आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 4 Rajashree Nemade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 4

भाग ४
तुमचा दिवस सुद्धा आईपासुनच सुुरू होत असणार आणि आईसोबतच संपत असणार.ती आपली एक मैत्रीण आणि एक योद्धा सुुध्दा असते. अशा काही काही गोष्टी असतात की ज्या आपण फक्त आपल्या आईलाच सांंगू शकतो.दिवस रात्र आपल्यासाठी कष्ट करणारी आणि राब राब राबणारी,अशी ती आपली आई.आजही मला आठवते,तु बाबांना नेहमी कामात मदत करायचीच,कारण चार पैसे घरात आलेे पाहिजे.बाबांजवळ जेव्हा पैैसे नसायचे, तेव्हा तुु मला कोणत्याही परिस्थितीत पैसे आणून द्यायचीच कारण माझी इच्छा पुर्ण झाली पाहिजे,बघा कशी असते ना आई,अगदी निरागस.
एकदा माझ्या मैत्रिणी सोबत एक घटना घडली.माझी मैत्रीण आणि तिची आई बसमध्ये प्रवास करत होते, तिच्या आईने माझ्या मैत्रिणीचे तिकिट काढले नाही, कारण ती तेव्हा लहान होती,पण बस कंडक्टर ती मोठी दिसत आहे,असे बोलून भांडण करायला लागला.तेव्हा तिच्या आईने तिची ढाल बनून त्याची बोलती बंद केली.तिने हा प्रसंग मला येऊन जेव्हा सांगितला, तेव्हा माझ्या तोंडातुन शब्द उद्गगारले, खरंच आई एक योद्धा असते,जी आपल्यासाठी कायम लढत असते.अगदी झाशीची राणी लक्ष्मीबाई.प्रत्येक संकटात आपले संरक्षण करत असते.जेव्हा आपल्याला जखमा होतात, तेव्हा आईच्या डोळ्यांतून अश्रू येतात.आपण भुकेले असले,तर आईही काही खात नाही.खरंच आई एक महान आत्मा असतो.जो सर्वांजवळ नसतो.ती आपल्यासाठी इतके काही करत असते,की आपण तिचे उपकार उभ्या जन्मात फेडु शकत नाही.लहानपणी तु प्रेमाने मला घास भरवायची, तेव्हा त्या जेवणाची चव यायची,पण आता स्वतः च्या हाताने खाण्यात मजाच नाही आणि त्याला चवही नाही.तुच दुर्गामातेच रुप,तुच वेळ आली की महाकालीचे रुप आणि तुच यशोदा माता.तुझे इतके विभिन्न रुप बघुन तुझे चरण स्पर्श करावेसे वाटतात.प्रत्येक नाते जसे एका मुलीचे,एका आईचे,भाऊ-बहिणीचे ती अगदी जाणीवपूर्वक जपत असते.माहित नाही ती इतक्या जबाबदाऱ्या कशी पार पाडत असते.
माझी दिदी, तिलाही एक छोटा मुलगा आहे.ती त्याच्या खाण्यापिण्यापासुन तर त्याच्या स्वच्छतेच्या बाबतीत सर्व काळजी घेते.एकदा तिच्या मुलाने असेच खेळता खेळता आतुन दरवाजा बंद करून घेतला.आम्ही सर्व बाहेर होतो.त्याने आतून दरवाज्याला कडी लावून घेतली हाती,पण त्याला ती उघडता येत नव्हती.त्यामुळे तो भसाभसा रडु लागला.आम्ही कडी तोडण्याचा प्रयत्न करत होतो.तो आतमध्ये रडत होता आणि बाहेर माझ्या दिदीच्या डोळ्यांत सुद्धा अश्रू होते.तो बाहेर येईपर्यंत ती अस्वस्थ होती.कारण तीसुद्धा एक आई होती.तिचा जीव फक्त आपल्या मुलांमध्ये अटकला होता. बऱ्याचवेळा त्याने हट्ट केला की,की दिदी त्याला मारते.पण तो रडत रडत परत तिच्याकडेच जातो.तो इतका छोटा असुनही त्याला माहित आहे की, आपल्याला कोणाच्या कुशीत सुरक्षितता भासते.असे भरपुर प्रसंग मी माझ्या डोळ्यांनी बघितले होते, ज्यावरुन माझ्या असे लक्षात आले की,आई ही किती मौल्यवान असते.आई हाच एक खरा दागिना आहे.आज ती माझ्याजवळ नाही,पण मला माहित आहे,ती कुठुन ना कुठुन तरी मला बघत आहे.ती शरिराने माझ्यासोबत नाही,पण माझ्या मनात कायम राहिल.
तशीच एक घटना मी बसमधून एकदा जाताना घडली.बसमध्ये सर्वजण जागा पकडण्यासाठी गेले.तशी मीही गेले, तेव्हा एका लेडिने मला त्या जागेवरून ढकलून दिले कारण तिला तिच्या मुलीसाठी ती जागा हवी होती.मी तिच्यासोबत भांडले नाही.माझ्या मनात असा विचार आला की,आई आपल्या मुलीसाठी काहीपण करु शकते.माझ्याजवळ तर आई नाही पण तिच्यासाठी तरी लढणारी तिची आई आहे,हे बघून आनंद झाला.तुम्हालाही तुमच्या आजुबाजुला अशा अनेक घटना दिसतील ज्यावरून आईचे आपल्यावरील प्रेम दिसुन येते.आई हा एक ईश्वराचाच अंश असतो,त्याला आपण कायम जपले पाहिजे नाहीतर तो आपल्या हातातून निसटून कायम दुर चालला जाईल.लहानपणी सकाळी लवकर उठून आपला डबा करुन, शाळेत जाण्याची तयारी करून देणारी ती आपली आईच असते.ते म्हणतात ना,
A mother's love will never end it is there from beginning to end