Obsession.....
प्रेमाचे खूप varieties असतात. काही रूप असतात. पण असा एक रूप आहे जे प्रेम करणार्यांना घाबरून टाकतो. प्रेमाच्या रूपाचे नाव आहे 'obsession'. 'obsession' , म्हणजे ज्या कोणावर एवढ प्रेम करणे की त्यासाठी काहीही करण्याची हिम्मत असते. काहीही म्हणजे काहीही. त्या व्यक्तीला त्रासही होईल असे. अशीच एक कथा आहे जी 'obsession' वर आधारित आहे. पण, हे obsession एक वेगळ्याच प्रकारचे आहे.
"प्यार एक जुनुन है, एक पागलपण है, एक दिवानगी है". असे म्हणतात की 'love is blind', जे प्रेमात होत त्याला कोणत्याही गोष्टीचे भान नसते. त्या व्यक्तीचे आयुष्य फक्त प्रेमच असत. प्रेमाच्या आयुष्यात माणसाला स्वर्गासारख वाटायला लागते. पण, प्रेम जेव्हा वेड्यासारख वाढत जाते तेव्हा त्याच रुपांतर भिती मध्ये होऊन जाते. अशाच भितीने पार्थ ला वेढलेले.
पार्थ हा मोठा आणि नामवंत add maker आहे आणि आपल्या प्रिया नावाच्या पत्नी सोबत मुंबई मध्ये राहत असतो. add नावाच्या दुनियेत पार्थचे खूप चांगल नाव आहे. पार्थ आपल्या सुंदर पत्नीसाठी इतका possessive आहे की तो आपल्या पत्नीला एकटा काय त्याच्या सोबत पण घेऊन जात नाही. एवढेच नाही तर तो प्रिया चे कपडे पण स्वतः च खरेदी करतो. ना प्रियाला कोणी ओळखत नाही आणि तो तिला कोणाला भेटू पण देत नाही. जेव्हा पार्थ ऑफिसला जातो तर घराला बाहेरून कुलूप लावून जातो. म्हणायचं म्हणजे प्रिया 24 तास आपल्या घरात कैद असते. पार्थला एक जगाची वेगळीच भिती आहे. त्याला अस वाटत की हे जग खूप खराब आहे जी त्याची पत्नी प्रिया ला हानी पोहोचेल.
"एका ना, मी मार्केटला जायचा विचार करते, घरातील काही सामान पण आणायचे आहे आणि मला पण काही शॉपिंग करायची आहे", प्रिया म्हणाली.
"प्रिया तू असा विचार नको करू किती वेळा सांगितलं तुला जे जे सामान आणायचे आहे ते मी घेऊन येईन का चिंता करतेय ?",.....पार्थ.
"पण, मला ही फिरायला जाता येईल ना आणि शॉपिंग ला पण",....प्रिया.
"अरे अरे, घरात खूप चांगल आहे. बाहेरच वातावरण खूप खराब आहे. प्रिया, तुला घरात काय प्रोब्लेम आहे सांग बर, क...क...कोणत्या गोष्टींची कमी केलीय मी ?...काय काय पाहिजे तुला मी सगळं घेऊन येईन सांग सांग काय पाहिजे ?",....पार्थ.
"कमी तर कोणत्याही गोष्टीची नाही",...प्रिया.
"नाही ना, तर चांगलं चांगलं जेवण बनव आणि आरामात रहा, चल चल मजेत रहा मी जातो आता संध्याकाळी येताना नवीन add ची idea सांगतो तुला ,ok ok by", .....पार्थ.
पार्थ आपल्या घरात प्रियाला लॉक करून आपल्या कामाला जातो. प्रियासाठी पण ही गोष्ट काही नव्यासारखी नव्हती. प्रियाने पण फक्त केला की कदाचित पार्थ तिला शॉपिंग ला जाऊ देईल. पार्थ ला ऑफिसमध्ये लोक सनकी म्हणत असत आणि का नाही म्हणणार, कारण पार्थ स्वतः च्याच विश्वात भरकटलेला असतो आणि आपल lunch कोणाबरोबर ही शेअर करत नाही.
"अरे पार्थ तिकडे का बसलाय, ये ना यार आमच्याबरोबर lunch ला बस", .....मीनल.
"नको नको, मी इथेच ठीक आहे", ....पार्थ.
"अरे यार ठीक आहे चल आम्हीच येतो",....मीनल.
