फुलराणी Dhanshri Kaje द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

फुलराणी

"चिनु... ए चिनु"
चिनु अंगणात खेळत असते. अचानक तिला कुणाचा तरी आवाज येतो आणि ति इकडे तिकडे बघते पण तिला कुणीच दिसत नाही. ति परत आपल्या खेळात मग्न होते. काही वेळाने तिला परत तोच आवाज ऐकू येतो.
"चिनु बघ तरी एकदा माझ्याकडे. मी आहे फुलपाखरू एकदा वळुन तर बघ."
फुलपाखरू म्हणल तस चिनु घाबरते ति मागे वळून बघते. तस तिला एक अगदीच छोटस फुलपाखरू दिसत. आपल्याशी एक छोटस फुलपाखरू बोलतंय यावर तिचा विश्वासच बसत नाही. चिनु फुलपाखरा जवळ जाते तस ते फुलपाखरू चिनुशी बोलु लागत.
"तु चिनु आहेस न? मला तुझ्याबद्दल सगळकाही माहीत आहे तु तुझ्या आई- बाबांची लाडकी आहेस न? तुला खुप मित्र- मैत्रीणी देखील आहेत मी रोज तुला त्यांच्याशी खेळताना बघत असते. तुला प्राण्यांची सुद्धा आवड आहे न? तु तर त्यांना नाव सुद्धा दिली आहेत बरोबर न? माझ्याशी मैत्री करशील ? मला तुझ्या सारखी लहान मुलं खुप आवडतात. जी प्राण्यांना आपलं समजतात त्यांना त्रास देत नाहीत त्यांच्यावर प्रेम करतात आणि तु तशीच आहेस एकदम प्रेमळ." चिनु खुप आश्चर्याने फुलपाखराच बोलणं ऐकत असते तिला काही वेळ समजतच नाही की एक फुलपाखरू आपल्या भाषेत कस काय बोलु शकत. पाहिले तर ति जराशी घाबरते पण काही वेळा नंतर फुलपाखराशी बोलु लागते.
"तु माझ्याशी बोलते आहेस? पण हे कसं शक्य आहे. मला माहित आहे प्राण्यांना माणसांची भाषा समजते पण तु तर बोलत आहेस. तु नक्की फुलपाखरूच आहेस न मला तुझी खुप भीती वाटत आहे." ते छोटस गोड फुलपाखरू हळुच तिच्या जवळ येत आणि तिची भीती कमी करण्याचा प्रयत्न करत.
"चिनु अग तु मला घाबरू नकोस मी तर तुझ्याशी मैत्री करायला आलीये मी तुला कधीच त्रास देणार नाही ग. तुला खर सांगु का इथे न माझ्याशी खेळायला माझ्या बरोबर बागडायला कुणीच नाही बघ. पण पाहिले अस न्हवत माझ्याही बरोबर खेळणारे बागडणारे माझ्याच सारखे मला मित्र-मैत्रिणी होत्या आम्ही खुप खेळायचो पण लोकांमुळे त्यांचा जीव गेला मग मी खुप उदास राहू लागले वाटलं सगळी लोक सारखीच असतात ही लोक आम्हाला जगुच देत नाहीत. मी नेहमी असा विचार करायचे पण एक दिवस तुला चिमण्यांना दाणे ठेवताना बघितलं आणि माझे विचारच बदलुन गेले मनात विचार आला सगळी लोक सारखी नसतात. काही प्राण्यांवर प्रेम करणारी त्यांना जीव लावणारी पण असतात म्हणून मला तुझ्या बरोबर खेळावस वाटलं. आता राहिला प्रश्न माझं बोलण्याचा तर तुझा स्वभाव खुप गोड आहे आणि मनही खुप साफ आहे म्हणून तुला माझा आवाज ऐकु येतोय. आता सांग करशील माझ्याशी मैत्री." चिनु आधीच खुप घाबरलेली असते तिला खुप मोठा प्रश्न पडलेला असतो एक छोटंसं फुलपाखरू आपल्याशी कस बोलु शकत ति त्या धक्यातुन सावरलेली नसते ति जरा वेळ विचार करते आणि हळुच फुलपाखराला विचारते.
"मी तुझ्याशी मैत्री करायला तयार आहे. पण मला यावर विश्वासच बसत नाहीये की तुला बोलता ही येत. तु खरच एक फुलपाखरुच आहेस न की अजुन कुणी? मला खर सांग तु मला त्रास तर देणार नाहीस न."
फुलपाखरू बोलत.
"अग एकदा बघ तरी माझ्याकडे. मी किती छोटी आहे आणि खर सांगु का तुला आम्ही कुणालाच त्रास देत नाही ग उलट आम्हालाच लोक त्रास देतात. तुला माहिती आहे आम्ही एखाद्या फुलावर थोडस बसलो न की लगेच लहान मुलं आम्हाला पकडायला धावतात. आम्हाला खुप भीती वाटते. आणि मग आम्ही अगदी जीव धरून पळतो आणि मग कुठे तरी बसायचं म्हणून बसतो तर दुसऱ्या प्राण्यांची शिकार होतो. मग सांग जे स्वतःच धोक्यात असतात ते त्रास देतील का? तु न एकदा माझ्या घरी चल मी तुला माझ्या मित्र- मैत्रिणींची परिस्थिती दाखवते चालेल तुला?"
आता थोडीशी चिनु शांत होते तिची भीती कमी झालेली असते. ति फुलपाखराला म्हणते.
"म्हणजे तुला जादु पण येते? अरे वाह! खुप छान. मला यायला आवडेल तुझ्या बरोबर. मी यायला तयार आहे."
आनंदून ते इवलस फुलपाखरू तिला म्हणतं.
"म्हणजे खरच आता तु माझी मैत्रीण झालीस?"
चिनु गोड हसुन म्हणते.
"हो आपण आता एकमेकांच्या मैत्रीणी आहोत. पण तु मला जादुनी उंच उंच फिरवुन आणशील न."
लगेच फुलपाखरू म्हणत.
"हो का नाही, आपले डोळे मिट."
चिनु आपले डोळे मिटते आणि काही क्षणातच ती फुला पानांवर उडत असते चिनु आपले डोळे उघडते. तिला ते दृष्य बघुन खुप आनंद होतो. ति खुप उडते बागडते आपल्या नव्या मैत्रीणी बरोबर खुप खेळते. मग काही वेळानंतर दोघेही थकतात आणि एका फुलावर बसतात. चिनु फुलपाखराला म्हणते.
"फुलपाखरू किती मस्त वाटत अस बसायला फुलाचा असाही उपयोग होऊ शकतो हे आजच मला कळतय. फुल पान ह्या तुमच्या उडण्याच्या बागडण्याच्या जागा आणि आम्ही लोक ती फुलच तोडुन टाकतो तुम्हाला किती वाईट वाटत असणार न. मी आता कधीच फुल तोडणार नाही आणि कुणाला तोडुही देणार नाही. ए मी तुला एक नाव देऊ का? आवडेल तुला?"
फुलपाखरू लगेच आनंदाने म्हणत. "हो चालेल की, मला नक्कीच आवडेल."
चिनु जराशी विचार करू लागते. "अं... काय नाव देऊ बरं तुला. (काही क्षणात) हं... आजपासून तुझ नाव फुलराणी. कस वाटलं तुला तुझं नाव?"
लगेच फुलपाखरू म्हणत. "अरे वाह! खुपच मस्त मला हे नाव खुप आवडलं."
चिनु फुलराणीला म्हणते. "तु मला तुझं घर दाखवणार होतीस न. आपण जाऊयात तुझ्या घरी?"
फुलराणी चिनुला आपल्या घरी घेऊन जाते. घरी पोहोचल्यावर चिनुला एक विदारक सत्य परिस्थिती दिसते. फुलरणीच्या सगळ्या मित्र- मैत्रीणीमध्ये कुणाला पंख नसतात तर कुणाला एकच डोळा असतो. ते बघुन चिनुला खुप त्रास होतो तिला रडु येत. फुलराणी चिनुला म्हणते.
"बघितलंस चिनु मुलं आम्हाला चिमटीत पकडतात म्हणून आमची अशी हालत होते मुलांना माणसांना माहीत असत आमचं आयुष्य खुप कमी आहे तरी मुलं आम्हाला हे असा त्रास देतात. तुला वाटत असेल की फक्त ह्या गोष्टी दाखवायला फुलराणीने आपल्याशी मैत्री केली. पण तसं अजीबात नाहीये बरं का. तु मला खरच खुप आवडतेस."
ती परिस्थिती बघुन चिनु म्हणते.
"अग नाही असं काही नाही बर झालं तु मला तुझ्या घरी आणलंस आमच्या मुळे तुमची कशी हालत झालीये ते तरी समजलं मला. पण फुलराणी यावर काही उपाय नाही का ग. मी काही करू शकते का तुमच्यासाठी."
चिनुच बोलणं ऐकून फुलरणीच्या डोळ्यात पाणी येत. ती म्हणते.
"तुम्ही लोक चांगली असतात ग, पण तुम्ही जेव्हा झाडांची हानी करता न ते तुम्ही चुकीचं वागता. ही झाडे फुले आमची दुसरी घर आहेत. तीच राहिली नाही तर आम्ही कुठे जायचे सांग."
चिनु विचार करू लागते आणि काही क्षणातच आपल्या मैत्रिणीला म्हणते.
"तु काळजी करू नकोस आज तु जे सत्य माझ्या समोर आणल आहेस न मी घरी गेल्यावर यावर काही न काही नक्की करेल हं. आता तुम्हाला तुमच्या घरापासून कुणीच दुर करणार नाही."
दोघी एकमेकांकडे बघून स्मित हास्य करतात आणि क्षणार्धात फुलराणी चिनुला आपल्या घराच्या अंगणात सोडते. भानावर आल्यावर एक क्षण तिला काही सुचतच नाही ति विचार करते. "जे काही आपण बघितलं आनुभवल ते खरच होत की स्वप्न."
ति स्वतःला लगेच सावरते आणि घरात जाऊन घडलेला सगळा प्रकार आपल्या आई बाबांना सांगते. त्यांना वाटत चिनु मजाच घेतीये ते तिला हसण्यावारी घेतात. ते बघुन ती तिथुन निघुन जाते आणि ऑनलाईन सर्च करू लागते सर्च करता करता तिला एक लेख सापडतो त्यात दिलेलं असत फुलपाखरांसाठी कोणकोणती फुलझाडे महत्वाची असतात. तिला एक कल्पना सुचते ति आपल्या मित्र मैत्रिणीना बोलावते आणि घडलेला प्रकार सांगते तिचे फ्रेंड्स तिच्यावर हसु लागतात. ति थोडीशी आपल्या मित्र मैत्रिणींवर रागावते. पण लगेच सगळे एक होतात चिनु आपली कल्पना सगळ्यांना सांगते सगळ्यांना तिची कल्पना खुप आवडते ते तयार होतात. आणि सगळे फ्रेंड्स मिळून लगेच कामाला सुरुवात करतात बघता बघता चिनुच्या घरा मागे एक छोटीशी सुंदर बाग तयार होते. हे सगळं चिनूची नवी मैत्रीण बघत असते. ति लगेच आपल्या बाकीच्या फ्रेंड्स ना घेऊन येते त्या फुलपाखरांना बघुन सगळ्यांना आनंद होतो. त्यातलं एक फुलपाखरू अचानक बोलु लागत ते फुलपाखरू सगळ्यांना आनंदून धन्यवाद करत. ते बघुन सगळे खुश होतात