Ti raat rani books and stories free download online pdf in Marathi

ती रात राणी

ऑफिस ७.३० ला च सुटत तस पण आज सुबोध बोलला की जाऊ आज थोड गरम होण्यासाठी. त्यामुळे घरी जायला उशीर झालाच होता. रात्रीचे ११.३० होऊन गेले होते पण अजून पण मी सुबोध सोबत पेठेच्या बाहेरील पावभाजी खात होतो सुबोध मागच्या आठवडयात सिंगल झाला होता कारण काव्याच्या घरच्यांना सुबोध चे आणि काव्याचे संबंध मान्य नव्हते. त्यामुळे तो प्रेम विरहात दुःखी होता आणि त्यामुळे त्याने भरपूर दारू सुद्धा पिली होती. मला त्याचे दुःख समजत होते कारण मी सुध्दा त्यातून गेलो होतो. सुबोधला दुःख अवरत नव्हते तो सारखा रडत होता आणि तो नेहमी पिनाऱ्यातील पण नव्हता म्हणून आज जास्त झाल्यामुळे त्याला शुद्ध पण नव्हती. त्याला घरी सोडून आलो तो जवळच राहत होता पण मला बस शिवाय पर्याय नव्हता. बस साठी मला पेठेच्या समोरच्या बस थांब्यावर जावं लागत. आत्ता जवळ जवळ १ वाजला होता शेवटची बस पण गेली होती म्हणून मी टॅक्सी ची वाट बघत उभा होतो. बाजूलाच पेठ असल्यामुळे पेठेतील आवाज येत होता.कारण त्या लोकांचा दिवस म्हणजे रात्र आणि रात्र म्हणजे दिवस. थांब्याच्या बाजूला च पान टपरी होती पेठेतील बायकांची येजा चालू होती. कोणी पान, कोणी सिगारेट, कोणी तंबाखू. मी आपला गप्प उभा होतो १५ मिनिटांच्या वर होऊन गेले होते मात्र टॅक्सीचा पत्ता नव्हता. विचार केला मेन रोड ला काही भेटेल पण मेनरोड ला जाण्यासाठी पेठेतून जाण्याशिवाय पर्याय नव्हता कारण मधून जाणारा आणि जवळचा तो एकच रस्ता होता नाहीतर दोन किलोमीटर फिरून मेनरोड लागणार दुसरा रस्ता होता. पाच मिनिटे विचार केला जाऊ की नको शेवटी ठरवलं जातोच कारण घरी जाणं भाग होतं. उशीर सुद्धा भरपूर झाला होता. तसा मी लगेच रुमाल काढला तोंडाला बांधून पेठेतून चालू लागलो. मीही सुबोध सोबत चार ग्लास लावले होते त्यामुळे मीही थोडा धुंदीत होतो.
सुरुवातीला जाताना गुपचूप गेलो मात्र जसा जास्त पेठेच्या आत जाऊ लागलो तसा तसा आवाज आणि कल्लोळ वाढत गेला. त्या रात्र राण्या दिसू लागल्या होत्या. दिसायला सर्वजणी एका पेक्षा एक जणू इंद्राच्या दरबारातील अप्साराच. मी खाली मान घालून त्यांचे ते वेगळे विश्व बघत होतो. बेवड्यांच्या दुनियेतला तो स्वर्ग मी बघत होतो. ती झगमग, ते आवाज, अत्तरचे सुगंध, ती गाणी, बेवड्या सोबतची भांडणे आणि बरच काही. आता दरवाज्यात उभ्या त्या रात्रीच्या राण्या दरवाज्यात उभ्या राहून कामनीय आवाज देऊ लागल्या, हाका मारत होत्या, काही तर अंगावर येत खोली कढे खेचत होत्या. मी मात्र मूकबधिर असल्या प्रमाणे गुपचूप चालत होतो. जसा जसा मी चालत होतो तसे तसे ते विश्व मागे जात होते. मी आत्ता मेनरोड च्या जवळ होतो तोच मला एक मुलगी दिसली. २३-२४ वर्षाची असेल ती बहुदा दारात बसून आकाशातील चंद्र बघत होती. इतरांपेक्षा दिसायला सुंदर होती ती. तिला बघताच मीही क्षणभर जागीच खिळलो. तिच्या त्या सुंदर रुपाकडे बघत होतो. मात्र मला बघताच ती उठली आणि मी सुद्धा भानावर आलो आणि चालू लागलो मात्र मी पाय टाकताच ती तिच्या मधुर आणि कोमल आवाजात बोलली "यांना साहेब गिर्‍हाईक आहे पण आता जाईलच ते यांना तुम्ही"
मी मात्र काहींना ऐकल्यासारखे पुढे जाऊ लागलो तसं ती पुन्हा म्हणाली "अहो साहेब जास्त नाही ओ घेणार ती" मी मात्र तसा च पुढे आलो आणि टॅक्सी स्टँड वर जाऊन टॅक्सी ने घरी गेलो.
घरी मी एकटा च होतो कारण आई वडील लहापणीच वारले होते. कधी मावशी येते २-३ दिवस राहून परत जाते. घरी आलो आणि फ्रेश होऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागलो पण झोप काही येत नव्हती शेवटी आली कशी कधी माहित नाही. सकाळी जाग आली ती शेजारच्या काकांनी दार वाजवले तेव्हा. "तुमचा दूधवाला आला का आज?" हे विचारण्यासाठी काका आले होते. तसा आज शनिवार होता आज आणि उद्या सुट्टी ऑफिसला. सर्व आवरता आवरता ११ कधी वाजले समजलच नाही. सुबोध ने आज मला दुपारी त्याच्या घरी बोलावलं होत कारण त्याचे आई वडील गावी गेले होते आणि तो एकटा होता म्हणून. सुबोधच्या घरी पोहोचलो तेव्हा हे महाशय दारूच्या नशेत फार डूबलेले होते. थोडा वेळ गप्पा मारल्या नंतर त्याला मी माझ्या सोबत रात्री झालेला प्रकार सांगितला कसा मी पेठेतून गेलो आणि शेवटी ती मुलगी दिसली आणि मी घरी कसा पोहोचलो ते सर्व. माझ बोलण संपताच सुबोध ने आधी मला एका दमात १० शिव्या घातल्या आणि म्हणाला "सल्या एवढी दग-दग करण्यापेक्षा माझ्या घरी थांबला असता तर तुझ्या अंगाला फोड आले नसते की मी तुला येऊ दिलं नसत मला शुद्ध नव्हती म्हणून मला काही बोलता आले नाही पण तू एवढा मूर्ख अशिल अस मला वाटल नव्हत". मी त्याला शांत करून मी ही ग्लास तोंडाला लावला आणि मी ही काही वेळात भिनलो तेव्हा मात्र मला काही माझा आवर राहिला नाही आणि कालच्या त्या मुलीची बात मी सुबोध ला सांगितली आणि तो ही सर्व ऐकून बोलला "तुला आवडलीना चल आज जाऊन तुझ्या साठी बुक करू तिला माझ्या घरी आन आणि कर तुझ्या जीवाच समाधान". मी मात्र तिला सुबोध बोलतो आहे त्या नजरेने पाहिले नव्हते की विचार सुद्धा केला नव्हता. मात्र मला तिला भेटायचं नव्हत अस नव्हत. मात्र ह्या सर्वात झोप कधी लागली माहित च नाही जाग आली तेव्हा सुबोध घरात नव्हता. मी पटकन फोन घेतला तर त्याचा मेसेज आला होता की तो ७ पर्यंत परत येणार आहे कामासाठी बाहेर गेला आहे.
