संघर्ष - 7 - शेवट शब्दांकूर द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संघर्ष - 7 - शेवट

आशाताई ने शगूनला विचारलं , हे काय केलंस शगुन तो कुठचा काय, गोत्र काय?, मूळ काय काही माहित नसताना हे काय केलंस तू
शगुन - आई , प्रेमाला कधी बंधनं असतात का गं ? तुझं पण लव्ह म्यॅरेज होतं ना ? मग तरी तू हे विचारतेस
आशाताई - म्हणूनच हे विचारते गं .. जेंव्हा ज्याला जवळचं मानावं तो अर्ध्या रस्त्यात सोडून निघून जातो तेंव्हा माणूस नाही प्रेम हरतं शगुन .. उद्या प्रेम पण सोडून गेला तर काय करशील ? मला ज्या यातना झाल्या त्या तुला का व्हायला नकोत हे मला वाटते. चल ते काढून टाक तुझं मी लग्न लावून देते .. मीच कुठे तरी कमी पडली ... आशाताईंच्या डोळ्यात पाणी दाटून आलं ..
शगुन - तू काहीही म्हण आई मी नाही असा काही करू देणार तुला .. मला नाही करायच हे असं

मी म्हटलं तसंच होणार , आशाताईंचा धारदार निर्णयी आवाज आला आणि शगुन रडत पडून राहिली

मी वळलो ते सरळ राहुलच्या ऑफिस कडे .. तिथे गेलो तर कळलं तो पनवेल ला गेलाय .. आणि माझी गाडी सुसाट निघाली ते थेट जिवण तारा ला गेली .. खूप दिवसांनी एखाद्या बार मध्ये बसलो होतो..

एक ९० दे रे ... सोबत चखणा

मी ऑर्डर सोडली .. आणि राहुलला फोन केला .. पण तो काही लागेना ... मला माहित होत तो पनवेलला आला कि इथेच येतो म्हटलं भेटेल .. पण खूप वेळ झाला तरी तो काही आला नाही त्याची वाट बघता बघता किती ९० झाले मलाच कळालं नाही .. शेवटी वेटर ने मला म्हंटलं साहेब खूप झाला आता ..

पैसे हवेत का तुला हे घे मी क्रेडिट कार्ड त्याला दिलं .. घे ठेव तुझ्याकडे खात्री करून घे पैसे आहेत कि नाही .. साले....

मी पुन्हा फोन करू लागलो .. ना शगूनला फोन लागत होता ना राहुलला .. मी उठलो आणि पैसे देऊन गाडीला किक मारली ते थेट शंभूराजेला गेलो .. आणि त्याचा फोन लागला

ये रावल्या ..आवल्या.. आहेस कुठे .. माझा संसार खराब केलास ना भेट साल्या आता .. आहे शंभू राजेला ये लवकर पाहतो तुला ...

मद्याची धुंद चढली होती .. मी पुन्हा बिअर मागितली ...

घरचा फोन खणखणला तशी शगुन वैतागुन म्हणाली कोण आहे यार आता एवढ्या सकाळी...आणि जावून फोन उचलला ...

शगुन - कोण बोलतय .. सकाळी सकाळी
मॅडम , मी क्रिटीकेयर हॉस्पिटल मधून बोलतेय .. प्रेम सरदेसाई आमच्या कडे भरती होते त्यांच्या कडे शगुन फूड चा आयडेंटिटी कार्ड मिळालं .. ऑफिस ला फोन केला तर तुमचा नंबर मिळाला ...
शगुन - काय बोलताय ? प्रेम कसा भरती होणार त्याला काही एक झाला नाही आहे तो तर कालच चांगला होता .. आणि शगूनला भोवळ आली

तेवढ्यात फोन चा आवाज ऐकून आशाताई धावत आल्यात .. आजकाल मोबाईलच्या युगात कोण लँडलाईन वापरतं , त्यांना आश्चर्य वाटलं .. एकदा वाटलं प्रेम ने फोन केला असेल कारण शगुन चा फोन त्यांनी फोडून टाकला होता रागात .. शगुन पडणार तेवढ्यात त्यांनी तिलाअलगद पकडल आणि फोन घेतला

हं कोण बोलतंय

मॅडम , मी क्रिटीकेयर हॉस्पिटल मधून बोलतेय .. प्रेम सरदेसाई आमच्या कडे भरती होते .. ते आता ...

अरे पण तू कोण बोलत आहेस .. तुझ्या डॉक्टरांना फोन दे - आशाताई
हॅलो , मी डॉक्टर साळुंखे बोलतोय , काय झाल मॅडम त्यांनी अदबीने आशाताईंना विचारलं
हि काय बोलतेय डॉ - आशाताई
मॅडम, प्रेम सरदेसाई आमच्या कडे भरती होते .. त्यांनी शेवटपर्यंत मृत्यूशी झुंज दिली पण आता ते नाही राहिलेत त्यांचं बद्दल माहिती काढताना आम्हाला तुमचा नंबर मिळाला म्हणून तुम्हाला सांगतोय जर तुम्हाला त्यांच्याबद्दल काही माहिती असेल तर त्यांना कळवावे .. मॅडम डेड बॉडी न्यावी लागेल त्यामुळे आम्ही काळजीत आहे त्यातल्या त्यात हि पोलीस केस आहे

काय !!!! - आशाताई ओरडल्याच .. पण काही फायदा नव्हता .. त्यांनी शगूनला उठवलं आणि बाजूला सांगितलं कि लक्ष ठेवा पण शगुन ऐकताच नव्हती तिने सारखी जिद्द लावली होती कि तिला जायचंय ..

शगुन आणि आशाताई हॉस्पिटल ला गेल्या .. माझ्या पार्थिव शरीराकडे बघून मटकन खाली बसल्या ... पण सर्व संपलं होतं आता .. मी प्रयत्न करून पण शगूनला स्पर्श नव्हतो करू शकत .. आणि डोळ्यातून अश्रू पण बाहेर पडत नव्हते

शगूनने मात्र रडून रडून स्वतःचे हाल केले होते.. आशाताईला समजत नव्हतं काय करावं .. त्या पण मटकन खालीच बसल्या होत्या.

आशाताई पुढे खूप मोठा प्रश्न पडला आता कसं करायचं .. याची फॅमिली शोधायची कशी? शगूनला घरी सोडून त्या माझ्या घरी गेल्या . मी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या काही थांबल्या नाहीत ... कुलूप तोडलं आणि माझ्या घरातला अवतार पाहून त्या उभ्याच राहिल्या .. मनातच म्हणाल्या कुठल्या गरीब घरातला आहे माहित नाही .. लगेच काही शोधाशोध केली माझ्या टेबलवर आलेलं पत्र बघितल आणि हैराण झाल्या .. त्यावर नाव लिहिलं होतं .. प्रेम सदाशिव सरदेसाई , आशाताई मनातच म्हणाल्या हा सरदेसाई बिल्डर चे मालक सदाशिव सरदेसाईंचा मुलगा आहे? आई गं !!!!!

आशाताईंच्या तळपायाखालची जमीन सरकली ... त्यांनी फोन घेतला आणि सरदेसाई बिल्डर मध्ये फोन लावला ...

हॅलो , मी शगुन फूड्स मधून बोलतेय .. मला सदाशिव सरांशी बोलायचं आहे
फोन ट्रान्सफर झाला .. आणि एक करडा आवाज आला ... कोण बोलतंय
सर मी शगुन फूड्स मधून आशाताई बोलतेय , प्रेम सरदेसाई आमच्याकडे कामाला होते .. आणि त्यांनी सर्व सांगितलं ...
हमम पोरगा जिद्दी होता ..

सदाशिव सरदेसाई मटकन खाली बसले ... कितीही कठोर असला तरी बाप होता ... त्यांना पाच वर्षांपूर्वीची गोस्ट आठवली ...

सकाळी ७ वाजले असतील .. प्रेम गाढ झोपेत होता ...
प्रमिला , प्रेम कुठे आहे .. सदाशिवराव करड्या आवाजात बोलले ... आज कॉलेज ला नाही जायचा का ?
अहो तो म्हणाला त्याला आज नाही जायचंय .. प्रमिला ताई
का ? सदाशिवरावांचा पारा चढला होता .. ते तरा तरा प्रेमाच्या रूम मध्ये गेले आणि बघतात तर काय प्रेम मस्त झोपलाय .. त्यांनी त्याला उठवल .. बापाच्या धाकाने प्रेम उठला आणि बाथरूम मध्ये गेला .. सदाशिवराव रूम मधून परतणार तेवढ्यात प्रेमचा फोन वाजला ... सदाशिव रावांनी फोन बघितला कुणीतरी शीतल चा होता ... त्यांनी उचलला आणि समोरून एक मस्त गोड आवाज आला .. हाय डार्लिंग उठलास का ये ना आज लोणावळा जाऊ ...

सदाशिव रावांनी काहीही उत्तर ना देता फोन कापला .. आणि तसेच उभे राहिले वाट बघत

प्रेम बाहेर आला आणि .. सदाशिवराव बोलले ... हि शीतल कोण आहे ?
प्रेम गडबडला .. कोणी नाही .. कोण शीतल ?
आज पासून तू ऑफिस ला ये .. काम कर पैसे कमव आणि मग ह्या सर्व गोष्टी कर ... माझ्याकडे तुझ्यासाठी फालतू पैसे नाही.. नाही तर जा बाहेर आणि कमावून दाखव ... कळेल तुला दुनियादारी

ठीक आहे जेंव्हा मी एवढे पैसे कमवेल तेंव्हाच घरात पाय ठेवेल .. प्रेमाने घातलेल्या कपड्यावर घर सोडले ... तो दिवस आणि आज ... गेलेला प्रेम आलाच नाही .. आता प्रमिलेला काय सांगू .. सदाशिवरावांसमोर मोठा प्रश्न होता .. पण सांगावं तर लागणारच होत

त्यांनी आशाताईंला फोन केला पत्ता विचारला आणि प्रमिलाताईसोबत दवाखान्यात गेले ...

माझं पार्थिव शरीर बघून गाडा गाडा हलवत रडलेलेला बाप मी पहिल्यांदा बघत होतो .. आईची तर रडून रडून हालत खराब झाली होती ... शगुन ढसाढसा रडत होती ... रडत रडताच तिला चक्कर आली आणि तिला तिथेच ऍडमिट केलं ... आशाताईंसोबत सदाशिवराव आणि प्रमिला ताई शगुन कडे गेल्या .. डॉक्टर म्हणाले काळजी घ्या तिला जास्त रडत काम नये ...

डॉक्टर सर्व काही नॉर्मल ना - सदाशिव राव
हो पण ती प्रेग्नन्ट आहे ना , रडून बाळाच्या प्रकृतीवर परिणाम व्हायचा - डॉक्टर
प्रेग्नन्ट ?? - सदाशिवराव आश्चर्याने बोलले
आशाताईंने खाली मान घातली आणि सर्व सांगितलं ...
म्हणजे माझ्या प्रेमचं मूल !!!! - सदशिवरावांना त्यातही थोडा आनंद झाला
डॉक्टर तिची पूर्ण काळजी घ्या माझी सून आहे ती - प्रमिलाताई
आशाताई बघताच राहिल्या ... मला मनापासून आनंद झाला ...

सर्व घरी गेले माझा शरीर निस्तेज पडलेल होतं .. किती दिवसांनी घरी आलो होतो माहित नाही ... सर्व सोपस्कार संपले आणि ... अग्नीच्या झोतात मी समाविष्ट झालो ..

बऱ्याच दिवसांनी आमच्या घरावर रोशनाई दिसत होती ... आत गडबड होती ... बाबा,आई आणि आशाताई .. सर्वांचे स्वागत करत होत होते ... कुणीतरी आवाज दिला .. अरे चला मुहूताची वेळ झाली ... आतून आवाज येऊ लागला .. कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या ...

एक मुलगी जोरात म्हणाली .. हं सांगा काय नाव ठेवायच... शगुन सांग गं ... सदाशिव राव बोलले...
नाही बाबा तुम्हीच सांगा - शगुन

संघर्ष .... संघर्ष प्रेम सरदेसाई ... आणि सर्वानी मंगलसुरात गजर केला ..

मी समाधानाने हसलो आणि ... विलीन होत गेलो ....