चाराण्याचं लव्ह बाराण्याचा लोच्या! - 4 Shirish द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

चाराण्याचं लव्ह बाराण्याचा लोच्या! - 4

चार आण्याचं लव्ह, बारा आण्याचा लोच्या

|| भाग - ४ ||

" तुला काय गरज होती त्या नागाला डिवचण्याची? " सिमरन चिडून बोलली.
" मग काय करायला हवं होतं मी ? कुठवर सहन करायला हवा होता मानसिक छळ... आपण मुकाट्याने सहन करत राहतो म्हणून त्यांची हिंमत वाढत जाते... " अंजलीचं प्रत्युत्तर.
" हो.. अगं पण थेट हात उचलायचा म्हणजे? "
" मग काय पूजा करायला हवी होती का त्या मुर्खाची? "
" आजपर्यंत गप्प राहून, दुर्लक्षच केलं होतंस ना तू... मग आज अचानक? "
" अगं आजपर्यंत तो नुसता लांबून शिट्ट्या बिट्टया मारायचा. आज थेट हात धरला त्याने माझा... मी आजही दुर्लक्ष केलं असतं तर उद्या उचलून नेलं असतं मला... योग्य वेळी योग्य प्रतिक्रिया नोंदवलीच पाहिजे... " अंजली परखडपणे बोलली.
" मान्य... तुझं म्हणणं मान्य... पण तुला काय वाटतं एवढ्यावर हा विषय संपेल.? आजिबात नाही... तो काही ना काही करेलच... "
" मला भीती नाही त्याची. रडत कुढत मान खाली घालून चालत राहण्यापेक्षा मी थांबणे पसंत करीन... "
" मला वाटतं आपण शिकायला आलोय इथे.. "
" येस्स! आणि जो माणूस स्वतःचा स्वाभिमान जपणं शिकत नाही त्याच्या सगळ्या डिग्र्या व्यर्थच असतात. "
" मला तुझी काळजी वाटायला लागलीय अंजू.. "
इतक्यात कुणीतरी दार ठोठावले. सिमरन आणखीच घाबरली.
" तोच असेल... गुंडांना घेऊन आला असेल... मला भीती वाटतेय अंजू.. " अंजलीने सिमरनकडे नजर टाकली. गालातल्या गालात हसली. दरवाजा उघडायला पुढे गेली.
" अंजू उघडू नको दरवाजा... तोच असेल.. " सिमरन घाबरून खोलीतल्या कपाटामागे जाऊन लपली. अंजलीने दार उघडलं. राहूल होता.
"अरे राहूल.. तू यावेळी इकडे कसा?"
" मला सीमाने बोलावलं होतं... काहीतरी काम आहे म्हणत होती.. "
" ओह... ये ना... ही बघ भित्री भागुबाई इथं लपलीय.. "
" लपलीय? का बुवा? " कपाटामागे दडून असलेली सिमरन भावाला बघताच समोर आली.
" बरं झालं दादा तू आलास... "
" का गं? इतक्या अर्जंट बोलावून घेतलंस? "
" हो... तू बस ना.. " खोलीतल्या एक मोडक्या खुर्चीत राहूल बसला.
" राहूल तू चहा कॉफी काही घेशील का? " अंजलीने विचारले.
" नाही.. नको काहीच.. "
" दादा... तुला कालच्या प्रकाराबद्दल तर ठाऊक असेलच... " सिमरन बोलली.
" लल्लनच्या का? "
" अं.. हो.. बघ ना.. अंजलीने उगीच त्या सापाच्या शेपटीवर पाय दिलाय.. आता तो काही गप्प बसणार नाही... मला अंजुची काळजी वाटतेय. " सिमरनने भावाजवळ मन मोकळे केले.
" थोडं चुकलेच अंजलीचे... अशा सापांच्या शेपटीवर नाही तर तोंडावर पाय द्यायला पाहिजे. चांगली ठेचून काढायला हवी अशी विकृती. "
" म्हणजे तुही अंजुलाच सपोर्ट करतोयस.. "
" अफकोर्स! तिने योग्य तेच केलेय. "
" अरे पण... पुढे काय? तो हा विषय बंद करणाऱ्यांतला नाही.. "
" त्याला काय करायचं ते करू दे... मी नाही घाबरत.. " अंजली बोलली.
" आणि घाबरूही नकोस... मी तुझ्या... आय मीन तुम्हा दोघींच्या सोबत आहे. काहीही त्रास झाला.. अडचण आली तर मला कळव.. "
" गरज पडली तर नक्कीच! "
" दादा तुही? मला वाटलं तू तरी हिला समजावशील... "
" अंजलीने जे केलंय ते योग्यच केलंय... तिला काहीही समजावण्याची गरज नाही... उलट तूच तिच्या सहवासात राहून बऱ्याच गोष्टी शिकून घ्यायला पाहीजेस.. "
" हो का? बरं बरं... गुरूच करून घेते आता तिला.. "
" व्हेरी गुड आयडिया... "
" मीही गुरुमंत्र द्यायला कधीही तयार आहे.. "
अंजलीच्या या वाक्यावर तिघेही खळखळून हसले.


© शिरीष ®

[ 'बारीक सारीक गोष्टी ' हा दर्जेदार कथांचा बालकुमार कथासंग्रह मिळवण्यासाठी संपर्क साधा मो. 7057292092 ]