गोट्या - भाग ४ Na Sa Yeotikar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

गोट्या - भाग ४


नशीब

बारावीची परीक्षा देऊन गोट्या आपल्या गावी परत आला होता. त्याला लहानपणीचे सारे खेळ आठवत होते मात्र त्याला ते खेळ खेळण्यात आता लाज वाटत होते. सकाळचे जेवण संपवून तो पलंगावर आराम करत होता. त्याला त्याचा भूतकाळ आठवू लागला. दहाव्या वर्गात शिकताना गोट्याला एका अनोख्या संकटाला।तोंड द्यावे लागले होते. दहावीचा वर्ष म्हणून त्याचा जोमाने अभ्यास चालू होता. गोट्या शरीराने जरा हाडकुळा होता. त्यामुळे बघणाऱ्याला हा आजारी आहे की काय ? अशी शंका मनात येत असे. तसा तो भित्रा देखील होता. कोणत्याही गुरुजींचे मार पडू नये म्हणून तो गृहपाठ आणि दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करत असे. कधी कोणत्याही शिक्षकांची गोट्या विषयी अजिबात तक्रार नव्हती. काही दिवस तो वर्गाचा मॉनिटर देखील होता. पण त्याला कोणी घाबरतच नव्हते त्यामुळे त्याने स्वतःहुन ते पद सोडून टाकले आणि अभ्यासाकडे लक्ष देऊ लागला. दिवाळीच्या सुट्या लागलेल्या होत्या. प्रत्येकजण आपापल्या गावाकडे दिवाळी साजरी करत होते आणि गोट्या मात्र दवाखान्यातल्या बेडवर झोपून होता. त्याला एका वेगळ्या आजाराने त्रस्त केले होते. त्याच्या डोक्यात एक फोड झाले होते आणि ते काही केल्या कमी होत नव्हते. त्यामुळे त्याला चक्कर येणे, डोळे दुखणे असा त्रास होऊ लागला होता. म्हणून त्याला मोठ्या दवाखान्यात भरती करण्यात आले. दिवाळीचा सण असल्याने डॉक्टरांनी ऑपरेशन एका दिवसांनी लांबविले होते. दवाखान्याच्या खिडकीतून आकाशात उडणारे फटाके तो पाहत होता, बॉम्बचा मोठा आवाज कानाने ऐकत होता. यावर्षी गोट्याच्या आजारपणामुळे आई-बाबा यांना देखील दिवाळी साजरी करता आले नाही याचे त्याला दुःख वाटत होते. दुसऱ्या दिवशी त्याच्या डोक्याचे ऑपरेशन संपन्न झाले. सर्व काही व्यवस्थित झाले होते. दिवाळीनंतर शाळेला जाता येईल असे गोट्याला वाटले पण तसे झाले नाही. एक महिन्याच्या कालावधी संपला तरी त्याच्या डोक्यावरील जखम पूर्णपणे बरी झाली नाही. डोक्यातून उग्र वास येत असल्याने गोट्याला कोणाजवळ जाऊन बसावे असे ही वाटत नव्हते. डॉक्टरांनी केलेले ऑपरेशन यशस्वी झाले नाही हे गोट्याच्या बाबांना लक्षात आले. असेच दोन महिने संपले, शालांत परीक्षेचे फॉर्म भरण्याचे दिवस जवळ आले. शाळेतील सरांनी गोट्याला यावर्षी परीक्षेला न बसविता पुढच्या वर्षी बसवा कारण त्याचा अभ्यास झाला नाही, त्याला कमी मार्क मिळाले तर त्याचे जीवन बरबाद होईल. सरांचे बोलणे ऐकून गोट्याच्या बाबानी त्याचा दहावीचा फॉर्म भरण्याचे टाळले. त्याला दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यांनी व्यवस्थित गोळ्या औषध दिल्याने हळूहळू त्याची जखम भरून निघाली. त्याच्या सोबतच्या सर्व मित्रांनी दहावीची परीक्षा दिली मात्र गोट्या देऊ शकला नाही, याचे त्याला खूप दुःख होत असे.
नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. नव्या मित्रांसोबत तो आपल्या अभ्यासाला सुरुवात केली. त्याचा पूर्ण अभ्यास झालेला होता त्यामुळे त्याला कोणतेच विषय अवघड जात नव्हते. सर्व घटकांची पुन्हा एकदा उजळणी होत होती. संपूर्ण वर्गात तो प्रथम क्रमांकावर राहत होता. त्याला आता कसलाही त्रास होत नव्हता. गोट्याचे आई-बाबा त्याची खूप काळजी घेत असत. एकदाची त्याची परीक्षा संपली आणि तो आपल्या गावी परतला. याच काळात त्याला लेखन करण्याचा छंद लागला. महिना दोन महिने काय करावं म्हणून तो अनेक पुस्तके, मासिके वाचून काढला आणि मनातील भावना लेख व कवितेच्या माध्यमातून व्यक्त करू लागला. त्याला एका शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले ज्यामुळे तो वृत्तपत्रात देखील आपल्या साहित्याद्वारे प्रसिद्ध होऊ लागला. पेपरात प्रसिद्धी मिळाल्यावर त्याला खूपच आनंद मिळू लागला होता. आपला रिकामा वेळ घालविण्यासाठी पत्रलेखन हा उत्तम छंद त्याला जडला होता. घरातील आई-बाबाचे, बहीण-भावाचे साऱ्यांचे स्वप्न होते की, गोट्या हा आपल्या बाबासारखा शिक्षक व्हावा. दहावीनंतर दोन वर्षांचा डी एड केलं की शिक्षक म्हणून नोकरी. खूप सोपं होतं नोकरी मिळवायला. गोट्याला देखील शिक्षकच व्हावे असे वाटत असे. तो देखील शिक्षक होण्याचेच स्वप्न पाहत असे. पाहता पाहता तीन महिन्यांच्या काळ उलटला आणि दहावीचा निकालाचा दिवस उजाडला. गोट्याच्या मनात धाकधूक चालू होतं, किती मार्क मिळतील ? याची त्याला उत्सुकता लागली होती. सकाळी सकाळी तो सायकलवर आपल्या शाळेत गेला. निकाल पाहण्यासाठी शाळेत विद्यार्थ्यांची एकच गर्दी झाली होती. सर्व मुले रांगेत उभे राहून आपला मार्कमेमो घेत होते. काही जणांच्या चेहऱ्यावर आनंद तर काही जणांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होते. नापास झालेले मुलं तर अक्षरशः रडत होते. शेवटी गोट्याच्या क्रमांक आला, त्याने मार्कमेमो हातात घेतला, मार्क पाहिलं तेंव्हा त्याचे त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. तो विशेष श्रेणीत पास झाला होता. आपला डी एड ला नक्की नंबर लागेल आणि दोन वर्षात शिक्षक होऊ असे त्याला वाटू लागले. तो आनंदात आपल्या घरी गेला. त्याचे मार्क पाहून सर्वाना खूप आनंद झाला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आलेल्या बातमीने गोट्यासह सारेच नाराज झाले. डी एड ला प्रवेश घेण्यासाठी बारावीची अट लावत असल्याचे शासनाने जाहीर केले. ही बातमी गोट्याचे सारे स्वप्न धुळीस मिळविले. गेल्या वर्षी परीक्षा दिली असती तर डी एड ला प्रवेश मिळाला असता. नेमकं याच वर्षी शासनाने बारावीनंतर डी एड का केलं असेल ? असा प्रश्न त्याच्या मनाला पडला. शेवटी तो आपल्या नशिबाला दोष देत बसला. गोट्याच्या नशिबात काय आहे ? हे बारावीच्या निकालानंतरच कळणार आहे.

- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769