्याच्या वाटेवर चालू लागु किंवा त्यांच्या विचारसरणीचा जवळ कुठे तरी आम्ही पोहोचू
पण आजचे युवक त्यांचे ते ध्येय आहेत
१:-मोबाईल, २:-पैसा, ३:-मोटार गाडी चोपडा आमच्या प्रत्येक युवकांची झाली आहेत( एक सुंदर प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला थोरांची विचारवंतांची ची जयंती आम्ही साजरी करतो त्यांच्या नावाचा आम्ही जयजयकार करतो आमचा जय जय कार कुणी करत नाही आमचे जयंती कोणी करत नाही आम्हाला चारचौघात कोणी ओळखत नाही का असा प्रश्न आमच्यासारख्या तरुणांना आज पडतो मग मला वाटतं करण समाजातल्या थोर वीर पुरूषांनी त्यांचे जीवन समाजासाठी जगणं होतं . त्यांच्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती ती प्रत्येक थेंब प्रथम या मातीमध्ये मातीसाठी सांडला होता म्हणून त्यांच्या जयंती आम्ही साजरा करतो .
पण आमचं कसा झालाय आमचीच गाडी, आमचीच वाठी , आमच्या वाडीतील आमची माडी आणि त्यामध्ये बायकोची गोल गोल साडी यामध्ये आम्ही बांधून गेलो त्यामुळे आम्ही अडकून गेलो मग आम्ही समाजामध्ये किंवा समाजासाठी काही देणं लागतच नाही हीच भावना आमच्या मनामध्ये आहे मग सांगा खरंच आमच्या जयंत्या कोणी साजरा करत का?)

हो घराचा वासा पोकळ असेल तर घर टिकेल का म्हणजे घर टिकणार नाही य ज्याचे चरित्र अचार विचार भक्कम असतात ते पुष्कळ जीवनात सदाचाराचा मार्गाने जातात आणि आपले ध्येय निश्चित गाठतात
आमच्या मातीतला इतिहास आम्हाला सांगतो की मरणासाठी ही झुंज आमच्या वीर पुरुषाने दिली व त्याच मातीमध्ये आम्ही युवक प्रेमामध्ये आणि परीक्षा मध्ये नापास झालो आपल्या प्राणाची हत्या करू लागलो तर यासारखी लाच्छनास्पद जीवन काय कामाचे?
आज आम्ही
शरीर फिट राहवं म्हणून जिम जॉईन करतो पण मनालाही बळकटी मिळावी संभाजी महाराजांचे चरित्र वाचायला हवा
शिवाजी महाराजांच्या चरित्रातून
राष्ट्र निष्ठेचासुगंध येतो
जगण्यावर प्रेम करणारी माणसं जीवन प्रेमी असं म्हणतात
मरणालाही प्रेम करणारी माणसं संभाजी महाराज सारखी असलेली माणसं म्हणून समाजामध्ये जन्माला येतात ही खरी वस्तुस्थिती आहे

