जोडी तुझी माझी - भाग 8 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जोडी तुझी माझी - भाग 8


गौरवी फ्रेश होऊन येते आणि बाबा सोफ्यावर टीव्ही बघत बसले असतात त्यांच्या बाजूला येऊन बसते.

गौरवी - बाबा मला तुम्हाला काही सांगायचं आहे, खर तर त्यासाठीच मी येथे आले आहे. पण मला एक वचन द्या की तुम्ही माझी पूर्ण गोष्ट संपल्याशिवाय मधात बोलणार नाही. चिढणार नाही आणि स्वतःला त्रास करून घेणार नाही.

गौ बाबा - काय झालं बाळा? सासरी सगळं ठीक आहे ना? त्रास तर नाही ना दिला कुणी तुला?

गौरवी - नाही हो बाबा खूप चांगले आहेत सगळे, माझी खूप काळजी घेतात, मला कोण त्रास देईल.

गौ बाबा - मग काय सांगायचंय, सांग तू मी नाही बोलणार तुझं झाल्याशिवाय.

गौरवी - बाबा विवेकची बदली यु.के ला झाली. त्याला 2 दिवसातच तिथे रुजू व्हावं लागणार होतं, म्हणून घाईतच तो निघून गेला. मला तुम्हाला सांगायचं होत पण वेळच मिळाला नाही आणि फोनवर सांगणं मला योग्य वाटत नव्हतं. म्हणून मी आज एकटीच आले आहे.

आणि बदलीच पत्र हातात ठेवल्यापासून तर यु.के ला जाईपर्यंत जे झालं घरात त्यांची संभाषण ते सगळं ती बाबांना सांगते फक्त त्याच तुटक वागणं ती प्रकर्षाने सांगायचं टाळते. किचन मधून तिची आईसुध्दा सगळं कान देऊन ऐकत होती.

गौ बाबा - गौरवी मला हे अजिबात आवडलेलं नाही असं कसं करू शकतो तोे. त्याला सगळं माहिती असताना सुध्दा त्यानी आपल्याला एकदाही कल्पना दिली नाही. अग जर जाणार होता तर तुला आधी सांगून तुझीही तयारी करून घ्यायची होती ना सोबत. अग आजच्या युगात लग्न झालं की नवरा बायको सोबत फिरायला जातात , एकमेकांबरोबर वयक्तिक वेळ घालवता यावा म्हणून किती प्रयत्न करतात आणि हा लग्नाच्या एका आठवड्यात तुला सोडून एकटाच निघून गेला. त्याला फोन लाव आताच मला बोलायचं त्याच्याशी . अस कसं करू शकतो तो. सरप्राइज म्हणे असं असत का सरप्राइज? याला शॉक म्हणतात मी तर म्हणेल फसवणूक म्हणतात.

गौरवी - अहो बाबा काय बोलताहेत? शांत व्हा तुम्ही आधी. तुम्ही चिढणार नव्हते ना, आणि अहो त्याच नाही चुकलं त्यानी जो विचार केला तो ही एका बाजूने बरोबरच आहे की, मी पण तर नोकरी करते ना, आणि स्वतःच्या पायावर उभी असताना नोकरी सोडून घरी बसलेलं तुम्हाला तरी आवडेल का? किती कष्ट केलेत तुम्ही मला या पदापर्यंत आणण्यासाठी. म्हणून त्याने आधी सांगितलं नाही. आधी सांगितलं असत तर मी नोकरी सोडली असती कदाचित आणि त्याला ते नको होतं. मला सांगून गेलाय तो की मी परत येईल तोपर्यंत नीट विचार कर आणि मग आपण सोबत जाऊ. त्याच्या आईनी तस वचन पण घेतलय त्याच्याकडून. आणि तो येईल तोपर्यंत जर मलाही तिकडे बदली मिळत असेल तर बघते ना. म्हणजे मला नोकरी न सोडता त्याच्यासोबत जाता येईल.

गौ आई - अहो बरोबर बोलतेय ना ती पण आणि झालंय हो आता, तो निघून गेला आहे, आपण काही नाही करू शकत. त्याचाही काही नाईलाज असेल ना, आपण का त्याला आताच ओळखतो आहे. गेले कित्येक दिवसांपासून तो आपल्या मुलीसोबत आहे आपल्याला कधी चुकीचा वाटला का? आणि त्याचे आई वडील आपल्या मुलीला त्यांच्या मुलापेक्षाही जास्त जीव लावतात बघितलं ना आपण, काही दिवसांचा प्रश्न आहे, होईल सगळं नीट, आणि मुलीच्या घरात जास्त डोकं ठेऊ नये माणसाने. जाऊ द्या तुम्ही त्रास करून घेऊ नका.

आईने गौरवीच्या बाजूने बोलून तिचा बराच तान कमी केला होता, खरं तर आईलाही आवडलेलं नव्हतच जे झालं ते पण उगाच गौरवीच्या वडिलांना ताण नको नाहीतर तब्येक बिघडेल म्हणून त्यांनी हा पवित्रा घेतला.

गौ बाबा - बेटा तू खुश आहेस ना? मला माहिती आहे विवेकच्या अस वागण्यामुळे तुलाही त्रास झालाच असणार. पण तू समजदारच आहे एवढी की तू त्यालाही समजून घेतलं आणि आम्हलाही समजावून सांगितलं.

गौरवी - हो बाबा मी खूप खुश आहे, आणि परिस्थितीनुसार एकमेकांना समजून घेतलं नाही तर ते नातच कसलं, नाही का? चला भूक लागलीय खूप, जेवायचं का?

गौ आई - स्वयंपाक तयार आहे, चला मी वाढते, बसा जेवण करून घेऊ.

गौ बाबा - हो चला.

हसत खेळत सगळे जेवण करतात , गौरवी दिवसभर माहेरीच असते आणि संध्याकाळी जायला निघते तोच

गौ बाबा - बेटा आता विवेक नाही आहे, तुला वाटलं तर तू इकडे येऊनही राहू शकतेस.

गौरवी - बाबा मी अधून मधून अशीच भेटीला येत जाईल की तुमच्या, पण मला इकडे येऊन राहायला नाही जमणार बाबा, विवेक त्याच्या आईवडीलांची जबाबदारी माझ्यावर टाकून गेलाय, विवाहित आयुष्यातली पहिलीच जबाबदारी मी पार पाडली नाही तर मी बेजबाबदार ठरेल ना, आणि तुमची मुलगी अशी नाही वागू शकत शिवाय लोकांना चर्चेचा विषय मिळेल . तेव्हा असा आग्रह धरू नका.

गौरवीच उत्तर ऐकून तिच्या आई बाबा दोघांच्याही डोळयात पाणी आलं, समाधानची आसवं होती ती, आपल्या मुलीच्या कौतुकाची आसवं होती ती. जाताना तिने आईबाबांना एकदा कडकडून मिठी मारली आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन निघाली.


----------------------------------------

क्रमशः