सिद्धनाथ - 3 Sanjeev द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सिद्धनाथ - 3

सिद्धनाथ 3
(अघोरी) (Reader descrition advised)
गावाची वेस संपत आली होती, भर दुपार ची वेळ, ऊन चांगलंच जाणवत होतं, तारा अघोरी ला अर्थात त्यानं काही फरक पडणार नव्हता, काळी कफनी, गळ्यात कवड्याच्या माळा, हातात बोटावर चढवलेल्या चेड्या च्या अंगठ्या, खप्पर , झोळी, खांद्यावर रुळणारे केस, कफनीतुन ही त्याच पिळदार शरीर जाणवत होतं, एका हातात त्रिशूळ होता, अघोरी असला तरी तारा दिसावयास देखणा होता, बेफिकीर चेहरा, हसरी मुद्रा, जर्द हिरवी शेवाळी मोहून टाकणारी भेदक नजर, कपाळावरच त्रिपुंड त्याच्या मोहक चेहेऱ्याच्या मोहिनीत एक वेगळीच भर टाकत होत ,
तारा त विलक्षण आकर्षण होत, रस्त्या न जा ये करणाऱ्या महिलांना सुद्धा एकदा मागे वळून बघण्याचा मोह आवरत नसे, वेस गेली थोडं पुढे स्मशान होत, तारा ला अर्थात त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं, थोडं पुढे वडाच झाड होत, कडकडून भूक लागलेली होती, तारा वडाच्या झाडापाशी आला थोडी जागा साफ केली , झोळीतून आसन काढून त्यावर बसला, रस्त्यावर तुरळक रहदारी होती, क्वचित बाईक , सायकल, टेम्पो ची जा ये चालू होती, पायी जाणारे येणारे त्याच्या कडे बघत, नंतर एकूणच तारा च्या वेशा मुळे नजर फिरवून पुढे जात.
तारा ला हे नवीन नव्हतं, खप्पर हातात घेतल, डोक्यावरील काळ रेशमी रुमाला न ते झाकल, तोंडाने अन्नदा यक्षिणी चे मंत्र म्हणत त्यानं तिला मनोमन प्रणाम करून आवाहन केलं, खप्परा वरचा रेशमी रुमाल बाजूला केला त्यात गरमागरम बिर्याणी होती, बिर्याणी चा द्रोण अलगद बाहेर काढला
"जय अनादिकल्पेश्वर...जय...अघोरेश्वर....",असा पंचवक्त्र अघोरमूर्ती भगवान शिव यांच्या जयजयकार करत त्यानं खाण्यास सुरुवात केली
पांढरी स्कॉर्पिओ येऊन वडा पाशी थांबली, माईसाहेब खाली उतरल्या , हातात टिफिन, बिस्लरी वडाच्या जवळ आल्या चपला काढल्या, तारा ला नमस्कार केला.
बबली मात्र driving seat वर च बसून होती, अघोरीच्या हालचाली निरखून बघत होती, इतका देखणा माणूस बाबा होऊ शकतो, बबली ला खर तर त्याच्याशी बोलायचं होत, पण बंगल्यावर सगळीच माणसे होती, जरी तो गेस्ट हाऊस मध्ये उतरला होता तरी तिथे जण बर दिसलं नसत, एकदाच बंगल्याच्या गेट मध्ये ती स्कुटी घेऊन बाहेर काढताना, तारा आत यायला एकच गाठ पडली होती, त्याच्या हिरव्या जर्द डोळ्याला डोळा भिडला होता, क्षणभर ती आतून थरारली होती..तारा च्या चेहेऱ्यावर मंद लुभावणार हास्य होत, जर्द हिरवा रंग आपल्या शरीरभर पसरतोय अस क्षणभर तिला वाटलं, अंगभर वासनेची लहर दवडून गेली, गडबडीने तिने नजर हटवली, बैरागी, बाबा इतके गोड, इतके देखणे असू शकतात...?, सहज तिच्या मनात विचार येऊन गेला.
"काही बैरागी, बाब बुवा असतात....", एवढं बोलत तारा बंगल्यात निघून गेला होता. Gate वरच्या गार्डस ना काही कळलं नव्हतं. बबली खाली उतरली, वडाच्या झाड जवळ आली , शूज काढले
"बाबा प्रणाम"
तारा न वर बघितलं, "कशी आहेस..?"
"एकदम मस्त...."
"बबली तू गाडीतच बस मला जरा बोलायच बाबांशी", माईसाहेबाना कधी बबली तिथून जाते अस झालं होतं, तारा च सामर्थ्य ती ओळखून होती. नाराजी व्यक्त करत बबली स्कॉर्पिओ कडे वळली.
"बाबा, तुम्हाला थांबायला सांगितलं होतं मी! चांगलं घरात बसून जेवले असता", जणू काही तारा तिच्या हक्कांचाच होता
"श्यामला..,आम्ही कोणाच्या हुकुमाचे ताबेदार नाही, पाणी दे!", अघोरी च्या आवाजात जरब होती
"तस नव्हे, पण जेवून मी सोडलं असत", , बिसलरी अघोरीच्या हातात देत, माईसाहेब सारवासारव करत म्हणाल्या.
"बोल..."
"निवडणुका जवळ आल्यात...!, पण आमचे मालक या वेळेस उभं राहू नको म्हणतात..!!!!"
अघोरी मधेच थांबला, "मी सांगेन ते करशील"
"हो..."
तारा न टिफिन उघडला आपल्या हाता न एक घास माईसाहेबांना भरवला, डाव्या हातातला चेडा, काढून तो त्यांच्या बोटात घातला, परत जेवायला सुरुवात केली
"रक्त लागत त्याला...आठवड्याला"
माईसाहेबांनी होकारदर्शक मान हलवली.
"ये तू...", टिफिन माईसाहेबांच्या हातात देत तारा म्हणाला, क्षणभर नजरा नजर झाली, माईसाहेब क्षणभर ताराच्या हिरव्या जर्द डोळ्यात हरवल्या सारख्या झाल्या, अंगावर रोमांच उभे राहिले, कशीबशी स्वतः ची त्या नजरेतून सुटका करत, तारा ला नमस्कार करून त्या परत फिरल्या, स्कॉर्पिओ U turn घेऊन दिसेनाशी झाली.
"काही म्हण ममा, तुझा तो बाबा solid आयटम आहे, so HOT", driving करणारी बबली खिदळत म्हणाली".
"ए, समोर बघून नीट गाडी चालव..., काय ग तुझी भाषा".
माईसाहेब डोळे मिटून बसल्या खर, पण शरीराला आतून तारा च्या स्पर्शाची ओढ लागली होती, ताराच्या पिळदार बाहुपाशात सगळं जग विसरून घालवलेले क्षण, धुंद करून गेलेलं अनेक बेभान आणि तृप्ती चे, ते ही एकाच रात्रीत अनेक वेळेस येऊन गेलेले क्षण.... !!!!
"कसला विचार करतेस .....?", बबली च्या आवाजान त्या एकदम भानावर आल्या.
"निवडणूका...", चेहेरा शक्य तितका निर्विकार ठेवत माईसाहेब म्हणाल्या.
तारा न मुद्दाम वडाच झाड निवडल होत, लताचा झाडापाशी उभा असलेला वासनादेह त्याच्या नजरेतून सुटलेला नव्हता, आभाळ आलं होतं, ऊन ही जरा उतरल होत.
वडाच्या झाडाला टेकून तर बसला होता,
"बोल.…"
लता थोडश्या संकोचान पुढं आली...,
"मी दिसते तर तुम्हाला...?"
"हो"
"इतरांना मग मी कशी दिसत नाही???"
"मेलेली माणस नुसत्या डोळ्यांनी नाही दिसत"
"मी, लता, मला तुमची मदत हवीय"
"बोलत रहा तू, मग मी ठरविन तुला मदत करायची की नाही"
"मी ह्या जवळच्या गावात च रहाते, एकदा रानशेण्या (गौऱ्या) वेचायला आले उशीर झाला होता, दिवस लहान, रस्त्यावर इथे दिवे नाही, इतक्यात एक जीप येऊन थांबली, चार जण होते, त्यांनी मला उचललं आणि झाडीत घेऊन गेले, आणि आणि...", लताला हुंदका फुटला
"भाई इसका क्या करने का?"
"जिंदा दफना दो" , ही शेवटची वाक्य माझ्या लक्षात आहेत, मी जिवंत होते, मला मरायची इच्छा नव्हती पण त्यांनी मला जिवंत जमिनीत पुरून टाकल, श्वास गुदमरला, नाका तोंडात माती गेली, मग हळूहळू सगळा अंधार पसरला, भानावर आले तेव्हा सगळी कडे किरर अंधार होता, एकही वस्त्र माझ्या अंगावर नव्हतं, तशीच मी घरी आले, घरातल्यानं ओरडून ओरडून उठवलं पण कोणी उठले नाहीत , कोणी माझी दखल सुद्धा घेतली नाही, निर्वस्त्र अवस्थेत घरा बाहेर पडले पण माझ्या कडे कोणाचा लक्षच नव्हतं", रडत रडत लता सांगत होती
"सोडवा मला यातून आणि आणि जर ते चारी जण सापडले तर मला सूड घाययचा आहे त्यांचा......", लता च रडणं जीव हेलावून टाकणार होत
तारा गंभीर झाला होता,
"मी तुझी ह्या अवस्थेतून सुटका करीन, पण त्या बदल्यात तुला माझी काही काम करावी लागतील...आणि ज्या कोणी तुला ह्या अवस्थेत नेलय त्यांना तर शिक्षा ही हवीच..".
लता तयार झाली होती, तारा न खप्पर समोर ठेवलं, अघोरमूर्ती च स्मरण केलं झोळीतल्या एक पुडीतून चिते ची राख काढली, एक रिकामी चेड्या करता बनवलेली माणसाच्या पाठीच्या मणक्याच्या हाडा पासून तयार केलेली अंगठी बाहेर काढली...
"जय अनादिकल्पेश्वर...जय...अघोरेश्वर....", असा जयजयकार करत त्यानं काही मंत्र म्हणायला सुरुवात केली, लता चा वासनादेह आता चेड्यात ओढला गेला होता, आणि चेडा तारा न स्वतः च्या हातात घातला होता , त्याची पावलं परत इंदोर शहरा कडे वळली होती, इंदोर शहराच्या बाहेर जवळच्या एक शिवालयात त्यानं मुक्काम केला होता, तो पर्यंत रात्री चे १०:३० झाले होते , क्षणभर डोके मिटून त्यानं श्यामला च ध्यान केलं.
श्यामला अंघोळ करत होती, अचानक बाथरूम मध्ये तारा ला बघून ती घाबरली होती, तीन कसतरी स्वतः ला झाकण्याचा प्रयत्न केला, कोणाला कळलं असत तर तिला घरातल्यांनी जिवंत जाळलं असत किंवा कापून टाकलं असत, "श्यामला उद्या भेटू, मी इंदोर मधेच आहे.. ". एवढं बोलून तारा दिसला तसा नाहीसा झाला होता. श्यामला न दचकून डोळे उघडले, ती बेड वर च होती, स्वप्न मात्र तिला स्पष्ट आठवत होत. तारा न आपल्याला नको त्या अवस्थेत पाहिलं अस उगीचच तिला वाटत राहील,अंगावर रोमांच येत राहिले, त्या स्वप्नांचा विचार करता करता तिला कधीतरी झोप लागली.
अघोरी पंथ हा हिंदू धर्माचा एक संप्रदाय आहे. जे त्याचे अनुसरण करतात त्यांना अघोरी असे म्हणतात. त्यांच्यात संन्यस्त व गृहस्थ अशा दोन्ही वृत्तीने राहणारे अनुयायी आहेत. अघोरी हे शैव संप्रदायातील एक पंथ. त्याला ‘अघोर’, ‘औघड’, ‘औदर’, ‘सरभंग’ व ‘अवधूत’ अशीही नावे आढळतात. अथर्ववेदात व यजुर्वेदात शिवाच्या अघोर तनूचे उल्लेख आहेत. ‘अघोरीश्वर’ या नावाने शिवाची उपासना म्हैसूर व इतर भागांतही केली जाते. यावरून प्रस्तूत पंथाचा संबंध शैव संप्रदायातील पाशुपत व कालमुख या पंथांशी जोडला जातो. तसेच त्याच्या काही सिद्धांतांचा संबंध नाथपंशी जोडला जातो. तसेच त्याच्या काही सिद्धांतांचा संबंध नाथपंथाशी व तंत्रमार्गाशी जोडण्यात येतो. पंथाचे उगमस्थान गुजरातमधील अबू मानले जाते. अघोर पंथाच्या उत्पत्तीच्या कालावधीविषयी कोणतेही निश्चित पुरावे उपलब्ध नाहीत, परंतु ते कापालिक संप्रदायाच्या समतुल्य मानले जातात. ते भारताच्या सर्वात जुना धर्म "शैवपंथ " (शिव साधक) शी संबंधित आहेत. अघोरी ना ह्या पृथ्वीवर भगवान शिव यांचे सजीव रूप मानले जाते. अघोर रूप हे भगवान शंकर ह्याच्या पाच मुखा पैकीच एक आहे असं मानलं जात . अघोरी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरला आहे. अघोरींचे आयुष्य जितके कठीण, तेवढे रहस्यमय आहे. अघोरीस साधना पद्धती तर सर्वात रहस्यमय, ह्या साधनांचे स्वतः: चे असे विधी विधान आहेत ज्याला कसला हि घोर किंवा चिंता नसते तो अघोरी. ते स्वभावानं सरळ असतात मनात कोणताही भेदभाव नसतो . अघोरीचा प्रत्येक गोष्टीत समदृष्टी किंवा भाव असतो, चवदार पदार्थांप्रमाणेच सडलेल्या प्राण्यांचे मांस त्यांच्या लेखी सारखं च असत जिवंत किंवा मृत त्यांच्या लेखी सामान असत .फार कमी लोकांना माहित आहे की अघोरींच्या साधनेत इतकी शक्ती आहे की ते मृतांशीही बोलू शकतात. या गोष्टी वाचणे आणि ऐकणे आश्चर्यकारक वाटू शकते परंतु त्यास पूर्णपणे नाकारता येत नाही. त्याच्या साधनेला आव्हान देता येत नाही.अघोरी बद्दल बर्याच गोष्टी प्रसिद्ध आहेत ते फार हट्टी असतात , जर एखाद्या गोष्टीवर अअडून बसले तर ते पूर्ण केल्याशिवाय सोडत नाहीत. रागावल्यास कोणत्याही थराला जाऊ शकतात . बहुतेक अघोरींचे डोळे लाल असतात, जणू ते खूप रागावले आहेत, परंतु त्यांचे मन तितकेच शांत आहे. काळी वस्त्र धारण केलेले, अघोरी गळ्यात धातूने बनविलेल्या नरमुंडांच्या माळा घालतात .
अघोरी मुळात तीन प्रकारच्या साधना करतात. शिव साधना , शव साधना आणि स्मशान साधना . शिव साधनेत, मृत शरीरावर उभ राहून साधना केली जाते. उर्वरित पद्धती शव साधने प्रमाणेच आहेत. या साधनेचा गाभा पार्वतीने (काली च्या स्वरूपात)शिवच्या छातीवर ठेवलेला पाय . अशा पद्धतींमध्ये मृतांना मांस आणि मद्य नैवेद्य म्हणून दिले जात .मृत शरीर आणि शिव साधने व्यतिरिक्त, तिसरी प्रथा स्मशान साधना आहे ज्यात सामान्य कुटुंबातील सदस्यांना देखील समाविष्ट केले जाऊ शकते. या साधनेत मृतदेवाऐवजी शवपीठ (ज्या ठिकाणी मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले जातात) पूजा केली जाते. त्यावर गंगेचे पाणी अर्पण केले जाते. येथे नैवेद्य म्हणून मांस व दारू ऐवजी मावा प्रसाद स्वरूपात वाहिला जातो. आजही अघोरी आणि तंत्र साधक आहेत जे पारलौकिक जगतास वश करू शकतात. या साधना स्मशानभूमीत होतात आणि जगात अश्या केवळ चार स्मशानभूमी आहेत जिथे तंत्रसाधनेचा अनुभव त्वरीत येतो . हि स्मशाने तारापीठ (पश्चिम बंगाल), स्मशान कामाख्या पीठ (आसाम), त्र्यंबकेश्वर (नाशिक) आणि उज्जैन (मध्य प्रदेश) इथे आहेत.महाकालेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात आहे. स्वयंभू , भव्य आणि दक्षिणेमुखी असल्याने महाकालेश्वर महादेव रूप हे अत्यंत पुण्यदायी मानले जातात. याच कारणास्तव तंत्रशास्त्रामध्येही शंकराचे हे शहर फारच फलदायी मानले जाते. येथे स्मशानभूमीत दूरदूरहून साधक तंत्र क्रिया करण्यासाठी येतात.स्मशानात असते व तेथील जळालेल्या मृतदेहाची राख ते आपल्या अंगास फासतात. ते आपली विद्या सिद्ध करण्यासाठी मानवाची कवटी व हाडे वापरतात. त्यांचे दागिनेही हाडांपासून बनविलेले असतात.
********************************************************
स्वामी कृपेने मला जे समजलं त्या नुसार खर तर अघोर तत्वज्ञान हे वैदिक "अहं ब्रम्हास्मि" ह्या सिद्धांतावर आधारित आहे, ज्यात कुठल्याही प्रकारच्या वर उल्लेखलेल्या साधनांचा संबंध येत नाही पण , असे अघोरी क्वचित आढळतात, पूर्वी अघोरी म्हणजे त्याला साक्षात देवाधिदेव महादेव समजलं जाई, कारण ते संपूर्ण जगापासून अलिप्त राहून एकांतवासात राहून अद्वैत साधनेत व्यग्र असत , शिवभावत असल्यामुळे अघोरी ची कृपा म्हणजे साक्षात भगवान शंकराची कृपा परंतु, पुढे हे तत्वज्ञान, साधना पद्धती त सरमिसळ होऊन त्यात वेगवेगळ्या कापालिक, तांत्रिक, कालमुखादी साधना, मद्य, मास मैथुनादी.शिरल आणि एकूणच त्या पंथा विषयीचे ग्रंथ, साधना पद्धती इत्या गोष्टी दुर्मिळ होत गेल्या , कदाचित हीच त्या देवाधिदेव महादेवाची इच्छा असावी
******************************************************** असो आता असलेले अघोरी जास्त करून कापालिक किंवा कालमुख संप्रदायाचे असतात किंवा तांत्रिक असतात ज्यात विविध साधना व अलौकिक सिद्धी सामर्थ्य ह्या वर जास्त भर दिसून येतो.
माईसाहेबांनी सकाळी सगळं लवकर आवरलं होत, तारा ला आणण्या साठी शिव मंदिरात गाडी पाठवली होती, माईसाहेब राजकारणातील मोठं प्रस्थ होत, त्यांचे यजमान सुद्धा राजकारणातील मोठी व्यक्ती होती. एकूणच सर्व घराणं किंवा त्यातलं कोणी ना कोणी अगदी १९४५ च्या काळा पासून राजकारणात होतच. मुबलक पैसा, प्रसिद्धी, कीर्ती, यश मनमानी अजून काय हवं.......
मालक व माईसाहेब तारा च्या अर्ध्या वचनात होते, तारा ची भ्रमंती चालूच असे , अचानक उज्जैन ला आला तर मग इंदोरला माईसाहेबा कडे मुक्काम असे , पण तो त्यांच्या अधीन नव्हता , मनात येईल तेव्हा तो निघून जाई तर कधी अचानक प्रकट होत असे
दोघांना त्या सगळ्या गोष्टींची सवय झाली होती, तारा मुळे तर झोपडीत राहणारी श्यामला राजकारणात ल बंद प्रस्थ झालं होतं
तारा गेस्टहोऊस वर आला, तेव्हा सकाळ चे ०७ ०७३० वाजलेले असावेत, बबली नुकतीच जिम मधून आली होती, तारा ला तीन बघितलं होत. आज तीन तारा ला भेटायचं ठरवलं होतं.
गेस्टहोऊस म्हणजे अजून एक मोठाच बंगला होता, तारा करता ते सदैव नीट तयार ठेवलेलं असे, एका खोलीत पुरुषभर उंचीची १८ हातांची महाकाली ची अतिशय उग्र मूर्ती होती, तीच तारा ची साधनेची खोली होती, सगळं आवरल, तारा च रुटीन वेगळं होत, चहा, ब्रेकफास्ट इ0 नसायचं च, साधने च्या बैठकी नुसार दुपारी जेवण असायचं किंवा नसायचं. कधी कधी ३ ३ दिवस तर कधी ७ ८ दिवस तारा साधनामस्त असायचा.
सकाळी गच्चीत उभं राहून सूर्याकडे बघत त्याची 3 तास साधना असायची, त्याला वाटेल तेव्हा मग तो भेटी करता माईसाहेबांच्या बंगला वर यायचा किंवा त्यांना तिकडे बोलवायचा, आरडाओरड नाही गोंधळ नाही कुठला हट्ट नाही की कुठला त्रास नाही जगावेगळा अघोरी होता तारा.
इतर शव, शिव, चिता इत्यादी साधना करताना तारा उज्जैनला निघून जाई, मग त्याचा नेम नसे कधी कधी ६ ६ महिने तो गायब असे.
बबली न सगळं आवरलं आणि थेट गेस्टहोऊस गाठलं होत, सोनचाफ्या चा सुगन्ध सगळी कडे दरवळत होता, तारा च्या अंगावर फक्त कटीवस्त्र होत, महाकाली च्या मूर्तीसमोर तो ध्यानस्थ बसलेला होता, एखद्या ग्रीक देवते सारख प्रमाणबद्ध रेखीव शरीर असलेला तारा, बबली न महाकाली च्या मूर्तीला जाऊन नमस्कार केला, पाय चुकून पूजेच्या तबकला लागला होता, आवाजाने तारा ची तंद्री भंग पावली, बबली घाबरली होती, तारा शांत होता,
"कशासाठी आलीस...?"
"म..मी मला बोलायचं होत तुमच्या शी", त्या क्षणी जे सुचलं ते बबली बोलून गेली.
"ये तू, संध्याकाळी बोलू आपण", तारान तिला जवळ जवळ हात धरून खोली बाहेर काढलं होत
तारा चा तो स्पर्श , बबली च्या सर्वांगात असंख्य फुल फुलवून गेला, तीव्र उत्तेजना तिला ३ ४ वेळेस येऊन गेल्या, थरथरत्या पायां न ती कशी बशी स्वतः च्या खोलीत आली, ओली वस्त्र बदलली,
तारा न आता ज्या चेड्यात लता ला ठेवलं होतं ती अंगठी हातातून काढली, लताचा वासना देह मोकळा झाला होता
"तुझ्या करता देहाची व्यवस्था झाली आहे, मग पुढे काय करायचं ते मी तुला सांगीन, आता तू मुक्त आहेस इथे तुला हवं तिथे वावरू शकते"
लता चा वासना देहान बबली च्या खोलीत प्रवेश केला , बबली बेड वर लोळत काही तरी वाचत पडली होती, लता च्या वासना शरीरं बबलित सामावून गेलं, क्षणभर बबली च्या अंगावर काटा आला मग पुढे काय झालं ते ती कळण्याच्या पलीकडे गेली होती . लताने एकदा स्वतः कडे बघितलं इतके दिवस देह नव्हता, आता तिला बबली च्या देहात राहता येणार होत. मनोमन ती जाम खुश झालो होती, बेड वर उठून बसली कोणी तरी दार वाजवत होत, तीन दार उघडलं
"अग काय करत होतीस...?"
"काय बी न्हाय!"
माईसाहेब विचित्र नजरेने बबली कडे बघत होत्या
"बबली...! तू ठीक आहेस ना ????"
बबली च्या शरीराचा ताबा आता लता च्या वासना शरीराने घेतलेला होता,
त्या मुळे देह बबली चा व वागणं लता च पण हे फक्त तारा लाच माहीत होतं
"चल आवर लवकर.."
"ए बये कोन तू, अन हित काय कारायली ...?"
माईसाहेब आता घाबरल्या होत्या, त्यांनी नोकराला सांगून ताराला बोलवण धाडलं
तारा न आल्या आल्या काहीतरी मंत्र म्हटले होते, लता ला बबली चा देह सोडावा लागला होता, बबली एकदम भानावर आली
तारा, आई, नोकर चाकर आपल्या रूम समोर गर्दी ती गोंधळली होती
"काय झालं आई..?"
"अग खेडुता सारख काय बोलत होतीस..?"
बबली ला काही संदर्भ लागत नव्हता
तारा परत त्याच्या साधनेच्या खोलीत आला, मागोमाग लता ओढल्या सारखी येऊन पोहोचली
"तुझं काम त्या देहात रहायचं अन माझी हौस पुरवायची, तोंड उघडलस तर एखाद्या झाडावर तुला कायमच च अडकवून ठेवेन, समजलं???", तारा च्या आवाजात जरब होती
लता न मान डोलवली
दार वाजल, दारात माईसाहेब उभ्या होत्या
"बाबा, काय झालं माझ्या पोरीला"
"काही नाही वार येतंय अंगात, जाईल थोड्या दिवसात , मी आहे ना"
हात जोडून माई साहेब निघून गेल्या
दिवसा बबली, अधून मधून लता आणि रात्री तर पूर्ण लताच.... आणि मग सगळी रात्र ताराच्या बाहुपाशात विरघळून जायची.
आपण ताराच्या फासात अडकलोय हे आता लता ला कळून चुकलं होत, एकीकडे शरीराचा मोह तर दुसरीकडे ताराची मनमानी.
तारा चा अघोरी गुरू मल्लिनाथ नेहमी म्हणत असे "तारा, स्त्री मोहापासून स्वतः ला जप.....", पण तारा न त्यांचं बोलणं कधी मनावर घेतल नव्हतं, तारा ची साधना जबरदस्त होती, पण स्त्री देहाची कमालीची आसक्ती त्याला सोडता आली नव्हती, त्या मुळे युगल साधने पासून तो दूर राहिला होता. आता ऐता लताच वासना शरीर मिळालं होतं आणि इथेच तारा घसरला होता
हळू हळू लता तारा सांगेल तस त्याची लहर फिरे तेव्हा कधी बबली तर कधी माईसाहेब उर्फ श्यामलात संचार करायला लावून दोघींचा मनसोक्त भोग घेत असे.
संचार गेल्यावर बबली काय किंवा श्यामला काय आपल्या शरीरा सोबत काहीतरी विपरीत होतय हे जाणवत असे, ठेचकाळल्या सारखी अंगदुखी, xxभागातील वेदना, कमालीचा थकवा...
लता च्या वासनाशरीरान एक दोन वेळेस त्या बंगल्यातून पळून जायचा प्रयत्न करून पाहिला पण अर्थात तारा न तीच स्थलबंधन केल्याने एक ठराविक मर्यादेच्या बाहेर तिला जात येत नसे, प्रयत्न केला की वेदना होत, तारा ला लगेच ती जाणीव होई, मग त्याची शिक्षा फारच भयानक असे
देह असताना टाचणी टोचल्यावर ज्या वेदना होतात त्या वेदना जवळजवळ १०००० पट तीव्र देहहीन अवस्थेत होतात असा मंत्र शास्त्राचा नियमच आहे
श्यामला च्या हातातील चेड्या वरील पिशाच मालकांच्या शरीरात प्रविष्ट झालं होतं. मालक शांत झाले होते, सर्व मीटिंग रद्द, पक्षाच्या भेटी गाठी रद्द, जास्त करून आपल्या खोलीत असायचे, संध्याकाळी मग पिण्याचा कार्यक्रम असायचा. रात्रभर मग टाईट अवस्थेत पडलेले असायचे
"अलख निरंजन", गेट समोर सिद्धनाथ उभा होता, उज्जैन च्या दिशेने निघालेला सिद्धनाथ माईसाहेबांच्या बंगल्याच्या समोर उभा होता, योगा योगान माईसाहेबांची गाडी गेट च्या बाहेर पडत होती, त्यांची नजर सिद्धनाथावर गेली,
"मयूर, गाडी थांबावं"
"माई साहेब खाली उतरल्या", सिद्धनाथास नमस्कार केला, त्यांना बघूनच त्रिकालदर्शी सिद्धनाथास सगळं समजलं होत,
अलख जागवत त्यानं झोळीतून तांब्याची अंगठी काढली आणि काही न बोलता ती माईसाहेबांच्या हातात चढवली, थोडी विभूती हातावर ठेवून
"सून गहनी, मेरी बाणी, मिटजाये ये अछूत....", म्हणत
"माई मी शिवमंदिरात आहे", इतकं बोलून चालत झाला. माईसाहेबांना काही बोलण्याची संधी देण्याच्या आत तो गेला देखील...
खूप दिवसांनी माईसाहेबांना शांत झोप लागली होती,
तारा पिसाळलेल्या सारखा वागत होता, लता चा वासना देह थरथर कापत होता,
"काय म्हणालीस तिला धरता येत नाही?"
"नाही, तिच्या शरीराजवळ गेलं की अंगाची भाजल्या सारखी आग होते, नाही धरता येत त्या बाईला..!!!"
तारा न झोळीतून चितेची राख काढली थोडी पाण्यात कालवून गंध लावल्या सारख काही तरी मंत्र म्हणत खप्परा च्या कपाळावर लावली
"जय भुतेश, जय भूतभावन, जय महादेव...."
