चांदण्या रात्री घराच्या माळ्यावर मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो. गार वारा सुटला होता पण अंगाला तो बोचत नव्हता तर वेगळाच स्पर्श करत होता. त्या अथांग पसरलेल्या आभाळातील असंख्य चांदण्या मोजण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतो आणि चुकत सुध्दा होतो आणि चुकण्याचे एक सुंदर कारण सुद्धा होते. आज ती मला दिसली होती अगदी तिथेच त्याच ड्रेस मध्ये त्याच जागी जिथे पहिल्यांदा ती मला दिसली होती. जरी मी घराच्या माळ्यावर असलो तरी मी अजून सुद्धा सकाळच्या ट्रेन मध्ये होतो. जेव्हा ती दिसली तेव्हा सर्व जुन्या आठवणी अगदी चल चित्राप्रमाणे डोळ्यासमोर येत होत्या जस चित्रपटात नटाला खूप वेळा नंतर किंवा त्याची नटी त्याला दिसते अगदी तस. आज सुद्धा ती अगदी तसे दिसत होती अशी मी पहिल्यांदा बघितली होती. फक्त फरक एवढाच होता की आता तिच्या कपाळावर टिकली होती आणि गळ्यात मंगळसूत्र.
अजून पण मला चांगलं आठवतं ती मला नेहमी बोलायची "होईल ना आपलं सर्व चांगलं ?" मला मात्र तिच्या ह्या प्रश्नांचे उत्तर कधी देता येत नाही. कारण मी नेहमी आजचा विचार करणारा माणूस आहे आणि ती नेहमी भविष्याचा विचार करायची भविष्यातील स्वप्न रंगवायची.
आज सकाळी सुद्धा तेव्हा तिला पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यात तो एक वेगळा एकाकीपणा एकटेपणा मला दिसला. दिसायला ती अजून सुद्धा सुंदर आहे फक्त एवढेच ही केस तिने कापले होते तरीसुद्धा तिच्या सुंदर रूपात तिळमात्रही बदल जाणवत नव्हता. आम्ही सोबत चार वर्ष होतो. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला आज पण जशास तसा आठवण येत आहे. मात्र या चार वर्षातील शेवटचे काही दिवस आमचे खूप तणावात गेले होते कारण तिला कळून चुकले होते की तिच्या घरचे आम्हा दोघांना कधीही मान्य करणार नव्हते. त्यामुळे आम्ही शेवटी वेगळे झालो. वेगळे झाल्यानंतर माझा आणि तिचा काही संबंध नव्हता. ती चे लग्न कधी झाले हे मला माहीत नव्हते. मात्र तिला बघून जीवात जीव आला होता वाटत होत जाऊन एकदा थोड बोलावं मात्र तिझ्या गळ्यातलं मंगळसूत्र मला अडवत होत. शेवटी माझा स्टेशन आल आणि मी उतरलो. मात्र वळून जेव्हा तिला बघितल तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होते आणि मी परत एकदा स्तब्ध झालो होतो. प्रश्न फक्त मलाच हाच आहे की आज मी तिला बघितलं की ती रोज मला बघत आली?? हळूहळू डोळ्यासमोरील चांदण्या मावळू लागल्या होत्या आणि घोर अंधार त्यांची जागा घेत होता.
सकाळी जाग आली विचार अजून पण तोच होता लवकर लवकर सर्व आवरून घेतलं आणि वेळेआधी स्टेशन वर जाऊन बसलो वाटतं ते आज परत एकदा दिसेल ती दिसली मात्र ती नाही ट्रेन मधून उतरताना परत एकदा वळून बघितलं दिसलं मात्र कोणी नाहीच
दोन दिवस गेले असेच विचार अजून पण तोच होता तिला बघण्याची आस मात्र वाढली होती. त्या आशेपोटी आज देवाला साकड मागण्यासाठी मंदिरात गेलो होतो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे स्टेशनला पोहोचलो होतो. लांबून हे दिसलं होतं माझ्या जागी कोणीतरी आज उभ होतं. जवळ जाताच मी ओळखलं आज ती उभी आहे वाट बघत माझी जवळ जाताच मी तिने मला मिठीत घेतलं. मी तिला जवळ घेत होतो कसला विचार न करता मी ह्या क्षणात हरवलो होतो. ती काही तरी बोलत होती पण मला ऐकू येत नव्हतं. स्पर्श तिचा ढिला व्हायला लागला होता. तीसुद्धा अंधुक व्हायला लागली होती. स्टेशन चा आवाज विरू लागला होता त्याजागी पक्ष्यांची किलबिलाट आणि गिरणीचा भोंगा ऐकू येऊ लागला होता. डोळ्यासमोर उजेड येऊ लागला होता. शरीर थोडं भाजू लागल होत. डोळे उघडताच कळून चुकलं की हे स्वप्नभंग झालं होतं. परत एकदा उठून तिला पाहण्यासाठी मी आसुसलो होतो.