भाग ८
अखेर तो दिवस उजाडला, सायली आणि रोहित एकत्र आश्रम मध्ये पोहोचले. दोघे एकत्र पाहून राजेंद्र देशमुख चकित झाले. आणि रोहित ला विचारू लागले, बेटा रोहित तू सायलीला ओळखतॊस ?
रोहित : हो बाबा, पण एक मिनिटे तुम्ही सायली ला कसे ओळखता? कारण मी तिच्या सोबत इथे पहिल्यांदा आलो.
सायली : एक मिनिट तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता? सगळे आश्चर्य चकित होऊन एकमेकांकडे पाहत होते.
राजेंद्र: बरं, सायली हा माझा मुलगा रोहित बरका !!!!!!
रोहित तुमचा मुलगा ? पण तुम्हाला तर एकच मुलगी ना? सानिका मग रोहित !!!!!!
राजेंद्र: अग सायली रोहित आणि सानिका बालपणापासून एकत्र वाढलेले, दोघांचे एकमेकांपासून अजिबात पान हालत नसायचा. सानिका गेल्या नंतर मला आणि हे आश्रम सानिकाचं स्वप्न हे रोहित ने सांभाळलं. माझा मुलगाच आहे तो.
सायली: रोहित तू कधीच काही बोलला नाहीस? मला नव्हता माहित बाबा.
रोहित: अगं, मला पण नव्हतं माहित कि तू बाबाना आणि सानिकाला ओळखतेस.
राजेंद्र: चला आज सगळे एकत्र भेटलो, इतके वर्ष एकमेकांना ओळखत असून एकत्र आलो नव्हतो.
आज सानिकाचं आपल्याला जवळ घेऊन आली.
सगळे मिळून सानिकाचा वाढदिवस साजरा करतात. सगळ्या आजी आजोबाना जेवायला घालतात आणि. रोहित सायली सर्वांचा निरोप घेऊन निघतात.
सायली च्या मनात खूप प्रश्न होते, हे रोहित ला समजत होतं, पण गेले कित्येक दिवसात सायली ज्या प्रकारे वागली होती त्यामुळे रोहित शांत राहिला.
न राहून सायली समोरून बोलते, तू मला कधीच बोलला नाहीस कि तू सानिका आणि बाबाना ओळखतॊस.
रोहित: अगं सायली कधी संबंधच नाही आला. त्यामुळे मी कधीच काही बोललो नाही.
आता दोघान मधले थोडे गैरसमज दूर होतील असं वाटत पण तितक्यात ओंकार चा फोन येतो.
सायली तो फोन उचलते आणि तिकडून जोरात ओरडण्याचा आवाज येतो. ओंकार सायली वर चिडलेला असतो, त्याने सकाळ पासून सायलीला पन्नास फोन केले होते पण या सगळ्या आनंदात तिने ते पहिले ले नसतात त्याचा असा चढा आवाज एकूण सायली फोन ठेऊन देते. आणि तिचा पूर्ण मूड खराब होतो.
हे रोहतीला समजलं, पण तो शांत राहातो. आणि थोडा वेळ जाऊन बोलतो, तुला नाही वाटत हा निर्णय घेण्यात तू घाई केलीस. .
हे सायली ऐकते आणि थोडा वेळ दोघात हि शांतता पसरते, ती शांतात भंग होते ते रिक्षा चालकाच्या आवाजाने ताई तुमचं स्टॉप आला. आणि सायली काही न बोलता निघून जाते.
असेच काही महिने निघून जातात. या दरम्यान रोहित इंटर्नशिप साठी दुसऱ्या शहरात निघून जातो.
जाण्या आधी एकदा तरी सायली ला भेटावं आणि तिला त्याच्या मनात तिची जी जागा आहे त्या बद्दल सगळं सांगावं असं वाटलं. पण त्याला ती वेळ योग्य वाटली नाही म्हणून तो निघून जातो.
अचानक ऑफिस मधून रोहित च्या वडिलांच्या पर्सनल अससिस्टन्ट चा फोन येतो. आणि फोन वर ती जे सांगते ते ऐकून रोहित ताबडतोब घरी येण्या साठी निघतो.
सगळं सोडतो आणि त्याला एकच माहित असत कि कोणत्या हि परिस्थिती त्याला आता घरी पोहोचणे गरजेचे आहे.
काय झालं असेल त्या सहा महिण्यात, असं काय फोन वर रोहित ने ऐकलं ज्यामुळे त्याने ठरवलेल्या सगळ्या गोष्टी सोडून रोहित घरी येण्या साठी निघाला.
संपूर्ण प्रवासात रोहित खूप अस्वस्थ असतो. कारण हे नाकी होतं कि जे काही झाला असेल ते नकीच मोठं असणार, आणि या सगळ्यात रोहित आणि सायलीचे आयुष्य एक नव्या वळणावर येऊन थांबणार होत.
आता या दोघं मधले गैरसमज दूर होतील का पाहूया पुठे काय होईल.