prem - veda - 7 - last part books and stories free download online pdf in Marathi

प्रेम - वेडा भाग ७ ( शेवटचा)

प्रेम वेडा (भाग ७)

अंकिताला त्या अवस्थेत अनिरुद्धला बघवत नव्हत , त्याला काहीच सुचत नव्हतं की काय करावे अंन काय नाही !!!
जितका मोठा धक्का अंकिताला बसला होता तितकाच मोठा धक्का अनिरुद्धला सुद्धा बसला होता !!

अनिरुद्धने अंकिताला सावरले व म्हणाला " त्याला बघायला आपण इस्पितळात जाउया का ?? "

" त्याला या अवस्थेत मी नाही बघू शकणार " अस म्हणत अंकिता नकार देत होती .

" त्याला गरज आहे तुझी , तुला बघताच जगण्याची त्याची इच्छा वाढेल , काय माहिती तो लवकर बरा होईल ??? , काय माहिती तो माणूस फक्त अंदाज लावत असेल की तो वाचू शकणार नाही पण अस्तित्वात काही दुसर असेल तर ???" अनिरुद्ध तिला समजवत म्हणू लागला !!

अनिरुद्धने कसं बस अंकिताला समजवले व ऑटो रिक्षा पकडून ते TIM इस्पितळा जवळ पोहचले .
इस्पितळा बाहेर खूप गर्दी होती , सायंकाळच्या वेळी इस्पितळाच्या बाहेर कॉलेज विद्यार्थ्यांची गर्दी पाहून त्याला आश्चर्य वाटेल ...

एक एक विद्यार्थ्यांला बाजूला करत ते इस्पितळाच्या आत जाऊ लागले !!!

डॉक्टर आय सी यु मधून बाहेर आले व तेथे असलेल्या व्यक्तींना सांगू लागले की ....

" रक्त जास्त गेलंय , घाबरण्याच काही कारण नाही , आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करत आहोत पण .....

" पण काय ?. डॉक्टर साहेब ?? " त्यातून एक व्यक्ती म्हणाला .

" पण पेशंटने स्वतःचा श्वास बंद करून ठेवत आहे , आम्हाला त्याला आय सी यु वर ठेवावे लागले आहे . आय सी यु ने आम्ही ऑक्सीजन पुर्वत आहेत !!! जर पेशंट असाच करत राहिला व जगण्याची इच्छा त्याने सोडून दिली तर सांगता नाही येत आम्हाला कितपत त्यांना जिवंत ठेवण्यात यश मिळेल !!! "

हे ऐकुन अंकिताची हालत अजुनच खराब झाली होती . व अनिरुद्धला हे बघवत नव्हत !!

यावर अनिरुद्ध मध्येच बडबडला सर " अंकिता ला एकदा त्याला भेटू द्या सर्व ठीक होईल !!! "

" आपण कोण ?? " डॉक्टर अनिरुद्धाला विचारात म्हणाले "

ते महत्त्वाचं नाही आहे डॉक्टर !! पेशंटला वाचवणे हे जास्त महत्त्वाचं आहे , एकदा अंकिता ला भेटू द्या सर्व ठीक होईल !!

कसं शक्य आहे , पेशंट वेडा आहे त्याला कोणीही भेटल तरी सारखच !!! त्याला माणसं ओळखायची समज नाही , आमचं काम आम्हाला करू द्या !!!

अंकिताच प्रेम आहे त्याच्यावर डॉक्टर , एकदा भेटू द्या फक्त मी हात जोडतो तुमच्या पुढे !!!
हे ऐकताच सर्व विद्यार्थी आपसात कुजबुज करू लागले . तेवढ्यात सगळ्या विद्यार्थ्यांनी डॉक्टरला आग्रह केला की अंकिता ला एकदा भेटू द्या !!!

सर्वांच्या आग्रहापुढे डॉक्टर ने अंकिताला पेशंटला भेटायला परवानगी दिली ...

अंकिताच मन एका जाग्यावर स्थिर नव्हत , चार वर्षां नंतर आपल्या प्रेमाला ती बघणार होती तेही अश्या अवस्थेत !!!

अंकिता चे एक एक पाऊल जड जात होते . ती आत शिरली नितीन ओळखायला येत नव्हता , वाढलेली दाढी , रक्ताने माखलेले शरीर . तिला त्याला बघवत नव्हत तरी ती मन भरून त्याला बघू लागली होती .

काय बोलावं तिला कळत नव्हतं ती फक्त एवढच म्हणाली " नितीन बघ मी आले तुझा श्वास घेवून ... "
अस बोलता बोलता अंकिता च्या डोळ्यातून अश्रू च्या धारा वाहू लागल्या . प्रत्येक एका अश्रूतून ती फक्त नितीनलाच बघत होती .

नितीन ची मात्र काहीच प्रतिक्रिया नव्हती ... फक्त त्याच्या डाव्या डोळ्यातून अश्रू चे एक थेंब बाहेर आले .

अंकिता आता स्वतःला सावरू शकत नव्हती म्हणून ती बाहेर पडू लागली तोवर तीला एक आवाज आला .