ही आहे मीनल जी पार्थ ची कलिग आहे आणि खूपच चांगल्या स्वभावाची आहे. तिला जर तिच्या प्रश्नाचे उत्तर भेटत नाही तर ती त्याच्या मागेच लागते. पण, पार्थ तर स्वतः मध्येच एक मोठा प्रश्न होता. मिनल तिचि lunch घेऊन पार्थपाशी येते.
"वा यार पार्थ काय खुशबू आहे!!!... काय आणलं आहेस आज टिफिन मध्ये", .....मीनल.
"अ...अ...बेबी कॉर्न आणि मशरूम आणि पनीर ची भाजी आहे. प्रियाने बनवली आहे. ख..ख..खूप चांगलं जेवण बनवते. तसही तसही, ती सगळच चांगल जेवण बनवते", ....पार्थ.
"it's wow yar!!!, मग दे इकडे वहिनींच्या हातच टेस्ट करू दे", ....मिनल.
"म्हणजे ?", ....पार्थ.
"म्हणजे मशरूम - स्वीट कॉर्न टेस्ट तर करू दे", ...मीनल.
"तुला तुला का टेस्ट करायला देऊ??? , हे... हे.. माझ्या प्रियाने बनवलय,माझ्यासाठी बनवलय. तू कोण आहेस ?", ...पार्थ.
"पण मी कुठे म्हणते माझ्यासाठी बनवलय, तुझ्यासाठीच तर बनवलय, मी तर म्हणते फक्त टेस्ट करायला दे",...मीनल.
"का का ?... हे काय cooking competition आहे ?... तू judge आहेस का ?...की माझी बायको शेफ आहे ?... इथे काय चाललंय काय ?... तू जेवण टेस्ट करून सांगणार की कस झालयं ते ",....पार्थ रागाच्या भरात बोलू लागला.
"अरे यार, पार्थ तुला झालय तरी काय??? मी तर फक्त जेवण शेअर करण्याबद्दल बोलत होते ", ....मीनल.
"मला जेवण कोणाबरोबर शेअर करायला नाही आवडत आणि मी.. मी माझ जेवण कोणाबरोबर ही शेअर नाही करत ",....पार्थ.
"ok ok relax",.....मीनल.
पार्थ हा सर्वांसाठी unpredictable असा होता. म्हणजे कोणालाही माहिती नसते की तो कधी कसा react करेल ते. पण, आपल्या कामामध्ये पार्थ सर्व विसरून जात होता. म्हणूनच, त्याची सर्व respect पण करत होते. त्याचबरोबर एका award function मध्ये पार्थच्या एका add campaign ला "popular add of the year" च्या category मध्ये घेतला गेले आणि त्याला हा award भेटला.
"आणि आता वेळ आली आहे "popular add of the year" ची. हा award जातो young and dynamic add maker!!!!.मि.पार्थ!!!...यांना",...सर्वजण टाळ्या वाजवून पार्थच स्वागत करू लागले.
"thank you....thank you... तूम्ही सर्वांनी माझ्या add ला ऐवढी पसंती दिली त्यासाठी मी तुमचा आभारी आहे, हे award प्रत्येक add maker चे स्वप्न आहे. पण या award वर फक्त माझा हक्क नाही. तर अजून एका व्यक्तीचा आहे. माझ्याबरोबर या add चे स्वप्न अजून कोणीतरी एकाने बघितलं आहे आणि ती आहे माझी पत्नी प्रिया, अ...अ..अ..असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्री चा हात असतो. तर, माझ्या यशाच्या मागे माझी पत्नी प्रियाचा हात आहे", ....पार्थ.
"जेव्हा मी कोणती idea सुचवतो तर ती पहिल्यांदा प्रियाला सांगतो आणि...आणि तिला ती आवडली तरच मी त्याच्यावर काम करतो!!!....या add साठी प्रियाने सांगितले होते की हे add या वर्षीच सर्वात बेस्ट add होईल आणि याला कोणीही नाही थांबवू शकत, th...th...thank you so much प्रिया..you are my strength", ...पार्थ.