तो येई पर्यंत काही काम पण नव्हते. मनात विचार आला की कालच्या त्या पेठेतील मुलीला बघून यावं का? थोडा वेळ विचार केला आणि सरळ उठून पेठेकढे निघालो मनात फक्त तिला बघण्याची इच्छा होती शेवटी पोहोचलो तिथे कलाच्याच जागी पण बघितलं की तिथे कोणीच नव्हतं. त्या छोट्या घराला ताळा लावलेला होता. थोडा वेळ थांबलो आणि पेठेतली एक बाई बोलली "रात्री येते बघा ती साहेब ९ नंतर आत्ता कोणी नसत तिथे ती नाईट सर्विस देते डे नाही" ते ऐकताच मी परत खाली मान घालून निघालो आणि जाता जाताच एका शोरुम च्या आत मला तीच कालची मुलगी दिसली अगदी टापटीप कपड्यात गिर्‍हाईकाला गाडीच्या फीचर्स सांगत होती. ते बघताच मी गोंधलो की नक्की ही काम काय करते. शेवटी ठरवल आज हिला भेटून विचारायचं. सुबोध ला फोन करून मी घरी जातोय कळवल आणि पेठेच्या बाहेरील चाहावाल्याच्या इथे ९ वाजायची वाट बघू लागलो. "आत्ता तुम्ही मला वेडा म्हणा किंवा काही पण मला तीच वेडच लागलं होत का ते मला माहित नाही असो". ८.३० च्या आसपास ती मी होतो त्या चाहावाल्याकडे कॉफी साठी आली आणि एक स्त्रोंग कॉफी ची ऑर्डर देऊन सिगारेट साठी विचारू लागली मात्र चाहावाल्याकडे सिगारेट नव्हती हाच मोका आहे अस धरून मी माझ्याकडची सिगारेट पुढे केली. मी केलेली सिगारेट बघून ती थोडी थांबली आणि नाही बोलली मी ही पण परत ठेऊ लागताच तिने मागितली आणि थँक्यू म्हणाली. टपरी वर ती आणि मीच होतो आणि चहावाला पण तोही फोन वर बोलण्यात व्यस्त होता. मी लागली च तिला विचारल की "तू त्या समोर च्या घरात असतेस ना?" हे ऐकताच ती चपापली कारण तिने मला मी कलचाच आहे हे ओलखल नव्हतं. ती उठली आणि कॉफी चा ग्लास तोंडाला लावत बोलली "मी तिथे असते पण मी स्वतः ते काम करत नाही मला तिथे अकाउंट च काम आहे" मला आधी ते सत्य वाटल नाही पण मी पुढे तिला विचारल की "अकाउंट ची गरज असते तिथे?" माझा हा खोचक प्रश्न ऐकताच तिला थोडा राग आला आणि सरळ बोलली "हे बघा साहेब मला ते काही माहित नाही पण मला अकाउंट हँडल करण्याचे पैसे भेटतात आणि मला माझ्या कामाशी काम असत मी इतर गोष्टीत लक्ष्य देत नाही तुम्हाला गरज असेल तर सांगा नाही तर रहुद्यात". कॉफी चा शेवटचा घोट घेत ती उठली आणि जाऊ लागली ९ वाजायला अजून वेळ होता तसा मी परत हाक मारून तिला सॉरी बोललो. ती आज कालच्या पेक्षा जास्त सुंदर दिसत होती ती बोलली साहेब बघा मला काम आहे तुम्ही माझ्या सोबत तिथे चला आणि बोला काय बोलायचं आहे ते मला उशीर होतोय. मी ही तिच्या मागे मागे गेलो आणि त्या छोट्या घरात शिरलो आत जाताच ते घर नाही तर आतून वाडा होता एखाद्या हवेली प्रमाणे मोठा मला लगेच समजल की इथे अकाऊंटची गरज का लागत असेल. आमच्या दोघांशिवाय तिथे कोणीच नव्हतं कारण तिथल्या रात राण्या ११ नंतर येतात अस तिने सांगीतल थोडा वेळ बसून राहिलो कारण तिला काही काम होत ते ती करत होती आणि नंतर तिने मला आवाज दिला आणि वरती टेरेस वर यायला सांगितले मी ही गेलो आणि बसलो. थोडा वेळ आम्ही गप्प होतो शेवटी तिने शांतता भंग करत बोलली "तुम्ही त्या पलीकडच्या आयटी पार्क मध्ये काम करता ना? मी खूप वेळा तुम्हाला आणि तुमच्या मित्राला तिथून बाहेर येताना बघितल आहे". मी हो बोललो आणि गप्पांना सुरुवात झाली. बोलता बोलता ती खूप काही सांगत होती की का ती इथे काम करते ती किती शिकली आणि बरच काही मी ही माझ्या बद्दल सांगत होतो खूप वेळ गप्पा मारल्यानंतर खूप साऱ्या बायकांचे आवाज येऊ लागले तसं ती बोलली "अहो साहेब ११ वाजले तुमच्या सोबत बोलता बोलता कधी वेळ गेला समजलच नाही" मी ही हो बोललो आणि उठलो खाली जाताच सर्व त्या बायका माझ्या कडे आणि तिच्याकडे बघून हसू लागल्या आणि ती