खप्पर थोडं थरारल होत
"कशा करता बोलवलं स ?"
"हे स्मशानाधिपते तुझी कृपा असताना माझा प्रयोग निष्फळ झालाच कसा ....?"
"नाथपंथी बैरागी"
"मग....??????"
"नाथपंथा करता साह्य करण्यासाठी आम्ही नेहमीच वचनबद्ध असतो..."
"आणि मग मला दिलेलं वचन.....?"
"तारा, ....हे वचन प्रत्यक्ष मच्छींन्द्रनाथांना दिलेलं वचन...!!!!!... आणि तू काही मच्छीन्द्र नाथ नाहीस.....!!!!!!!"
तारा अजूनच संतापाने पेटला होता
"पण अघोरी तर साक्षात भगवान शंकराचं रूप असत.. हे विसरलास काय ...????...मी तुला शिक्षा करीन...!!!!!."
"पण तूझ आचरण भूतभावन भगवान शंकरा सारख कुठय...?????, अघोरी ना बदनाम करणारा कलंक आहेस तू...."
लताचा वासनादेह भीतीने थरथर कापत सगळं दृश्य पहात होता.....
"आणि शिक्षेच म्हणशील तर साफ विसरून जा, कारण आम्ही भगवान शिवाचे गण आहोत, तुझे नोकर नाही, तुझ्या साधने मुळे वचनबद्ध आहोत इतकंच, पण त्याला ही मर्यादा आहेत..."
"शहाणा असशील तर वेळीच सावध हो..."
खप्पर थरारल आणी मग शांत झाल
तारा न गुरू च स्मरण केलं..मिटल्या डोळ्या समोर मल्लिनाथ उभे होते..
"तारा तुला मी अनेक वेळेस सावध करून ही तू त्याच त्याच चूक स्त्री च्या बाबतीत करतो आहेस...!!!!"
"पण गुरुदेव...."
"सावध हो, सगळं घालवून बसशील...!!!!'
मल्लिनाथ अदृश्य झाला
खर तर तारा एक उत्तम दर्जाचे अघोरी होऊ शकला असता पण , स्रीमोह ही त्याची कमकुवत बाजू असल्याने अघोरी पंथातील काही साधना त्यानं मुद्दाम टाळल्या होत्या कारण त्या सगळ्या युगल साधना होत्या....थोडीशी चुकी म्हणजे मृत्यू आणि अत्यंत हीन प्राणियोनीत जन्म.....!!!!!!
तारा न लता ला शिव मंदिरात जाऊन कोण आहे ते बघून ये म्हणून पाठवलं, सिद्धनाथ भगवान शंकराच्या पिंडी समोर ध्यानस्थ बसलेला होता,
"मृत्युंजय महारुद्र....."
गाभारा सिद्धनाथाच्या मंत्रोच्चारान भारल्या सारखा झालेला होता, शिवपिंडी वर एक आगळ वेगळ निळसर प्रभामंडल दिसत होतं, लता मंदिराच्या बाहेरून हे दृश्य आश्चर्याने बघत उभी होती
हळूहळू सिद्धनाथ समाधीत लिन झाला त्याचा विदेही आत्मा आता मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आला,. लता ला आता दोन सिद्धनाथ दिसत होते, एक पिंडीसमोर ध्यानस्थ तर एक तिच्या समोर उभा
"अलख निरंजन..." , सिद्धनाथ्याच्या जयजयकार न ती भानावर आली
सिद्धनाथा ला तिला बघितल्यावर सर्व कल्पना आलीच होती,
"बाबा...म मला...", रडत रडत तीन सगळं सिद्धनाथाला सांगितले होत
"माई, रडू नकोस, जे घडलं ती दैवगती, म्हणून ज्यांनी अत्याचार केले त्यांचा सूड घेणं म्हणजे अजून हजारो वर्षे पिशाच योनीत घालवणं, त्यांना योग्य ती शिक्षा ही वेळेनुसार होईलच ...आता हजारो वर्षे तारा ची गुलामगिरीत काढायचे की ह्यातून मुक्त व्हायचं हे तू ठरव.....!!!!"
"मला मुक्त करा ह्यातून..."
"अलख निरंजन, ओम नमो आदेश गुरुजी को आदेश, पहली चौकी...गणपती, दुजी बीर हनुमंत...तिजी......", सिद्धनाथाच्या धीर गंभीर स्वरांत वातावरण भारून गेलं होतं, तारा न लता ला घातलेलं बंधन तुटल होत...लता चा वासनादेह आता मुक्त झाला होता,
"माई आत जाऊन दर्शन घे, म्हणजे ह्या योनीतुन कायम ची मुक्त होशील"
लता च्या वासना शरीराने एकदा सिद्धनाथाला प्रदक्षिणा घातली, मंदिरात जाऊन भगवान शंकराच्या पिंडी च दर्शन घेतलं अन तीच भान गेलं होतं....लता च्या पुढच्या प्रवासाच्या तयारीच चक्र फिरायला सुरुवात झालं होतं.