पार्थ आपल्या यशाच सर्व क्रेडीट आपल्या पत्नीला देतो आणि लोक टाळ्या वाजवून पार्थ च्या speech च welcome करतात. घरी प्रिया बातम्या बघतच होती. बातम्यांमध्ये प्रियाला समजते की पार्थ ला त्याच्या add साठी त्याला अवॉर्ड भेटलेला असतो. त्याचवेळी पार्थ दरवाजा खोलून आतमध्ये येतो आणि खुश होऊन अवॉर्ड ची ट्रॉफी तिच्या हातात देतो. प्रिया पण खूप खुश होते
"हे...हे!!!!अवॉर्ड मला नाही तर तुला भेटायला पाहिजे होत, त...त...तुला सांगू मी जेव्हा सांगितले की माझी पत्नी ही माझ्यासाठी मोठी supporter आहे आणि तिच्यामुळेच मला हा अवॉर्ड भेटला आहे, तेव्हा सर्वांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या!!!!",.... पार्थ आनंदाने बोलू लागला.
"किती छान झालं असत ना जर मी तुम्हाला अवॉर्ड घेताना बघितलं असत",....प्रिया.
"अगं....इथे टिव्ही वर आलेलं ना!!! बघितलं असशील ना त्यात मजा नाही आली का तुला??..अगं तिथे ना तिथे ना खूप विचित्र आणि बेकार लोक येतात",.....पार्थ.
"अहो!!! मला लोकांशी काय करायच आहे, मला तर तुमच्याशी संबंध आहे ना", .....प्रिया.
"हा तर माझ्याशी संबंध आहे तर मी आहे ना तुझ्याजवळ, तुझ्या जवळच राहीन, आता ही ट्रॉफी प्लीज तुझ्या हातांनी मला दे", ....पार्थ.
"प्रिया हसत हसत, ok ji.... यावर्षीचा best add चा अवॉर्ड mr.parth यांना जातोय", .....प्रिया.
"thank you, चल आपण आता पार्टी करु," ....पार्थ.
wow!!!!!...पार्टी...ok मी लगेचच तयार होऊन येते",...प्रिया.
" हा, लवकर तयार होऊन ये", ....पार्थ.
प्रिया लवकर तयार व्हायला जाते आणि आज प्रियासाठी खूप मोठा दिवस होता. कारण, पार्थ पहिल्यांदा प्रियाला डिनर ला घेऊन जाणार होता. प्रिया तर या गोष्टीने खूप खुश होती.
"तयार झालीस प्रिया ???",पार्थ.
"होय, चला मी रेडी आहे ", प्रिया.
"wow!!!beautiful, खूप सुंदर दिसतेस तू....इकडे ये ना स्वतः ला आरशासमोर बघ, म...म्हणजे मी बरोबर आहे तूच सगळ्यात सुंदर आहेस",....पार्थ.
"अच्छा आता हा रोमान्स बंद करा आणि चला", ....प्रिया लाजत लाजत बोलली.
"चला!!! पण कुठे चला ??? ", ....पार्थ.
"बाहेर पार्टी करायला, म्हहह... प्रेमात एवढे वेडे झालात की सगळं विसरलात??? ", .....प्रिया.
"पण..पण, आपण बाहेर कुठे चाललोय आपण घरीच पार्टी करतोय ना मी जेवण पण ऑर्डर केलय ",.....पार्थ.
"पण, तुम्ही मला तयार व्हायला का लावलत ??? ", प्रिया.
"कारण, मला तुला एका सुंदर ड्रेस वर बघायचं होत ", ...पार्थ.
तेव्हाच door bell वाजते. पार्थ रुममध्ये अंधार करून दरवाजा उघडतो आणि ऑर्डर केलेले जेवण घेऊन पैसे देत. प्रिया इतकी खूश होती की अचानक ती या गोष्टीने दुःखी झाली. पार्थ लाईट लावतो आणि डायनिंग टेबलवर जेवण वाढतो.
"मला कळत का नाही पण, तुम्ही अस का करता ? ",...प्रिया.
"कस प्रिया ? ", पार्थ.
"ना मला कुठे बाहेर घेऊन जाता, ना मला जाऊन देता. घरातील सामान, माझी शॉपिंग, कपडे तुम्हीच घेऊन येता. जेव्हा घराच्या बाहेर जाता तेव्हा दरवाजा लॉक करून जाता. हे सगळं काय आहे ??? ", प्रिया बोलते.
"हे सगळं प्रेम आहे प्रिया ", पार्थ.
" हे कसल प्रेम आहे ??", ....प्रिया.
