Aaiche majhya jivnatil astitva kuthe harvle - 2 books and stories free download online pdf in Marathi

आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 2

भाग २

माझ्या जीवनाचा शिल्पकार तुच होतीस,कारण लहानपणापासून तुच मला घडवत होतीस.लहानपणी तुझे बोट पकडून शाळेत जायला सुुरुवात केेली.तेव्हा शाळेत मन रमेना,पण तुु नेहमी माझ्या सोबत असायची.हळुहळू शिक्षकांची मी आवडती होऊ लागले,कारण प्रत्येक वेळेस शाळेत पहिला किंवा दुसरा क्रमांक असायचा.हे फक्त तु माझ्या सोबत होतीस म्हणून शक्य होतेे.माझ्या प्रत्येक स्पर्धेत नृृत्य,गायन,कोणतीही असो,तु नेहमीच माझ्या सोबत असायचीच.एकदा पाचवी इयत्तेत असताना माझा तिसरा क्रमांक आला.तेव्हा मी खूप निराश झाले होते,खुप रडत होते.तेव्हा तु मला प्रेमाने समजावून जाणीव करून दिली कि अपयश एकदा ना एकदा आयुष्यात तर येतेच, त्याने निराश न होता परत उठून मेहनत करायची, तेव्हापासून मी परत त्याच प्रयत्नाने अभ्यास करायला सुरुवात केली.खरंच अशा अनेक गोष्टी होत्या की,मी त्या तुझ्याशिवाय पुर्ण करु शकत नव्हते.माझे जीवन जगण्याचे तुु मुर्तीमंत उदाहरण होती.
तुमचेही कोणतेही काम आईशिवाय होत नसेल.भुक लागली तर आई,काही जखम झाली तर रडुन रडुन तोंडातून नाव येते, फक्त आईचे, लहानपणी प्रत्येक संकटात आपल्याला आईच आठवते.खरंच किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण तिला बघत असतो.ज्यांना आई असते,ते तिचे महत्त्व जाणूच शकत नाही.काहीजण आई,बाबा म्हातारे झाल्यावर त्यांना वृद्धाश्रमात सोडुन येतात,तर काही त्यांना सोडून दूर परदेशात निघून जातात, किती कठोर असतात ते.लहानपणापासून त्यांनी आपल्यासाठी काय काय सोसले,याची जाणीव त्यांना होतच नाही.कधीकधी आईला आपल्या मुलासाठी जीवनभर वाट बघावी लागते,
तेव्हा त्या आईची हाक ऐकताना ही कविता सुचली....
तुला जन्म दिला मी
तुला खांद्यावर घेऊन, तुझे सर्व मागणे पुर्ण केले,
पण आता दुर परदेशात तु निघून गेलास.
आता तुला आठवेल का रे मी?
माझ्या संवेदनांची जाणीव होईल का रे तुला?
माझ्या ह्रदयाची हाक एकू येईल का तुला?
माझे काळीज धडपडत आहे,फ़क्त तुला भेटण्यासाठी.
काय या जन्मात आपल्या होतील भेटीगाठी.
तुझ्याविना इथे फक्त नैराश्य पडले पदरात
कधी येशील तु, माझ्या या छोट्याश्या दारात.
हे वादळ आता थकले आहे,
पण फक्त वाट तुझीच पाहे.
आता हे शेवटचे एकच मागणे
माझी ही अंतीमयात्रा तुझ्या सहवासात पार पाडणे.
एक आई आपल्या मुलाला यासाठी जन्म देते का,की तो तिला कायमचा नंतर सोडून चालला जाईल.अरे त्यांना विचारा याचे दुःख, ज्यांना आई नाही.लहानपणी ती शिक्षित नाही म्हणून आपल्याला आपल्या शाळेत आलेली ती चालत नव्हती,कारण आपल्याला तिची लाज वाटते.आपले मित्र, मैत्रीण चिडवतील याची आपल्याला काळजी असते,पण त्या माऊलीची नसते.तरीही ती आपले ओझे स्वतःच्या खांद्यावर पेलत असते.चला आपण तर तेव्हा लहान होतो, तेव्हा समज नसते.पण मोठे झाल्यावर सुद्धा आपली आईसोबत तशीच वागणुक असते.तरिही ती त्याच पद्धतीने आपल्यावर प्रेम करत असते,कारण आपण कितीही मोठे झालो तरी तिच्यासाठी लहानच असतो.खरंच ती जेव्हा आपल्या जवळ असते, तेव्हा तिची किंमत नसते,पण ती दुर गेल्यावर आपले जगच थांबते.जेव्हा आईचे अस्तित्व आपल्याला जाणवते, तोपर्यंत ती कायमची दुर निघुन गेली असते.
माझ्यासोबतही असेच काहीसे घडले आणि ती कायमची माझ्या दुर निघुन गेली.तुझ्याशिवाय लढण्याची ताकद आता राहिली नाही.हे असेच का केले,हे असेच का ठेवले असे लोकांचे बोलणे ऐकून ऐकून आता जगण्याची इच्छा होत नाही.कधीकधी तर तुझ्याजवळ धावून यावेसे वाटते,पण स्वतःला थांबवते कारण वडिलांची आणि लहान बहिणीची जिम्मेदारी माझ्यावर आहे,हे मला आठवते.असे वाटते,आता माझ्यावर प्रेम करणारं कोणी नाही.लोक माझ्या सोबत जेव्हा जेव्हा वाईट लागले तेव्हा तेव्हा मी त्यांना सामोरे जावू शकले नाही,कारण मी कमजोर पडले होते.मला हिम्मत देणारे कोणीच नव्हते.तु नाही तर एक एक दिवस मी घुटमळत आहे, चेहऱ्यावर हसू असते,पण मनातल्या मनात पुर्णपणे नाहिसी झाले आहे.माझ्या मनातले कोणालाही सांगू शकत नाही.लोकांचे हे सर्व बोलणे ऐकून फक्त एकच काम करु शकते, जेव्हा जेव्हा तुझी आठवण आली तेव्हा सर्वांच्या नकळत एका कोपऱ्यात जाऊन रडत बसते.रोज एकच प्रश्न पडतो,
तु मला न सांगता का इतकी दुर निघून गेलीस?
गेली तर गेलीस,पण माझी दुनिया ठप्प करुन गेलीस.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED