Sangharsh. - 4 books and stories free download online pdf in Marathi

संघर्ष - 4


तिचे सुंगंधीत केस .. नुकतेच धुतलेले .. लाल रंगाची सॅटिन नाईटी आत काहीही ना घालता अंगाप्रत्यांगावर लालिमा पसरलेली .. न्यूड लिप्स आणि हस्तिदंतासारखी शुभ्र दंतपंक्ती .. तिचा नाजूक रेशमी स्पर्श .. हाताचा हाताला होणारा .. मला आत ओढून तिने पुन्हा किणकिणत्या आवाजात विचारलं .. माझे फोन का नाही उचलत तू ? २५ कॉल केले आज शेवटी हे हत्यार उपसलं .. यानंतर जर फोन नाही उचलला लक्षात घे मी काय करेल ते ? तिने लाडिक दम दिला मी फक्त अवाक होतो .. तेवढ्यात आतून आवाज आला

कोण आहे ग एवढ्या रात्री .. आवाज मला ओळखीचा वाटला
आई कोणी नाही .. शगुन मधून काही मागवलं ..
ओके कोण आलं आणि ती व्यक्ती बाहेर आली मी बघतच राहिलो त्या आशाताई होत्या .. मी फक्त बोललो मॅडम आपण ...
हो रे पण तू का आलास
मॅडम आज डिलिव्हरी जास्त आहेत कोणीच नव्हतं .. म्हटलं जाताना देऊन जावं ..
बरं बैस .. शगुन याला चहा वैगेरे दे ग
मी कोचम्बून बसलो आणि एक मस्त चहा मला मिळाला .. आम्ही सोबतीनेच नास्ता केला आणि मी निघालो ... जाता जाता तिने पुन्हा दारात म्हटलं .. आता बघा फोन नाही उचलला तर आईला सांगेल आणि नोकरी वरून काढून टाकेल .. मी फक्त नमस्कार केला ... आणि निघालो ..

घरी गेलो बेड वर पडलो पण झोप काही केल्या येईना .. मी मोरपंखी स्वप्नात रममाण झालो ... रोज आमचं फोन वर बोलणं सुरु झालं आम्ही मनाने जवळ यायला लागलो .. कधी सिद्धिविनायक तर कधी दादर चौपाटी ला भेटायला लागलो ..

सायंकाळची वेळ होती .. खूप पाऊस होता आशाताई काही कामासाठी गेल्या होत्या मला तेवढ्यात फोन आला ..

शगुन बोलतेय , लवकर ये घरी आईला बरं नाही आहे ..ती एवढी घाबरली होती कि काहीच कळेना
मी लगेच निघालो आणि घरी गेलो बघितलं आशाताई खूप अस्वस्थ होत्या मी लगेच डॉक्टरकडे नेलं डॉक्टरांनाही कळेना त्यांनी लगेच हार्ट हॉस्पिटल ला भरती करायला सांगितलं .. त्यांना माईल्ड अटॅक आला होता पण त्या बऱ्या होत्या रात्री त्यांना हॉस्पिटल मध्येच भरती ठेवायला लागलं ... . रात्र खूप झाली होती आशाताईंना औषध दिलं आणि आम्ही बाहेर बसलो होतो मस्त धुंद पाऊस होता आन तिचा हात हातात तो मोरपंखी स्पर्श मला माझ्या आयुष्याचा सर्वांत सोनेरी क्षण वाटत होता .. बाहेर पाऊस चालू होता पण मी मनातल्या पावसाने ओथंबून वाहत होतो .. मला ठाऊक नाही शगुन ला केंव्हा झोप लागली ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती खूप थकल्या सारखी दिसत होती .. पहाटेचा क्षण असेल मी तिला थोडी हुडहुडी भरायला लागली होती .. मी एका नर्सला सांगून एक चादर मागवली व तिला पांघरून दिलं ... माझ्या मांडीवर ठेवलेलं तिचा डोकं आणि तिच्या रेशमी केसांमधून फिरणारे माझे बोट .. सारं कसं स्वप्नवत .. तेवढ्यात डॉक्टर आले आणि आम्ही उठलो .. डॉक्टरना माझ्याशी बोलायचे होते ...

प्रेम .. अँजिओप्लास्टी करावी लागेल .. २ मायनर ब्लॉक आहेत .. औषधाने ठीक होऊ शकेल पण रिस्क आहे
मी शगुन कडे बघून म्हणालो .. ठीक आहे आपण करूयात .. मग सारा दिवस ऑपेरेशन च्या गडबडीत गेला .. सायंकाळी आशाताईला जग आली आणि त्या बोलल्या तेवढा हायसं वाटलं .. आम्ही संपूर्ण दिवस सोबत होतो .. खूप दिवसांनी जगात आपलं आहे अस वाटलं... मी सहज तिचा हात पकडला घट्ट एकदम तिने पण माझ्याकडे बघितलं ... आणि लाजली चक्क ...

दिवसांमागुन दिवस जात होते आशाताई ठीक होत होत्या .. त्या घरी आल्या आणि घरी पण अराम करू लागल्या शगुन फूड्स ची जवाबदारी मझ्यावर होती .. मी रात्र दिवस स्वतःला झोकून दिलं .. आमचा व्यवसाय दिवसेंदिवस आकाशाला भिडत चालला होता ... हळू हळू मी जुन्या व्यवसायावरही पकड घेऊ लागलो .. ज्या मॅनेजरने घोटाळा केला आणि त्याला काढलं होतं त्याच्या कंपनी मध्ये मी सुरुंग पेरायला लागलो कारण त्याला संपवायचं हा मी आशाताईंला दिलेला शब्द होता ... मी त्याच्या कंपनीचे सर्व प्रॉडक्ट शगुन फूड्स मध्ये डेव्हलोप करायला लागलो आणि मग त्याला मार्केट मध्ये नवी कॉम्पेटेशन द्यायला लागलो ...
माझे हे कारनामे आशाताईला मात्र माहित नव्हते .. मी विचार केला सांगेल आणि इथेच घात झाला .. एक दिवस दुपारच्या वेळेस मी बसलो होतो आणि अचानक फोन आला .. सर तुम्हाला भेटायला राहुल सर आलेत .. मला माहीतच होते हा येईल मी म्हटलं ठीक आहे बोर्ड रूम मध्ये पाठवा ..

राहुलने येताच म्हणाला ... हे चांगलं नाही करत आहेस .. फळ भोगशील
मी फळ भोगायला नाही घाबरत मित्रा .. मला एवढच माहित आहे कर्म चांगले केले कि फळ पण चांगलंच मिळतं ..
बाकी तू आताही सेटलमेंट करू शकतोस दिलेल्या धोक्याची माफी मागून आणि शगुन फूड साठी तिथेच राहून इन्फॉर्मशन देऊन ... बोल मंजूर आहे पैसे तू मागशील ते ..
राहुल तावातावात निघाला - बघून घेईल मी तुला ..
आणि मी पण त्याला म्हणालो बघायचं तर आता बघ ... पुढचं बसलास .. मी दार बंद केलं आणि फोन आला .. मी शगुन बोलतेय ... काय करतोस .. आणि हा राहुल कशाला आला होता मी आश्चर्य चकित झालो तिला कसा माहिती झालं ....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED