एक रहस्य आणखी.. - भाग 1 Nikhil Deore द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक रहस्य आणखी.. - भाग 1

रेवती रक्ताळल्या डोळ्यांनी समोर येत होती... हातात असलेला धारदार चाकू विजेसारखा लख्ख चमकू लागला होता...रोहनच्या कानात कुठूनतरी जोरदार नगाड्यांचा आवाज घुमत होता..वाऱ्यांचा सन.. सन आवाजही आता त्याला स्पष्ट ऐकू येत होता जणू तो काही सांगत आहे असेच त्याला भासत होते.. मृत्त्यू त्याच्या काही पावलांवरच येऊन ठेपला आहे हे त्याला कळून चुकले होते. अचानक रेड्यांचा कर्कश आवाज त्याच्या कानी पडला जणू काही यमराज अगदी जवळ आले आहे असे त्याला वाटू लागले. रेवती अगदी दोन पावलांवरच येऊन उभी राहिली होती. विजेसारखा धारदार चाकू त्याला मारण्यासाठी वर उचलला गेला.. रोहनने डोळे मिटून "देवा या संकातूनही वाचव रे" असे म्हणून देवाचा धावा सुरु केला आणि क्षणार्धांतच काही महिन्याचे कालचक्र त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले.

"दाटले रेशमी आहे धुके धुके " रोहनच्या मोबाईल चा अलार्म खणाणला.अरेच्या ! सकाळचे 9 वाजले होते. रेवती चे 27 whatss app msg त्याला दिसले. " शेट आज परत late होणार मी " असे तो स्वतःशीच म्हणून पटापट fresh व्हायला सुरवात केली. रोहन हा B.com च्या final year ला असणारा, उंचीने साडेपाच फूट, दिसायला गोरा, well treamed beard, अतिशय attractive hair style, perfect jawline असणारा हँडसम hunk होता. पांढऱ्या चेक्स चा शर्ट त्यावर नेव्ही ब्लु पॅन्ट, जेल लावून वेल सेट केलेले केस आणि mild purfume मारून तो रेवती ला भेटायला निघाला.

