कॉलेज फ्रेइन्डशिप - 10 Adv Pooja Kondhalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

कॉलेज फ्रेइन्डशिप - 10

भाग १०'

सायली ला खूप काही बोलायचं होत. पण तिला समजत नव्हतं कि रोहित तिला समजून घेईल नाही घेईल.

आणि तिच्या चेहृर्यावरचे भाव पाहून रोहित स्वतः बोलतो, काय सायली काय म्हणतेस मग कस चालू आहे सगळं, आई काय म्हणते, भावच कॉलेज पूर्ण झालं ना? हे सर्व एकूण सायली च्या डोळ्यात पाणी येत. रोहित ला काही समजत नाही, त्याला कळत नाही तो असं काय बोलला कि सायली ला वाईट वाटलं.

तो गाडी एका बाजूला थांबवतो, आणि तिला पाणी देतो, सायली काय झालं, सांगशील का? मी काही चुकीचं बोललो असेल तर माफ कर, ती न राहवून रोहित च्या गळ्यात पडते, रोहित ला कळून चुकत कि काही तरी खूप मोठं झालं आहे नाहीतर सायली एवढी खचणार नाही. तो तिला प्रेमाने समजून सांगण्याचा प्रयत्न करतो.

सायली त्याच्यावर जोरात ओरडते, मला तू तुझी खूप जवळची मैत्रीण मानतोस ना मग माझे कान पकडून का नाही समजावलंस कि, मी चुकीचा निर्णय घेते आहे. माझ्या एका चुकीच्या निर्णय मुळे आज आई माझ्या सोबत बोलत नाही, माझी फॅमिली माझ्या पासून लांब झाली. तू हि इथे माझ्या सोबत नव्हतास. जर सर आणि राजेंद्र बाबा माझ्या सोबत नसते, तर माझं काय झालं असत. तुला एकदा हि असं नाही वाटलं का रे एखादा फोन करून विचारवं मी कशी आहे.

रोहित एक छान हलकी smile देतो, आणि म्हणतो अगं वेडा बाई तू एखादा फोन का नाही केलास, आणि ओंकार होता ना तुझ्या सोबत, मग?

आणि झालं काय असं कि आई आणि फॅमिली सगळं काही ........ मला नीट सांगशील का ?

सायली: रोहित तू मला त्या दिवशी घरी सोडलेस , आणि तू गेल्यावर ओंकार आला, मी त्याला तू शहर सोडून जाणार आहेस हे सांगतले आणि त्याचा चेहराच बदलला.

रोहित: पण मी तर तुला शहर सोडून जाणार आहे हे सांगतले नव्हतं, मग तुला कस कळलं.

सायली: राजेंद्र बाबा नी सांगितलं. ते महत्वाचं नाही रे. ओंकार चा आवाज वाढू लागला. त्याचा आवाज एकूण, सगळे बाहेर येऊन पाहू लागले. त्याचा असं वागणं पाहून मी त्याला घरी घेऊन गेले. त्या नंतर तो जे काही बोलला ते एकूण मला देखील शॉक लागला. तो जे वागत होता त्याचा आई ला खूप त्रास झाला.

आई ने ओंकार गेल्यावर मला पण घर बाहेर काढलं.

रोहित: पण असं काय झालं सायली, काय केलं ओंकार नि कि आई नी तुला घरा बाहेर काढलं आणि मग तू गेलीस कुठे कारण खूप उशीर झालं होता आधीच एवढ्या रात्री काय केलस तू?

सायली: मला काहीच सुचत नव्हतं तुला फोन करावा असं वाटत होत, पण तू आधीच बोलून गेला होतास कि मी घाई केली, मग मी राजेंद्र बाबा न कडे गेले त्यांनी मला सांभाळलं.

रोहित: अगं सायली का नाही केलास फोन, मला एवढं परकं समजलीस?

सायली: मला तुला फोन करायची फार इचछा होती, पण तू तुझी नवी सुरुवात केली होती, तू तुझं आयुष्य एका नव्या रूपात सुरु केलं होत. आधीच मी तुझ्या सोबत खूप चुकीचं वागलं होते.

रोहित: सायली मला अजिबात त्रास नव्हता झाला. उलट मी या सगळ्यात तुझ्या सोबत नव्हतो या गोष्टीच जास्त वाईट वाटत. पण या सगळ्यात ओंकार ने असं काय केलं कि हे सगळं घडलं.

सायली: ओंकार ला माझ्याशी काही च घेणं देणं नव्हतं, त्याला फक्त आपल्या मैत्री शी मतलब होत. तो सुरुवाती पासून मला फक्त एक पायरी समजत होता, तुझ्या वडिलांच्या ऑफिस मध्ये एन्ट्री मिळवण्या साठी. त्याला फक्त तुझ्या वडिलांच्या ऑफिस मध्ये एक चांगली पोस्ट आणि मी तर आधीच तिथे होते, मग काय, त्याला नोकरी, आणि माझा पगार, सगळं काही आयत मिळणार होत.

त्याला फक्त एवढंच नको तर माझ्या आई ने मेहनतीने उभं केलेलं घर पण हवं होत.

या सगळ्या च मला अजिबात वाईट वाटलं नाही पण त्या नंतर तो जे बोलला ते खूप लागलं आई ला पण आणि मला पण.

रोहित: त्याला नोकरीच हवी होती तर मला सांगायचं, मी स्वतः बोललो असतो बाबांशी.

आपल्या सोबत एवढं मोठं नाटक का केलं. आणि काय बोलला तो असं? कारण तू अशी खचणाऱ्यातली नाहीस, नक्की काही तर खूप चुकीचं बोलला असणार तो.

सायली: हो , इतकं कि मला माझीच लाज वाटली, आई ला डायरेक्ट बोलायला लागला, मला काय माहित नाही का कि बिना नवऱ्याचं तुम्ही या दोघाना कस वाढवलं असेल.

हे एकूण माझ्या पाय खालची जमीन सरकली, मला काही समजण्या आधी आई ने त्याला एक चांगलीच लावून दिली, आणि घरा बाहेर काढलं.

थोड्या वेळाने मला देखील चालती हो म्हणाली, तुझ्या मुळे आज माझ्या घरात एक परकं माणूस येऊन एवढं काही बोलून गेला. आणि मला देखील घरा बाहेर काढलं.

रोहती: सायली तू वेडी आहेस का? एवढं झालं आणि तू मला एकदा पण काहीच सांगितलं नाहीस.

कोण समजते ग तू स्वतःला?

सायली : मला नाही समजलं काय करायला पाहिजे, राजेंद्र बाबांनी मला सांभाळलं, मला या सगळ्या तुन बाहेर काढलं. आणि परत नव्या आयुष्याला सुरुवात करायला मदत केली.

रोहित: ok , हे सगळं बाजूला राहूदे, पण तू माझ्या शी बोलणं का बंद केलं होत ते नाही समजलं मला अजून ?

सायली: कारण ट्रिप मध्ये तुझ्या आणि निशा मध्ये झालेलं भांडण मी ऐकलं होत, आणि मला समजलं होत कि तुला माझ्या विषयी काय वाटत, त्यानंतर सानिकाच्या वाढदिवशी हे देखील समजलं कि तुला माझ्या विषयी जे वाटत ते का आणि कोणामुळे. पण वेळ निघून गेली होती, माझा एक चुकीचा निर्णय मला या टप्प्या वर आणून ठेवेल.

रोहित: सायली तुझी जागा आज हि तीच आहे माझ्या आयुष्यात, आता आजही तुलाच निर्णय घ्याचा आहे.

मी सगळं तर नीट नाही करू शकणार पण अजून काही चुकीचं होऊन देणार नाही हा प्रयत्न तर नक्की करेल.

रोहित च हे बोलणं एकूण सायलीच्या डोळ्यात आश्रू येतात, पण हे आश्रू आनंदाचे असतात आणि समाधानाचे देखील.

आज खऱ्या अर्थाने रोहित आणि सायली च्या नव्या आयुष्याची सुरुतात झाली होती. त्यांची मैत्री एक प्रेमाचे नवीन रूप घेऊन समोर येणार होते.

रोहित आणि सायली च तर नवे आयुष्य सुरु झालं आपण पण भेटू या लवकरच एका नवीन गोष्टी सोबत........