अस काही नाही बोलत होती. शेवटी मी बाहेर आलो आणि ती माझ्या माघे ती दारात च बसली आणि बोलली "खूप बरं वाटलं आज तुमच्याशी बोलून" मी ही बोललो "मला ही खूप मस्त वाटल उद्या परत भेटूया का? जर तुला काही हरकत नसेल तर" ती बोलली नाही मी उद्या घरी असते स्वतःसाठी वेळ देते घरी राहून आराम करते तस आपण बाहेर हवतर भेटू शकतो". हे ऐकताच मी होकार दिला आणि तिथून निघालो. मनात काय चालू होत माझी मलाच समजत नव्हतं. सुबोधला फोन केला की मी कामासाठी तुझ्या इथे आलो आहे. तो ही हो येतो थांब बोलला आणि २० मिनटात आला थोड जेऊन वगेरे झालं आणि मी घरी जायला टॅक्सी स्टँड काढे आलो पण मग आठवल की उद्या जर भेटायचं तिला तर कुठे कसं ते कसं समजणार मी लगेच परत तिथे गेलो तर ती तिथे नव्हती. आत गेलो तर ती दिसली आणि मला बघताच बाहेर आली आणि विचारल की "गेला नाही तुम्ही अजून घरी?" मी विचारल की उद्या कसं कुठे भेटायचं कसं समजणार? ती ही माझ्या कडे बघून बोलली "बर अस आहे तर त्यासाठी तुम्ही परत अलात मला तुमचा नंबर द्या मी उद्या फोन करेन". मी तिला नंबर दिला आणि परत घरी आलो.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे उठून आवरून बसलो रविवार असल्या मुळे काही काम पण नव्हत. थोड ऑफिसच काम करून घेतलं आणि लोळत पडलो तेवढ्यात फोन वाजला मेसेज आला होता की संध्यकाळी ७ वाजता भेटुयात तुमच्या ऑफिस समोरील पावभाजी वाल्याकडे मी रिप्लाय केला नको दुसरी कडे कुठे आणि गप्पांना सुरुवात झाली खूप वेळ हे नको तिथे नको करून शेवटी कॉफी प्यायला कॉफी डे जागा ठरली. ठरल्या प्रमाणे मी पोहोचलो आणि ती आली गप्पा झाल्या. तिने शेवटी मला सांगितले की मी मागील ४ महिने झाले तुम्हाला बघत आहे आणि बरच काही मी ही तिला माझ्या मनातली गोष्ट सांगितली. हळूहळू भेटी वाढत गेल्या, जवळीक वाढत गेली. आम्ही एकमेकांच्या जवळ येत गेलो. रोज ऑफिस सुटल्यावर तिला थोडावेळ भेटत होतो तीही मला भेटण्यासाठी शोरूम मधून लवकर याय ची नंतर हळू हळू मोबाईल वर गप्पा वाढत गेल्या.हे सर्व मी सुबोधला सांगितले त्याला तिच्याशी भेटवले. तो ही माझ्यासाठी खूष होता. आम्हाला आता एकमेकांसोबत २ महिन्याच्या वर झाले होते. रोज भेटणे फिरणे एकमेकांसोबत वेळ घालवणे असे करत करत दोन महिने कधी गेले हे आम्हाला माहीतच नव्हते. आम्ही एकमेकांसोबत खूष होतो.
एक दिवस ऑफिस सुटल्यावर तिला भेटायला गेलो पण ती आली नाही मी फोन केले तरी घेतले नाही. अस ४-५ दिवस झाल. ती काम करते त्या शोरुम मध्ये गेलो आणि तिची विचारपूस केली तर समजल की ६ दिवसांपूर्वी तिचा रस्ता ओलांडताना एक्सीडेंट झाला होता आणि ५ दिवसांपूर्वी ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना झोपली ती कायमची. हे सर्व ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मी बाहेर येऊन सुबोध ला सर्व सांगितले आणि तो ही लगेच १० मिनटात आला मला काहीच सुचत नव्हते त्याने मला पाणी दिले आणि त्याच्या घरी घेऊन गेला त्या रात्री माझी हलत सुबोध सारखी झाली होती तो माझी समजूत पण काढत होता मला सावरत होता शेवटी मी उठलो आणि घरी आलो ४ दिवस ऑफिसला गेलो नाही की बोललो नाही कोणाशी. सुबोध घरी आला तेव्हा माझी हालत आणि घराची हालत बघुन तो घाबरला आणि मला सावरू लागला. अजून ४ दिवस असेच गेले. तिला जाऊन आत्ता ३ महिने होऊन गेले होते आणि माझे परत मागचे दिवस पुढे आले होते ऑफिस आणि रात्री दारू बस पण आजपण अधे मध्ये आठवण येते त्या रात राणी ची अजूनही आठवते ती रात्र आणि तिचे ते रूप. होय तीच रात राणी जी पेठेतील असून पेठेतील नव्हती. प्रश्न पडतो कधी कधी मला "ती रात राणी भेटेल का परत कधी तशाच रात्री?"

इतर रसदार पर्याय