संघर्ष - 2 शब्दांकूर द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संघर्ष - 2

------------------------------
भाग दोन
----------------------------------
माझ्या डोळ्यात पाणी आलं .. पोटत भुकेची कुर्तड आणि डोक्यात निराशेची .. तेवढ्यात एक ड्युटी आली मी निराशेनेच ती घेतली आणि गेलो ..
एक लावण्यवती गर्द हिरव्या रंगाची साडी घालून ओठांना गुलाबी रंगाचं लिपस्टिक .. केसांचा बांधलेला अंबाडा थोडा उरोजांच्या बाजूने जाणारा पदर मोठी खोल नाभी .. मी पुन्हा निराश झालो खूप भूक लागली होती पण काहीच करू शकत नव्हतो ..

मी म्हटलं ....बसा मॅडम ...पण कश्या बसणार बाईक वर साडी घालून? बसता येईल का हो?

तू काळजी नको करुस. मी बसते बरोबर .. आज टॅक्सी नाही मिळत आहे ना आणि मला जायचं आहे लवकर ..

मी तिला हेल्मेट दिल आणि ती बसली आम्ही निघालो .. म्हणाली थोडा वेगात घे मला एका ठिकाणी जायचं आहे .. मी हो म्हणालो आणि तिने माझ्या कमरेला घट्ट पकडल .. गाडी सुसाट निघाली होती आणि पावसाने रंग दाखवला मी गाडी बाजूला घेतली आणि तिला एक झाडाखाली उभं केलं

पावसाळा आहे नं .. येणारच कि तो .. ती पुटपुटली

बाजूला गरमागरम चहा बनत होता मी म्हटलं घेणार मॅडम तिने नाईलाजाने होकार दिला मी चहा दिला तिला .. त्या निमित्ताने मला पण मिळाला ..थोड्या वेळात पाऊस गेला मी तिला सोडलं आणि निघणार तेवढ्यात ती बाहेर आली मला म्हणाली तू दिवसभर गाडी चालवतोस का
मी म्हणालो , हो मॅडम .. कालच सुरु केलं हे काम
माझ्यासाठी करणार काम , लॉजिस्टिकस च आम्ही बाईक ने भाज्या आणि फळ घरोघरी पोहचवत असतो
मी म्हणालो .. पण मॅडम ..
अरे मी तुला २०००० रुपये महिना देईल ..
मी गप्प होतो .. लगेच ती म्हणाली बरं २५००० रुपये देईल कारण मला विश्वासू मुलगा हवाय ..

मी फक्त पाय पकडायचे बाकी राहिलो होतो आता मला तिच्यात साक्षात लक्ष्मी दिसली ..
मॅडम पण मला थोडी पहिले मदत मिळेल का? .. कारण ...

आलं माझ्या लक्षात तुझ्या कपड्यावरून .. काळजी नको करुस हे १०००० रुपये घे .. पहिले जेव काही तरी आणि कपडे घे आणि मग ये मला भेटायला इथेच ..
माझ्या डोळ्यातुन अश्रूच्या धारा वाहायला लागल्या ...

अरे वेड्या रडतोस काय ? जा लवकर कर ....

मी गेलो पहिले थोडा जेवलो खूप दिवस झाले होते अस सुग्रास जेवायला पोटात आता तर भूक पण मेली होती पण एक पोळी आणि थोडा वरण भात खाल्ला .. बाजूलाच कपड्यांचं दुकान होतं .. एकतीन साड्या घेतल्या हलक्याच होत्या पण तेवढंच जमत होतं मला .. दोन जोडी कपडे घेतले आणि एक शूज .. हिशोब करून १००० रुपये घरच्यांसाठी ठेवले .. ५००० रुपये बाजूला केले म्हटलं परत करून देईल ..

मी आलो परत तिथेच .. तिला एक साडी दिली म्हटलं मला तुम्ही देवीपेक्षा कमी नाहीत तिने आढेवेढे घेतलेत पण शेवटी ठेवून घेतली मी म्हटलं खूप हलकी आहे पण माझं मन राखायला ठेवा माझ्याकडे पैसे आले कि मी चांगली घेऊन देईल. ती हसली फक्त मात्र तिने पैसे परत केले
मी तिच्याकडून काम समजावून घेतलं आणि घरी गेलो खूप थकलो होतो जाताना घरी थोडं धान्य थोड किराणा आणि भाजीचं नेलं .. तेवढ्यातही घर भरल्यासारखं वाटलं .. देवाला हार नेला आणि खण नारळाची ओटी भरली .. एक साडी आईसाठी ठेवली . .. घरात दिवाळी आल्यासारखं वाटत होतं .. मी जेवण केलं आणि झोपलो सकाळाचो मधुररम्य स्वप्न पाहत

सकाळ झाली मी लवकरच ऑफिस ला गेलो. मला सरावांशी तिने ओळख करून दिली आणि मला म्हटलं सुशांत कसून काम समजून घे घाई नाही करायची .. मी मान डोलावली
सुशांत ने मला काम सांगितलं आणि म्हणाला आता प्रॅक्टिकल .. एक काम कर हा ऑर्डर डेलीवरी करून ये .. मी लगेच निघालो आणि बघतो तो काय त्याच सोसायटी मध्ये आलो जिथे मला पहिली ड्युटी मिळाली होती सेक्युरिटी मध्ये एन्ट्री केली आणि आणि लिफ्टने वर आलो १४ वा मजला मनातच म्हणालो पडलो तर चिंध्यापन नाही भेटणार ..