एवढे असून सुधा संभाजी महाराज बदल आमच्या समजत काय समाज आहे ,हे तर मी पहिल्या भागात सागितले आहेच
संभाजी महाराज बदनाम केले ते पाहूया
शिवरायांच्या तेजस्वी इतिहासाला ओजस्वी बनवण्याचे फार मोठे काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं होतं छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे नऊ वर्षे अखंडपणे रक्षण करणारा छत्रपती संभाजी महाराज तलवारीच्या धारेला शिवाजी महाराजांच्या विचारांचा पाणी होतं
परंतु काही इतिहासकारांनी साहित्यिकांनी नाटककारांनी कादंबरीकारांनी बदनाम करून टाकला
अरे संभाजी महाराज म्हणजे रंगेलं संभाजी महाराज म्हणजे रगेल संभाजी महाराजा म्हणजे व्यसनी संभाजी महाराज म्हणजे चारित्र्यहीन अशाप्रकारे छत्रपती संभाजी राजांची चारित्र्य बदनाम करून टाकलं
दुधामध्ये मिठाचा खडा टाकावा शुद्ध असो दूध पवित्र करून टाकावा असं काम अनेक लेखकांनी संभाजी महाराज बदल केला होता
कोऱ्या दुधामध्ये पाणी वतून पाणीयुक्त दूध म्हणून संभाजी महाराजांचे चरित्र विकणारे इतिहासकाराणे केलं पण दुधात किती वारी पाणी असलं तरीही राजहंस हा पक्षी दुध वेगळ आणि पाणि वेगळ करतो त्याच प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्याला न्याय देणारा इतिहास कार्यास मातीमध्ये घडले छत्रपती संभाजी महाराज आम्हाला कळू लागला आणि माझ्यासारखा की वक्ता लेखकाच लिहू लागला
पाहूया संभाजी महाराजांचा इतिहास कोणत्या नराधमांनी लीला पहिली सुरुवात केली ती म्हणजे मल्हार रामराव चिटणीस हा कोण होता तो स्वराज्याचा चिटणीस बाळाजी आवजी यांचा हा वंशज होता स्वराज्य दोन हात अण्णाजी दत्तो मोरोपंत बाळाजी आवजी राहुजी सोमनाथ पुराव्यानिशी आढळले छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना पकडून देऊन हत्तीच्या पायी दिले म्हणून तो राग काढण्यासाठी बाळाजी आवजी चिटणीस यांचा वंशज त्यांना संभाजी महाराजांच्या बद्दल राग काढणारी बकरे लिहिली आणि त्या रामराव चिटणीसांनी संभाजी महाराजांचे चरित्र बिघडून टाकलं चंद्रावर सुद्धा डाग आहे पण माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावर डाग पडणार नाही एवढा पवित्र माझा राजा नराधमाने घेण्याचा प्रयत्न केला
जानी पिक्चर काढले जुनी नाटके बनवली त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र बदनाम करून टाकले
सूर्याकडे बघून थूकले तर थुकी आपल्या तोंडावर पडते छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करायचा प्रयत्न केला त्यांना एवढंच कळलं नाही कर्तव्य म्हणावा लागेल

मला सांगा यामध्ये दोष कोणाचा शिवपुत्र संभाजी महाराजाचा का गरजू खाणाऱ्या प्रति भावाच्या लेखनीचा

ते एवढ्यावरच थांबले नाहीत छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये नको नको ती स्त्रीपात्रे खालून संभाजी महाराजांचे चरित्र बदनाम करण्यात आला ते कशा प्रकारे आपण पाहूया

1) थोरातांची कमळा:-
पन्हाळ्याच्या पायथ्याशी कमरेचे स्मृतिमंदिर आहे संभाजी राजांचं नाव कांबळे बरोबर जोडला आहे ही लोककथा चित्र पाठवून नाटकातूनही कथा दाखवली जाते तर खरा इतिहास काय सांगतो पन्हाळ्याच्या पायथ्याशी बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या अशी लढत असताना त्याला छातीत भरून लागून तो मरण पावला आणतो मिळाला म्हणून त्याच्या पत्नीचे मध्ये किती गिरी आणि त्यांच्या भाऊबंदकी नाही त्यांचं मंदिर बांधलं पण त्याच त्या त्यासंबंधी वरून अनेक इतिहासकारांनी थोरातांची कमळा ची समाधी दाखवून संभाजी महाराजांच्या चरित्र बदनाम करण्याचे काम आणि किती ही दुर्दैवाची

2) गोदावरी ची कथा:-
संभाजी राजांचा गोदावरी बरोबर नाव जोडण्यात आला रायगडाच्या पायथ्याशी गोदावरीची म्हणून जी संबंधित दाखवली जाते सवाई माधवराव पेशवे यांची स्त्री यशोदाबाई यांची समाधी आहे परकराच्या योगामध्ये त्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्या समाधीच्या नावावर गोदावरीची संबंधी म्हणून अनेकदा रंगवल्या गेल्या संभाजी महाराजांना बदनाम करणारे इतिहास कार थोडासुद्धा विचार न करता संभाजी महाराजांच्या चरित्रावर डाग पाडण्यात आली

3) हंसा:-
अनाजी दत्तो ची मुलगी हंसा यांच्याबरोबर संभाजीराजांचा प्रेमप्रकरण होतं अशी कथा रंगोली गेली असं म्हणतात त्या मुलीला भेटण्यासाठी संभाजी महाराज गडाच्या पायथ्याशी येत असत पाणी भरण्यासाठी हंसा गडाखाली येत असे तिथे दोघांची भेट होत असे अशी काल्पनिक मांडणी हरामखोरांनी केली आहे. परंतु द मिलिट्री सिस्टिम ऑफ मराठा या संशोधनात्मक ग्रंथ डॉक्टर सेन म्हणतात, शिव काळातील किल्लेदार गडाचे दरवाजे सायंकाळीच बंद करत होता स्वतः शिवाजी महाराज आले तरी तो दरवाजा उघडता आणि तो दरवाजा उघडायचा तो सकाळीच ते आपल्या सर्वांना माहीत आहे एवढं असताना छत्रपतीसंभाजीमहाराज गडाचे दरवाजे उघडून खाली जातील का हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्याच्याही पुढे सांगायचं म्हटलं अनाजी दत्तो हा सर्वसामान्य माणूस नव्हता अष्टप्रधानमंडळातील एक महत्वाचे मंत्री होता एखाद्या मंत्र्याची मुलगी घागर घेऊन गडाच्या खाली पाण्या भरण्यासाठी जाईल का आजकालच्या आमच्या साध्या पुढार्‍याची पोरगी घरातून निघून पाणी भरायचं सोडा घरात पाणी भरत नाही, मग त्या वेळेस मंत्र्याची पोरगी गडाच्या खाली पाण्यासाठी जाईल का हा प्रश्न तोच तो इतिहासकार लिहितो यावरून लक्षात होतं छत्रपती संभाजी महाराजांचा बदनाम करण्यासाठी लेखक कोण कोणत्या थराला जाऊन लिहिले कारण त्यांना माहिती एवढे लिहू सुद्धा आपलीच बदनामी होणार आहे तरीही ते उघड लिहितात आणि तोच इतिहास आम्ही वाचून त्याच्यावर विश्वास ठेवून नंदीबैल यासारख्या मानवा डोलतो यासारखे दुर्दैव अमच्या राजाचं काहीच नाही

यामध्ये काही चुकीच आढळल्यास तर मला बोला हे माझे स्वतःचे विचार नसून ज्या इतिहासकारांनी लिहिले आहे हे ते फक्त माझ्या शब्दांमध्ये लिहिण्याचे काम मी करत आहे
फक्त निमित्त आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र याला न्याय द्यावा हाच माझा उद्देश ठेवून तुमच्यासमोर लिहिण्यास मी छोटासा प्रयत्न करत आहे नक्कीच आवडल्यावर आणि नाही आवडल्यावर प्रतिक्रिया जरूर द्या तुम्हाला आवडली तरे लिहिण्यासाठी थांबणार नाही किंवा नाही आवडली तरी लिहिण्यासाठी थांबणार नाही
काही तक्रार असेल तर माझा भ्रमण क्रमांक तुम्हाला देतो संध्याकाळी नऊच्या पुढे मला नक्कीच कॉल करून विचारू शकता धन्यवाद 🙏🙏🙏

पुढचा भाग लवकरात लवकर येईल त्यासाठी आतासारखं वेळ लावणार नाही

आमचं तुमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय आणि जय शंभुराजे ही संकल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये मला पोहोचवायची आहे

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
🚩शिवव्याख्याते सुहास पाटील (पंढरपुरकर)🚩