Navnath Mahatmay - 19 books and stories free download online pdf in Marathi

नवनाथ महात्म्य भाग १९

नवनाथ महात्म्य भाग १९

देव दर्शन घेतल्यावर त्याने चरपटीजवळ बसून तुम्ही कोण, कोठे राहता म्हणुन विचारले.
तेव्हा चरपटीने सर्व वृत्तांत त्यास सांगितला.
तो ऐकून ब्राह्मणरूपी नारद म्हणाला, “त्या सत्यश्रव्या ब्राह्मणाला वेड लागलेले दिसते.
अविचाराने मुलगा मात्र त्याने हातातला घालविला.
त्या मुर्ख म्हाताऱ्याची बुद्धि चळली आहे हे नक्की .
आता तू त्याला पुनः तोंड दाखवूच नको, खुशाल त्याचा त्याग करून अरण्यात जा.”

ह्याप्रमाणें नारदाने सांगताच, चरपटीसने परत घरी न जाण्याचे ठरवले आणि तो त्या ब्राह्मणास म्हणाला,” तुम्हीं माझ्या घरीं जाऊन गुप्तपणाने त्या कुलंबास घेऊन या, म्हणजे आम्ही दोघे कोठे तरी अन्य देशात जाऊन विद्याभ्यास करून राहूं.”
मग तो ब्राह्मणरुपी नारद कुलंबास आणायसाठी उठून बाहेर गेला.
थोड्या वेळाने तो कुलंबाचा वेष घेऊन आला.
नंतर सत्यश्रव्यापाशी न राहता अन्यत्र कोठे तरी जाऊन अभ्यास करून राहू असा कुलंबाचेही मत पडले .
मग ते दोघे एके ठिकाणी राहण्याचे ठरवून तेथून निघाले.
ते बरेच लांब गेल्यावर कुलंबाने म्हटले, आपण प्रथम बदरिकाश्रमास जाऊ व बदरी केदाराचें दर्शन घेऊन मग काशीस जाऊन तेथे विद्याभ्यास करु हा कुलंबाचा विचार चरपटीस मान्य झाला.
मग ते दोघे बदरिकाश्रमास गेले.
तेथे देवालयात जाऊन त्यांनी बदरीकेदारला नमस्कार केला.
इतक्यात दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ प्रकट झाले.
कुलंबाने( नारदाने ) दत्तात्रेयाच्या पाया पडून मच्छिंद्रनाथास नमस्कार केला.
चरपटीही दोघांच्या पाया पडला व हे दोघे कोण आहेत म्हणुन त्याने कुलंबास विचारले मग कुलंबाने त्यांची नावे सांगितली व स्वतःकडे हात करून म्हटले , या देहाला नारद म्हणतात.
तुझ्या कार्यासाठी मी कुलंबाचा वेष घेतला होता.
हे ऐकून चरपटी नारदाच्या पाया पडून दर्शन देण्यासाठी विनंति करु लागला.
तेव्हा नारदाने त्यास सांगितले की, आम्ही तिघे तुला प्रकट दर्शन देऊ.
परंतु गुरुप्रसादावाचुन आम्ही तुला दिसणार नाहीं
एकदा गुरुने कानात मंत्र सांगितला की, सर्व जग ब्रह्मरूप दिसेल.
ते ऐकून चरपटी म्हणाला,तुमच्याहुन श्रेष्ठ असा कोणता गुरु मी शोधून काढू ?
तरी आता तुम्ही मला येथे अनुग्रह देऊन सनाथ करावे.
तेव्हा नारदाने दत्तात्रेयास विनंती केली.
दत्तात्रेयाने चरपटीच्या मस्तकावर हात ठेवला व कानात मंत्र सांगितला.
तेव्हा त्याचे अज्ञान लागलीच जाऊन त्यास दिव्यज्ञान प्राप्त झाले.
मग चरपटीनाथास त्यांचे दर्शन झाले.
त्याने तिघांच्या पायावर मस्तक ठेवले.
शंकराने प्रकट होऊन चरपटीनाथास दर्शन दिले.
त्याला विद्याभ्यास करवून नाथपंथ देण्याबद्दल दत्तात्रेयास सांगितले.
मग दत्तात्रेयाने त्यास सर्व विद्या पढविल्या.
संपूर्ण अस्त्रविद्येत वाकबगार केले व तपश्चर्येंस बसविले.
पुढें नाग‍अश्वर्त्थी जाऊन बारा वर्षें राहून वीरसाधन केले व नवकोटी सातलक्ष साबरी कवित्व केले.
त्यास सर्व देवांनी येऊन आशीर्वाद दिले.
नंतर श्रीदत्तात्रेय गिरिनारपर्वती गेले व चरपटी तीर्थयात्रेस निघाला.
एके दिवशी नारद अमरापुरीस गेला असता ' यावे कळीचे नारद' असें इंद्राने सहज विनोदाने त्यास म्हटले.
ते नारदास अजिबात आवडले नाही पण तो त्या वेळेस गप्प बसला .
कांही दिवसानंतर मात्र चरपटीनाथाकडून इंद्राची फजिती व दुर्दशा करण्याचा नारदाने ठरवले.
एके दिवशी नारद चरपटीनाथास बरोबर घेऊन इंद्राच्या बागेत फिरायला गेला.
तेथे चरपटीनाथाने मला येथील फळें खाण्याची इच्छा झाली आहे अशी इच्छा दाखवली व यथेच्छ फळे तोडून खाल्ली.
नंतर तेथील बरीच फुले तोडून सत्यलोकास ब्रह्मदेव देवपूजेस बसले होते तेथे त्यांच्याजवळ नेऊन ठेवली.
याप्रमाणे ते दोघे रोजच इंद्राच्या बागेत जाऊन फळे खाऊन व फुले घेऊन जाऊ लागले .
त्यामुळें बागेचा नाश होऊ लागला.
तो नाश कोण करतो, याचा इंद्राचे माळी तपास करीत असता त्यांना शोध लागेना.
ते एके दिवशीं लपून बसले.
थोड्या वेळाने नारद व चरपटीनाथ हे दोघे बागेत शिरले व चरपटीनाथाने फळे तोडण्यास हात लावला तोच रक्षकांनी हळुच मागून जाऊन नाथाला धरले हे पाहून नारद मात्र पळून सत्यलोकास गेला.
मग रक्षकांनी चरपटीनाथास धरुन खूप मारले.
तेव्हा त्यास राग आला.
त्याने अस्त्राचा जप करून भस्म फेकून रक्षकांना अर्धमेले केले .
दुसऱ्या रक्षकांनी पाहिले व त्यांनी इंद्रास जाऊन सांगितले की एक सूर्यासारखा प्रतापी मुलगा बागेत बेधडक फिरत आहे व त्याने आपल्या रक्षकांचा प्राण घेतला असून सर्व बागेची धुळधाण करून टाकली आहे.
हे ऐकून त्याच्याशी युद्ध करून त्यास जिंकण्याकरता इंद्राने सर्व देवांना पाठवले.
महासागराप्रमाणें देवांची त्या अपार सेनेला चरपटीनाथाने वाताकर्षण अस्त्राने मरणप्राय केलें.
इंद्राने कांही दूत पाठवले होते त्यांनी इंद्रास सांगितले तो लहान बाळ दिसतो,परंतु काळासारखा भासत आहे.
त्याने ऐरावत तयार करण्यास सांगितले.
तेव्हा हेर म्हाणाले, त्या बालकाच्या हातांत धनुष्यबाण नाही की अस्त्र नाही कोणती तरी गुप्तविद्या त्यास साध्य झाली आहे.
आपण तेथे जाउ नये काय इलाज करायचा तो येथुन करावा.
अन्यथा शंकरास साह्यास आणावे म्हणज तो देवास उठवील.
हेरांचे भाषण ऐकुन इंद्र कैलासास गेला व शंकराच्या पाया पडून झालेला सर्व वृत्तांत सांगुन ह्या अरिष्टातुन सोडविण्याकरितां प्रार्थना करु लागला.
तुझा शत्रु कोण आहे म्हणुन शंकराने विचारल्यावर इंद्र म्हणाला, मी अजुन त्यास पाहिले नाही त्याने माझ्या बागेचा नाश केल्यावरुन मी सैन्य पाठविले.
परंतु ते सर्व मरणप्राय झाले, म्हणुन मी पळून येथे तुमची मदत मागायला आलो आहे.
मग शत्रुवर जाण्यासाठी शंकराने आपल्या गणांस आज्ञा केली.
विष्णुस येण्यासाठी निरोप पाठविला.
मग अष्टभैरव, अष्टपुत्र, गण असा शतकोटी समुदाय घेऊन शंकर अमरावतीस गेले.
त्यास पाहताच चरपटीनाथाने वाताकर्षण मंत्रानें भस्म मंत्रुन फेकले त्यामुळे शंकरासह सर्वांची मागच्यासारखीच अवस्था झाली.
इंद्र शंकर व सर्व सेना मूर्च्छित पडलेली पाहून नारद इंद्राकडे पाहुन हसु लागला.
शिवाच्या दूतांनी वैकुंठी जाऊन हा अत्यद्भुत प्रकार विष्णुला सांगितला.
मग छप्पन्न कोटी गण घेऊन विष्णु अमरावतीस आला व शंकरासुद्धा सर्वांस अचेतन पडलेले पाहून संतापला.
त्याने आपल्या गणांस युद्ध करण्याची आज्ञा दिली.
तेव्हां चरपटीनाथाने विष्णुच्या सुदर्शनाचा, गांडीवाचा व इतर शस्त्रास्त्रांचा उपयोग होऊ नये म्हणुन मोहनास्त्राची योजना केली.
मंत्राने भस्म फेकताच संपूर्ण विष्णुगण निश्चेष्ट पडले .
पिप्पलायन हा प्रत्यक्ष नारायण, त्याचाच अवतार हा चरपटीनाथ अर्थात हा आपला स्वामी ठरतो.
असा विचार सुदर्शन चक्राने आपणहून नाथास नमन केले व ते त्याच्या उजव्या बाजूस थांबले .
हातात सुदर्शन आल्यामुळे चरपटीनाथ प्रती विष्णु असाच भासू लागला.
शत्रुच्या हातात सुदर्शन पाहून विष्णुस आश्चर्य वाटले.
मग विष्णु नाथाजवळ येऊ लागला.
तेव्हा त्याने वाताकर्षणास्त्राची विष्णुवर प्रेरणा केली.
त्यामुळे विष्णु धाडकन जमिनीवर पडला.
त्याच्या हातातली गदा पडली व शंख वगैरे आयुधेहि गळाली.
मग चरपटीनाथ विष्णुजवळ येऊन त्यास न्याहाळून पाहू लागला.
त्याने त्याच्या गळ्यांतील वैजयंती माळ काढून घेतली. मुगुट, शंख, गदा, देखील घेतली.
नंतर तो शंकराजवळ गेला व त्याची आयुधें घेऊन सत्यलोकास जाऊन ब्रह्मदेवासमोर उभा राहिला.
विष्णुचीं व शिवाची आयुधें चरपटीनथाजवळ पाहुन ब्रह्मदेव मनांत दचकला व काही तरी घोटाळा झाला असे समजून चिंतेत पडला.
मग त्याने नाथास जवळ बसवुन ही आयुधे कोठून आणलीस असे त्याला विचारले.
तेव्हा चरपटीनें घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला.
तो ऐकून ब्रह्मा घाबरला व त्यास म्हणाला, बाळ विष्णु माझा बाप व तुझा आजा होता.
महादेव तर सर्व जगाचें आराध्य दैवत होय.
ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होऊन आपले काही चालणार नाही.
तू लौकर जाऊन त्यांना जिवंत कर किंवा मला तरी मारून टाक.
ते भाषण ऐकून चरपटीनाथ चकित झाला व मी त्यांस सावध करतो.
असे त्याने ब्रह्मदेवास सांगितले.
मग ते अमरापुरीस गेले.
तेथे विष्णु, शंकर आदि सर्व देव निश्चेष्ट पडलेले ब्रह्मदेवास दिसले.
चरपटीनाथाने वाताकर्षणास्त्र काढून घेतले व जे गतप्राण झाले होते त्यास संजीवनी मंत्रानें उठविले.
मग ब्रह्मदेवाने चरपटीनाथास विष्णुच्या व शंकराच्या पायावर घातले.
त्यांनी हा कोण आहे म्हणून विचारल्यावर ब्रह्मदेवाने नाथाच्या जन्मापासुनची कथा विष्णुस सांगितली विष्णुची व शिवाची सर्व शस्त्रे ,भूषणे त्यांना परत दिली.
मग सर्व मडळीं आनंदानें आपापल्या स्थानी गेली.
नंतर नारद गायन करीत इंद्रापाशी गेला व नमस्कार करून त्यास म्हणाला, “तुम्हाला जे इतके संकटांत पडावे लागले त्याचें कारण समजले ना ?
आम्ही तुमच्या दर्शनास येतो तेव्हा तुम्ही आम्हास कळलाव्या नारद म्हणता.
आजचा हा प्रसंग तरी आमच्या कळीमुळे नाही ना गुदरला ?
तुम्हास कोणी तरी चांगलाच हात दाखविलेला दिसतो .”
हे नारदाचें शब्द ऐकून इंद्र मनात वरमला.
त्याने नारदाची पूजा करून त्यास निरोप दिला व त्या दिवसापासुन त्यानें ' कळीचा नारद ' हे शब्द सोडून दिलें.

नंतर पर्वणीस ब्रह्मदेव चरपटीनाथास घेऊन मणिकर्णीकेच्या स्नानास गेले.
एकवीस स्वर्गीचे लोक स्नानास आले होते.
चरपटीनाथ सत्यलोकास वर्षभर राहीला.
तेथुन पृथ्वीवर येऊन तो अन्य तीर्थ करून पाताळात गेला.
तसेच सप्त पाताळे फिरुन बळीच्या घरी जाऊन वामनास वंदन केले.
त्याचा बळीने चांगला आदरसत्कार केला.
त्या नंतर तो पृथ्वीवर आला.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED