संघर्षमय ती ची धडपड #१० - अंतिम भाग Khushi Dhoke..️️️ द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संघर्षमय ती ची धडपड #१० - अंतिम भाग

 

लग्न काहीच दिवसांवर आल्याने घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू होती..... शीतल मात्र निराश असते.... कारण, आता इथून पुढची लाईफ तिची स्वतःची नसेल या भितीत आणि पुढे काय वाढून ठेवलंय या चिंतेत ती स्वतःला, परिस्थितीसमोर हतबल मानत असते......����

 

काहीच दिवसांत लग्न होतं..... लग्न करून ती सासरी येते..... सगळी कामं करून तिला वेळच उरत नसल्याने आता हेच माझं आयुष्य अस ती मानते..... स्वतःचं जे स्वप्न होतं ते क्षणात विसरून, ती आता फक्त आपल्या घर - संसारात रमणार असते...... तिचा नवरा ही कधी - कधीच कामावर जातो..... शीतलला जाणीवपूर्वक फसवल गेलं असतं..... यानंतर अशी एक घटना घडते की, ज्याने तिच्या आयुष्याचे वळण पूर्ण बदलून जाईल......

 

एक दिवस तिला तिच्या भाच्याचा फोन येतो.....

 

शुभम : "मासी मैं आ रहा हुं...... कुछ दीन तुम्हारे यहाँ..... मेरा एक्झाम सेंटर वहां से पास पडेगा.....ठीक हैं ना.... आऊँ ना....??��"

 

शीतल : "हां.... आ जा..... उसमे क्या हैं....☺️☺️"

 

तो तिच्या घरी काही दिवस थांबणार असतो.... आता भाचा म्हटलं की, फ्रेंड ना.... आणि शीतल काही मोठी नव्हतीच तिचं अजून बालपण देखील ती जबाबदारीमुळे पूर्णपणे जगली नव्हती...... म्हणून, शुभम आणि ती दोघेही घरी खूप मस्ती करायचे..... ती त्याच्यासोबत बाहेर नवऱ्याला सांगून फिरायला जायची..... नवराही आधी काहीच म्हणायचा नाही....म्हणून, ती जायची..... काहीच दिवसांत, शुभम तिचा फ्रेंड होऊन गेला..... पण, त्याची परीक्षा संपली आणि घरी जाण्याची वेळ आली..... आणि शीतलला मग बोर व्हायला लागलं..... शुभम गेल्यावर एक दिवस तिचा नवरा खूप पिऊन आला....... आणि तिला शिवीगाळ करू लागला.......

 

तिच्या नवऱ्याच नाव लिहून मी माझ्या कथेचा अपमान करणार नाहीये..... कारण, त्या गलिच्छ माणसाची ही सुद्धा लायकी नाही की, मी त्याचं नाव माझ्या कथेत लिहू....��

 

नवरा : "काय ग मस्त झाली का मजा मारून त्या भाच्यासोबत.....���"

 

शीतल आज पर्यंत नवऱ्याला उलट शब्दाने बोलली नव्हती.... पण, आज हे शब्द ऐकून तिची तळपायातली आग मस्तकात गेली आणि ती ताडकन जागेवरून उठून उभी झाली......

 

शीतल : "काय तुमचं... मी काहीच उत्तर देत नाही..... म्हणून, तुम्ही तुमची मर्यादा ओलांडणार का....�"

 

नवरा : "अये.... भवाने..... मला मर्यादा शिकवतेस..... चल.... चल तुला आज चांगलीच मजा दाखवतो....��"

 

तो तिला केस पकडुन, ओढतच गॅस शेगळीजवळ नेतो....... गॅस सुरू करतो आणि एक लोखंडी काठीने तिला चटके देतो..... ती तिथून पळत हॉलमध्ये येते..... तो ही तिच्या मागे धावतो..... आणि तिला बेदम मारहाण करतो..... पिऊन असल्याने मारून दमतो आणि तिथेच लोळत, शिव्या देत झोपी जातो......��

 

इकडे ती तिच्या भाच्याला फोन करून बोलावून सगळा घडलेला प्रकार सांगते...... तिचा भाचा तिला तिथून आपल्या घरी आणतो..... शीतल आता शेवटचा स्वतःचा निर्णय घेते.... इथून पुढे ती एकटीच स्व: संघर्ष साठी झटेल..... त्यासाठी तिला कुणाचीही आता गरज पडणार नाही...... घरचे तिला नवऱ्याला सोडू नको हाच सल्ला देत असतात.....�

 

म्हणजे बघा ना काय लाजीरवाणी गोष्ट.... एका मुलीला नवऱ्याने जीव जात पर्यंत बेदम मारहाण करून, ती स्वतःच्या स्वप्नासाठी आताही उठून उभी रहायला तयार आहे...... पण, तिच्याच घरचे तिला परत त्याच नरकात जा म्हणून सांगतात....�

 

पण, आता शीतल कुणाचही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसते..... कारण, तिचा निर्णय आता कुणीच बदलू शकणार नसतं..... सगळ्यांचं ऐकुन खड्ड्यात पडण्यापेक्षा, आपणच खोदलेल्या खड्ड्यात आपण पडलो.... तर, बाहेर निघण्याची हिम्मत तरी असते...... पण, दुसऱ्यांनी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडल्यावर मात्र आपण पूर्ण मनातून तुटून जातो..... मग आपल्याला त्यातून सावरायला आपलीच माणसं नकार देतात....

म्हणून, इथून पुढचा प्रवास आता तिचा एकटीचां आहे.... डिव्होर्सची प्रोसेस अजूनही सुरू आहे...... तिला स्वतःला सावरायला थोडा वेळ गेलाच...... पण, आता ती एक  आत्मविश्वासू स्त्री म्हणून समाजात स्वतंत्र आहे..... स्वतः एक छोटा व्यवसाय करते..... आणि महत्वाचं म्हणजे ती या एकट्या जीवनात जास्त खुश आहे..... नको ते खोटे हसणे...��� ज्यात, आपल्याला दुसऱ्यांना दाखवण्यासाठी हसाव लागतं....��

 

खरं सांगायचं झालं तर, शीतल कडून मी स्वतः एक सकारात्मक ऊर्जा अनुभवली आहे..... माझ्या "अपूर्णत्वास - पूर्णत्व" या कथेतून ती मला भेटली खरी.... पण, आता मी स्वतः तिची फॅन झालीय...... तिच्याशी बोलून मला स्वतः टेन्शन फ्री वाटतं...... माझ्याही पेक्षा अधिक ऊर्जा असणारी, अशी ती नेहमीच मला, सकारात्मक भासते.... तर अशी "ती" ची ही संघर्षमय स्व: ची धडपड आज इथे संपेल..... कारण, तिची धडपड अजून तरी सुरूच आहे आणि ती सुरूच असेल..... जोपर्यंत "ती" जिवंत असेल..(भाव नकारात्मक घेऊ नये).... कारण, स्त्रियांची धडपड ही कधीच संपणारी नसते......

 

म्हणून, इथे आता तिचं स्वप्न पूर्ण झाले नाही मग तुम्ही कशी काय कथा संपवताय हे प्रश्न कृपया नको..... कारण, बालपणापासून ते आतापर्यंत "ती" ची हीच कथा आहे...... आताही "ती" ची धडपड सुरूच आहे..... आणि मला खात्री आहे शीतल तू नक्कीच यशस्वी होणार आहेस.... काळजी करू नकोस..... जितकी सकारात्मक आहेस तितकीच नेहमी रहा......��

 

अरे हो तुम्हाला एक सांगायचं विसरलेच.... शीतल कडे ना पूर्ण निसर्ग साठा आहे.... कारणही तसेच ना राव...... ती आहे नेरळ ची..... जे की माथेरानमध्ये मग विषय का...... मला सगळं सांगते ती........ तिच्याकडे एक मोठा arowana आणि एक ऑस्कर फिश आहेत..... अजून खूप प्राणी आहेत.... म्हणून, म्हणते ना ती निसर्ग साठ्यात रहाते........... मी तर चक्क तिला सांगून दिलंय, मी येणार तुझ्याकडे..... कारण, कस असतं आपल्याला ना मनाची नाती हवी असतात.....❤️ कारण, बाकीची नाती मी तर गमावून बसले ना.....� असो....

