तुझी माझी यारी - 9 vidya,s world द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी यारी - 9

सरूच बोलणं ऐकून अंजली चे डोळे विस्पारतात .

अंजली :सरु तुला काय वेड लागलंय का ? खर बोलतेस ना तू ? की माझी गम्मत करत आहेस ?

सरु आता तोंड बारीक करून बोलते.

सरु : खरचं..

अंजली : पणं सरु ..तू मला एकदा ही बोलली नाहीस ? आणि कसली बेस्ट फ्रेन्ड बोलतेस ? अशीच असते का बेस्ट फ्रेन्ड ? छोट्या छोट्या गोष्टी साठी सुद्धा तुला मी आठवते आणि आता इतकी मोठी गोष्ट तू मला सांगितली नाहीस ? खरचं मला विश्वास च बसत नाही.

सरु : अंजली ..मी तुला सांगणार होते..

अंजली तिचं बोलण मध्येच तोडत विचारते ..

अंजली : कधी सांगणार होतीस ? अख्ख्या गावाला माहित झाल्यावर ?

सरु : तस्स नाही अंजली..

अंजली : मग कसं सरु ? काहीच नको सांगुस मला ..जेव्हा सांगायला हवं तेव्हा सांगितलं नाहीस आता कशाला सांगतेस ?

अस बोलत अंजली जायला वळते तेव्हा सरु तिला थांबवते ..

सरु : अंजली थांब ना ..ऐक तरी..

अंजली : सरु ..मुल चांगली नसतात ग..अजून तू लहान आहेस ..कशाला अस करतेस ? काय माहित तो सुदीप कसा आहे ? खर तरी प्रेम करतो की नाही ..तुझ्या वर की नाटक करत आहे ? सोड हे सर्व ...आता आपलं दहावीचं वर्ष आहे किती महत्वाचं आहे ते ...आणि तू काय हे असल करत बसलीस ?

सरु : अग सुदीप चांगले आहेत.. खरचं प्रेम करतात माझ्या वर आणि मी ही करते ..

अंजली : हो का ? मग बस घेऊन तुझ्या सुदीप ला मी चालले ..माझ्या सोबत अजिबात बोलू नकोस ..

अंजली पुढे सरु च काहीच ऐकुन न घेता तिथून निघून जाते .सरु तिला समजावण्याचा प्रयत्न करते पणं ती ऐकत नाही.जेवणाच्या सुट्टीत ही अंजली सरु सोबत बोलत नाही..घरी ही जाताना सरु ला सोडून च निघून जाते....इतर मैत्रिणी ना ही अंजली व सरु मध्ये काही तरी बिनसलं आहे याची चाहूल लागते ..काही जणी खुश ही होतात ..अंजली व सरु ची मैत्री तुटली म्हणून..

आज चार दिवस झाले होते ..अंजली सरु सोबत बोलत नव्हती ...सरु खूप उदास होती...अंजली ला ही सरु सोबत बोलू वाटत होत पण तरी ही आपल्या बोलण्यावर आडून बसली होती ...निशा ने अंजली ला विचारल..

निशा : अंजली काय झालं तू सरु सोबत बोलत नाहीस ?

अंजली ने नजर चोरत च सांगितलं ..

अंजली : कुठे काय ? बोलते ना ..

निशा : खोट नको बोलू ..चार दिवस झालं मी पाहते तू बोलत नाही तिच्या सोबत बिचारी किती उदास आहे काय झालंय सांग ना अंजली ?

अंजली : अग काही नाही ती बघ ना अजिबात अभ्यास करत नाही...या टेस्ट मध्ये ती सर्व विषयात काठा वर पास आहे..अजिबात लक्ष देत नाही अभ्यासात ..म्हणून ..म्हणून च मी बोलत नाही..

निशा ला अंजली च बोलणं खरच वाटत..

निशा : जाऊ दे ना अंजली अग नसेल तिचं डोक चालत अभ्यासात तर काय करावं तिने बिचारी ने ?

अंजली हळू आवाजात बडबडते ..नाही तिथे बर चालत डोकं तिचं ?

निशा : काही बोललीस का ?

निशा ला तिचं बोलणं ऐकू येत नाही म्हणून ती विचारते..

अंजली : नाही तर कुठे काय ?बर बघू ती नीट अभ्यास करेल तर मी बोलेन तिच्या सोबत ..तू सोड तो विषय ..चल पाणी पिऊन येऊ ..

मग निशा ही शांत होते व अंजली सोबत पाण्याच्या टाकी कडे पाणी पियायला जाते.तिथेच बागेत सरु असते ती अंजली ला पाहून तिच्या कडे येते.

सरु : अंजली मला तुझ्या सोबत बोलायचं आहे चल ना..

अंजली :आपण परत बोलू सरु ..मला अभ्यास आहे आता..

त्या दोघींच्या मध्ये आता निशा पडते..

निशा : अंजली ती इतकी बोलतेय तर बोल ना तिच्या सोबत ..अस का वागतेस ?तू तर अजिबात अशी नाहीस ?

अंजली ला तर आता काय बोलावं तेच कळत नाही मग ती ही सरु ला चल बोलते ..मग सरु व अंजली दोघी बागेत येतात.

अंजली : हा बोल लवकर..

सरु : अंजली सॉरी ना...मला माहित आहे ..मी तुझा विश्वास तोडला आहे..तुला सांगितलं नाही ..चुकलं माझं ..पणं तू आपली मैत्री अशी तोडू नकोस..तुझ्या पेक्षा जास्त मला कोणीच जवळच नाही...ते सुदीप ही नाहीत..तुला नसेल आवडत तरी मी नाही बोलणार त्या सुदीप ना आणि भेटणार ही नाही..मला सुदीप नको तू हवी..आपली मैत्री हवी..

अंजली : खरं च ना ?तू नाही बोलणार ना त्या सुदीप सोबत ?

सरु : हो तुझी शप्पथ...कोण्या सुदीप मुळे मला आपली मैत्री नाही तोडायची...अंजली माझ्या साठी तूच माझं सर्व काही आहेस.. बघ ना..तू बोलत नाहीस ..तर मला काहीच चांगलं वाटतं नाही..

सरु च बोलणं ऐकून अंजली खुश होते व सरु ला मिठी मारते..

अंजली : सरु मला सुद्धा तुझ्या शिवाय अजिबात करमल नाही..मला ही बोलू वाटत होत ..पणं तू खरच त्या सुदीप सोबत बोलणार नाहीस ना ?

सरु : अंजली मी तुझी खोटी शप्पथ घेईन का कधी ? आता तुझी शपथ घेऊन सांगितलं ना..

अंजली व सरु पुन्हा एक होतात ..दोघी पुन्हा बोलू लागतात..सरु जरी बोलणार नाही अस म्हणाली तरी सरु थोडी उदास आहे हे अंजली ने ओळखलं होत.

सरु ने अंजली ला प्रॉमिस केल्या प्रमाणे सुदीप सोबत बोलणं बंद केलं पणं आता सरु थोडी उदास असायची.. सुदीप ने सरु सोबत बोलाय चा प्रयत्न केला पण सरु बोलली नाही ..तिच्या साठी सुदीप पेक्षा जास्त महत्वाची अंजली होती ..तिची मैत्री होती.

एक दिवस सुट्टी दिवशी अंजली सरु च्या घरी न जाता पूजा च्या घरी जाते . पूजा अंजली ला पाहून खुश होते . थोड्या वेळ बसून गप्पा मारतात दोघी व नंतर अंजली पूजा ला सरळच सुदीप बद्दल विचारते .

अंजलीः पूजा .. ते मला त्या सुदीप ला पाहायच आहे दाखव ना कुठे आहे त्याच घर ?

पूजाः अग इथेच आहे . . आमच्या घराच्या बाजूची चार घर सोडून चल मी तुला दाखवते तो बाहेर असेल तर दिसेल ...

अस बोलत पूजा अंजली ला घेऊन घरा बाहेर येते..पूजाच्या घरा पासून चार घर सोडून सुदीप च घर होत ..घर तस्स चांगलं होत ..घरा समोर कट्टा होता..त्यावर एक मुलगा बसला होता हातात एक पुस्तक घेऊन..त्याला पाहून पूजा बोलली..

पूजा : अरे वा बघ ..आता तो बाहेर च बसला आहे ..पूजा बोट करून एका मुला कडे दाखवत बोलते..तो बघ तो बसला आहे ना तोच सुदीप आहे..ती बोट करून दाखवत असते तेव्हा अंजली पूजाचा हात पटकन खाली घेते..

अंजली : अग त्याच्या कडे हात करून कशाला दाखवत आहेस ? कोणी पाहिलं तर काय विचार करतील ?

पूजा : सॉरी ..सॉरी ..माझ्या लक्षात च आल नाही..

अंजली त्या कट्यावर च्या मुला ला थोड निरखून पाहत बोलते....

अंजली : हम्म ...तसा दिसतो तर चांगला च आहे पणं कोणाचा काय भरोसा ? माणसाच्या चेहऱ्यावर जाऊ नये फक्त ...पूजा काय करतो तो ?

पूजा : तो कॉलेज ला आहे..

अंजली : तू ओळखते ना त्याला ? कसा आहे ग ? म्हणजे तुला माहीत असेल ना ?

पूजा : अग तसा तो चांगला आहे ..सरु सारखाच शांत स्वभावाचा आहे म्हणूनच जमलं असेल त्याचं ..

तिच्या बोलण्यावर अंजली तिच्या कडे थोड रागात पहाते..

पूजा : सॉरी ...

पूजा आपली जीभ चावत बोलते..अंजली मग आपल्या घरी जायला वळते.

अंजली : पूजा मी तुझ्या कडे आले होते हे सरू ला नको सांगू बर का..

पूजा : हो ग नाही सांगत ..

अंजली मग घरी निघून जाते.

क्रमशः