"unique, एक... एक वेगळच प्रेम, म्हणजेच माझ्या idea सारखे. म...म...मला तुला त्रास द्यायचा नाही आणि तूला माहिती आहे ना मी तुला पार्टी आणि फंक्शन मध्ये का घेऊन जात नाही ते. तिकडे खूप विचित्र लोक येतात, विचित्र बोलतात. मी स्वतः तिथे कसा तरी जातो. प्रिया, ही दुनिया ना खूप खराब आहे आणि तू...तू... बघ किती भोळी आहेस. म्हणून मी या घाणेरड्या लोकांशी तुला नाही भेटुन देत. ही दुनिया ना भुरळ घालेल तुझ्यावर. तुझ्यात आणि माझ्यामध्ये गैरसमज आणू शकतील. म्हणून मी तुला त्यांच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय प्रिया. तसही मला या दुनियेशी काही देण-घेण नाहीये. माझी दुनिया तर तू आहेस प्रिया!!! तुला नाही माहिती प्रिया मी तुझ्यावर किती प्रेम करतो ते !!!!",..... पार्थ प्रियाला समजावू लागला.
"मला माहिती आहे किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर ते !!",.....प्रिया.
"तर..तर मग आपण एकमेकांच्या साथीने नाही का जगू शकत ??? ", ....पार्थ.
पार्थ प्रियाच्या बाबतीत एवढा possessive झाला होता की, एका क्षणासाठी पण तो प्रियाला बाहेर घेऊन जायला तयार नव्हता. पार्थच बोलणे एकुण प्रियाने स्वतः ला समजावून घेतले आणि दोघांनी घरीच पार्टी केली. दुसर्यादिवशी पार्थच्या ऑफिसमध्ये वेगळीच परिस्थिती होती. सर्वांनी पार्थ ला congratulate केले आणि सर्वांच्या डिमांड वर पार्थ ने छोटीशी pizza पार्टी ठेवली.
"पार्थ, मजा आली यार!!! ", .....मीनल.
"अजून तर खूप मजा घ्यायची आहे. पुढच्या वर्षीची तयारी सुरू करु ",.....पार्थ.
"पार्थ सर, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे तर एक छोटस फंक्शन ठेवले आहे. तुम्हाला नक्की यायचे आहे हं ", ऑफिस मधील editor पार्थ ला वाढदिवसासाठी invite करतो.
"अच्छा, ठीक आहे. नक्की येतो. अरे वा !!! कार्ड खूप मस्त आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता आहे ना??? ", ....पार्थ.
"yes sir", ऑफिस एडिटर....
"ok ok", .....पार्थ.
"आणि हा सर, वहिनींना पण नक्की घेऊन या ",...ऑफिस एडिटर.
"का ??... का घेऊन येऊ ", .....पार्थ.
"आवडेल सर आम्हाला आणि तशीच वहिनींची पण भेट होईल नाही का ",.....ऑफिस एडिटर.
"का ?... तू काय माझ्या बायकोला ओळखतोस ?... तू का भेटणार आहेस तिला ??? माझ्या बायको शिवाय तूझ्या मुलाचा केक नाही कापणार का ? दुसर्यांच्या घरात ना बघायचे सोडा आता ok ", पार्थ रागाच्या भरात त्या एडिटर ला बोलू लागला.
पार्थ त्या एडिटर वर खूप रागवतो. त्यानंतर एडिटर सोरी बोलून निघून जातो. पण मिनल खूप दिवसापासून पार्थची हरकत बघत असते तिला काही तरी गडबड आह अस वाटतं. मीनल महिलांसाठी काम करणाऱ्या NGO सोबत जुडलेली. मीनल ला वाटतं की पार्थ च्या पत्नीबरोबर काही तरी गडबड आहे आणि ती पार्थ च्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला भेटायला जायचा प्रयत्न करते. दुसऱ्या दिवशी मीनल पार्थच्या घरी जाते आणि door bell वाजवते.
"अरे !!! sunday ला कोण आल !!!...मी तर कोणाला भेटत पण नाही ", ....पार्थ.
" मीनल !!! तू काय करतेस आज ?",...पार्थ.
"काही नाही सहजच आले, इकडून आलेले तर म्हंटल तुला भेटून जाऊ ", ....मीनल.
" अच्छा अच्छा !!! आज तर sunday आहे आणि मी सुट्टी दिवशी भेटत नाही कोणाला , म्हणजे sunday मी माझ्या family बरोबर घालवतो. बाकीच्या दिवशी family ला वेळ देऊ शकत नाही म्हणूनच. s..s..sunday पूर्ण दिवस family साठी असतो. ok ,आता जा तू ", ...पार्थ.
