संघर्ष - 1 शब्दांकूर द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

संघर्ष - 1

संघर्ष

संपलेल्या "प्रेम"ची कहाणी ....
----------------------------------
भाग एक
----------------------------------

ये आवल्या ... धमकी नको .. भेटायचं तर मर्दासारखा भेट .. फोन वरून मी धमकीच्या सुरात बोललो .. ये पनवेलच्या शंभूराजे मध्ये वाट बघतोय बघू किती दम आहे कोनात ते ?

दारूचा अंमल चढला होता मी पूर्ण नशेत होतो गाडी कशी तरी उभी करत शंभू मध्ये शिरलो .. कसातरी बसलो .. अन मनातच बरळलो .. या साल्यानो बघतो एका एकाला ..
पुन्हा फोन केला.. साल्यानो प्रत्येक मीटिंग बोर्डरुम मध्ये नाही होत रे .. या मिटिंग दाखवतो तुम्हाला ..

ये एक बिअर आन रे ... वेटरने बियर ठेवली आणि मी तोंडाला लावली .. अर्धी खल्लास झाली असेल आणि दोन गाड्या आल्यात .. मी घेरल्या गेलो होतो .. मी तेवढ्यातही उठलो आणि डोक्यावर काही तरी झणझणीत लागलं .. मला फक्त माझ्या रक्ताचे थेम्ब दिसले आणि अंधार झाला ..साला मागून वार झाला होता ... संपलो आपण मनात झालेल्या किर्रर्र दाट अंधारात एकही तारा नव्हता .. किर्रर्र अंधार ..

माझ्या डोळ्यावरती खूप दडपण असल्याचा भास मला होत होता .. मला काहीहि काळात नव्हतं ..खूप दिवसांच्या अंतराने मी झोपेतून उठतोय कि काय असं मला वाटलं .. मी कुठे आहे काय करतोय काही काही नाही ... तेवढ्यात मला तिचा नाजूक स्पर्श जाणवला ..मी उठण्याची केविलवाणी धडपड केली आणि पडलो .. तिने मला सांभाळलं आणि तिच्या भरदार उरोजांचा मला स्पर्श झाला ... तोही रात्रीचा अंधार होता .. कदाचित पहाटेचा पहिला प्रहार ... मी पुन्हा पडून राहिलो डोळे उघडले गेले होते .. बोलता मात्र येत नव्हत.. तिने मला पाणी दिलं .. मी पिण्याचा प्रयत्न केला पण फसला तिने चमच्याने पाणी टाकल.. तिचा ड्रेस थोडा समोरून लो नेक होता मला तिच्या उरोजांचे गोलाकार आवर्तने दिसायला लागले होते .. मी विचार करत होतो कि हि आहे कोण? तिने लगेच इंजेकशन घेतल आणि मला टोचलं

पुन्हा तोच अंधार तोच अंधकार अन मी पुन्हा हरवलेलो ...

मी वर वर जात असल्याचा भास होत होता मला .. अरे हे काय माझ्यासारखा कोण पडलाय असा निचपीत इथे मी स्वतःला हात लावून बघत होतो पण मला माझा अस्तित्व जाणवत नव्हत...

तेवढ्यात डॉक्टर आले आणि नर्स ला म्हणाले .. काय झालं .. व्हेंटिलेटर लावा .. स्ट्रोक्स द्या ... हार्ट लाईन सरळ सुतासारखी दिसत होती ... सर्व माझ्या डोक्यावरचं रक्त पुसत होते .. सर्व कसे मेकॅनिकल ..

माझ्या अंगावर पांढरा कापड टाकण्यात आला आणि मला तिथून हलवण्यात आला .. मी विचारात होतो कुठे नेताहेत मलाच ... अरे यार मी इथे आहे ना .. पण कुणीच ऐकायला तयार नव्हत... मला कुजक्या खूप घाणेरड्या जागेवर टाकण्यात आलं मात्र मला काहीच जाणीव नव्हती ..

मी वैतागलो बेचैन झालो आणि मा शांत झालो .. असाच माझ्या देहाच्या बाजूला बसलो हताश होऊन .. कोण आहे मी काय आहे माझा अस्तित्व ? कोणीच नाही .. मला तो दिवस आठवला ..

सकाळ झाली होती मी उठलो आपला ड्रेस घातला आणि गाडीला किक मारली नुकतच कॉलेज संपलं होतं खिश्याला पैश्याची आणि पोटाला अन्नाची चणचण पडली होती .. आपली बॅग घेतली जि पी आर एस सुरु केल आणि निघालो .. घरून बाहेर जाताना गणपती बाप्पाला नमस्कार केला कोण दही साखर देणार मला ? मीच घेतलं आणि बघतो तर पहिली ड्युटी आली हो मी नवीन कामात हात टाकला होता .. जशी टॅक्सी ऑटो लोकांना पोहचवते तसेच मी बाईक ने लोकांना पोहोचवणार होतो .. मी आलेल्या लोकेशन वर गेलो .. एक सुंदर मोठी सोसायटी होती ती .. मी आलेला नंबर डायल केला .. तिकडून एक सुंदरसा आवाज आला ..
मॅडम, मी आलोय लवकर या
तिने गोड आवाजात म्हणाली - हा आलीच दोन मिनिट ह...
दोनाचे १५ मिनिट झाले मी बेचैन होतो आणि तितक्यात ती आली
मी गाडी स्टार्ट केली तिला हेल्मेट दिलं आणि गाडी सुरु केली
मॅडम ट्रिप सुरु करतोय मानेनेच होकार दिला आणि माझ्या कमाईला सुरुवात झाली .. मी तिला तिच्या ऑफिस ला सोडलं आणि बाय करून निघालो .. २५ रुपये मिळाले होते माझी पहिली कमाई .. खूप आनंद झाला मी २५ रुपयात जगातली सर्व सुखं विकत घेतलीत ...

त्यादिवशी मी ५० ट्रिप मारल्यात .. पोटाला जेवणाचा पत्ता नव्हता शेवटची ट्रिप पूर्ण केली तेंव्हा रात्रीचे १ वाजले होते मी घरी आलो .. खिश्यात ७०० रुपये होते देवासमोर ठेवले .. घरी बघितलं पाण्याशिवाय काही नव्हतं ... ब्लॅक टी घेतला .. साखरेविना .. बरीच लोक डायट म्हणून घेतात मी मजबुरी म्हणून ... पाय खूप दुखत होते .. सलग १८ तास ड्रायविंग केला होत.. थकलो होतो पण झोप येत नव्हती कारण पायाला सूज आली होती आणि फोड पण आले होते हाताला .. रात्र तळमळण्यात गेली सकाळी तसाच उठलो पाणी गरम केलं .. आंघोळ केली .. पॅन्ट घालता घालता भलत्याठिकाणावून फाटला .. काय करुऊ समजेना .. एक सुई मिळाली आन शिवून घातला म्हटलं बघू .. कि कपडे पण येतील ...देवाला नमस्कार केला थोडं बरं वाटलं आणि फोन चालू केला .. आणि पुन्हा एकदा सुरुवात आज हातात ग्लोव्हस घातले थोडे फाटले होते पण फोड झाकल्या जात होतं पायात फाटलेले बूट .. मोज्यांची वानवा होतीच ..

पुन्हा तीच ड्युटी आली होती मी पुन्हा मी गेलो ती आली ट्रिप सुरु करणार तेवढ्यात ती म्हणाली कभी नाहते हो या नाही कितना गंदा स्मेल आ राहा है I .. मुझे नही जाणा कॅन्सल कर दो .. मी लहानसं तोंड करून निघालो आणि ती टीप टीप करत सॅंडल वाजवत शिव्यांची लाखाली वाहत ..