कॉलेज फ्रेइन्डशिप - 9 Adv Pooja Kondhalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कॉलेज फ्रेइन्डशिप - 9

भाग ९

रोहित जस जसा परातीचा प्रवास सुरु करतो तस तस त्याला जुन्या सगळ्या गोष्टी समोर दिसत होत्या. त्या सहा महिन्यात असा एक पण दिवस नसतो कि, त्याला सायलीची ओढ सतावत नसेल, पण तो स्वतःला खूप समजावत होता.

रोहित शहरात पोहोचल्यावर डायरेक्ट हॉस्पिटल साठी निघतो. हॉस्पिटल मध्ये आधीच सानिका चे बाबा आणि ऑफिस मधला काही स्टाफ उभा असतो, सानिका चे बाबा काही न बोलता आपल्या हाताचे एक बोट ICU कडे दाखवतात. रोहित हातातले सगळे सामान सोडून ICU कडे धाव घेतो. पण आत मध्ये एन्ट्री नसल्याने तिथेच उभाराहून काचे मधून तो त्याच्या बाबा ना न्याहाळतो. डोळ्यात अश्रू भरून आले होते पण कोना समोर ते व्यक्त करणार म्हणून गप तसाच काही क्षण उभा राहतो. अचानक कोणी तरी त्याच्या खांद्ययावर हाथ ठेवत, तो मागे वळून पाहतो, त्याचा बांध फुटतो आणि त्या व्यक्तीच्या गळ्यात पडून तो खूप रडतो. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सायली असते. ऑफिस चा सगला स्टाफ दोघं कडे पाहत असतो, हे सायली ला समजताच ती त्याला समजून खाली बसवायचा प्रयत्न करते.

सायली : रोहित शांत हो. तुला स्वतःला सावरावे लागेल. कारण तुझे वडील फक्त तुझी फॅमिली नाही ये तर इथे उभी असलेली प्रत्येक व्यक्ती तुझी फॅमिली आहे तुला त्यांच्या साठी स्वतःला सांभाळावे लागेल. नाहीतर तुझ्या वडिलाने उभे केलेले एवढे साम्राज्य त्यांची हे फॅमिली कोण सांभाळणार.

थोडा वेळ तो गप असतो, आणि अचानक उठून उभा राहतो, सगळे त्याच्याकडे आशेने पाहतात, तो सगळ्या कडॆ एक नजर फिरवतो, आणि बोलायला सुरवात करतो,

रोहित: आता सगळे घरी जा अराम करा, उद्या पासून आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे, बाबा लवकरच बरे होऊन आपल्या सोबत काम करायला सुरुवात करतील, पण जर आज आपण इथेच थांबलो सगळी काम सोडून तर त्यांना चांगलं नाही वाटणार. उद्या आपण ऑफिस मध्ये भेटू.

सर्व जण घरी जातात सायली मात्र तिथेच असते. तो सायलीला देखील घरी जायला सांगतो, पण ती काही जात नाही तितक्यात मेडिसिन घेऊन सानिका चे बाबा येतात,

रोहित: बाबा तुम्ही बसा मी करतो सगळे.

सानिका चे बाबा : अरे मी कुठे काय केलं आहे, सकाळ पासून सायली च सगळं करते आहे बघ, मला सांभाळते डॉक्टर जे सांगेल ते मेडिसिन आणून देते. गुणांची ती माझी पोर.

रोहित त्याची नजर तिच्या कडे फिरवतो ती एक च्या दरवाज्या पाशी च उभी असते.

रोहित तिथून निघून जातो, थोड्या वेळाने परत येतो हातात कॉफी आणि पाणी घेऊन.

सायलीला जवळ बोलवतो आणि पाणी, कॉफी देतो.

दोघे हि एकमेकां कडे चोर नजरेने पाहत होते पण काही बोलत नव्हते.

सायली ची नजर खूप काही सांगायचं प्रयत्न करत होती, हे रोहित ला समजत होत, पण तो शांत होता कारण ती जागा आणि वेळ अयोग्य होती.

तितक्यात डॉक्टर येतात, काळजी करू नका आता काही टेन्शन नाही पण आज पासून धावपळ बंद काम बंद , त्यांनी फक्त आराम करायचा.

रोहित सोबत सानिका चे बाबा ऐन सायली देखील मान हलवून डॉक्टर ना समर्थन देतात.

रोहती: डॉक्टर मी बाबा ना भेटू शकतो का?

डॉक्टर: आता नाही उद्या सकाळी, तुम्ही देखील आराम करा आता, उद्या सकाळी या मग खुशाल भेटा.

रोहित सायली ला थोड्या वेळ तिथेच थांबण्या साठी विचारतो, आणि सानिका च्या बाबाना घरी सोडण्यासाठी निघतो. गाडीत बाबा ना कधी झोप लागते कळताच नाही. त्यांना घरात शांत झोपून रोहित परत हॉस्पिटल ला येतो. सायली चा शांत निरागस चेहरा पाहून तो प्रसन्न होतो. तिला तो उठवत नाही कारण सकाळ पासून खूप धावपळ केली होती तिने. तो तिच्या शेजारी येऊन बसतो. त्याला हि कधी झोप लागते कळतच नाही.

दोघांना सकाळी जाग येते ते हॉस्पिटल मधल्या मावशींच्या आवाजाने. दोघे हि स्वतःला सावरतात आणि फ्रेश होण्यासाठी निघून जातात.

सायली फ्रेश होऊन डायरेक्ट रोहित च्या बाबा ना बघायला जाते. त्यांची विचार पूस करते. तितक्यात मागून रोहित देखील येतो त्याला पाहून त्याच्या बाबा ना खूप बरं वाटत. रोहित आणि त्याचे बाबा एक मेकांना खूप वेळेनंतर भेटले होते दोघे खूप गप्पा मारतात. सायली जाण्या साठी निघते, रोहित तिला थांबवतो, थांब सायली मी तुला घरी सोडतो, सानिका चे बाबा येत आहेत ते आले कि आपण निघू.

रोहित चे बाबा : अरे तुमची ओळख झाली वाटत ?

रोहित: बाबा आम्ही पहिल्या पासून एकमेकांना ओळखतो, ती माझी खूप छान मैत्रीण आहे. आम्ही कॉलेज मध्ये एकत्र होतो.

रोहित चे बाबा : हो का ? अरे वाह्ह छानच (हळूच हसत )

त्यांच्या छानच आणि हळूच हसण्याचा अंदाज दोघे हि लावण्याचा प्रयत्न करत होते तितक्यात सानिका चे बाबा येतात, आणि जोरात रोहित सायली वर ओरडत निघा रे घरी दोघे तुम्ही आराम करा जाऊन मी आहे इथे.

दोघे हि प्रश्नार्थ चेहरा करून बाहेर पडतात