आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 3 Rajashree Nemade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 3

भाग ३
आई,किती छोटा शब्द आहे हा.पण आई खरंच आपला जीव की प्राण.मला देव आहे की नाही हे माहीत नाही,पण जन्म देऊन मला या जगात आणणारया आईमधे मी देवाचे रुप बघितले आणि एवढेच नाही तर मला चांगले संस्कारसुद्धा तिच्याकडून मिळाले. निस्वार्थपणे फक्त माझ्याच भल्याचा विचार करणारी.तिच्याबद्दल कितीही शब्द बोलले तरीही ते कमीच आहे.अगदी साधी सरळ,सामान्य,जगापासुन वेगळी.विचारही सर्वांपासुन वेगळे.सर्व सुख-दुखात माझ्या सोबत असणारी,माझी आई माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होती,पण कधी कल्पनाही नव्हती की एवढ्या लवकर ती माझ्यापासुन दूर जाईल आणि इतकी दूर कि मला कधीही ती भेटणार नाही.
कधी कधी देवावर राग यायचा,वाटायचे मला आईपासुन दुर करायचेच होते तर तिचे अस्तित्व जाणवलेच कशाला,पण असे म्हणता ना देव चांगल्या माणसांना लवकर वरती नेतो.कदाचित त्याला तुझी सर्वांत जास्त आवश्यकता होती.
प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतात.जेव्हा तुझा जळता देह मी माझ्या डोळ्यांसमोर बघितला तेव्हा ते माझ्या आयुष्यात आलेले सर्वात मोठे संकट होते.किती भयंकर मृत्यु.इतक्या लवकर खुप काही घडुन गेले,काही उमगलेच नाही.आजही त्याचा विचार करुन थरथराट कापुन सुटते.पण खरंच आई किती मौल्यवान असते हे,ती दुर गेल्यावरंच समजते.पण माझ्यापासुन ती इतकी दुर गेली कि तिचा स्पर्शही आता मला अनुभवायला मिळणार नाही.आई तुझ्याबद्दल खुप काही बोलावेसे वाटते.

आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर,
असे शब्द आपल्या मनात स्फुरतात,
पण हे फार थोड्यांनाच जाणवते की,
या शब्दात सारे जग सामावलेले असते.
आई तुझ्याबद्दल काय बोलणार?
तु दूर जातास,माझेही मन रमत नाही,
आठवण तुझी येताच श्रावण सरी वाहतात नयनातुनी.
फार थोड्यांनाच मिळते ही मायेची सावली,
म्हणुन तर म्हणविते,ती सारया जगाची माऊली.
आई तुझ्या कुशीत येताच,तुझा स्पर्श जाणवताच,
माझ्याही पावलात सामर्थ्य येते.
तेव्हा मला जाणवते,की आई सदैव तिच्या लेकराची असते.
संकटसमयी मला कधीच एकटे जाणवू दिले नाही.
माझी कधी चूक झाली,तर क्षमा दिल्यावाचून राहिली नाही.
ज्यांनी आगळेवेगळे शोध लावले त्यांचे नाव
तर आपण कायम स्मरण करतो,
पण तुझ्यासारखा मायेचा ऊब देणारा अंश, ज्या
देवाने आम्हाला दिला,
त्या देवाला आम्ही साष्टांग नमस्कार करतो.
आई अजून मी तुला जाणलेच होते किती.तुझी साथ मला खूप प्रिय होती.तुझ्याशिवाय या जगात वावरणे आता कठिण झाले आहे.तु जाण्याच्या अगोदर तुला सांगायचे होते की, मी तुझ्यावर खुप सारे प्रेम करते.या वाईट क्षणांमध्ये असेही लक्षात आले कि, सुखात सर्व आपल्या सोबत असतात,पण दुःखात कोणीही पुढे येत नाही.हिम्मत धरुन धरुन पण किती धरायची, कधीतरी माणूसपण खचतोच ना.त्याला कोणाची ना कोणाची सोबत लागते,पण माझ्याजवळ कोणीच नव्हते.दुनियापासुन तर तु दुर गेली होतीस,पण माझ्या रोमारोमांत तुच होतीस आणि आजही आहे.माहित नाही तुझ्याशिवाय हे पुर्ण जीवन मी कसे जगणार?
कधी कधी तुझ्या मांडीवर डोके टेकवून झोपावेसे वाटते,पण तेही माझ्या नशिबात नाही.माझ्या संसाराची गाडी अटकली आहे, मला एकदा तरी भेटायला ये आणि हिम्मत, आशिर्वाद दे की,तु तुझ्या आयुष्यात यशस्वी होवो.पण काळजावर दगड ठेवून हे मानावे लागले की,तु परत कधीच येऊ शकत नाहीस.आज मी एवढी मोठी झाली आहे,पण आजही तुझी गरज भासते, तुझ्याशिवाय एकही जिम्मेदारी मी पार पाडु शकत नाही.आता समजदार पणाचा कळस दुर सारुन, पुन्हा लहान होऊन तुझ्या कुशीत बागळावेसे वाटते आहे.आता मन उतावीळ होत आहे फक्त तुला भेटण्यासाठी, फक्त तुझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी,तुझा आवाज ऐकण्यासाठी.पण आता तुझी सावली माझ्यावर राहिली नाही.
स्वयंपाकातही तु अतिशय उत्तम होती,पण तुझ्या हातचे खाणे आता नशिबात नाही.अशा कोणत्या गोष्टी होत्या की त्या तु करु शकत नव्हती की,तु सर्वांमध्ये माहिर होती.तरिही सर्व तुला दोष द्यायचे.पण तु त्यांना काहीही उलट उत्तर न देता सर्व काही सहन करायचीच.आई खरंच एका विशाल सागरासारखी असते.सर्व नाती अगदी प्रेमाने जपत असते.
शेवटी आई ही आपल्याला सगळ्यांपेक्षा नऊ महिने अधिक ओळखत असते.