सिद्धनाथा न एकदा आपल्या गुरू गोरक्षनाथां च स्मरण केलं., विदेही अवस्थेत त्यानं उज्जैन च्या दिशेने प्रयाण केल
तारा न बराच वेळ वाट बघून लता परतली नव्हती, त्यानं महाकाली च्या मूर्ती समोर आसन जमवलं,

"जय अनादिकल्पेश्वर...जय...अघोरेश्वर....",असा पंचवक्त्र अघोरमूर्ती भगवान शिव यांच्या जयजयकार करत तो ध्यानमग्न झाला, ध्यानात सर्व प्रकार त्याच्या लक्षात आलं होता, लता पण आता हातून निसटली होती.
शेवटी नागा, कालमुख, नकुलिश, तांत्रिक, मांत्रिक, अघोरी, सिद्ध, कापालिक एकमेकांना जोखत असतातच आपापसात हेवेदावे द्वेष मत्सर, त्यांचे ग्रुप, एकत्रित साधना, एकमेकांवर तीक्ष्ण यंत्र मंत्र तंत्र हल्ले हे है अलौकिक जगतात घडत असतच आणि आज ही घडत आहे, हे तुम्ही सुद्धा ओळखू शकता, बघू शकता पण शेवटी साधना हवी....साधनेला पर्याय नाही....!!!!
खरा अघोरी मात्र ह्या सर्वा पासून अलिप्त भैरवोSहम् शिवोSहम् भावात स्थिर असतो, सर्व संप्रदायात अघोरपंथ श्रेष्ठ त्यातील अघोरी म्हणजे साक्षात देहधारी भगवान शंकर, पण असे महात्मे आता क्वचित आढळतात... आता जे अघोरी आपण social media वर किंवा प्रत्यक्ष बघतो ते त्या पंथाचे विकृत स्वरूप..... आज आपण जे अघोरी समाजात वावरताना बघतो ते दुर्दैवाने अघोर पंथाचे तत्वज्ञान च न समजल्याने, आलेलं विकृत रूप कदाचित हा ही काळाची महिमा असेल. खरे अघोरी जे वाटेल ते घडवू शकतात, प्रारब्ध संचित क्रियामाण सगळं बदलून टाकून नवीन नशीब एखाद्याच लीलया लिहू शकतात ... त्यांना भस्म, जटा दाढी, माळा, कंकण, मद्य मांस नग्नता, चितेची राख , स्मशान चिता ह्यांची खर तर गरजच नसते.....शेवटी ह्या वादात न पडलेलं बर......असो.
दिवसेन दिवस भारतीय अध्यात्माला विकृत स्वरूप येत चाललं आहे एवढं मात्र नाकारून चालणार नाही
तारा न आता अग्निकुंड पेटवल होत, बीज सहस्त्रअक्षरी च्या अवर्तनात त्यानं झोळीतून लांडग्याच्या हाडा पासूनबनवलेला त्रिशूल बाहेर काढला, कावळा सकाळीच पकडून ठेवलेला होता, सूरी स्वतःच्या तळहातावर फिरवत त्यानं अग्नीत स्वतः च्या रक्ताच्या आहुती देत तीक्ष्ण दारूण शतअष्टक म्हणत त्रिशूल कावळ्याच्या छातीत खुपसल, भयानक ध्वनी होऊन काळसर अस काहीतरी हवनकुंडातून निघून खिडकीतून नाहीस झालं
सिद्धनाथा च्या विदेही आत्म्याला क्षणात जाणीव झाली होती, क्षणात सिद्धनाथ स्वतः च्या देहात होता
घोंघावणारी विध्वंसक कल्पांतभैरव शक्ती न शिवमंदिर झाकून टाकलं होतं, सिद्धनाथा न एकदा गुरुगोरक्षनाथां च स्मरण केलं, आणि अघोरमूर्ती भगवान शंकराचं स्मरण करत
"काल भैरो..भूत भैरो...महाभय विनाशन...",साक्षात गुरू गोरक्षनाथ नी लिहिल्या मंत्रांच उच्चारण सुरू केलं...
आकाशातून विजेचा लोळ खाली उतरला आणि कळसातून मंदिरात उतरला, आणि शिवपिंडीत नाहीसा झाला, मंदिराला झाकोळणार काळ आवरण पेटून लालभडक झालं व तितक्याच वेगात अवकाशात नाहीस झालं
दुसऱ्या दिवशी यज्ञकुंडा जवळ तारा दुपार पर्यंत बेशुद्धावस्थेत होता, भानावर आला तेव्हा आपल्या सगळ्या साधना विद्या नष्ट झाल्या हे त्याला जाणवलं होत,
धावत पळत त्यानं शिवमंदिर गाठलं त्यानं पण पुजारी म्हणाला ...
"महाराज...वो बैरागी आज सुबह ही उज्जैन चला गया...कोई आया तो उसको ये दो ऐसा बोलके गया", अस म्हणत त्यानं तारा चाच तो वाळलेल्या रक्तानं भरलेला त्रिशूळ त्याला च परत दिला होता
नाथपंथी ला नडल्या ची आठवण म्हणून

अविनाश
@स्वामी@