Destiny ... books and stories free download online pdf in Marathi

प्रारब्ध...

।।लघुकथा।।
​ 💐💐प्रारब्ध💐💐
​ प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही तरी कारणाने येत असतो असं माझं मत आहे. काही व्यक्ती खूप खास असतात ते आपल्याला ही कळत नाही त्या क्षणाला ते का आलेत आपल्या आयुष्यात आणि ते ही त्या नात्यांविषयी समजण्याची आणि समजून घेण्याची ना आपली पात्रता असते आणि ना आपले वय पण तरीही त्या व्यक्ती बद्दलची ओढ मात्र अगदी मनाचा मनाशी आपसूकच जुळलेला एक अतूट असा नाजूक धागा असतो. त्यांचं आपल्या आयुष्यात येण्याचं कारण ही खूप खास असतं..ते खूप काही देऊन जातात... मग ते दुःख असो वा सुख अगदी भरभरून देतात...
​ अजीब सें फैसलें होतें हैं तेरें ऐ जिंदगीं...
​कदम कदम पर इम्तिहानों के दौंर सें...
​लबोंपर मुस्कुराहटों की लकींरों के साथ...
​गुजरना पडता हैं...फिर भीं तू हमारें होनें का
​सबब पुछती रहती हों...और
​हम हर बार खामोंश खडे रहकर देखते रहतें है...
​ अंजू... ए अंजू! काय करतेस इथे अशी
​खिडकी जवळ उभी राहून कसला विचार करतेस गं..तिचा नवरा अनिल तिच्या जवळ येऊन बोलू लागला तरी त्याच्याकडे तिचं लक्षच नव्हतं. तो जवळ आला तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलणार इतक्यात त्याच्या हाताच्या हळूवार स्पर्शाने तिची तंद्री भंग झाली..
​तिने स्मित हास्य करत विचारले..
​अहो, तुम्ही इथे काय करताय? तुमची मित्रमंडळी
​आहेत काय म्हणतील ते..
​ते काही ही बोलू देत मी माझ्या बायको जवळ आलोय अनिल तिचा नवरा बोलला..
​आणि काय गं ते म्हणतील म्हणून मी तुझ्या कडे यायचं नाही असं कुठल्या शास्त्रात लिहलंय...
​and bye the way mam ते गेल्यानंतर च मी आलोय बरं का..
​आणि मला एक सांग मी इतक्यांदा बोलूनही तुझा प्रतिसाद नाही कुठे हरवली होतीस तू ...
​काही नाही हो, अंजू म्हणाली..
​असं कसं..मला माहिती आहे तू आपली मुलगी रियाचा विचार करत होतीस ना..अनिल बोलला.
​हम्म्म..अंजू बोलली
​खरंच किती जीव लावलास गं तू तिला..अनिल
​माझी मुलगी नाही का ती..आईपण मिळालं तिच्या रूपाने मला आणि खरं तर.. आई ने जन्म दिल्यामुळे मुलांना अस्तित्व मिळते, पण..तिच्या मुळे मला अस्तित्व मिळाले. तिच माझी आई झाली ना...अंजू म्हणाली..
​बरं असो.. तुम्हाला काही हवंय का..चहा कॉफी वगैरे घेणार दिवसभर फार तारांबळ उडाली होती
​ना.. फार दमायला झाले असणार अंजू बोलली..
​नाही गं.. काही नको काही दमलो वगैरे नाही मी..
​तूच दमली असशील.. सकाळपासून चालू होतं तुझं हे बघ, ते बघ सगळीकडे तुलाच बघावं लागलं
​मुलीच्या लग्नाच्या गडबडीत स्वतःकडे जरा सुध्दा लक्ष दिलं नाहीस..मी देऊ का तुला कॉफी करून
​अनिल बोलला..
​नाही हो..काही नको..मी ठीक आहे..अंजू बोलली.
​नक्की ना..परत विचारलं अनिलनी..
​हो नक्की.. आणि काय हो..आज फारच प्रेम ऊतू
​चाललंय.. अंजू बोलली.
​का नाही mam.. तुमच्या लेकीची सक्त ताकीद आहे आम्हाला.. सासरी जातांना विणा सांगून गेलीय मला..बाबा, आईची काळजी घ्या.
​हसता बोलता दोघांनाही ही भूतकाळात स्वतःला आठवणींच्या स्वाधीन केलं..
​ अंजू मध्यम कुटुंबातील मुलगी ​दिसायला सुंदर, सोज्वळ, नाकी डोळी कोरीव,​लांब केस, उंच ठेवणीदार काया, शिक्षणात हुशार, मनमिळाऊ आई-वडीलांची एकुलती एक. साधारण चौदा वर्षाची असतांना आई वडील बाहेरगावी जातांना त्यांना अपघात झाला नि दोघांचेही मायेचे छत्र कायमचे हरपले. मामा मामी तिला त्यांच्याकडे घेऊन गेले. मामीचा छळ, उपासमार,घरची कामं सगळं करून ती शिकत होती. आई वडीलांची उणीव मात्र तिला वेळोवेळी जाणवत होती. त्यांच्या आठवणींचा पूर तिच्या डोळ्यातून वाहून तिला प्रत्येक वेळी ते जवळ असल्याची जाणीव ती स्वतःला करवून देत होती. तिच्या मामाच्या तब्येतीमुळे त्याचा छोटासा व्यवसाय डबघाईस येऊ लागला. मामाची तब्येत दिवसेंदिवस ढासळतच होती तोपर्यंत अठरा वर्षाची झाली मामाला तिची काळजी होती त्यामुळे मामाच्या इच्छेखातर ती लग्नाला तयार झाली आणि तसंही मामीच्या जाचाला कंटाळली होती त्यामुळे मामा ज्या मुलाशी लग्न लावून देईल त्या मुलाशी ती लग्नाला तयार झाली. मामाने कसलीही विचारपूस नं करता मुलगा शोधून लग्न करून दिले. मुलगा बऱ्यापैकी होता सरकारी नोकरीवर होता.बघता क्षणीच मुलाच्या आईवडीलांनी तिला पसंत केलं आणि लग्न उरकले.
​ कित्येकदा आपण आपल्या आयुष्यात वेगळ्याच कल्पना रंगवत असतो. पण हे सर्व करतांना आपण हे विसरतो की देवाने आपल्या नशीबात काही तरी वेगळेच वाढून ठेवलेले असते आणि कधी कधी जे डोळ्यांना दिसते ते वास्तव आहे हे मानायला मन तयारच नसते. खरंच आयुष्य पण किती परीक्षा घेते नं माणसाची.
​तिची ही अशीच परीक्षा होती. लग्न करून नवऱ्यासोबत नोकरीच्या गावी राहायला आली नी
​तिया आयुष्यातील साडेसाती सुरू झाली. मामीच्या जाचातून सुटण्यासाठी लग्न केलं पण नवरा फक्त नावापुरता..त्याचं साधं लक्षही तिच्याकडे कडे नाही कारण लग्न हे त्याच्या मनाविरुद्ध झालेलं. त्याचं प्रेम होतं एका मुलीवर; पण हे त्याच्या आईवडीलांना मान्य नव्हतं. त्याच्या
​वडीलांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याला मनाविरुद्ध तिच्याशी लग्न करावं लागलं. हे तिला पहिल्या रात्री च त्याच्याकडून तिने कुठल्याही अपेक्षा ठेवू नये हे सगळं सांगून तो प्रत्येक जबाबदारीतून मोकळाच झाला. काय करणार होती सगळंच अनोळखी होतं तिच्यासाठी.
​ती तिची कर्तव्य करत होतीच नवरा असूनही नसल्यात जमा. दोन चार महिन्यात शेजाऱ्यांशी थोडीफार ओळखी करून एखादा जॉब करावा असं मनात विचार करत होती. शेजारच्या काकांनी
​तिच्यासाठी जवळच्याच लायब्ररी मध्ये तिला जॉब सांगितला आणि ती जॉबवर जाऊ लागली. तिचा वेळ ही जात होता आणि तिला वाचनाचा छंद सुद्धा लागला तिचा वेळ खूप छान जत होता हातात पैसेही येऊ लागले..सध्यातरी तिच्या आयुष्यात थोडं सुरळीत पणे सुरू होतं अशीच दिवस जाऊ लागले..​पती पत्नीतील संवाद कधी नव्हताच फक्त बोलणं कामापुरतंच पाच वर्ष त्यांच्या लग्नाला होऊन घरात भयाण शांतता त्याची तिच्या कुठल्याही गोष्टीत ना दखल होती आणि ना कुठली हरकत.​फक्त जगाच्या दृष्टीने ते पती पत्नी होते. तिलाही तक्रार करून कुठे जायला हक्काची जागा नव्हतीच जे आयुष्य होतं ते तिने विना तक्रार स्विकारलं होतं.
​म्हणता म्हणता तिच्या लग्नाला पाच वर्ष झाली. तिच्या सासु-सासऱ्यांनी दोघांंनाही दिवाळीच्या निमित्ताने गावाला बोलावले. नवऱ्याचे मन नव्हते जायचे पण सासु- सासऱ्याच्या आग्रहाखातर तो तयार झाला... साहजिकच तिला घेऊन जाणं त्यालाही भाग पडलं. गावाला जाण्याची तयारी झाली दोघेही स्वतःच्या गाडीने गावच्या प्रवासाला निघाले. तिचं मन इतकं बेचैन होतं की, राहून राहून तिला काही तरी विपरीत होईल अशी आशंका येऊ लागली पण त्याच्याशी ती बोलू शकत नव्हती. दोघाचाही प्रवास चालला होता गाडी तिचा नवराच चालवत होता.. अचानक
​त्याच्या गाडीवरचा ताबा सुटला नि समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकवर कार इतक्या जोरात आदळली अपघात इतका विलक्षण होता की कुणाला काही कळण्याच्या आत सगळं होऊन गेलं
​तिचा नवरा तर जागीच ठार झाला आणि ही हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे ती कोमात गेली. जवळ जवळ बारा महिने ती कोमात राहिली.जवळचं असं कुणी नाही. सासरची मंडळी त्याचा मुलगा गेल्यावर त्यांनी तर साधी चौकशी पण केली नाही जवळ असणं तर दूरच राहिलं...
