जोडी तुझी माझी - भाग 7 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जोडी तुझी माझी - भाग 7

विवेकला थोडं शांत झाल्यावर जाणवत की उगाच चिढलो आपण तिच्यावर. तिला खुश ठेवायला हवं नाहीतर तिला संशय येईल उगाच. म्हणून तो परत खोलीत येतो. गौरवी दरवाज्याकडे पाठ करून बेडवरच्या कपड्यांच्या घड्या घालत असते.

विवेक - गौरवी ऐक ना, i m sorry मी उगाच चिढलो तुझ्यावर.

त्याच बोलणं ऐकून गौरवीचा राग कुठल्या कुठे पळून जातो, त्याने स्वतःहून बोलावं हेच तर तिला हवं होतं कालपासून. पण ती काहीच बोलत नाही. त्याच बोलणं ऐकून पुन्हा आपलं काम करत राहते.

विवेक - खरतर मी आई बाबांना सोडून कधी कुठेच गेलेलो नाही, आणि आता सरळ परदेशात जातोय, खूप सवय आहे मला त्यांची आणि काळजी ही वाटते कारण ते उतार वयात प्रवेश करताहेत, पण माझ्या कडे पर्याय नाही दुसरा म्हणून मला जावंच लागेल. म्हणून मी थोडा उदास आहे, त्यांची काळजी वाटतेय मला. आणि त्यामुळे चिढचिढ झाली असेल माझी.

गौरवी - ( त्याच्याकडे वळून) अरे एवढंच ना, अजिबात काळजी करू नको मी आहे ना इथे मी तुला वचन देते की मी त्यांची सगळी नीट काळजी घेईल. मला वाटलंच होत कुठली तरी गोष्ट तुला आतून खातेय म्हणून मी तुला परत परत विचारात होते. तू relax राहा आणि आपल्या कामाकडे लक्ष दे इकडे मी बघेल सगळं. आणि हो रोज फोन करत जा. म्हणजे तुला तेवढी त्यांची कमी जाणवणार नाही.

विवेक - thank u गौरवी, चल मला निघायला हवं, थोडावेळ आईबाबांबरोबर घालवतो आणि मग निघतो.

गौरवी - चालेल.

ते दोघेही खोलीतून बाहेर येतात . गौरवी सगळ्यांसाठी चहा करते आणि हे तिघेही हॉल मध्ये बसून गप्पा मारत असतात. छान हसून खेळून खुश असतात हे सर्व पाहून गौरावीला ही छान वाटतं. तिच्या मनाची घालमेल आता त्यानी शांत केली होती. अचानक बोलता बोलता बाबा हळवे होतात

बाबा - विवेक, बाळा पहिल्यांदा अस घराबाहेर आम्हाला सोडून जातोय आणि तेही सरळ परदेशात. आम्हाला रोज आठवण करत जा रे आणि लवकर घरी ये.

एवढ्या वेलळापासून आईनी स्वतःला कस बस आवरून ठेवल होत व बाबांच्या अशा बोलण्याने त्यांनाही गहिवरून आलं.

आई - हो रे बाळा आणि स्वतःची नीट काळजी घेत जा जेवण, नाश्ता वेळेवर करत जा. आम्हाला गौरवी आहे सोबत पण तू मात्र आता तिकडे एकटाच असशील, कधीही आठवण आली तर फोन करत जा.

तेवढ्यात गौरवी चहा घेऊन येते आणि वातावरण हलकं करायचं म्हणून सगळ्याना चहा देत म्हणते, "अरे बापरे इकडे पूर येणार दिसतंय".

आणि लागेच त्यांना समजावत म्हणते

गौरवी - आई , बाबा तुम्ही त्याला अस हळवं होऊन आसवांनी निरोप दिला तर त्याच मन लागेल का? त्याला निघावसच नाही वाटणार. हसून आनंदाने निरोप द्यावा म्हणजे त्या व्यक्तीला हिम्मत मिळते आणि सगळी दुःख संकटं त्याच्या पासून लांब राहतात.

तसेच ते सगळे पुन्हा एकदा हसत हसत बोलू लागले. आता विवेकच्या गाडी दारासमोर आली आणि तो निघाला. इकडे आई बाबांना सोडून जावं लागलं म्हणून त्याला वाईट वाटत होतं . काही तासात तो हेथ्रो ऐरपोर्टला पोचला, इकडे आयशा विवेकची वाटच बघत होती. त्याला घ्यायला ती ऐरपोर्टवर आली होती. तिला बघताच तो आई बाबा विसरून गेला. आपण पोचलो हे कळवायच पण तो विसरला.

आयशाने त्याच्यासाठी एक घर बघून ठेवलं होतं, ती त्याला सरळ तिथेच घेऊन गेली. त्यालाही घर आवडलं. बराच वेळ आयशासोबत घालवल्यावर त्याला घराची आठवण झाली. त्यांनी गौरावीला फोन लावला भारतात रात्र झाली होती आणि आई बाबा झोपी गेले होते, पण गौरवी विवेकच्याच फोनची वाट पाहत होती.

विवेक - हॅलो, गौरवी, झोपली होती का ग?
गौरवी - नाही रे, तुझ्याच फोनची वाट पक्षात होते.
विवेक - आईबाबा झोपलेत का?
गौरवी - हो ते झोपलेत, तुम्ही पोचलात का?
विवेक - हो मी पोचलो सकाळीच, पण घर शोधाशोध आणि त्या सगळ्या गडबडीत फोन करायचं विसरूनच गेलो.
गौरवी - ठीक आहे रे काही हरकत नाही. मी आईबाबसन्न उद्या उठले की सांगेल.
विवेक - बर ठीक आहे , झोप आता, गुड नाईट.
गौरवी - बाय, गुड नाईट.

गौरवी पुढे आता मोठं प्रश्न होता तो म्हणजे तिच्या बाबांना सांगणे. पण सांगावं तर लागणारच ना, जस विवेकच्या आईबाबांना समजावलं तसाच त्यांनाही समजावू. असा विचार करतच झोपी गेली.

सकाळीच उठून गौरवी आवरून खोलीतून बाहेर येते. विवेकचे आईबाबा तिचीच वाट बघत असतात. ती लगेच त्याना सांगते

गौरवी - आईबाबा विवेक पोचला सुखरूप आणि घरही मिळालं त्याला . रात्री फार उशीर फोन आला होता त्याचा तुम्ही झोपला असाल म्हणून तुम्हाला सांगितलं नाही.

आई - इतका उशीर कसा लागला त्याला पोचायला 9 तासातच पोचतोना येथून यु.के आणि त्याची तर सरळ फ्लाईट होती.

गौरवी - आई तो वेळेतच पोचला पण घर शोधण्याच्या गडबडीत सांगायचं विसरला. पण जाऊ दे आला होता ना त्याचा फोन.

आई - हम्म.

गौरवी - बर तुमचा चहा झाला का?

बाबा - नाही अजून, विवेकचा फोन का आला नाही म्हणून चिंता होत होती, तुझीच वाट बघत होतो आम्ही, पण तू सांगितलंस आणि चिंता मिटली.

गौरवी - ठीक आहे मी करते आपल्याला चहा.

आई - हो चल, मी पण येते.

दोघी पण किचन मध्ये जातात. आणि गौरवी तिची चलबिचल आईजवळ बोलते.

गौरवी - आई तुम्ही रागावणार नसाल तर एक बोलायचं होतं.

आई - अग बोल ना, तुझ्यावर का रागावू मी.

गौरवी - आई मी माझ्या घरी कोणाला अजून काहीच सांगितलं नाहीय, फोनवर सांगणं मला योग्य वाटलं नाही तेव्हा आज मी एकदा माझ्या घरी जाऊन येऊ का सगळ्यांना विवेकबद्दल सांगेल आणि त्यांना भेटूनही येईल.

आई - (थोडं चिंतेत) हो तू जा, पण ते चिढतील ना ग विवेकवर, तुला जमेल ना त्यांना सांगायला का मी येऊ सोबत तुझ्या?

गौरवी - आई तुम्हाला सोबत न्यायचा मला आनंदच झाला असता पण मी सांभाळून घेईल सगळं. तुम्हाला सांगितलं तसच त्यांनाही सांगेल की समजावून. तुम्ही नको काळजी करा.

आई - ठीक आहे जेवण करून निघ लगेच.

गौरवी - नाही आई जेवण करेल ना मी तिकडेच, चहा घेऊन झाला की निघते. पोचायला उशीर लागेल ना आणि नंतर ऊन होईल जास्त.

आई - ठीक आहे, जस तुला ठीक वाटेल.

गौरवी तिच्या माहेरी येते. तिला बघून आईबाबा खूप खुश होतात . आणि लगेच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात.

गौ बाबा - का ग, एकटीच आलीस? आमचे लाडके जावई कुठे आहेत?

गौरवी - विषय टाळत, हे बघा ,म्हणजे मुलगी आलीय त्याचा काही नाही. मला दारातच उभी ठेवणार आहेत का?

गौ बाबा - आग नाही तस नाही तुला बघून तर खूप आनंद झाला , तुझीच आठवण येत होती आम्हाला खुप. ( तिला घरात घेत बाबा बोलत होते)

गौरवी - हो ना मग बघा मी आले.😊
आई आज काहीतरी मस्त चमचमीत माझ्या आवडीचं बनाव ना काहीतरी, तुझा स्वयंपाक होऊन जाईल मग मला खायला नाही मिळणार माझ्या आवडीचं म्हणून लवकर आले लाड पुरवून घ्यायला.

गौ आई - हो ग बाई, आमची एकुलती एक लाडाचीच आहे तू, तुझे नाहीतर कुणाचे लाड पुरवायचे?

गौरवी - बाबा तुमची तब्येत कशी आहे ? लग्नाच्या गडबडीत खूप धावपळ झाली तुमची. आता नीट काळजी घेता ना.

गौ बाबा - हो ग मी एकदम ठीक आहे, पण तू सांगितलं नाहीस जावई कुठे आहेत आमचे ? तू एकटीच का आलीस?

गौरवी - अहो बाबा सांगते मी तुम्हाला, थोड्यावेळाने निवांत बसून बोलूया का आपण? मी आताच आली आहे ना दमली मी फार. मी आलेच फ्रेश होऊन मग बोलूयात.

------------------------------------------------------------

क्रमशः