Pair Yours Mine - Part 6 books and stories free download online pdf in Marathi

जोडी तुझी माझी - भाग 6



आई - ते मला काही माहिती नाही. ती इथे राहणार नाही, तू तुझं तिकीट केलं तेव्हा तुला माहिती होत ना की आपलं लग्न होणार आहे आणि गौरवी व सोबत असेल मग दोघांचेही तिकीट का नाही केलं तू?

विवेक - अग आई तुला कस सांगू अग तिकडे राहायची माझीच अजून नीट सोय नाहीय तर मी तिला कुठे ठेऊ? मी शेअरिंग मध्ये मुलांबरोबर राहणार आहे. आणि अग आम्ही दोघेही गेलो तर तुमच्याजवळ कोण थांबेल? तुमची काळजी कोण घेईल? म्हणून मी तिला नेणार नाहीये.

आई - चिढून विवेक तू आमची काळजी नको करू. आम्ही दोघे आहोत एकमेकांसाठी. आणि ती या घरात आमची सून आहेच पण त्या आधी तुझी बायको आहे. आमची काळजी घ्यायला नाही आणली तिला लग्न करून , कळलं?

विवेक - मला तस म्हणायचं नव्हतं आई, अग मी प्रयत्न करेल ना इकडे पुन्हा ट्रान्सफर करून घ्यायचे आणि अधे मध्ये येत जाईलच की तुमच्या भेटीला.

आई - नवरा बायको अधे मध्ये कधीतरी नसतात भेटत विवेक, ते सोबत असतात एकमेकांच्या आयुष्यभर. आमचं ठीक आहे रे पण तू तिचा विचार कर ना एकदा. तू मला आताच्या आता वचन दे की तू तिला घेऊन जाशील, त्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. ती समजदार आहे म्हणून तू तिचा फायदा नको घेऊस विवेक.

विवेक - अग आई.... बरं ठीक आहे मी घेऊन जाईल तिला माझ्याबरोबर पण आता नाही, पुढच्या वेळी येईल तेव्हा घेऊन जाईल, ठीक आहे. आता नाही जमणार प्लीज समजून घे. तो पर्यंत ती सुद्धा तिच्या नोकरी ला नोटीस देऊन व्यवस्थित रित्या सोडून देईल.

आई - अजूनही नाही पटत आहे मला पण तरी एकदा गौरवीशी बोल आणि मग ठरव, माझी संमती आहे आता.

बाबा - हो पण तिने संमती दिली तरी तिला घ्यायला लवकर येशील. तिच्या स्वप्नांची माती नको करू विवेक.

विवेक - हो बाबा , तिची संमती मी कालच घेतली होती तरी पण तुमच्यासमोर परत एकदा विचारतो.

बाबा - गौरवी ..... गौरवी .... बेटा बाहेर ये जरा...

गौरवी बाहेर येते

गौरवी - बोला बाबा.

विवेकला बोलायचं होतं तुझ्याशी.

गौरवी - अच्छा, हो का? बोल ना विवेक.

विवेक - जरा रूममध्ये ये ना थोडं बोलायचं.
दोघेही त्यांच्या खोलीत जातात.

विवेक - गौरवी मी तुला कालच सांगितलं होतं की मी जाणार आहे, आणि तू आई बाबांना समजवशील म्हंटली होती.

गौरवी - हो अरे मी सांगितलं त्यांना समजावलं पण, ते तयार तर आहेत ना, मग आता काय झालं?

विवेक - हो ग तू व्यवस्थित सांगितलं त्यांना ते तयार आहेत पण आईने जी अट घातली आहे आणि वचन घेतलाय माझ्याकडून ते कसं पूर्ण करू मी. आणि तुला पण नोकरी आहे ना. आई म्हणते आहे तुला पण सोबत घेऊन जाऊ. मी सद्धे सांगितलं की पुढच्या वेळी आलो की घेऊन जाईल , तोपर्यंत तुही निट विचार कर आणि आईलाही समजावं.
आता ते तुला तू माझ्या निर्णयाशी सहमत आहे का विचारतील तर प्लीज हो म्हण. ठीक आहे? चल आता.

तिला बोलण्याचा एकही चान्स ना देत तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन आला. आणि आई बाबांना बोलला की गौरवी तयार आहे. मी पुढच्यावेळी आलो की तिला घेऊन जाईल.

बाबा - गौरवी बेटा तू तयार आहेस ना? उगाच हो म्हणू नकोस

गौरवी - हो बाबा मी तयार आहे. काहीच दिवसांचा तर प्रश्न आहे ना.

बाबा - ठीक आहे मग. करा तयारी, बॅग भरावी लागेल ना.
विवेक - हो बाबा, थँक्स.

विवेक तयारीला लागतो, गौरवी त्याला मदत करते. त्याची संपूर्ण तयारी होते. पण एवढ्या वेळापासून एकदाही विवेक तिच्याशी प्रेमाने बोललेला नसतो, अगदी कामपुरतंच तो बोलत असतो, तिला वाटते सगळी तयारी झाल्यावर बोलेल कदाचित आता कामात आहे म्हणून त्याला बोलावसं नसेल वाटलं. आता ती वाट बघत असते की विवेक तिच्याशी बोलेल. पण तो सरळ खोलीच्या बाहेर निघून जातो. तिला लहुप वाईट वाटत आता निघायची वेळ आली तरी हा माझ्याशी एकदाही नीट बोलला नाही, काय झालं? अस का वागतोय हा? माझं काही चुकलं तर नाही ना? मला विचारायला पाहिजे. आणि ती ही त्याच्या मागेमागेच खोलीतून बाहेर पडते. पण घरात सगळ्यांसमोर नाही बोलता येणार म्हणून ती शांत असते. पण मनात प्रश्न वादळ घालत असतात. आई बाबा त्यांच्या खोलीत असताना ती त्याला एकट्याला गाठून त्याला आवाज देते. तो ही लगेच तिच्याकडे बघून

विवेक - हं बोल

गौरवी - विवेक, काही झालय का? माझी काही चूक झालीय का?

विवेक - नाहीतर, का ? अस का विचारतेय?

गौरवी- नाही अरे असच मला वाटलं की तू रागवला आहेस की काय.

विवेक - (तिथून निघत, तिला टाळत) नाही मी का रागवेल, बर मला काम आहे जरा, आपण नंतर बोलूयात.

गौरवी - फार वेळ नाही आहे रे आता, तुला थोडावेळाणी निघावं लागेल, आपलं लग्न झाल्यापासून तू एकदाही नीट बोलला नाही माझ्यासोबत, आधी मला वाटलं घरात पाहुणे आहेत म्हणून तू असं वागत असणार, पण आता तर सगळेच गेलेत, काय झालंय सांगशील का?

विवेक तीच ऐकून न ऐकल्या सारख करतो आणि कामात व्यस्त असल्यासारखं दाखवतो. ती तिथेच उभी असते त्याच्या उत्तराच्या अपेक्षेने, तेवढ्यात

विवेक - काही म्हणालीस का? sorry जरा काम आहे. मला कॉफी देतेस का?

गौरवी कॉफी बनवायला निघून जाते. 5 मिनिटात त्याला कॉफी आणून देते, अजूनही तो कामातच असल्यासारखं दाखवतो. गौरवी कॉफी देत देत त्याला म्हणते.

गौरवी - मी येऊ का तुझ्यासोबत?
हे ऐकून विवेक तिच्यावर चिडतो.

विवेक - r u out of ur mind? कस शक्य आहे, मला 2 तासानी निघायचं आहे आता. तुला कस घेऊन जाता येईल मला. आणि आपलं बोलणं झालं ना यावर मग परत तेच का विचारते.

गौरवी - शांत हो विवेक मी यु.के ला येण्याबाबत नव्हते बोलत, मला माहिती आहे ते शक्य नाही, मी तर एअरपोर्ट पर्यंत तुला सोडायला येऊ का विचारत होते. म्हणजे तेवढ्या वेळात तरी आपल्याला बोलता येइल.

विवेक - ( शांत होत)नको तू कशाला उगाच दगदग करून घेते? आणि तू आली तर आई बाबा तू परत घरी येईपर्यंत काळजी करत बसतील. तेव्हा तू नको येऊ. काय बोलायचं तुला आताच बोल.

गौरवी -(त्याच्याजवळ बसत स्वतःहून प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करते) तू नसताना मला तुझी खूप आठवण येईल, तिकडे गेल्यावर तू मला विसरणार तर नाहीस ना.

विवेक - तू विसरू देशील?

गौरवी - नाही ते तर खरचं आहे. पण तरीही मला रोज फोन करशील ना?

विवेक - हो.

गौरवी - तुला अस एकदम लग्नानंतर लगेच जावं लागत आहे म्हणून नाराज आहे का?

विवेक - नाही तस काही नाही

गौरवी - काय झालाय सांग तरी, इतका तुटक का वागतोय तू माझ्याशी?

विवेक -(थोडस चिढून) एकदा सांगितलं ना काही नाही झालं ते, सारख सारख तेच तेच का विचारतेय? हेच बोलायचं होत का? झालं असेल तर मी आवरू माझं.

आणि रागातच उठून खोलीबाहेर निघून जातो. गौरावीला त्याच्या वागण्याचं बोलण्याचं खूप वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात टचकन पाणी येत. आणि आता तिला थोडा रागही येतो, ती आपल्या मनाशीच बोलते "किती भाव खायचा एखाद्याने, चांगलं बोलतेय तर अस वागतोय, आता मी पण नाही बोलणार , बघतेच काय करतो ते."


-----------------------------------

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED