जोडी तुझी माझी - भाग 5 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जोडी तुझी माझी - भाग 5

आजची पहिली रात्र आणि हा अस वागतोय 2 दिवसांनी किती दूर जाणार एकटाच. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, तिनी किती स्वप्न बघितली होती पण सगळी मातीमोल होतांना दिसत होती. ति स्वतःला सावरतच उठली आपला समाज शृंगार उतरविला आणि साधे कपडे घालून त्याच्या बाजूला पडली. तीही थकली होती पण तिला झोप येत नव्हती. तिला तिच्या वडिलांची आठवण येत होती परदेशात राहणाऱ्या मुलाला त्यांना मुलगी द्यायची नव्हती खर तर एकुलती एकच मुलगी आणि ती ही परदेशात नको, री आमच्यासमोर असावी आणि आम्ही तीच सुख बघून समाधानी राहावं अशी त्यांची ईच्छा होती, पण आता लग्न झालंय. उद्या मी सगळ्यांना कस समजविणार याचाच विचार करत होती. आणि विचार करता करताच पहाटे केव्हातरी तिला झोप लागली.

विवेक उठला त्याने बघितलं ती झोपलेली होती. त्यानी आपलं आवरलं आणि घराबाहेर जातच होता की आईनी आवाज दिला.

वि आई - कुठे निघालास एवढ्या सकाळी एकटाच? आणि गौरवी कुठे आहे?

विवेक - आई अग ती झोपली आहे अजून, मी येतो जरा बाहेर जाऊन. थोडं काम आहे. ती उठली की सांग तिला.

वि आई - ठीक आहे, लवकर ये.

इकडे गौरवी उठली बघते तर विवेक तिच्या बाजूला नव्हता, तो उठून फ्रेश होत असेल असं तिला वाटलं, म्हणून तिने 2- 3 आवाज देऊन बघितले, पण काहीच प्रत्युत्तर नाही. तिला वाटलं तयारी करून हॉल मध्ये बसला असेल, 'पण मला उठवायचा तरी ना. जाऊ दे मी पण पटकन आवरून घेते.' असा विचार करत तिनेही आवरलं, एक नजर हॉल मध्ये टाकली तर विवेक नव्हता तिथे आणि किचन मध्ये गेली तर आई चहा टाकत होत्या. त्यांनी गौरावीला बघताच

वि आई - गौरवी उठलीस तू. ये चहा घेणार का?

गौरवीची सासू अगदी आईसारखी तिची काळजी करायच्या आणि सासरे सुध्दा अगदी वडील असल्यासारखे वागायचे. गौरवी सुध्दा त्यांचा पूर्ण मान ठेवायची.

गौरवी - आई मी करते ना द्या मला. sorry आई मला उशीर झाला थोडा उठायला, पण उद्यापासून लवकरच उठेल.

वि आई - अग काही हरकत नाही, आणि रोज ही लवकर नाही उठलीस तरी चालेल, आम्हाला सवय आहे ना त्यामुळे कितीही इच्छा असली तरी झोप नाही येत म्हणून उठून बसतो आम्ही.

गौरवी - आई विवेक कुठे दिसत नाहिये.

वि आई - अरे हा, तो बाहेर गेला आहे, काही काम होत म्हणाला, येईल लवकरच.

गौरवी - अच्छा।।

गौरवी मनातच विचार करत होती. मला उठवलं पण नाही आणि न सांगताच घराबाहेरही निघून गेला. कालपासून अचानक असा का वागतोय हा? नंतर तिला काल रात्रीच्या बदली पत्राबद्दल आठवलं. 'कस सांगू सगळ्यांना' हा विचार घोळत होता तिच्या मनात, तेवढ्यात मोबाइल वाजला, विवेकचा मेसेज होता.

विवेक ✉ हॅलो, गुड मॉर्निंग, मी यायच्या आत तू आई बाबांशी बोलून घे माझ्या जाण्याबद्दल , तीच आठवण करून द्यायला मेसेज केला मी.

गौरवी ✉ हो सांगते.

आणि ती चहा गाळून बाहेर घेऊन आली. आई केव्हाच बाहेर हॉल मध्ये आल्या होत्या. तिने चहा दिला आई बाबांना आणि एक कप स्वतः पण घेतला. चहा घेवून होताच ती बोलू लागली.

गौरवी - आई बाबा मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. काही सांगायच आहे.

बाबा - बोल ना बेटा, तू चिंतीत वाटते आहे. काही अडचण आहे का? विवेक काही बोलला का? त्यांनी तुला दुखावलं तर नाही ना? थांब येऊ दे त्याला चांगला....

गौरवी - ( बाबांचं बोलणं मधेच तोडत) नाही बाबा तस काही नाही. तो नाही काही बोलला मला.

आई - मग काय झालं? निसंकोच पने बोल बेटा.

आता तिला जर धीर वाटायला लागलं आणि तिने विवेकच्या बदली पत्राबाबत आणि यु.के जाण्याबाबत आई बबन सगळं सांगितलं. हे ऐकून तर त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.

बाबा - अस कसं परस्पर निर्णय घेतला त्यानी, आम्हाला सांगणं पण गरजेचं नाही वाटलं का त्याला.

गौरवी - (त्याची बाजू सावरत ) नाही बाबा त्यांनी तुम्हाला सांगायचं प्रयत्न केला पण तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही दुःखी व्हाल आणि तुम्हाला दुखत तो बघू शकणार नाही म्हणून तो बोलू नाही शकला तुम्हाला. आणि ऑफर टाळता पण येणार नाही नाहीतर नोकरी जायची. त्याला काही पर्यायच नाही उरला म्हणून. आणि आजकाल बरेच मुलांना जावंच लागते ना हो बाबा. आपण त्याचा परिवार आहोत आपल्याला त्याची होणारी घुसमट समजून घ्यायला हवी ना.

ती खूप समजदार पणाने बोलत होती.

आई - हो बरोबर आहे मुली तुझं. ( आणि बाबांचीही समजूत घालत ) जाऊ देऊयात ना काय हरकत आहे. आपण आपलं सांभाळू शकतो तसं पण आणि आपल्याला त्याला प्रोत्साहन द्यायला हवं ना त्याच्या बेड्या बनून काय उपयोग? उद्या तो आपल्यालाच कोसेल की तुमच्यामुळे मला पुढे जात आलं नाही म्हणून.

आता बाबा ही मानले होते. पुढे गौरवी च्या डोक्यावरून हात फिरवत
बाबा - खूप समजदार आहेस तू. म्हणूनच आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला तुझ्यासारखी सून मिळाली. बरं कधी निघायचं आहे? तयारी करायला पाहिजे ना.

गौरवी - बाबा उद्याच निघायचंय, उद्याची फ्लाईट आहे त्याची.

आई - काय उद्याच? इतक्या कमी वेळात कस शक्य आहे? आणि तू म्हणाली तुला कालच सांगितलं त्यानी मग तुझा तर व्हिसा, तिकीट कास काय काढलं?

गौरवी - नाही आई माझं व्हिसा तिकीट काहिच नाहीय, मी नाही जाणार ते एकटेच जाणार आहेत.

आई - काय? आताच नवीन लग्न झालंय, तुम्हाला सोबत राहायला पाहिजे तर तो एकटाच..... तू कस मान्य केलं हे?

बाबा - (आईला तोडत) ती समजदार आहे ना म्हणून त्यानी समजावलं असणार आणि हिने हट्ट करायचं सोडून मान्य केलं असणार, ते काही नाही येऊ दे त्याला, मी बोलतो त्याच्याशी. जायचं असेल तर दोघेही जा नाहीतर नाही जायचं.

गौरवी काही बोलणार तेवढ्यात विवेक आला. आणि बाबांनी सरळ आपला मोर्चा विवेककडे वळवला.

बाबा- विवेक काय सांगतेय गौरवी? खर आहे का ते?

त्याने एकदा गौरवी कडे बघितलं, तिच्या चेहऱ्यावर तिने सगळं सांगितल्याचे भाव स्पष्ट होते. नंतर बाबांकडे बघत

विवेक - हो बाबा खरं आहे ते.

बाबा - मग तुला आम्हाला सांगावस नाही वाटलं का? की आमचे विचार तुझ्यासाठी काहीच मायने ठेवत नाहीत?

विवेक - तस नाही हो बाबा, मी संगणारच होतो पण....

त्याला मधातूनच तोडत

गौरवी - बाबा मी सांगितलं ना तुम्हाला त्याला तुम्हाला दुखवायच नव्हतं.

विवेक ही तिच्या होकारात होकार भरत

विवेक - हो बाबा. प्लीज मला समजून घ्या, अस रागावू नका.

इतक्या वेळ शांत बसलेली विवेकच्या आई बोलली.

वि आई - पण माझी एक अट आहे.

विवेक - ( गोंधळून) कसली अट आई?

आई - माझ्या सुनेलाही तू घेऊन जाशील तरच मी तुला जाऊ देईल. अन्यथा नाही.

हे ऐकून गौरवी आणि विवेक दोघेही गोंधळून गेले.

विवेक - अग पण आई मला लगेच निघावं लागेल. रुजू व्हायचंय मला कामावर, आणि गौरवीचा व्हिसा आणि तिकीट व्हायला वेळ लागेल. एवढा वेळ नाहीय माझ्याकडे. आणि ती ही नोकरी करते ना ग. तिला कस जमेल यायला, अस तडकाफडकी नोकरी नाही सोडता येत. नोटीस द्यावी लागते आधी.

गौरवी मात्र शांत उभी होती, तिनी सांगीतल्याप्रमाणे तीच काम केलं होतं आता आई आणि मुलाच्या संभाषणात ती बोलणार नव्हती. विवेकने तिच्याकडे बघताच ती चहाचे कप घेऊन आत निघून गेली.


---------------------------------------------

क्रमशः...