" अंकिता !!!!!!

तो आवाज नितीनचा होता !!! , उजव्या हाताने त्याने ऑक्सिजनचे मास्क पकडले होते ...

स्वतःचा आवाज ऐकताच ती धावत जाऊन नितीनला बिलगली व रडु लागली होती !!!

" यायला जास्त उशीर नाही केलास का ??"

" मी हरवले होते , मला वाट सापडतच नव्हती , अखेर सापडताच मी आली आहे तुझा श्वास घेवून . आता कधीच सोडून नाही जाणार , फक्त तू लवकर बरा हो !!! "

एवढ्यात नर्स बाहेरून आत आली व अंकिताला बाहेर जायला सांगितले .

बाहेर एक मुलगा अनिरुद्ध ला विचारत होता " तुम्ही कोण ??? "

अनिरुद्ध म्हणाला " मी अंकिता चा पती "

यावर हसत तो मुलगा म्हणाला " मग मी अजय देवगन , कोणी आपल्या बायकोला तिच्या प्रियकराशी भेटायला आणत का ?? " काहीही बोलतो हा !!

तेवढ्यात अंकिता बाहेर आली व धावत येवून अनिरुध्द ला मिठी मारली . या चार वर्षात पहिल्यांदा अंकिताने अनिरुद्ध ला मिठी मारली होती . त्याचा आनंद गगनात मावत नव्हता !!! पण हा आनंद जास्त वेळ टिकू शकला नाही !!!

अंकिता त्याला म्हणाली " माझं खूप प्रेम आहे नीतिन वर " मी नाही जगू शकत त्याच्या शिवाय , अन् तोही नाही जगणार माझ्या शिवाय !!!

अनिरुद्ध काही बोलेल तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले व म्हणाले " चमत्कार आहे चमत्कार मी माझ्या ३० वर्षाच्या करीयर मद्धे हे कधीच नाही बघितल . पेशंट श्वास घेत आहे आणि वेडा पेशंट पूर्ण पणें बरा झाला आहे , बहुतेक त्या कार च्या आघाताने " त्याच्या जखमा भरण्यासाठी पंचवीस तीस दिवस जातील , तीन दिवसांनी पेशंटला डिस्चार्ज मिळेल !!!

यावर सर्व विद्यार्थी ओरडले " सर कार नाही प्यार आहे प्यार !!!

अनिरुद्ध एकटा घरी पोहोचला " त्याने घरी सर्व खर खरं सांगितल , घरच्यांनी त्याला वेड्यात काढलं , पण त्याचा निर्णय ठाम होता , त्याने आपल्या आई वडिलांना खूप समजवले ...पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते .

आई वडिलांच्या मते हे समाजाला अमान्य आहे , लोक निंदा करतील ...
पण अनिरुद्ध चे म्हणणे एकच होते ,
अंकिता चे प्रेम नाही माझ्यावर , ती खुश नाही माझ्या सोबत !!!
मी जे करायला जातोय त्याने सर्व खुश राहू , एखाद्या शवा प्रमाणे नाही बघता येत आपल्या प्रेमाला , त्या ऐवजी दूर असून खुश बघितलेले जास्त योग्य . !!!

अखेर अनिरुद्ध चे म्हणणे त्यांनी मान्य केले मात्र त्यांना ते पटले नव्हते मात्र मान्य करण्या शिवाय त्याच्या पुढे दुसरा काहीच पर्याय नव्हता !!!

तिन दिवस अनिरुद्ध रोज डब्बा घेवून त्या इस्पितळात जाऊ लागला होता . त्यांना हवं नको ते सर्व पाहू लागला होता . त्याने अंकिताच्या चेहऱ्यावर पुन्हा आधी सारखे हास्य आणले होते !!

तीन दिवसांनी नितीन व अंकिता ला अनिरुद्ध ने आपल्या घरी आणल !!! जवळच्या सोसायटीमध्ये एक घर भाड्याने घेतले . व स्वतःच्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन , समाज - दुनियेला न जुमानता त्याने अंकिता व नितीन चे लग्न लावून दिले . नितीन पूर्ण पने ठीक होई पर्यंत त्याची पूर्ण जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला !!!

त्याग हा प्रेमाचा खरा धर्म आहे , दुसऱ्याच्या सुखात सुख मानणारे , दुःखात साथ देणारे तेच खरे प्रेमी .
प्रेमात त्याग हा सर्वात महत्वाचा आहे , तसेच आपल्या प्रेमाची शेवटच्या श्वासापर्यंत वाट बघण ही तेवढंच महत्त्वाचं !!!
कारण प्रेम हे नातच अस असतं जे कायम जपायचं असतं , एकमेकांच्या यशासाठी सर्वस्व अर्पण करायचं असतं ...

---------- समाप्त ----------

कथा कशी वाटली नक्कीच कळवा . व तुमची प्रेमाची व्याख्या तसेच कोणाचं प्रेम जास्त होत ?? ते सामिक्षे द्वारे कळवा !!!
अंकिता
नितीन
अनिरुद्ध
की अर्जून ???


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED