prem - veda - 2 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम - वेडा भाग २











म्हणतात ना आपल्याला आवडलेली गोष्ट सहजा सहजी मिळत नाही आणि मला मिळत होती तेव्हा नशिबाने नवीन धक्का दिला होता .

अनिरुद्ध बाहेर आला तेव्हा सर्व आपसात बोलत होते .
सर्वांचं बोलण होई पर्यंत तो काहीच बोलाला नाही ...

शेवटी ९ मार्च ही लग्नाची तारीख निश्चित केली गेली ...

अनिरुद्ध व सर्व परिवार आपल्या घरच्या दिशेने निघाले .
घरी पोहचल्यावर आपल्या वडिलांना त्याने सांगितले .

" बाबा मला मुलगी नाही आवडली "

या वाक्याने त्याचे वडील गोंधळले व डोक्यावर हात मारून म्हणाले ...
" कसं शक्य आहे कालच दिपाली आम्हाला म्हणाली होती की तुलाही अंकिता आवडली आहे... आणि आज अचानक हे ,
अरे मुर्खा ९ मार्च ही तारीख निश्चित केली आहे लग्नाची ... तारीख ठरवताना देखील काही म्हणाला नाहीस .!!!
मुलगी पसंत नव्हती तर तिथेच का नाही काही बोललास ?? , लग्न म्हणजे खेळ समजते आज कालची पिढी !!!!


अनिरुद्ध - माझी हिम्मत होत नव्हती बाबा .!!!

वडील - मग आता कशी झाली हिम्मत ???

वडिलांनी आईला आवाज देवून म्हणू लागले ... " बघ , कसा पोर जन्माला घातला आहेस ,... नकार होकार मग होकार ?? उद्या लग्ना नंतर हा म्हणेल " माझं प्रेम नव्हत तुमच्या सांगण्यावरून केलं होत लग्न !!! "

ने मनिमन विचार केला आणि वडिलांना खर सांगायचं ठरवलं . व घडलेला सर्व प्रकार सांगितला .

वडील आता चिंतेत दिसू लागले होते ... ते अनिरुद्धला म्हणाले " तू काळजी करू नकोस , मी बोलतो अंकिताच्या वडिलांशी . ... काहीतरी गैरसमज होत असेल , कारण कालच अंकिताने लग्नाला होकार दिला होता ....."

अनिरुद्ध वडिलांच्या खोलीतून बाहेर पडला पण त्याच्या मनात अंकीताचे ते शब्द फिरत होते , तो हाच विचार करत होता की तिने लग्नाला नकार का दिला असेल ,
साधारण एका तासा नंतर अंकीताच्या वडिलांचा त्याला फोन आला आणि ताबडतोब त्याला भेटायला बोलावले .

., घरी पोहोचण्या पर्यंत त्याच्या मनात वेगवेगळे विचार येवू लागले होते . अखेर तो अंकीताच्या घरी पोहोचला !!!

घरात अंकिता कुठेच दिसत नव्हती !!!

अंकीताच्या वडिलांनी त्याला विचारले " तुला अंकिता आवडली होती ना , मग लग्नाला नकार का देत आहेस ??"

अनिरुद्ध ने त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली .

यावर तिचे वडील गालातल्या गालात हसले व म्हणाले , एवढच ना ??

" अंकितावर एका मुलाने काळा जादू केला आहे , म्हणून ती अशी वागत आहे ... काल पर्यंत ती लग्नाला तय्यार होती पण त्याच मुलाने पुन्हा काहीतरी केलं असावं "

अंकिता लग्नाला तय्यार होती हे जाणून अनिरुद्ध खुश झाला होता .
त्याने त्या मुलाबद्दल विचारलं " कोण आहे तो मुलगा आणि का अस करतोस ??
तुम्ही का काही केलं नाही यावर ?? "
आणि खर सांगू तर तर मला काळा जादू , नवस टोटका यावर बिलकुल विश्वास नाही ...

अनिरुद्धला मध्येच थांबवत ते म्हणाले . " म्हणून तर तुला इथे बोलावलं आहे , त्या मुलाला अंकिता आवडली आहे पण अंकिताने त्याला कित्येकदा नकार दिला पण त्याने हे नवीन कारस्थानं केलं ,... काल त्याने आत्महत्येची धमकी दिली होती त्याच टेंशन मद्धे अस बोलली असेल .
अंकिताच्या लग्नानंतर तो काहीच करू नाही शकणार , म्हणून सांगतोय लग्नाला नकार देवू नकोस तूच मदत करू शकतोस अंकिताची "

अनिरुध्दला काहीच समजत नव्हत , अंकिता इतकी सुंदर आहे की कोणीही तिच्या प्रेमात पडेल हे तर सहाजिक आहे , पण अस आत्महत्या वैगेरे त्याला नाही पटल ...

अनिरुद्ध - तुम्ही पोलिसांची मदत का नाही घेतली ??

अंकीताचे वडील - " एका मुलीचा बाप आहे , समाजात मुलीच्या चारित्र्यावर दाग लावणारे भरपूर आहेत , त्यांना फक्त एक लहान कारण हवं असत ,!!! जो स्वतः ला संपवू शकतो तो दुसऱ्याला काय काय करेल ? अन् पोलिसांना कलवणल्या नंतर त्या मुला कडून काही वाईट कृत्य घडवून आणू नये म्हणून ... तस ही अॅसिड अटॅक किती वाढत आहेत ... भीती वाटते या सर्व गोषटींची ..!!!


अनिरुद्धने थोडा वेळ विचार केला पण त्याच्या समोर अंकिताचा तो हसरा चेहरा त्याला सतत आठवू लागला अन् ह्याच्या पुढे काही न विचारता होकार दिला आणि म्हणाला ...

" ...मी तयार आहे लग्नासाठी... "

---------- ८ मार्च २०१२ ----------

लग्नाच्या एका दिवसा आधी गुरव परीवारात लग्नाची तय्यारी मोठ्या थाटामाटात सुरू होती . पण अंकिताच्या डोळ्यात मात्र अश्रू होते . त्याच अवस्थेत ती आपल्या वडिलांच्या खोलीत शिरली ...
वडील फोनवर कुणाशी तरी बोलत होते ,

" आज नंतर तो प्रॉब्लेम दिसला नाही पाहिजे , होईल तेवढ्या लवकर सोडव तो प्रॉब्लेम .!!

अंकिता आत येताच त्यांनी कॉल कट केला व अंकिता जवळ जाऊ लागले होते . पण अंकिताने त्यांना दूरच थांबवलं व म्हणाली " का करत आहात पप्पा असे ???
मी झाली आहे ना लग्नाला तय्यार !!!
मला फक्त शेवटचा भेटायचं आहे त्याला ....
त्याच खूप प्रेम आहे माझ्यावर , नाही जगू शकणार तो माझ्या विना , शेवटच भेटू द्या ना फक्त , माझ्या भेटण्याचे त्याचा जीव वाचेल जागी नाही शकणार तो .... "

अंकीताची अशी विनवणी बघून बाजीरावांचा पारा चढला . " तू माझीच अंकिता आहेस ना ????
एक माझी अंकिता होती जी माझ्या एका आवाजावर घाबरायची आणि एक तू आहेस जी माझ्या डोळ्यात डोळे घालून एका मुलाला भेटायला जाऊ का विचारत आहेस . !!!
खरंच आहे हे !!!! की तुझ्यावर कोणी जादू केली आहे , करणी केली आहे ...
तू माझी अंकिता नाहीस !!
उद्या लग्न आहे तुझं आणि आज तुझं अस बाहेर पडण योग्य वाटत का तुला ??? . तुझा बाप आहे मी तुझ्या भल्यासाठीच काही सांगत असेन.... .!!! हे का नाही समजत तू !!!
अनिरुद्ध सारखा मुलगा शोधून नाही सापडणार तुला ;!

अंकीताचा धीर आता खचला होता ती मनात होत नव्हतं ते सर्व सांगू लागली .

" काही जादू वैगेरे नाही पप्पा , तुम्ही का नाही समजतं प्रेम आहे त्याच बाबा ... नाही जगू शकणार तो माझ्या शिवाय !!! आणि मी तुमचीच अंकिता आहे , माझं फक्त एकदा ऐका पप्पा मला शेवटच भेटू द्या त्याला त्या नंतर सांगाल तस करायला तय्यार आहे मी ...

हे सर्व ऐकुन अंकीताच्या वडिलांनी होकार दिला व ४ दिवसापासून घेतलेला तिचा मोबाईल तिला परत देत म्हणाले .... तू गुरव परिवाराची लाज आहेस हे लक्षात असू दे .

अंकिताने मान हलवून होकार दर्शवला . व स्वतःच्या स्कुटीवर बसून ती सिद्धार्थ नगरच्या बस स्थानकावर जाण्यासाठी निघणार तोवर तिच्या वडिलांनी तिला थांबवलं ...
थांबवून म्हणाले " चल मी पण येतोय तुझ्या सोबत , एकच मुलगी आहे मला काळजी वाटते तुझी !!! , आजकालच्या मुलांचं काही सांगता नाही येत . !!
तुझ्यावर करणी केली , आज भानामती करेल , अॅसिड फेकेल किव्वा पळवून घेवून जायला कमी नाही करणार तो ...

अंकिता नाईलाजाने आपल्या वडिलांसोबत बस स्थानका जवळ नितीनला भेटायला जाण्यासाठी तय्यार झाली .

दोन तास बस स्थानकावर वाट पाहिली पण कोणी आलच नाही .
तिने कित्तेक फोन केले , रिंग जात होती पण कॉल कोणीच उचलत नव्हत ...
बस स्थानकाजवळ असलेले काही दुकानदार तिलाच बघत होते .
तिच्या मनात खूपसे विचार येत होते ...
तिला त्याला शेवटच भेटून खूप अश्या गोष्टी समजवयाच्या होत्या पण तो आलाच नाही...

शेवटी तिचे वडील तिला म्हणाले " अशी मुलं प्रेम नाही करत फक्त प्रेम करण्याचं नाटक करतात " .

वडिलांना नेमकं काय म्हणायचं होत ते अंकिताला समजल .
आपल्या प्रेमाला न आलेलं बघून तिला स्वतः वर राग येवू लागला होता . खूप वाट बघून शेवटी तीने अनिरुद्ध सोबत लग्नासाठी वडिलांकडे होकार दर्शवला .

व अखेर अनिरुद्ध आणि अंकिता चे लग्न झाले .

"""""" -------चार वर्षानंतर -------"""""
दिनांक - २९ फेब्रुवारी २०१६

अंकिता व अनिरुद्धच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली होती . सर्वांच्या मते अंकितासारखी बायको कोणाला मिळूच शकत नाही . अनिरुद्धच्या आईच्या मते अंकितासारखी सून तिला सात जन्म शोधून सुद्धा सापडणार नाही . कारण तिने कधीच कसली अपेक्षा ठेवली नाही , जे मिळालं त्यात समाधानी राहिली ...
तिच्या चेहऱ्यावर ना कधी निराशा ना कधी रडण होत .
सर्व घराची कामे न सांगता पूर्ण करायची ,
सर्वच अंकिताच्या असण्याने आनंदी होते . अनिरुद्ध आणि अंकिताचि जोडी अनिरुद्धच्या मित्रांना , घरच्यांना सर्वांनाच खूप आवडली होती .

पण अनिरुद्धचे मत याच्या उलट होते .
अनिरुद्धला जशी अंकिता हवी होती ती अंकिता ही नव्हतीच . ज्या अंकीताला लग्नाअगोदर बघितलं होत त्या अंकितामध्ये अन् लग्न झाल्या नंतरच्या अंकीतामध्ये जमीन आसमानचा फरक होता ...
कारण तिने या चार वर्षांमध्ये अगोदर सारखे चेहऱ्यावर एकदाही हास्य आणले नव्हते . मनातून हसत नव्हती अन् मनातल दुःख ही व्यक्त करत नव्हती .
अस वाटत होत ती बायको होण्याचं फक्त कर्तव्य निभावत आहे .
या चार वर्षांमध्ये कुणाला एक तर कुणाला २ मुलं होतात मात्र अनिरुध्दच्या आयुष्यात हेही सुख नव्हत .

२९ फेब्रवारी हा अंकिताचा वाढदिवस होता .
तिला सतत खुश ठेवायचं अस वचन दिलं होत म्हणून
चार वर्षातून एकदा येणारा हा तिचा वाढदिवस अनिरुद्धला खूप स्पेशल करायचा होता . यासाठी त्याने दिपालीला याबद्दल विचारलं तेव्हा तिने सांगितल की " सिद्धार्थ नगर मधील बस स्थानक जवळ एका दुकानात तुला हवं तसं गिफ्ट मिळेल ...आम्ही कॉलेज मद्धे असताना तिथूनच गिफ्ट घ्यायचो .."

त्याची कार खराब असल्याने त्याने बस मधून प्रवास करायचे ठरवले ...
पार्किंग मध्ये असणाऱ्या उंदरांनी कारचे वायर कुर्तडले होते ,
त्याने त्याच्या घराजवळच्या बस स्थानकावरून १४३ नंबर ची बस पकडली , कंडक्टर सर्वांचे तिकीट काढत होता ...
अनिरुद्ध ने सुद्धा एक सिद्धार्थ नगरचे तिकीट काढले .
तेवढ्यात अनुरुद्धच्या बाजूला बसलेला एक मुलगा वेगळंच काही बडबडला ...म्हणून त्याचं लक्ष त्याच्यावर गेलं ..
तो मुलगा कंडक्टरला म्हणत होता " एक तिकीट ' प्रेम - वेडा ' स्टॉप !!!"

अनिरुद्ध ला काही समजल नाही म्हणून त्याने त्या मुलाला विचारले " मित्रा ' प्रेम वेडा ' हे कोणत स्टॉप आहे ?? "

यावर तो मुलगा काही बोलणार तेवढ्यात कंडक्टर मध्येच म्हणाला " काही नाही हो !.. ही मुलं गेल्या ४ वर्षा पासून उगाच सिद्धार्थ नगरला " प्रेमवेडा स्टॉप " म्हणत आहेत ... आता तर सवय झाली आहे आम्हालाच याची !!!

का म्हणतात सिद्धार्थ नगरला " प्रेम - वेडा स्टॉप ,"???
अनिरुद्ध ने आश्चर्याने विचारले ..

तो मुलगा पुन्हा काही सांगणार तेवढ्यात कंडक्टर पुन्हा मध्येच म्हणाला " बिचारा एक वेडा बसलेला असतो त्या स्टॉपच्या बाजूला असलेल्या झाडा जवळ !! .... त्याच झाडाच्या बाजूला असलेल्या अभिनव विध्यायलय मधील काही वेड्या मुलांचा तसेच मूर्ख शिक्षकांचा गैरसमज आहे की तो वेडा ," प्रेमात वेडा झालेला आशिक " आहे ... प्रेम न मिळाल्याने तो वेडा झाला आहे !!
जर का या वेड्या मुलांच्या हाती कारभार दिला ना, तर तिथे दुसर ताजमहाल सुद्धा बांधायला कमी करणार नाहीत ."
त्या मुलाला तिकीट देत कंडक्टर हसत पुढे निघाला .

सिद्धार्थ नगर स्थानक आल्यानंतर अनिरुद्ध बस मधून उतरला ...
घाई घाईने तो बहिणीने सांगितलेल्या गिफ्टच्या दुकानात पोहचला ...


त्याने त्याला हवं असलेलं गिफ्ट घेतल व तेथून घरी जाण्यास निघाला . जेव्हा तो बस स्थानक जवळ पोहचला तेव्हा त्याला कळलं की बसला येण्यासाठी १० मिनिटे आहेत तर तो इथे तिथे आपली नजर फिरवू लागला होता . त्याने बघितल की बस स्थानकाजवळ असलेल्या एका भिंतीवर खूप अशी नावे लिहली होती ... अनिरुद्धने काही अशीच नावे बसच्या सीटच्या समोर सुद्धा लिहिली होती " ' प्रेमवेडा आकाश
' प्रेमवेडा सूरज ' , प्रेमवेडा अर्जुन ' ."

अनिरुद्धने बाजूला असेल्या एका विद्यार्थ्याला विचारले की यांच्या पुढे प्रेमवेडा का लिहल आहे ???

यावर त्या मुलाने एक छान असे हास्य करत त्या वेड्या जवळ बोट करत म्हणाला " तो जो भिखाऱ्या सारखा दिसणारा वेडा आहे ना तो आमच्या सारख्या एकतर्फी प्रेमींसाठी प्रेरणास्त्रोत आहे . म्हणून एकतर्फी प्रेमी आपल्या नावापुढे प्रेमवेडा लावतात ."

अनिरुद्धने त्या वेड्या व्यक्तीला बघितले त्याच्या बद्दल येवढं सगळ ऐकुन त्याला राहवलं नाही म्हणून तो त्याच्या दिशेने चालू लागला . तो त्याला निरखून बघू लागला . तो वेडा रस्त्यावर खडूने काहीतरी लिहत होता ...
अनिरुद्ध त्याच्या जवळ पोहोचला... त्याने त्या रस्त्यावर लिहलेले वाक्य वाचले तसा तो चक्रावला ...
त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता , त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती .
कारण त्या रस्त्यावर त्या वेड्याने लीहले होते...

देवाने मला एक दान करावे .
सोबत तुझ्या माझं आयुष्य सरावे .
एकही क्षण असे न जावे
जेव्हा मी तुला न आठवावे
बघू तिथे मला तूच तू दिसावे .
तुला बघताच मन माझे हरवावे .
न पाहिल्यास बैचेन मी व्हावे .
तुझ्याच भोवती विश्व माझं असावे
शिवाय तुझ्या माझा श्वास नसावे .
तुझ्या विना आयुष्य माझं थांबावे
तुझ्या पासून सुरू तुझ्यावरच संपावे
प्रेमाच्या या जगात कोणी एकट नसावे ,
प्रेमाच्या या जगात कोणी एकट नसावे
माझं पहिल अन् शेवटचे प्रेम तूच असावे !!
शेवटचे प्रेम तूच असावे !!

" happy birthday Ankita "



----------- क्रमशः ----------


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED