कॉलेजचे आवार आज अगदी फुलुन गेलं होतं. नुकतीच १०वी पास होऊन कॉलेज लाईफ सुरु करणार होती ही मुलं. नोटीस बोर्ड पाशी गर्दी करून जो तो आपला वर्ग कोणत्या मजल्यावर आहे हें शोधत होते. कोणाचे आई-वडील सोडायला आले होते, कोणी खुप कॉन्फिडेंट होतें तर कोणी अगदीच बावरून गेले होतें. एक वेगळाच उत्साह होता या मुलांच्यात. डोळ्यात एक वेगळीच चमक होती.
बेल वाजली!!! आणि सर्वजण आपापल्या वर्गात जाऊन बसले. ११वी सायन्स A चा वर्ग; अभ्यंकर सर, फिजिक्स हा विषय शिकवायचे. सगळ्यांनी "गूड मॉर्निंग सर" असें म्हणताच " Please take your seats" हे बोलण्याची त्यांची विशिष्ट लकब फेमस होती; त्यानी लगेच हजेरी घ्यायला सुरुवात केली.. Roll no.1, 2,3,4.......
रोल नं. २० सायली खरे! "येस सर";
रोल नं. २१ शेखर खरे ! "present sir";
रोल नं २२ सुमित खरे! " येस सर"
जेमतेम म्हंटले आणि तिघांनी एकमेकांना कडे आश्चर्याने पाहिले; हीच त्या तिघांच्या घनिष्ट मैत्रीची सुरवात!!
सायली, शेखर आणि सुमित हे त्रिकुट काही काळातच पूर्ण कॉलेज मध्ये फेमस झालं. तिघेही हुशार आणि अत्यंत sincere; कधीच कुठलेच तास चुकवायचा नाहीत; नोट्स पूर्ण असायच्या, जर्नल्स वेळेत पूर्ण करायचे. कॉलेज कॅन्टीन असो की लिब्ररी तिघे एकत्रच!!!! आता त्यांच्या मित्र मैत्रिणीना आणि टीचर्सनाही सवय झाली होती त्यांना एकत्रच पहायची.
सुमित - राहायला मुलुंडला; साधारण शरीरयष्टी, नुकतेच मिसरूड फुटलेला, घाऱ्या डोळ्याचा, गोरापान स्मार्ट मुलगा. वडिलांचा बिझनेस; आई घरीच असायची आणि मोठी बहीण असे छोटे आनंदी कुटुंब.
शेखर - रहायला कल्याणला;उंच धिप्पाड, काळा सावळा, दिसायला smart, आई शिक्षिका आणि वडील पोस्टात, एक धाकटी बहिण आणि भाऊ. कुटूंब आनंदी नक्कीच होते पण काटकसरीने दिवस काढायला लागायचे.
सायली - राहायला ठाण्यात आजी सोबत मामा कडे, आई-वडील लहानपणी अपघातात वारले. कायम सलवार कुर्ता, एक वेणी. खुप गोड दिसायची; तिची गालावरची खळी तिचं सौंदर्य आणिकच वाढवायची.
तिघे वेगवेगळ्या ठिकाणी राहूनही एकत्र स्टेशनला भेटायचे आणि एकत्रच कॉलेजमध्ये यायचे.अत्यंत निखळ, निरागस मैत्री होती तिघांच्यात. एकमेकांना पुरते ओळखु लागले होतें त्यामुळे स्वभाव, आवडीनिवडी माहीत होते. कधीं रुसवे फुगवे झालेच तरी कोणी एक समजूत काढून पटकन मिटवून टाकायचे. ११वी तर मजेत गेली. सगळ्या सोबत अभ्यासाचे प्रचंड ताण होता. तरी ९०% कामावलेच तिघांनी.
आता १२वी चे अतिशय महत्त्वाचे वर्ष; सुमित ने क्लास लावले होतें, त्याच्या नोट्सवर तिघे लायब्ररीत बसून अभ्यास करायचे. हें वर्षे फक्त आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे असे ठरले होते त्यांचे. १२ वी चा रिझल्ट खुप छान लागला तिघांचा. नेहमी प्रमाणेच एक-दोन टक्क्यांनी पुढे मागे पण ९० ते ९५ %च्या खाली नाहीच.
आता मात्र तिघांची दिशा बदलणार होती...शेखर चे आधीच इंजिनिअरिंगला जायचे ठरवले होते; त्याप्रमाणे त्यांनी एडमिशन ची तयारी सुरू केली. सायली चा मेडिसिन मध्ये रस होता; तिला डॉक्टर व्हायचे होते. सुमितचे वडील त्याला सॉफ्टवेअर इंजेनिर किंवा मॅनेजमेंट कोर्स करायला सांगत होते; कारण त्यांचा बिझनेस पूर्ण सेट होता. तोच सुमितने पुढे सांभाळावा ही त्यांची इच्छा.
असा तिघांचा तीन दिशेला आपापल्या करियरचा प्रवास सुरु झाला!!!!!
त्यावेळी स्मार्टफोन नव्हते; तसेच Social net सुध्दा नव्हते. व्हाट्सएप कॉल, फेसबुक पोस्ट्स असे एकमेकांना कनेक्ट ठेवण्याची सोप्पी साधनं नव्हती. त्यामुळे एकतर भेटायचे असेल तर सरळ त्या व्यक्तीच्या घरीं जाणे किंवा लँडलाईन वर फोन करणे. यामुळे आपोआपच तिघांच्या भेटी, बोलणे कमी होत गेले. कोण काय करतंय याची कल्पनाही एकमेकांना नव्हती.
४-५ वर्षांनी एकदा संध्याकाळी सुमितने सायलीला ऑटो साठी धपडताना पहिलं; "चल बस पटकन, सोडतो तुला घरी; घाईत नसशील तर एक कॉफी घेऊया का"? सायलीने हो किंवा नाही म्हणायच्या आत सुमितने कार हॉटेल समोर पार्क केली सुध्दा. "मग!! काय चालु आहे"? "अरे, खरं तर थोडी घाईतच आहे; लंडनला जात्ये, चांगली जॉब मिळाला आहे हॉस्पिटलमध्य आणि माझा ब्रेन आणि सब कॉनशीयास माईंडवर रिसर्च चालुये तोही सोबत करायला मिळेल" ती काय बोलत होती या कडे सुमितचे लक्षच नव्हते. त्याला सायली सोबत निवांत वेळ हवा होता बोलायला. "मग; आजी कशी आहे"? "आजीची रवानगी मामाने वृद्धाश्रमात केलीये, त्यामुळे मी पेइंग गेस्ट म्हणून राहत्ये, आता सगळा गाशा गुंडाळून लंडनला स्थायिक व्हायचंय".
तुझे काय चाललंय? " मी आता MBA झालं की पप्पान सोबतच जॉइन करणार, सध्या त्यांच्या सोबत US, सिंगापूर, दुबई; वरचेवर जाण चालु असत!! तेवढाच अनुभव मिळतो".
तो बोलत होता आणि सायलीच्या डोक्यात तिच्या तयारीचे विचार येत होते.
" सायली!! थोडं बोलायचे होते ग! तुझ्या सोबत; बोलु का?" हो; बोल की" किंवा असे करूया का, मी लंडनला जायच्या आधी भेटू तिघे आणि खूप गप्पा करु; आत्ता थोडी घाईतच आहे रे!! निघू मी? असे म्हणत ती पटकन निघुन गेली. सुमितला काय बोलायचे होत याचा अंदाज तिला कॉलेज पासून होताच; पण त्याने तसे कधीच दर्शवले नाहीं आणि बोलला ही नाही. आता सायलीने टाळणेच; कारण आता तिला तिची स्वप्न साकारायचा ध्यास लागला होता. सुमित थोड्यावेळ तिथेच रेंगाळत होता. "आधीच विचारायला हवं होतं ग तुला!! असो... बघु नंतर".
सुमित आणि शेखरने मस्त डिनर चा प्लॅन केला.
शेखर- Civil Engineer झाला होता; जॉब च्या शोधात होता; बाबांच्या बऱ्याच जबाबदाऱ्या त्यालाच पूर्ण करायच्या होत्या.
मग ठरल्या प्रमाणे एका संध्याकाळी तिघेजण भेटले.....
हे त्रिकूट SK3 या नावाने कॉलेजमध्ये गाजलेले...
खूप गप्पा, आठवणी, हशा अशी मस्त संध्याकाळ घालवली. एकमेकांना गिफ्ट्स दिले. सायली नेहमी पेक्षा ही खुप सुंदर दिसत होती. सुमित योग्य वेळेची वाट पहात होता; शेखर Smoke करायला गेल्यावर सायलीला मनातल सांगून टाकलं; पण सायलीचें उत्तर तयार होते; सुमितनेही तिला force केला नाही. एकमेकांना bye बोलताना तिघांच्याही डोळ्यात पाणी होतें. आता परत लवकर भेट होणार नाही याची खात्री होती तिघांना.....
सायली आता तिच्या job आणि research मध्ये पूर्ण bussy झाली. शेखर त्याचा job, घरच्या जबाबदाऱ्या बहिणीचं लग्न भावाचे शिक्षण, त्यात सतत bangalore, madras ला जॉब सदर्भात जायला लागायचं. सुमित वडिलांच्या सोबत बऱ्याच वेळेस business tour वर असायचा. अशी साधारणपणे ५-६ वर्षे गेलीं असतील. आता शेखरचे लग्न झाले अनुजा सोबत, आणि सुमितचे मुग्धा सोबत.
एका संध्याकाळी सुमित मीटिंगस आवरून मस्त drinks घेत FB वर Posts पाहत होता; त्यात त्याला सायलीच्या नावांची friend request दिसली. खुप खूश झाला, request accept केली आणि पुढचे दोन तास कसे गेले कळलंच नाही. सायलीने नेहमीप्रमाणे तिचा जॉब, research आणि धावपळीचा पाढा भराभर वाचला. सुमितनेही तिला त्याचा business चा तो कसा efficiently संभाळतोय ते सांगितले; शिवाय त्याचे लग्न झाले हे ही सांगितले.
आता बऱ्याच वेळा दोघ रिकाम्या वेळात chatting करायचे.सायली online असली की खूप गप्पा व्हायच्या पण मधेच offline असायची पाच- सहा दिवस. असे का ते सुमितनेही विचारले नाही आणि तिने ही कधी सांगितले नाही.मुग्धाला या तिघांच्या मैत्रीची पूर्ण कल्पना होती; १०० वेळा तरी तिनें त्याच्या गंमती ऐकल्या असतील. कोणालाच भेटली नसली तरी सगळ्यांची माहिती होती तिला.
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुमित US ला गेला; दिवसभर meetings, conference करून जाम दमला होता. रूममध्येच जेवण मागवून मस्त drinks घेऊन आराम करायच्या विचारात होता. नेहमी सारखा फ्रेश झाला n laptop उघडून Post पाहत होता; त्यात सायली चा मेसेज होता...I am landing in INDIA on 17th Oct@ sharp 7.45pm. वाचून त्याला खूपच आनंद झाला. त्यानं सायलीला खूप contact करायचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ.. तिचे पुढे मेसेजेस नाहीतच. त्याचा stay वाढला आणि तो त्याच्या कामात पुन्हा bussy होऊन गेला. India मध्ये येण्याची आता त्याला ही घाई झाली होती. मुग्धाला 7 वा महिना उलटुन गेला होता.
सुमीत airport वर कॅब ची वाट पाहत असताना पाठून जोरात थाप पडते आणि चमकून मागे बघतो तर काय!! " शेखर; काय मस्त surprise यार" दोघांना खूप आनंद झाला, घट्ट मिठी मारून सुमितला तो उचलून घ्यायचा तसा आजही उचलला त्याला...
दोघांनी एक एक drink घेऊ असे ठरवले; त्याप्रमाणे दोघांनी घरी फोन करून सांगून टाकले. शेखर त्याच्या job बद्द्ल बोलत होता आणि सुमित त्यांच्या business बद्द्ल; दोघे आपल्या आपल्या संसाराची खुशहली share करत होतें. आपल्यात कीती बदल झाले आणि किती मोठे झालो; या गप्पा रंगल्या होत्या दोघांच्या.
"अरे; सायली परत येत्ये India मध्ये; ती आणि मी जवळपास ५-६ महिने Fb वर chat करतोय" हे सांगताच शेखर जोरात ओरडलाच " काय?? ती बरी झाली!!!!! अरे कोमात होती ती; जवळपास ५ -६ महिने झाले असतील". आता ओरडायची पाळी सुमितची होती; " अरे कसं शक्य आहे हे" ; तिचा मेसेज आहे ती येत्ये परत!!!!
" नाही रे सुमित!! ती कधीच आलीय परत,आजारी होती; ब्रेन वर ताण आला आणि treatment च्या दरम्यान कोमात गेली".
"How can it be possible; till yesterday she was in contact with me".
"Oh!! Come on; Sumit!! काहीतरी गल्लत होतीये तुझी; १५ दिवसान पूर्वी मी Bangalore ला जायच्या आधी तिला Hospital ला भेटून आलो; ती कोमात आहे".
"नाही रे नाही!! कसं शक्य आहे??कसं शक्य आहे??? सुमित याच विचारात घरीं पोचला. कोणाला बोलण्याची सोय नव्हती कारण मुग्धाची तब्येत नाजूक होती; तिची कधीही delivery होईल अशा परिस्थितीत होती ती.२-३ दिवस सुमित झोपु शकला नव्हता; शेवटी त्याने शेखरला बोलावले आणि दोघे hospital मध्ये सायली ला बघायला गेले. सायलीला असे पाहून सुमीतचे हात पाय गार पडले. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता; शेवटी शेखरने समजावले त्याला.
मूग्धची डिलिव्हरी date होती आणि नेमके सुमितला US ला tour ला जावे लागणार होते. मोठा project होता; मीटिंग cancel करणे possible नव्हते. आई-पप्पा, मुग्धा सगळ्यांनी त्याला इथलं tension घेऊ नकोस; शिवाय मुग्धाचे दादा- वहिनी , आई-बाबा सुध्दा आहेत इथे.मुग्धाची delivery date होती आणि नेमके सुमितला US ला tour ला जावे लागणार होते. मोठा project होता; मीटिंग cancel करणे possible नव्हते. आई-पप्पा, मुग्धा सगळ्यांनी त्याला इथलं tension घेऊ नकोस; शिवाय मुग्धाचे दादा- वहिनी , आई-बाबा सुध्दा आहेत इथे. मनात नसताना ही सुमित जड मनानी निघाला.
मुग्धा Dr. कडे checking ला गेली. Dr. गोडबोले मुग्धा च्या आईला आणि सासूबाईना सांगत होत्या " एक दोन दिवस जातील अजून; मी एक injection देत्ये; लक्ष असु देत; काहीही emergency वाटली, pains सुरु झाले तर लगेच घेऊन या".
सुमित आपली काम पटापट आवरत होता, Dr. चे बोलणं ऐकून तोही थोडा रिलॅक्स झाला. दोन दिवसांनी मुग्धाला ऍडमिट केलंय असा पप्पानचा फोन आला तसा सुमित... जी पटकन मिळेल त्या flight चे booking करून मोकळा झाला. रात्री 9 चे flight होते; Hotel checkout केले आणि Airport वर पोचला. मन खूपच अस्वस्थ होत होते. सगळे लक्ष मुग्धा कडे लागले होते.
8 वाजता त्याच्या फोन वर मेसेज आला... Mugdha deliver a baby Girl at 7.45pm Both are fine; waiting for your arrival!!!! प्रचंड खूष झाला;......आणि पाठोपाठ दुसरा शेखरचा मेसेज होता....सायली passed away at 7.45pm
Date 17th Oct @ 7.45pm
सुमित च्या तोंडून निघाले "सायली!! हो, ही सायलीच आली आहे !!!!
(समाप्त)