"ok ok ,आता आलीच आहे तर तुझ्या वाईफ ला पण भेटून जाते ", ......मीनल
"नाही नाही, बिलकुल नाही. काही गरज नाही. she doesn't want to meet anyone. तिला नाही आवडत कोणाला भेटायला ok", ...पार्थ घाबरत घाबरत बोलतो.
"ok ok, जर ती बोली की मला नाही भेटायचं तर, मी इथून निघून जाते ", ....मीनल.
"अरे !! मी बोलतोय ना, का का भेटायचं आहे तुला ?... प्रियाला हे अजिबात आवडणार नाही ", ....पार्थ.
" मला माहिती आहे या घरात काहीही ठीक नाहीये आणि तूझ्या पत्नी ला भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाहिये ", ...मीनल
"आ !!! तुला भेटायचं आहे प्रियाशी ?..भेटायचं आहे ?.. ये बघ बघ , प्रियाला तू अजिबात आवडणार नाहीस. मी भेटवतो तुला प्रियाशी. इकडे ये...ये इकडे इथे उभी रहा. बघ ती बघ ती आहे प्रिया. बघितलस ती किती भोळी आहे आणि मासुम आहे. तुझ्यासारखी चलाख नाही ", ....पार्थ.
"कुठे आहे ?" ,.....मीनल.
" तिथेच आहे तुझ्यासमोर !!! ", ....पार्थ.
" what ??? आरशा मध्ये तर तू दिसतो आहेस, प्रिया कुठे आहे ? ", मीनल.
"इथेच आहे... इथेच आहे माझी प्रिया. किती भोळी, किती सुंदर, सगळ्यात चांगली. बघ बघ , प्रिया ऐक ना ही बघ तुला भेटायला आलीये. हिला वाटतय की मी तुला harasse करतो. प्रिया, सांग सांग तिला ", ....पार्थ.
" नाही , पार्थ खूप खूप चांगले आहेत. माझी खूप काळजी घेतात, माझ्यावर खूप प्रेम करतात ", पार्थ स्वतः च्याच आवाजात बोलत असतो.
"पार्थ हे सर्व काय आहे ? तू वेडा आहेस का ? ", मीनल.
"प्रेम करणार्यांना सगळेच वेडे म्हणतात. बघितलस बघितलस ना प्रिया ",..... पार्थ.
" ohh my god !!!!!",......मीनल.
Actually पार्थ ची प्रिया कोणीही नाही. पार्थ ला स्वतः शी self obsession होता. स्वतः शी एवढा प्रेम करत होता की, त्याने स्वतः ची एक वेगळी दुनिया बनवलेली. पार्थ स्वतः च प्रियाचा roll play करत असतो आणि प्रियाच्या प्रेमात वेडा झालेला असतो. काही लोक अशा पार्टनर च्या शोधात असतात, ज्यांच्यात या सर्व गुण आहेत जे त्यांना पसंत असतात आणि जर अस कोणी भेटले नाही तर त्यांना अस वाटत की त्यांच्यासाठी कोण बनलेलेच नाही आणि मग ते स्वतः च्या प्रेमात बुडून जातात. पार्थनी पण स्वतः ची एक वेगळीच दुनिया बनवलेली. अचानक मीनलच्या येण्याने पार्थचे हे गुपीत उघडले गेले.
मीनलच्या समोर त्याने पार्थचा आणि प्रियाचा दोन्ही चा roll play केला. मीनल पार्थची ही हालत बघून shocked झाली. मीनल कशी तरी तिथून निघून गेली आणि त्यानंतर आपल्या मित्रांच्या मदतीने तिने पार्थला एका हॉस्पिटलमध्ये admit केले. जिथे दीड वर्ष झाली पार्थचे तिथे मानसिक आजाराची ट्रिटमेंट चालू आहेत. काल पर्यंत एक नामवंत add maker आज वॉर्ड नंबर .25 चा एक पेंशट बनलेला आहे. and this all beacuase of self obsession. प्रेमाचे असेही रूप असतात जे घाबरून टाकतात. आपण तर हेच म्हणू शकतो स्वतः वर प्रेम करणे चांगले आहे. एवढे पण नाही की तूम्हाला दुसरे कोणी आवडू शकत नाही.