Pair Your Mine - Part 4 books and stories free download online pdf in Marathi

जोडी तुझी माझी - भाग 4


गौरावीला त्यांचं लेडिज टॉयलेट मधलं बोलणं आठवते....पण जाऊ दे आधीच खूप अविश्वास दाखवलाय आणखी नको आणि जर विवेक नव्हताच तिथे तर ते बोलणं पण त्याच नव्हतं, असा मनातच विचार करून ती काहीच बोलत नाही.

गौरवी - हो झालंय माझं आता कुठलीच शंका नाही.

विवेक - हुश्शश्श.....

त्यानी मनातच विचार केला आता हिला परत हॉटेलवर न्यायला नको नाहीतर सगळं पितळ उघडे पडायचं. कसतरी संभाळलय पुन्हा विस्कटेल.

आता परत खोटं बोलून विवेकनी आणखी एक बाजी जिंकली. गौरवीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि साध्या भोळ्या स्वभावाचा विवेक फायदा घेत होता.

विवेक - बरं काही खाऊन घ्यायचं का आता नाहीतर आणखी भोवळ यायची.

गौरवी (काहीसं हसत) - हो चालेल.

अस म्हणत त्याच्यासोबत निघाली. दोघेही तिथल्याच जवळच्या हॉटेल मध्ये गेले आणि जेवण केलं. जेवण झाल्यावर विवेक गौरवीला म्हणतो-

विवेक - गौरवी तू अस कर इकडेच थांब मी आपलं सामान घेऊन येतो मग आपण इथूनच निघुयात लगेच.

गौरवी - मी पण येते ना सोबत फ्रेश होऊन मग निघू.

विवेक - नाही नको तू थांब इथेच या हॉटेल मधेच फ्रेश होऊन घे. उगाच दगदग नको तुला आधीच आजारी आहेस . आणि आपले हॉटेलचे तासही संपले आहेत. (आणखी एक थाप मारली त्यानी) मी येतो पटकन जाऊन.

गौरवी - ठीक आहे.

विवेक निघून गेला पण पुन्हा गौरवीच्या मनात शंका आली "मला का नेलं नसेल? याचा पाठलाग करावा का?" हा विचारही तिच्या मनात आला पण तिने तो लगेच झटकून टाकला आणि "नको पुन्हा तेच" अस म्हणून आपल्या मनाला समजावलं. त्याच हॉटेल मध्ये फ्रेश झाली आणि विवेक येईपर्यंत तिथेच थांबली. खूप प्रेम होतं तीच विवेकवर, आणि विश्वासही, त्यामुळे तिला त्यानी दिलेली सगळी कारणे खरी वाटली आणि तिनी पुन्हा एकदा विवेकवर डोळे झाकून विश्वास केला.

इकडे विवेक थँक्स गॉड म्हणता सुस्कारा सोडत निघाला. हॉटेल रूम मध्ये गेला तेव्हा आयशा त्याची वाटच बघत होती.

आयशा विवेकची गर्लफ्रेंड, दिसायला अतिशय सुंदर, गोरीपान, नाजूक, भरपूर attitude, इगो आणि खूप स्वार्थी. विवेकला ती आवडायची, तीही स्वार्थ साधण्यासाठी त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक करत होती. ती ग्लॅमर वर्ल्ड मध्ये करियर करायचा प्रयत्न करत होती. त्यामुळे इतक्यात लग्न करणं तिला शक्य नव्हतं.

आयशा - अरे अचानक कुठे गायब झाला होतास मला न सांगता ? किती टेन्शन आलं होतं मला माहिती आहे. मी किती शोधलं तुला. शेवटी रिसेप्शन वर जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू हॉस्पिटलमध्ये गेला आहे. काय झालं? मला सांगशील का? अस अचानक निघून गेलास?

विवेक - अग हो... हो... तू शांत होशील तेव्हा सांगेल ना.

आणि त्यानी आवरता आवारताच तिला सगळं सांगितलं.

आयशा - बापरे!!! गौरवी कशी आहे आता? आणि तिचा संशय नक्की दूर झाला ना. तू खात्री करून घेतली ना? नाहीतर इकडे येईल तुझ्या मागे.

जास्त वाट बघायला लावली तर गौरवी इकडेही येऊ शकते या भितीने त्यानी लवकरच आवरलं.

विवेक - नाही ती आता ठीक आहे आणि तिचा संशय पण दूर झालाय पण मला आता लवकर जायला हवं. sorry babes फक्त काहीच दिवसांचा प्रश्न आहे एकदा लग्न झालं की झालं मग. चल भेटू आपण नंतर मला आता गेलं पाहिजे.

अस म्हणत आयशाला एक मिठी मारून तो तिथून निघाला. आणि गौरवीकडे आला. तिथून पुढे दोघांनी परतीचा प्रवास सुरु केला म्हणजेच त्यांच्या घरी जायला निघाले.

आपला खूप मोठा गैरसमज झाला होता अस समजून गौरवीने ती गोष्ट तिथेच संपवली. पुन्हा कधीच दोघांमध्ये परत यावरून संवाद झाला नाही. आणि विवेकही तिला परत संशय येईल असं तिच्यापुढे वागला नाही.

2 महिने उलटून गेलेत आणि आता लग्नाची तारीख जवळ येत होती. दोघांनी ही परिवरासोबत मिळून छान लग्नाची खरेदी केली. गौरवीचे सासू सासरे गौरवीचा एकही शब्द मोडत नव्हते, सगळी खरेदी तयारी गौरवी सांगेल तशीच करण्यात आली. इतकी छान सासरची लोक मिळाली म्हणून गौरवी आणि तिच्या घरचे खूप खुश होते, मुलीने नशीब काढलं खरच असच सगळे तिला म्हणायचे. पण या नशीबाला ग्रहन लागलंय याची कुणालाच कल्पना नव्हती.

लग्नाचा दिवस उजाडला, आज सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू होती. गौरवीची आईबाबा येणाऱ्या पाहुण्यांची सोय करण्यात गुंतले होते. गौरवी तयार होत होती. वधु वेशात ती खूपच सुंदर दिसत होती आणि तिच्या गालांवर लाली पसरली होती, चेहर्यावर चमक होती. वर वेशात विवेकही खूप खुलून दिसत होता. लग्न मुहूर्त जवळ आलं, दोघांनाही स्टेजवर बोलविण्यात आलं. आणि लग्न विधी सुरू झाले. दोघांनी एकमेकांना माळा घातल्यात, सप्तपदी झाली आणि पाठवणी होऊन गौरवी सासरी आली. सगळ्या पद्धती आणि परंपरा पार पडल्यानंतर, ती रात्र उजाडली, मधुचंद्राची रात्र. गौरवी लाजून लाजून गोरीमोरी होत होती पण विवेकमध्ये काहीच भावना नसल्यासारखा तो वागत होता. त्या पहिल्या रात्री गिफ्ट म्हणून विवेकने गौरवीच्या हातात एक लेटर ठेवलं.

गौरवी - हे काय आहे? आणि तुला काय झालंय? असा का वागतोय? काही चुकलं का माझं? नाराज आहे का माझ्यावर?
( तिला काय माहिती होत आपल्या पुढच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय?)

विवेक - उघडून तर बघ, मग कळेल. आणि मला कुठे काही झालंय, लग्नाच्या गडबडीत थकलोय ना थोडा म्हणून तुला तस वाटत असेल.

गौरवी उघडून बघते तर त्यात विवेकच्या बदलीच पत्र असतं. त्याची बदली परदेशात म्हणजे यु.के मध्ये झाली असते. आणि ते ही कायम ची. खर तर हाच त्याचा आणि आयशाच प्लॅन असतो. ती खूप नाराज होते, आणि विवेकला म्हणते

गौरवी - हे काय!! तुझी यु.के ला बदली झाली, पण कस काय? आणि तुला कधी कळलं हे? मला आधी का नाही सांगितलं? 2 दिवसानंतर तुला रुजू व्हायचंय.. हे सगळं कसं शक्य आहे? आणि तिकडे आपलं कुणीच नाही ओळखीचं. तुला तरी करमेल का घरच्यांना सोडून तिकडे?

विवेक - एक मिनिट एवढं काय रेऍक्ट होतेय? हे चालूच असतं. मला वाटलं मी तुला सरप्राईज देईल. म्हणून नाही सांगितलं आधी, का आधी सांगितलं असतं तर लग्न नसतं केलं का तू? आणि तसही माझं तिकीट झालेलं आहे so मी निघतोय 2 दिवसांनी.

गौरवी- आणि मी काय करू? माझा व्हिसा नाही तिकीट नाही मला तुझ्याबरोबर यायला कस जमेल?

विवेक - अग तुला कुठे यायचं तिकडे? तू इकडेच थांब ना घरच्यांबरोबर, तुझा जॉब आहे सगळे नातेवाईक, आई बाबा सगळे इकडेच आहेत, तुला तिकडे नाही करमणार. मी येत जाईल ना अधून मधून इकडेच.

ती फक्त अवाक होऊन त्याच्याकडे बघतच राहिली, नवीनच लग्न झालय अजून आणि हा दुसऱ्या ठिकाणी कायमच राहायला जातोय आणि मला इकडे सोडून. तिला त्याच असा वागणं, अस बोलणं फार त्रास देत होतं पण ती काहीच बोलली नाही.

गौरवी - ठीक आहे, आई बाबांना माहिती आहे का तुम्ही जाणार आहेत ते?

विवेक - अं... नाही ते तुला त्यांना सांगावं लागेल. माझी एक विनंती आहे प्लीज ते तुझं ऐकतील नक्की , तू सांग ना त्यांना समजावून. मला जावं तर लागेलच ना, नाहीतर नोकरी राहणार नाही माझी. तू समजवशील ना त्यांना प्लीज प्लीज... माझ्यासाठी...

बराच वेळानी तो तिच्याशी चांगला आणि प्रेमाने बोलला, साहजिक ते स्वार्थ साधण्यासाठीच होत.

गौरवी - हो पण ते माझं ऐकतील कशावरून? तुम्ही म्हणता तर सांगून पाहिल मी. ( खरं तर तीची अजिबात ईच्छा नव्हती पण त्यानी एवढी विनंती केली तर तिला नाकारता आल नाही)

विवेक - thanks. बर चल झोप आता, मला खूप झोप येतेय आणि तुलाही सकाळी लवकर उठाव लागेल ना तर झोपुयात हं...

बोलता बोलता अंगावर घेऊन तो तिच्याकडे पाठ करत आडवा झाला आणि झोपुनही गेला. ती मात्र बघतच राहिली.


------------------------------------

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED