प्रेम - वेडा भाग १ Akash Rewle द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम - वेडा भाग १

------------- २ मार्च २०१२ ------------


अनिरुद्धला फॅमिली फंक्शन्स कधीचं आवडले नाहीत , पण तरी वडिलांच्या निर्णयापुढे त्यांचे काही एक चालले नाही . आणि आज त्याला गुरव परिवारांच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यास भाग पडले होते .



सोबत आपल्या वयाचे कोणीच नसल्याने त्याला तो कार्यक्रम कंटाळवाणा वाटू लागला होता , तेवढ्यात त्याची नजर एका लहान मुलीवर पडली ... तिला खेळताना पाहून त्याचा चेहरा खिळला .... वेळ तर तसंही जात नव्हता तर त्या लहान मुलीसोबत खेळावे या विचाराने तो तिच्या दिशेने जाऊ लागला ....


पण त्याच वेळी तिथे एक सुंदर मुलगी येवून पोहचली व त्या लहान मुलीसोबत खेळू लागली होती . तिचे गाल ओढू लागली होती .

ती मुलगी खूपच सुंदर दिसत होती , त्या लहान मुलीसोबत खेळताना तिचा भोळेपणा , तिचे हास्य तो निरखून पाहू लागला होता . हे सर्व बघण्यात तो एवढा रमला होता की बाजूने त्याची बहीण दिपाली त्याला बोलवत आहे हे त्याला कळलं देखील नाही ...


" अनिरुद्ध "

" अनिरुद्ध "

" अनिरुद्ध "


ओय अनी ...


अचानक दचकून तो भानेवर आला आणि म्हणाला .

" हा ... !!! बोल ना ताई काय झालं ?"


" कोणाला बघतोय एवढा !!! इथे ओरडून ओरडून माझा गळा बसला माझा अन् तुला आवाज देखील ऐकू येत नाही आहे !!?? छान चाललंय तुझं !! वाटलं एकटा बोर झाला असशील म्हणून तुझ्या जवळ आले तर राजे तर इथे बहिरे होवून बसलेत !!!


" तस काही नाही !! तिथे बघ ना बाबू किती छान दिसतेय !! "


दिपाली हसत म्हणली " हो तुझी बाबू जास्तच छान दिसतेय , तसे तुझ्या बाबुचे नाव दर्शना पाटील आहे !! "



" ताई तुझा काहीतरी गैरसमज होत आहे ... मी त्या लहान मुली बद्दल बोलत होतो , आणि तुला नाव कसं माहिती तीच ??? "


दिपाली - त्या लहान मुलीचेच नाव दर्शना आहे ...!!"


मला माहिती आहे तुला त्या सुंदर मुलीचं नाव ऐकायचं आहे ...!!!



अनिरुद्ध - नाही ग ताई !!! अस काही नाही ...



दिपाली - मग नको सांगू ना ?? !!!


अनिरुध्द - ऐकुन तसंही काय होणार आहे ??? २८ वर्षाचा झालोय अजुन एक प्रीयसी नाही !!!


दिपाली - बस कर रडू नकोस आता ... तीच नाव अंकिता गुरव आहे ...!! आणखी एक ..राहील सांगायचं ..", एक धक्का आहे तुझ्या साठी घरी पोहचलास की कळेल . !! "


येवढं बोलून दिपाली तिथून निघून गेली .


अनिरुद्ध (मनातल्या मनात )- 'छान नाव आहे " अंकिता " ..'


पण अनिरुद्ध हाचं विचार करत होता की ' आता घरी कोणत नवीन संकट त्याची वाट पाहत आहे ????


कार्यक्रम संपल्यावर ... घरी पोहचून , आराम करण्यास अनिरुद्ध आपल्या खोलीत जातच होता तेवढ्यात .,.


वडिलांनी त्याला बोलावले , ..

वडील - जरा महत्त्वाचं बोलायचं होत , बस इथे ...


अनिरुद्ध वडिलांच्या बाजूला असलेल्या खुर्चीवर बसला .


वडील सोफ्यावरून उठले अन् खुर्चीच्या मागे जाऊन दोन्ही हात अनिरुध्दच्या खांद्यावर ठेवले .


अनिरुद्ध मनातल्या मनात विचार करू लागला .


बाबा दुसऱ्यांदा अस खांद्यावर हात ठेवून काही तरी बोलत आहेत , खांद्यावर हात ठेवून बोलण्याचा जुना प्रसंग काही चांगला नव्हता ..

पहिल्या वेळेस बोलले होते तेव्हा गोवाची ट्रीप कॅन्सल केली होती ... आता कोणता नवीन धक्का ??? .



वडील - " एक मुलगी पसंत केली आहे तुझ्या साठी ... !!! उद्या जायचयं त्यांच्या घरी , मुलगी बघायला "!!


हे ऐकुन त्याला खरंच खूप मोठा धक्का बसला होता . तो वडिलांना म्हणाला " बाबा मला लग्न नाही करायचंय तुम्हाला माहिती आहे ना अजून वेळ आहे माझ्या लग्नाला . "


यावर त्याचे वडील म्हणाले " असे स्तळ शोधून मिळणार नाही , मुलगी सुद्धा शिकलेली आहे , सुंदर आहे , एकदा भेटून तर बघ ... जर आवडलीच नाही तर ठरव पुढचं पुढे ."


पण अनिरुद्धला पहिल्याच नजरेत अंकिता आवडली होती ...हे वडिलांना सांगू ही शकत नव्हता .. म्हणून तो सरळ म्हणाला " नाही बाबा मी नाही करणार लग्न "


अनिरुद्धची आई त्याला खूप समजवायचा प्रयत्न करत होती पण तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता .


व रागा रागात आपल्या खोलीत जाऊन बसला .

मागोमाग त्याची बहीण दिपाली तिथे आली व म्हणाली

अजून एक धक्का देवू का तुला ??


तो बोलला येवढं झाल अजून काही बाकी आहे का सांगायचं ???


यावर दिपाली म्हणाली " हो खूप काही आहे "


अनिरुद्ध चिडून बोलू लागला ", प्लीज मला एकट सोड ;!!! नको धक्के देवूस मला ."


दिपाली पुन्हा हसत म्हणाली " अरे असा काय करतोयस ... एकदा भेटून तरी ये अंकिताला , छान मुलगी आहे.... आवडली तरच लग्नाला होकार दे , कोणी जबरदस्ती थोडीच करणार आहे ."


नाही करायचंय मला लग्नं ... किती वेळा सांगू !! मला नको अजून त्रास देवूस !!! पूर्ण दिवस खराब केला आता रात्र पण नको !!!


काही क्षण गेल्यावर त्याच्या लक्षात आल आणि तो हसत म्हणाला .

काय ????

अंकिता ???

खरंच ????


दिपाली हसत म्हणली " हो , पण तू तर लग्नाला नकार दिलास ...

आई वडील येवढं समजवत होते पण तू समजला नाहीस .


अनिरुध्द - काही तरी मदत कर ना !!!


दिपाली - " दिवस खराब गेला , आता माझ्या मूळे उगाच रात्र नको खराब करुस तुझी .." येवढं बोलून दिपाली हसत निघून गेली .


अनिरुद्ध आता स्वतःवरच हसत होता .


तो लगेच आई जवळ पोहचला व म्हणाला ...

" आई लहान पणापासून तू माझा किती लाड पुरवलेस ... तू माझी एवढी काळजी घेतेस अन् तुला आवडलेल्या मुलीला मी बघण्यास देखील नकार दिला , मी खूप विचार केला आणि मला माझी चूक कळली आहे , तुझी पसंत ती माझी पसंत आई !!!


आईने तिरक्या नजरेने रागाने अनिरुद्ध कडे पाहिले व म्हणाली " माझ्या पुढे तू काहीही बोल काही फरक पडणार नाही . तुझ्या वडिलांनी आताच त्यांना फोनवर तुझा नकार कळवला आहे . वाटलच तर जा आपल्या वडीलांना समजव ."


अनिरुद्धला काहीच सुचत नव्हते त्याचा पोपट झाला होता ... धाडस करून तो वडिलांच्या खोलीत शिरला वडील जणू त्याचीच वाट बघत होते .

अनिरुद्ध आत येताच त्याला बोलले " तुझं म्हणणं पटलय मला ," तुला काय हवंय , काय नकोय "...

हे आम्ही विचारायला हवे होते ,... पण आम्ही , आम्हाला काय हवंय .!!! तेच लादत होतो तुझ्यावर . ..

तुला हवं त्या मुलीशी लग्न कर आणि हवं तेव्हा कर काही बंधन नाही . !!!!


यावर अनिरुद्ध डोकं खाजवत म्हणाला " बाबा तुम्ही माझा वाईट विचार कराल का ??

तुम्ही जे कराल ते माझ्या चांगल्या साठीच कराल , तुम्ही सांगाल त्या मुलीशी विवाह करायला तय्यार आहे मी ....


वडील - " मुलगी बघ , विचार कर मग ठरव ... अस उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग सारखं नको करुस .!!


अनिरुद्ध - बरोबर आहे तुमचं !! तुम्ही सांगाल तसच !!!


यावर वडील म्हणाले खरंच का ???

ठीक आहे तर ठरल उद्याच जातोय आपण गुरव यांच्या घरी त्याची मुलगी आहे अंकिता , मला आणि तुझ्या आईला आवडली ... तुझ्या ताईला पण आवडली ...

आता फक्त तुझी पसंती राहिली आहे ..

मुलगी बघण्या साठीच तर तुझी बहीण सासर वरुन माहेरी आली आहे ...


हे ऐकुन अनिरुद्धला आपल्या बहिणीवर राग येत होता , पण तेवढाच आनंद होत होता .


त्याचा आनंद गगनात मावत नव्हता ...


आपला आनंद लपवत श्रावण बाळाप्रमाणे मान खाली घालून आपल्या खोलीत शिरला ...

अन् जसा खोलीत शिरला तसा दरवाजा लावून नाचू लागला ..!!!


त्याला त्याचं जग मिळालं होत .


---------- ०३ मार्च २०१२ ------------


दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे सर्व अंकिताच्या घरी पोहचले ...

अंकिताने सर्वांसाठी चहा आणला ..

पण अनिरुद्ध ची नजर तिच्यावरून सरकतच नव्हती ....


शेवटी ज्याची वाट तो आतुरतेने पाहत होता ती वेळ आली .

अंकिताचे वडील (बाजीराव) हसत म्हणाले " अंकिता ज अनिरुद्धला तूझी खोली दाखव !! अन् आम्हाला ही इथे मोकळ्या गप्पा मारायला मिळतील "


अंकिता पुढे जाऊ लागली आणि तिच्या पाठी पाठी मी चालत होतो .

मी पहिल्यांदा असा कोणत्या मुली सोबत , आई वडिलांच्या परवानगीने खोलीत जात होतो ....


काहीच सुचत नव्हतं काय बोलू .

खूप काही बोलावंसं वाटत होत मात्र शब्द सुचत नव्हते .

दोन मिनिटे झाली होती कोणीच एकमेकांना काहीच बोलले नाही , पूर्ण खोलीत भयाण शांतता पसरली होती ... एखादी सुई जरी पडली असती तरी तिचा आवाज कानापर्यंत येवून पोहचला असता . मला ही शांतता नकोशी झाली होती तिचा आवाज ऐकायची इच्छा मला आतून खाऊ लागली होती ... शेवटी मीच बोलण्याचा पराक्रम केला .

व म्हणालो " काल तुमच्या घरातील कार्यक्रमा मद्धे तुम्हाला पाहिलं , पहिल्या नजरेत तुम्ही आवडलात मला . व घरी पोहचल्यावर कळलं की तुमच्याच सोबत लग्नाची बोलणी करून आई वडिल आले होते .

किती सुंदर नशीब आहे ना माझं !!!


अंकिता सर्व शांत ऐकत होती पण अचानक काय झाल देवास ठाऊक ती अचानक म्हणली " लग्नाला नकार द्याल का तुम्ही ???


तिचा आवाज ऐकुन मन तृप्त झाल होत पण नकार ऐकुन मात्र मनाचे तार छेडल्या गेल्या होत्या ..

मन बैचेन झाल होत .


मी तिला विचारले " का पण मला तुम्ही आवडला आहात मी कसा नकार देवू शकतो ?? आणि का देवू नकार ?? .. जर तुम्हाला नकार दिला तर लोक तुम्हाला वाईट समजतील की मुलीमध्ये काहीतरी दोष आहे म्हणून मी लग्नाला नकार दिला ... आणि तुमच्यात दोष आहे अस माझ्या एका नकारामुळे कोणी सांगितलेलं मला अजिबात आवडणार नाही ...


यावर ती म्हणाली माझ्या जवळ याच उत्तर नाही फक्त तुम्ही लग्नाला नकार द्या मी तुमच्या पुढे हात जोडते पाया पडते !!!


हे ऐकुन व तिला विनवणी करताना बघून मला खूपच वाईट वाटत होत शेवटी मी नकार देण्यासाठी मान्य केलं ...


माझ्या पायाखालची जमीन सरकली होती ...

मला काहीच कळत नव्हत ... म्हणतात ना आपल्याला आवडलेली गोष्ट सहजा सहजी मिळत नाही आणि मला मिळत होती तेव्हा नशिबाने नवीन धक्का दिला होता .


---------- क्रमशः ----------