 

तर, ही होती "ती" ची संघर्षमय स्व: ची धडपड.......

 

काही प्रश्न पडू शकतात...... जसे,

 

यशवंतच्या सिनचा कथेशी काय संबंध....�� तर, त्याचं काय ना, यशवंत जर असता तर त्याने, आपल्या परीला कधीच त्रास होऊ दिला नसता..... आणि मग परीच्या मनात स्व: ची धडपड जागी झाली असती का हो...??! हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून बघा......

 

आपलं स्व: तेव्हाच जागं होतं... जेव्हा, त्याला कुणी डिवचतं आणि मग तेच सांगण्याकरिता मला यशवंत चे पात्र त्यात घ्यावे लागले आणि अर्ध्यात त्याला थांबवावे लागले..... त्याचा एक उद्देश असाही होता की, प्रत्येकाने नेहमी कुठल्याही परिस्थितीसाठी तयार असावं..... यशवंत गेल्यावर शिवाजी हरला नाही..... सविताने सुद्धा त्याला साथ दिली..... तर, नेहमीच परिस्थिती सारखीच असेल असेही नसते...... हेच मी माझ्या कथेतून सांगू इच्छिते..... आशा करते जुळवून घ्याल......☝️

 

आता एक प्रश्न हा पडू शकतो की, शिवाजी आणि सविता स्वभावाने, इतके कसे बदलले.....?? तर, ह्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला उदाहरण देऊन स्पष्ट करेल..... आधी आमच्या शेजारी एक पोलिस डिपार्टमेंटचे काका रहायला होते..... त्यांनी त्यांच्या मुलीला खूप शिकवलं... पण, मग तिला एक मुलगा आवडला आणि ती त्याच्यासोबत पळून गेली..... त्यानंतर मात्र काकांनी दुसऱ्या मुलीचं विसाव्या वर्षीच लग्न लावून टाकलं.....कारण, तिने बहिनिसारख काही करू नये..... आता ते तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये असून सुद्धा प्रतिगामी समाजाचा मान ठेवणारे निघाले....... मग, शिवाजी आणि  सविता सारखे सामान्य लोक जर असे करत असतील..... तर, मात्र आपल्याला धक्का बसू नये...... आणि जर असेलच मनात राग तर, आपण आपल्या मुलांच्या बाबतीत निर्णय हे त्यांच्या इच्छेविरुद्ध घेणार नाही हे वचन आजच आपण स्वतःला देणे गरजेचे आहे....☝️�

 

बाकी काही नाही......☝️☝️

 

तर, मित्रांनो...... प्रत्येकच कथा ही परिपूर्ण असावी अशी वाचकांची ईच्छा असतेच, त्यात काहीच वाद नाही..... पण, स्त्रियांची स्व: साठी असणारी धडपडही कधीच पूर्ण होत नाही हे ही तितकेच सत्य आहे...... माझ्या कथेची नायिका ही खऱ्या आयुष्यात मला भेटली आहे.... स्वतःची आत्मकथा मला सांगून....... कसलाच विचार न करता, माझ्यावर विश्वास ठेऊन, मला स्वतःविषयी लिहिण्याची परवानगी दिली...... त्याबद्दल, "ती" चे मनःपूर्वक आभार......�☝️

"ती" नेहमीच सुखी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.......☝️���

निरोप घेते......�

समाप्त....