भाग ६
आम्ही दिवस रात्र फक्त एकाच गोष्टीचा विचार करत होतो, आम्ही असे काय केले पाहिजे जेेणेकरून आमची आई बरी होईल.कारण आईची परिस्थिती अतिशय खालावत चालली होती.आमचे छोटेेेसे गाव असल्यामुळे तिथे चांगले दवाखानेेेही नव्हते.हालाकीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आईला गावाच्या बाहेर नेणे गरजेचे झाले होते.शत्रु असला तरीही त्यांच्यावर प्रेम करणारी आई आता सर्वांशी वाईट वागु लागली होती.हळुहळु ती सर्व विसरत चालली होती.आपला परिवार आहे, आपल्या मुुुुली आहेत सर्व काही.माझी ताई दुर शिक्षणाला जेेव्हा घरापासून दूर जात होती, तेव्हा डोळ्यांत अश्रू न मावणाऱ्या माझ्या आईच्या मनात आता कोणासाठीही भावना नव्हती.अशा या शापित आजाराने माझ्या आईला मुठीतच घेेऊन टाकले होते.कुठेतरी आता माझी आई माझ्यापासून हरवत चालली होती.काहीच समजेनासे झाले होते.
बाबा ताबडतोब आईच्या इलाजासाठी नाशिकला गेले.मी,आई,आम्ही सर्व आजीच्या घरी गेलो.ही जणू आमची एक प्रकारची शिक्षा होती.या सर्वांना सामोरे जाणे खूप कठीण होते.आम्ही सर्वांनी गाव सोडून नाशिकला जाण्याचा निर्णय घेतला होता.बाबांसमोर परत एकदा नव्याने सुरूवात करण्याचे आवाहन उभे राहिले होते.बाबा आमच्या राहाण्याची सोय करण्यासाठी एकटे नाशिकला गेले.आम्ही सर्व आजीच्या गावी गेलो.मला आणि माझ्या बहिणीला शाळा आणि आमचे मित्र-मैत्रिणी मधुनच सोडून जावे लागले होते.मला अभ्यासाची आवड असल्यामुळे मला शाळा सोडण्याचे मनातुन खूप वाईट वाटले.माझ्या मित्र-मैत्रिणींना याची थोडी सुद्धा जाणीव नव्हती,कारण मला भिती होती की,माझी आई पागल आहे असे ते मला चिडवतील. कोणालाही काहीही न सांगता आम्ही अचानक निघून गेलो.असे वाटते,देवाने तिला जन्मापासूनच शाप दिला होता थोडेही आनंदाने न जीवन जगण्याचा.म्हणूनच की काय तिच्यावर ही परिस्थिती ओढावली होती.माणसाचा मेंदु अतिशय कमजोर असतो.त्याच्यावर थोडाही आघात झाला की तो काम करणे बंद करुन टाकतो, असेच काहीसे माझ्या आईसोबतही घडले होते.तिला स्वतःला समजत नव्हते,की तिच्यासोबत काय घडत होते.आमच्यासाठी सर्व गोष्टी अशक्य होऊ लागल्या होत्या.पुढील खुप काही महिने आम्ही आजीच्याच घरी राहिलो.आमची शाळा बंद होती.बाबा रोज मला फोन करून दिलासा देत होते.माझ्या पुढील शिक्षणात अडथळा आल्यामुळे,आईचे प्रेम हिरावल्यामुळे अशा सर्व गोष्टींमुळे कंटाळून जगावेसे वाटत नव्हते.रोजचा एक एक दिवस आमच्यासाठी कठिण होऊ लागला होता.आईचे वेगवेगळे रुप रोज बघायला मिळायचे.आमची तिला सहन करण्याची शक्तीही हळूहळू संपत चालली होती.घरात आरडाओरडा असल्यामुळे आजीच्या गावामध्येही ही बातमी सर्वीकडे पसरली होती.सर्व गावात तोच चर्चेचा विषय बनला होता.रोज एक नवीन तमाशा त्यांना बघायला मिळायचा.गावातही दिवस रात्र याच गोष्टीवर गलबला असायचा.पण परिस्थिती मात्र हातातून निसटत चालली होती.मावशी,काका,आजी,आजोबा या सर्वांचे प्रयत्न चालू होते,तिला मोकळे करण्याचे,तिला नव्याने जगाची ओळख करण्याची.ती जे म्हणेल,ते आम्ही करायचो.कारण असा आजार असलेल्यांना खुप प्रेमाने सांभाळावे लागते, नाहीतर ते रागाच्या भरात स्वतःलाही नुकसान पोहोचवतात आणि दुसऱ्यांनाही.दुःख या गोष्टीचे नव्हते की ती हे सर्व करत आहे, दुःख या गोष्टीचे होते की,तिची परिस्थिती तिला हे सर्व करण्यात भाग पाडत होते.कधी कधी कोणालाही न सांगुन ती घरातुन निघुन जायची,आम्ही तिला पुर्ण गावात शोधत राहायचो.जणु आमचे नशिबाचे चक्र पुर्णपणे उलटे फिरत होते.गावातले लोक तिची विचारपूस करण्यासाठी नव्हे तर तिची मजा पाहण्यासाठी यायचे.मावशीचे,मामाचे मुलं तिच्यावर हसायचे आणि मलाही हसण्यास भाग पाडायचे.पण माझ्या आईची ही अवस्था बघून मी आतून किती मरत होते,हे मलाच माहित होते.
कभी कभी शरम आती है इस बात की,आपका हम खयाल नहीं रख पाए,कभी कभी गम होता है इस बात का,की आपके हम काबील ना बन पाए.
बघा ना, शब्दांमध्ये किती ताकद असते, माझ्या आईबद्दल माझ्या कानावर असे असे शब्द पडले,ज्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली होती.म्हणून कधी कधी खंत वाटते की, तेव्हा जर तुझी काळजी घेण्यात आम्ही कमी पडलो नसतो तर तु आज आमच्या सोबत असतीस.
हजारो माणसे मिळतील आयुष्यात,पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारी आई पुन्हा मिळणार नाही.