" किती उशीर रे ! केव्हापासून मी तुझी वाट बघतेय " रेवती म्हणाली.
रेवती ही पाच फूट उंचीची, दिसायला अतिशय गोरीपान, काळेशार मृगनैनिचे डोळे, अतिशय दाट आणि लांब केस, हनुवटीवर बारीकसा तीळ आणि dimple girl म्हणून B.com second year ला प्रसिद्ध होती. या दोंघाचे सूत जवळपास एका वर्षाआधी जुळले जेव्हा रेवती ही b.com first year la freshers होती.
" मी काय म्हणतेय किती उशीर ! किती वेळची वाट पाहतेय मी " रेवती चिडून म्हणते.
" अरे काय सांगू यार बस एवढंच म्हणेन "मेरे जागनेसे पहले हाय रे मेरी किस्मत सो जाती है. मै देर करता नही देर हो जाती है". रोहन हसून म्हणतो आणि दोघेही हसू लागतात.
" माहित आहे ना आज आपल्याला long drive वर जायचंय म्हणून "
" अरे हो बाबा माहित आहे. हे कस विसरेण मी ".
"मग कुठं जायचंय आहे ".
"आज आपण जाऊ रेवणगढ गार्डन त्याच्याच बाजूला आरक्षित जंगल (reserved forest) पण आहे तिथे आपल्याला भरपूर एकांत मिळेल ".
"Hmm निघूया का मग आपण? "
" हो नक्कीच "
रेवती रोहनच्या कार मध्ये बसते आणि प्रवासाला सुरवात होते.
" सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का " ऐ रेवती हे गाणं तू ऐकलंय का? ".
" मी नाही ऐकत असले जुनाट गाणे. नवीन असेल तर सांग ".
" अरे ऐक तर खूप खोल अर्थ आहे ह्या गाण्याचा आणि यात एक कडव तर खूप खूप आवडते मला ".
"कुठलं कडव आहे रे ? "
"आता ते मी नाही सांगणार तूच ऐक ते गाणं "
" मग जाऊ दे मला नाही ऐकायचं "
" By the way जाऊ दे आज खूप सुंदर दिसत आहेस तू".
"Thankx for the compliment "
एवढ्यात रोहन जोरात ब्रेक मारतो. गाडीसमोर कोणीतरी अतिशय विचित्र दिसणारा माणूस उभा असतो.
"ऐ चल हो बाजूला तुला मरायला माझीच गाडी दिसली का नालायक कुठला".रोहन ओरडतो.
तो माणूस काहीच बोलत नाही फक्त एका तिरक्या नजरेनी त्या दोघांकडे बघतो. त्याची ती भयानक नजर पाहून रेवती म्हणते
"ऐ चल plzzzz आपण लवकर येथून निघूया मला खूप भीती वाटत आहे".
" अरे रिलॅक्स डिअर ! तो माणूस गेलाय इथून ".
गाडी भरघाव वेगाने पडत असते आणि शेवटी रेवणगढ गार्डनला येऊन पोहचते. रोहन आणि रेवती फिरायला निघतात. गार्डन मध्ये अतिशय प्रसन्न वातावरण होते. सगळीकडे गुलाबी, पिवळ्या रंगाची फुले होती, गार्डनच्या डाव्या बाजूला अतिशय सुंदर पणे cactus ची लागवड केली होती. गार्डन च्या मध्यभागी लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झुले लावलेले होते, गार्डनच्या शेवटच्या point ला विस्तीर्ण धबधबा होता तिथेच मोठ्या प्रमाणावर प्रेमी जोडपे बसलेले होते.
रोहन एक गुलाबाच फुल तोडतो आणि गुडघ्यावर बसून रेवती ला देण्याचा प्रयत्न करतो.
" हे काय आहे नवीन नाटक? "
" अरे एका 45 किलोच्या गुलाबाला 4 ग्रॅम चा गुलाब देत आहे ".
" असले फिल्मी डायलॉग माझ्यावर काम नाही करत. हा डायलॉग i guess बेंगाल टायगर रवी तेजाच्या मूवी मधला आहे बरोबर ना".
" बापरे मूवी पाहण्यात तर माझ्याही पुढे दिसतेस ".
" मग ते तर आहेच "
रोहन आणि रेवती काही वेळ गार्डन मध्ये फिरतात, धबधब्याजवळ बसतात आणि एकांतासाठी बाजूच्याच आरक्षित जंगलाकडे (reserved forest) कडे जायला निघतात. आरक्षित जंगलामध्ये आल्यावर त्यांना जाणवते कि तिथे खूप कमी लोक आहेत. फक्त काही काही जागेवरच लोक आहेत जजे आरक्षित जंगल पाहायला आले आहेत.
" किती छान आहे ना हे जंगल. इथे कोणीच नाही फक्त तू आणि मी ".रोहन प्रेमाने म्हणतो
" पण आपण इथे आलोय तरी कशाला? ".
"असंच एकांतासाठी. wait a minute हे काय आहे? "
रोहन आणि रेवती समोर पाहतात तर काय तिथे एक खूप मोठा दगड असतो त्यावर पूर्णतः शेंदूर फासलेले असतात, त्याच्यावर हळदीकुंकू लावलेले असतात, बाजूलाच लिंबु मिरच्या आणि बाहुल्या ठेवलेल्या असतात. काही हाडेही तिथेच ठेवलेली असतात. रोहन तो दगड तेथून हलवून बाजूला ठेवायला जातो.
" अरे रोहन हा काहीतरी विचित्र प्रकार वाटतो. माझी आई म्हणते अश्या गोष्टीला हात नाही लावायचा म्हणून. चल लवकरच इथून"
" अरे आज लोक चंद्रावर चाललित आणि भारतात अजूनही लोक अश्या गोष्टीवर विश्वास करतात" असे म्हणत रोहन तो दगड तेथून हलवून फेकून देतो.
" घोर पाप केलंय तू. तुझा कर्दनकाळ आता जवळ आला आहे. तुझ्या पापांची शिक्षा भोगायला आता तयार राहा ". हे शब्द रोहनच्या कानावर पडतात आणि त्याच्या समोर भगवा वस्त्र धारण केलेले, पांढरी अतिशय लांब वाढलेली दाढी, गळ्यात रुद्राक्षाची माळ, खोल आत गेलेले डोळे असलेले साधू त्याला दिसतात.
" मी नाही मानत असल्या गोष्टींना " रोहन म्हणतो
" मान किंवा नको मानू पण तू जे केलंय त्याची शिक्षा भोगायला तयार राहा याची शिक्षा नक्कीच तुला मिळणार आहे".
" अश्या गोष्टींमुळेच भारत मागे आहे. मी नाही मानत असल्या गोष्टींना ".

दुसऱ्या दिवशी

" अरे रोहन तुझे डोळे एवढे सुजल्यासारखे का दिसत आहे आणि चेहरा ही निस्तेज दिसत आहे. रात्री झोप नाही झाली का?". रेवती विचारते
"नाही "
" का पण"
"काल रात्री मी खूप भयानक काहीतरी पाहिलंय. खूप विचित्र होत ते. काय होत कोण होत नाही माहित पण फार भयानक होत ते. कुणाचातरी अस्तित्व मी काल रात्री अनुभवलय ".

पुढची कथा दुसऱ्या भागात
- निखिल देवरे