​पण म्हणतात ना जेव्हा सगळे मार्ग बंद होतात सगळीकडे काळोख असतो तेव्हा त्या काळोखातून ही एक सूक्ष्म प्रकाश येतो आणि मार्ग सापडतोच.
​तिच्याही आयुष्यात एक प्रकाश किरण नवीन मार्ग
​दाखवत उभा होता. कोमातून यायला तिला वर्ष लागलं शुद्धीवर आली तेव्हा तिचं सगळं जगच बदललेलं होतं... मानसिक धक्क्याने जगण्याची आशा ही तिच्या मनात उरलेली नव्हती.तिला रिकव्हर व्हायला सहा महिने लागले. ती ज्या हॉस्पिटलमध्ये भरती होती त्याच हॉस्पिटलमध्ये डॉ. अनिल हे न्यूरो सर्जन होते स्वभाव, आचार विचाराने प्रगल्भ व्यक्तिमत्व असलेले सर्वांचे लाडके डॉक्टर म्हणून प्रसिद्ध. त्यांना रिया नावाची
​दोन वर्षाची मुलगी होती. लग्नानंतर साधारण तीन वर्षाचा त्यांचा संसार झाला. त्यांच्या पत्नीला कँन्सर झाला होता रियाला जन्म दिल्यानंतर त्यांची पत्नी सहा महिन्यांनी वारली होती. तिच्या पश्चात त्यांनी रियाचा योग्य प्रकारे सांभाळ करत होते. सध्या त्यांची मुलगी दोन वर्षाची होती. डॉ. अनिल अंजूवर योग्य प्रकारे उपचार करून शक्य ती काळजी घेत होते तिच्या मनात जगण्याविषयी गोडी निर्माण करत होते. एकूणच तिच्यामध्ये सकारात्मक बदल होत होते आणि ती उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देऊ लागली. डॉ. च्या स्वभावामुळे ती त्यांच्या शी मनमोकळे बोलू लागली. दोघांच्याही अंतरी एक अनामिक ओढ निर्माण झाली होती. पण ते व्यक्त करता येत नव्हतं. ती पूर्ण बरी झाल्यानंतर तिच्या कडे कुठे जायला मार्ग नव्हता. त्यामुळे डॉ अनिल यांनी तिला आपल्या मुलीची केअर टेकर म्हणून नोकरी दिली. आणि तिचं आयुष्यच बदललं तिच्या सहवासात ती तिचं सगळं दुःख विसरली.तिच्या इतकी गुंतली की तिचीच मुलगी एक वेगळेच बंध जुळले त्यांचे एकमेकींशी... खरंच कधी कधी रक्ताच्या नात्या पेक्षा ही मनाने जुळलेली नाती इतकी मजबूत होतात की या नात्यांची एकेक पाकळी फुलांप्रमाणे अगदी अलगद उलगडत जाते.आणि त्याचा सुगंध हा आयुष्यभर दरवळत राहतो आणि हा सुगंध आयुष्य जगण्याला प्रवाहित करत असतो. फुलांचा सुगंध कालानुरूप कमी होतो पण नात्यांचा सुगंध कमी करायचा की वाढवायचा हे मात्र आपल्याच हातात असते.आणि हे दोघांनी जपलं होतं. रिया ही तिची मुलगी झाली आणि अंजू तिची आहे झाली होती.डॉ. अनिलनी अंजूशी लग्न केलं आणि तिला तिचं हक्काचं घर मिळालं. रिया तिच्या आयुष्यात एक निखळ झरा बनून आली आणि तिच्या जगण्याला अर्थ मिळाला बघता बघता तिचे शिक्षण पूर्ण झाले. करिअर झालं आणि तिला स्थळ आलं तिच्या पसंतीने तिचं
​लग्नं ठरलं... आज तिच्या लग्न होऊन सासरी गेल्याने पोकळी तर होती पण समाधानही होतं की ती आनंदी आहे आणि सर्व तिच्या मनाप्रमाणे आहे सर्व सुखी; माणसाचं नशीब पण कसं आहे क्षण लागत नाही नशीब बदलायला...
​ समाप्त...
​ शोभा मानवटकर.... नागपूर..

इतर रसदार पर्याय