दि लॉस्ट पेंटिंग Prathamesh Dahale द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दि लॉस्ट पेंटिंग

...............................................................
प्रस्तावना :- ही एक सायकॉलॉजीकल , क्राईम , ड्रामा , सस्पेन्स , थ्रिलर अशी कथा आहे , यात सर्व घटना , व्यक्ती काल्पनिक आहेत , जर काही संबंध आढळून आला तर निव्वळ योगायोग समजावा. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे असतील.
................................................................

दि लॉस्ट पेंटिंग
........................................................................

एका प्रशस्त बंगल्यासमोर लोकांची गर्लेली होती..पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या...काही पोलीस बाहेर तैनात होते...बंगल्याच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचे बॅरिकेड लावून मध्ये कोणालाही जाऊ देण्यात येत नव्हते...जमलेले लोक गेटबाहेर उभे राहुन मध्ये काय चालू आहे ते चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवत बघत होते. तेवढ्यात तिथे एक कार येऊन थांबली.. तसा एक पोलीस हवालदार पळत गाडीजवळ पोहोचला आणि त्याने गाडीचे दार उघडले. गाडीतून सुटबुटातील एक व्यक्ती आत शिरली , त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. ती व्यक्ती आत शिरताच पोलीस इन्स्पेक्टर गजानन साळवी लगबगीने त्या व्यक्तीजवळ आले...आणि त्या व्यक्तीला मध्ये घेऊन जाऊ लागले.
" सर , संचित शर्मा यांच्या डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात आले आहे , त्यांच्या डोक्यावर वार केल्याच्या जखमा आहेत , बोटांचे ठसे तपासण्याचे काम सुरू आहे आणि घरात हे एकटेच राहत असल्याने कोणी काही पाहिले किंवा ऐकले असण्याचीही शक्यता नाही " इन्स्पेक्टर गजानन साळवी त्या व्यक्तीला सांगत होते..मात्र त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर अत्यंत गंभीर आणि दुःखद भाव दिसत होते.साळवी त्याला आता घेऊन गेले...आतील खोलीत एका साधारण 35 - 40 वर्षांच्या सुप्रसिद्ध चित्रकार संचित शर्मा यांची डेडबॉडी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली...आजूबाजूला अनेक पेंटिंग लावलेल्या होत्या...त्यांच्या टेबलवरील सर्व सामान अत्याव्यस्त होते. संपूर्ण रूम मध्ये ड्रॉइंगचे सामान सोडले तर काही विशेष नव्हते. साळवींसोबत आलेला गुप्तहेर जयंत नवले खाली वाकून बॉडी कडे पाहू लागला...डोक्यावर वार केल्याच्या खुणा , हातावरही काही जखमेच्या खुणा दिसत होत्या..शरीरावर इतर कुठेही जखमा नव्हत्या...बॉडीकडे बघत असतानाच जयंतच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले..साळवेंनी ते पाहिले तसे त्यांनी जयंतच्या पाठीवर हात ठेवला..जयंत डोळ्यातून येणारे अश्रू थांबवण्याचा प्रयन्त करत होता , मात्र इतक्या जवळचा मित्र गेल्याचे त्याला प्रचंड दुःख झाले होते.
" मी समजू शकतो , जयंत सर....इतका जवळचा मित्र गेल्याचे आपल्याला दुःख होत आहे , मात्र यावेळी आपल्याला खुन्याला शोधणे जास्त गरजेचे आहे " साळवे त्याचे सांत्वन करत म्हणाले.
" सॉरी सर " जयंत डोळे पुसत म्हणाला.
" इट्स ओके " साळवे म्हणाला.
जयंत उठून उभा राहिला , त्याला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचे होते मात्र त्याला शर्माच्या बॉडी कडे पाहुन पुन्हा भरून आले. तो ताबडतोब बाहेर आला आणि बंगल्याच्या बाजूला असलेल्या छोट्याशा गार्डन मध्ये येऊन कोपऱ्यात उभा राहिला. जयंत बाहेर येताच साळवे इतर पोलिसांना कामे समजावून जयंत जवळ आले...जयंतचे मात्र त्यांच्याकडे लक्ष नव्हते..कुठेतरी शून्यात नजर लावून जयंत डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून देत होता. साळवे आजूबाजूकडे बघत होता..समोर छानशी रोपटी , फुलझाडी लावलेली आणि त्यासमोर एक टेबल आणि दोन आरामदायक खुर्च्या...बराच वेळ कोणी काहीही बोलले नाही. साळवे मात्र पुढील तपास कसा करता येईल याच्या विचारात गुंतला.
" इथेच , इथेच आम्ही दोघे गप्पा मारत बसायचो , दोन दिवसांपूर्वीच भेटलो होतो त्याला..." जयंत समोर असलेल्या खुर्चीकडे हात करत बोलला..त्याच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू टपकले. मात्र पुन्हा डोळे पुसत त्याने साळवे कडे पाहिले.
" हे बघा साळवे , मला नाही वाटत मी या केस मध्ये तुम्हाला काही मदत करु शकेन , या साठी माझे मन तयार नाही , स्वतःच्या मित्राच्या हत्येचा तपास करणे मला शक्य नाही " जयंतनी आपली मानसिक तयारी नसल्याचे सांगून टाकले.मात्र जयंतने नकार देताच साळवेचा चेहरा उतरला.
" नाही...नाही असे म्हणू नका सर , मी तुमची परिस्थिती समजू शकतो , पण या केस मध्ये मला तुमची मदत हवी आहे , ही केस दिसते तेवढी सोपी नाही , आणि हायप्रोफाइल केस आहे म्हटल्यावर जनता , मीडिया या सर्वांचेच दडपण असणार , त्यामुळे ही केस लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे , आणि तुम्ही याआधीच्या केसेस कश्या सोडवल्या आहेत हे मी जाणून आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी मदत मागत आहे , त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या केसमध्ये मला मदत करा..." साळवे जयंतला विनवणी करत म्हणाला. जयंत काहीच न बोलता विचारात गुंगला.
" ठीक आहे साळवे. पण मला थोडा वेळ हवा आहे , मी सध्या तरी काही करण्याच्या स्थितीत नाही , तुम्ही तपास चालू ठेवा. तुम्हाला जर काही मदत लागलीच तर मला कॉल करू शकता. येतो मी. " जयंत जड आवाजात म्हणाला आणि निघून गेला. इकडे साळवेंची मात्र निराशा झाली , ते हताश झाले.
इकडे जयंत आपल्या घरी आला , फ्रेश होऊन आपल्या खोलीत आला. आणि त्याच्या टेबलच्या ड्रॉवर मधून एक अल्बम काढला..आणि शेजारी असलेल्या खुर्चीवर बसून अल्बम बघू लागला. त्यात त्याचे आणि त्याच्या मित्रांचे फोटो पाहू लागला. एका फोटोत संचित बरोबरचे फोटो पाहून त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले आणि तो भूतकाळातील आठवणीत रमला.
त्याला संचित सोबतच्या भेटीची पहिली वेळ आठवली..

(भूतकाळात - जवळपास 5 वर्षांपूर्वी)
------------------------------------------------------------
संचित ने एक पेंटिंग वरून पडदा काढला. समोर उभा असलेला जयंत आणि त्याचा मित्र सागर डोळे फाडून बघतच उभे राहिले.
" वा , काय पेंटिंग आहे....! " जयंतच्या तोंडातून पेंटिंग बघताच शब्द फुटले.
" खरच ही पेंटिंग तर अप्रतिम आहे " जयंतचा मित्र सागर पेंटिंगची स्तुती करत म्हणाला.
जयंत ती पेंटिंग न्याहाळू लागला...एक डोंगर , त्याखाली नदी , आणि सर्व बाजूने हिरवीगार झाडे. बघताच असे वाटत होते जसे काय हे आपल्या समोरच आहे..अगदी खरे भासणाऱ्या त्या पेंटिंगमध्ये जयंत हरवून गेला.
" हीच पेंटिंग मला हवी आहे , किंमत जी बोलाल ती देईल मात्र ही पेंटिंग फक्त मलाच पाहिजे." जयंतला पेंटिंग फारच आवडली.
" अजूनही काही पेंटिंग आहेत , त्या तुम्ही बघू शकता." संचित इतर पेंटिंग कडे हात दाखवत बोलला. जयंतला पहिली पेंटिंग प्रचंड आवडली होती.त्यावरून त्याची नजर हटत नव्हती.
" नाही , मला हीच पेटिंग हवी आहे , मी लागेल ती किंमत द्यायला तयार आहे " जयंत म्हणाला.
" ठीक आहे , ही पेंटिंग तुमची..! " संचित म्हणाला. जयंतच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
" तुम्ही या , बाहेर हॉल मध्ये बसा मी आलोच " संचित असे बोलून निघून गेला.
जयंत आणि सागर हॉल मधे येऊन बसले. सागर घरावरून नजर फिरवत होता.
" यार , तू मला या पेंटर कडे पाहिले का नाही घेऊन आला ? आजपर्यंत एवढ्या पेंटिंग पाहिल्या पण अशी पेंटिंग कुठेच पाहिली नाही.! " जयंत सागरला म्हणाले
" अरे , तुला याच पेंटरकडे घेऊन येणार होतो , मात्र हा होता दिल्लीला कालच मुंबईला आलाय. म्हणून तुला आज लगेच घेऊन आलो. " सागर म्हणाला..तेवढ्यात संचित हातात ट्रे मधे कॉफी घेऊन आला..ट्रे टेबल वर ठेवत सोफ्यावर जयंत समोर बसला.
" घ्या कॉफी घ्या. " संचित चेहऱ्यावर स्मित करत जयंत आणि सागरला म्हणाला.
" खरंच , तुमचं कौतुक कराव तेवढं कमी आहे , एवढी सुंदर पेंटिंग मी आजपर्यंत नाही पहिली. " जयंत संचितचे कौतुक करत म्हणाला.
" धन्यवाद , आपल्याला माझी पेंटिंग आवडली हे बघुन आनंद झाला." संचित पुन्हा स्मित करत म्हणाला.
" खरे तर मला पेंटिंग बद्दल फार काही कळत नाही , मात्र मला पेंटिंग बघायला फार आवडतात , आणि म्हणूनच मी माझ्या घरात लावता यावी यासाठी पेंटिंग शोधत होतो. आणि सागरला पेंटर्सची माहिती असल्याने मी त्याची मदत घ्यायची ठरवले...पण तुमच्याकडे यायला उशीर केला असे वाटत आहे." जयंत हसत म्हणाला.
" सध्या मी दिल्लीत होतो , कालच मुंबईला परतलो , त्यामुळे मी सागरला आता भेटू शकत नाही अस सांगितलं " संचित बोलला.
" चला तर मग , मी येतो , मला महत्वाचे काम आहे , पेंटिंगबद्दल तुम्ही सागरशी बोलून घ्या " कॉफी संपवून जयंत जाण्यास उठला.
" हो , तुम्हाला भेटून आनंद झाला , पुन्हा नक्की या " संचित जयंतशी हातमिळवणी करत म्हणाला.
" हो , तुमच्यासारख्या थोर कलावंताला भेटणे माझ्यासाठी भाग्यवान आहे , चला येतो." जयंत बोलून निघून गेला.
----------------------------------------------------------------
संचित सोबतची पहिली भेट आठवून जयंतच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यानंतर संचित आणि जयंतची अनेक वेळा भेट झाली. त्यांची मैत्री घट्ट झाली होती...आणि आता इतक्या जवळच्या मित्राला आपण गमावले आहे हे त्याला पचण्यासारखे नव्हते. जयंतने अल्बम बंद केला. आणि डोळे पुसून उठला. आणि इन्स्पेक्टर साळवेंना फोन लावला.
" हॅलो साळवे , काही नवीन माहिती ? " जयंतने केस संबंधित साळवेंना विचारले.
" सर तपास सुरू आहे , बॉडी पोस्टमार्टेम ला
पाठवली आहे , कॉल डिटेल्सही मागवल्या आहेत. याव्यतिरिक्त विशेष काही नाही " साळवेंनी माहिती पुरवली.
" ठीक आहे , जर काही कळाल तर मला इंफॉर्म करा , मी उद्या तुम्हाला भेटतो. " जयंत म्हणाला.
" ठीक आहे सर , मी कळवतो." साळवे म्हणाले.
" हम्म " म्हणत जयंत ने फोन ठेवला. आणि विचारात गुंतला. संचितचे वागणे अगदी साधे होते , आपण आणि आपले काम भले असा तो होता..पण त्याचा कुणी खून का करेल हे त्याला काही जयंतला समजत नव्हते.

दुसरा दिवस

साळवे आपल्या पोलीस चौकीच्या केबिनमध्ये जयंतची वाट बघत बसले होते. तेवढ्यात एक हवालदार आत आला.
" साहेब , आपल्याला भेटायला कोणी जयंत नवले आले आहेत." हवालदाराने माहिती पुरवली.
पाठवून द्या अशी खुण साळवेंनी हवालदाराला केली.
काही वेळाने जयंत आत आला. जयंत येताच साळवे उठून उभे राहिले. मात्र जयंत ने हातानेच त्यांना बसण्याची खुण केली.
" बोला साळवे , काय माहिती ? " जयंतने खुर्चीत बसत साळवेंना विचारणा केली.
" हे कॉल डिटेल्स आहेत , यात घरच्या लोकांचे सोडले आणि तुमचे कॉल्स सोडले तर बाकी कुणाचे जास्त कॉल्स नाहीत " साळवें टेबलावरील फाईल जयंतला दाखवत म्हणाले.
" हम्म. यात माझे आणि बाकीच्या मित्रांचे कॉल आहेत , आणि बाकीचे घरच्यांचेच असतील , कारण संचित फक्त कामासाठीच कॉल करायचा. " जयंत म्हणाला.
" हम्म. आणि जे उरलेले कॉल आहेत ते काही मोठ्या पेंटर्सचे आणि काही पेंटिंग खरेदी करणाऱ्याचे आहेत. त्या नंबर्सवर कॉल करून कंम्फर्म केले आहे. " साळवेंनी माहिती पुरवली.
" आणि पोस्टमार्टेम ? " जयंतनी साळवेंना प्रश्न केला.
" रिपोर्ट आज संध्याकाळ पर्यंत मिळणार आहेत , फिंगरप्रिंटस चे रिपोर्ट ही आज मिळतील. " साळवेंनी माहिती पुरवली.
" आणि क्राईम स्पॉट ला काही कल्यू ? काही संशयास्पद आढळले ? " जयंतने विचारले.
" संपूर्ण घरात तपास केला मात्र काही आढळले नाही. " साळवेंनी सांगितले.
" बाहेर कोणी कोणाला पाहिले ? कोणी संशयास्पद व्यक्ती किंवा इतर काही ? " जयंतने काहीतरी कल्यू मिळेल म्हणून प्रयत्न केला.
" नाही , आजूबाजूला सगळीकडे झाडझुडपेच आहेत , शेजारी राहणारे कोणी नाही हे आपल्याला माहीतच असेल." साळवे शांतपणे म्हणाला.
" हो माहीत आहे , पण तरीही त्याबाजुने तपास करायलाच हवा." जयंत म्हणाला.
" साळवे , मी तुमच्या बरोबर काम करतोय हे सर्वांना माहितीये ? " जयंत ने शंका विचारली.
" हो , मोठ्या साहेबांनी होकार दिला आहे , आणि मीडियाला सुद्धा समजले आहे की , तुम्ही पोलिसांसोबत काम करणार आहात." साळवेंनी स्पष्ट केले.
" ठीक आहे , आता आपण संचित च्या घरी जाऊया , आपल्याला नक्कीच काहीतरी कल्यू मिळेल. आणि जोपर्यंत मी माझ्या मित्राच्या मारेकऱ्याला शोधत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. " जयंत दुःखी होत मात्र आत्मविश्वासाने म्हणाला. दोघेही उठून क्राईम स्पॉटकडे निघाले.
साळवें पोलीस गाडीने आणि जयंत त्याच्या फोर व्हीलरने संचित च्या घरी आले. बाहेर मीडिया वाल्यांने गर्दी केलेली होती. साळवें आणि जयंत गाडीतून उतरताच मीडियाने त्यांना घेरले. साळवें आणि जयंत पुढे चालले होते मात्र मिडियावाल्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
" या केस साठी डिटेक्टिव्ह ची का निवड केली गेली आहे ? पोलीस यंत्रणा कमी पडते आहे का ? एवढ्या मोठ्या कलाकाराची दिवसा ढवळ्या हत्या होते , तर सामान्य नागरिक सुरक्षित कसे ? " असे अनेक प्रश्न विचारले जात होते. मात्र जयंत आणि साळवें एकही प्रश्नाला उत्तर न देता घरात शिरले. हॉल मध्ये शिरताच जयंत इकडून तिकडे नजर फिरवू लागला. हॉल मध्ये देखील काही पेंटिंग्स लावलेल्या होत्या...इतर सर्व सामान व्यवस्थित लावलेले होते..साळवें ड्रॉइंग रूममध्ये गेला , जयंत त्याच्या पाठीमागून आला. टेबलावरील अत्याव्यस्त समान तसेच होते. जयंत टेबलावरील सामान पाहू लागला. सगळे पेंटिंग कलर्स , आणि पेंटिंग चे सामान होते , टेबलच्या समोरच्या बाजूला एक मोठी पेंटिंग अर्धवट अवस्थेत लावलेली होती. कदाचित मृत्यूआधी संचित याच पेंटिंगवर काम करत असावा. जयंत हातात ग्लोव्स घालून पेंटिंगच्या सामानात काही मिळते का ते पाहू लागला. साळवेही त्या अर्धवट पेंटिंगच्या आजूबाजूला काही मिळते का पाहू लागले.
जयंत प्रत्येक गोष्ट बारीक निरखून बघत होता. जयंतने बाजूच्या ड्रॉवर मध्ये काही मिळते का पाहिले. मात्र त्याला त्यामध्येही ड्रॉइंग मटेरिअल शिवाय दुसरे काही सापडले नाही. शेवटी काहीच न मिळाल्याने साळवे आणि जयंत बाहेर आले. बाहेर आल्यावर जयंत ने आजूबाजूला नजर फिरवली. घरच्या प्रवेशाचा भाग सोडला तर बाकी सर्व भाग झडाझुडपांनी व्याप्त होता , यामुळे खुन्याला कोणी बघितले असण्याची शक्यता नव्हतीच , हे जयंतच्या लक्षात आले.
बाहेर येताच त्यांचा पुन्हा मीडियाने रस्ता अडवला. आता मात्र जयंत मिडियापुढे सरसावला. साळवे देखील मिडियासमोर सरसावला.
" या केससाठी पोलिसांनी आपल्याला निवडले आहे , तर आपण या केसकडे कसे बघता ? आणि आपली या केसमध्ये काय भूमिका असणार आहे? " एका रिपोर्टरने जयंतला प्रश्न केला.
" जस आपल्या सर्वांना माहीतच आहे की , चित्रकार संचित शर्मा हे माझे जवळचे मित्र होते. आणि त्यांच्या जाण्याने मला आणि सर्व कलाप्रेमींना दुःख झाले आहे. तरी मी मित्र आणि डिटेक्टिव्ह या दोन्ही नात्याने पोलिसांना शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. " जयंतने उत्तर दिले.
" तपास कुठं पर्यंत आला आहे , काय सांगाल." दुसऱ्या पत्रकाराने साळवें ना प्रश्न केला.
" आमचा तपास सुरू आहे , आणि आम्ही ह्या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावू असा आम्हाला विश्वास आहे." साळवें नि उत्तर दिले.
इतर पत्रकार प्रश्न विचारू लागले. मात्र जयंत न थांबता पुढे आपली गाडीजवळ गेला. त्यापाठोपाठ साळवे ही आले.
गाडीजवळ उभा राहून जयंत पुढे कसा तपास करायचा याचा विचार करत होता.
" आता पुढे काय , साळवे." जयंतने साळवें ना तपासाची दिशा विचारली.
" सध्या तरी अपलयाकडे काही पुरावा नाही. त्यामुळे सध्या तरी आपल्याला काही करता येणार नाही.. जेव्हा पोस्टमार्टेम आणि फिंगर प्रिंट्स रिपोर्ट येतील तेव्हाच काय ते कळेल. " साळवे म्हणाला.
" हम्म , बरोबर आहे तुमचं. " जयंत म्हणाला.
" चला , मी येतो साळवे , रिपोर्ट्स आले की मला कळवा." साळवें ना सांगूंन जयंत त्याच्या गाडीत बसला आणि निघाला. साळवें मात्र त्याच्या गाडीकडे बघत विचार करत होता. आणि नंतर तो ही निघून गेला.
इकडे जयंत आपल्या घरी आला. आपल्या रूम मध्ये जाऊन केस बद्दल विचार करू लागला. विचार करता करता त्याने आपला मोबाइल हातात घेतला. आणि कोणालातरी कॉल केला.
" हॅलो सागर " जयंत बोलला.
" हॅलो जयंत , बोल " पलीकडून सागर बोलला.
" अ...तुला संचित बद्दल तर कळलेच असेल. " जयंत बोलला.
" हो , कळलं..खूप वाईट झालं." सागर पलीकडून जड अंतकरणाने बोलला.
" आणि मी असही ऐकलं की तू या केसचा तपस करतोय ? " सागर म्हणाला.
" हो , मी डिटेक्टिव्ह (गुप्तहेर) म्हणून काम करतोय. आणि मला यात तुझी मदत हवी आहे. " जयंतने मुद्द्याला हात घातला.
" बोल ना , काय मदत पाहिजे , संचित च्या खुन्याला शोधण्यासाठी लागेल ती मदत करेन." सागर म्हणाला.
" मला संचित बद्दल महिती हवी आहे , संचितचे कुणासोबत वाद होते का ? एखाद्या चित्रकार , मित्र किंवा त्याचे घरच्यांसोबत काही वादविवाद ? " जयंतने सागरला विचारले.
" नाही , मला जेवढे माहीत आहे तेवढ्यात तर त्याचे कोणाशीही काहीही वाद नव्हते. आणि तुलाही माहीत आहेच की संचित हा अतिशय साधा माणूस होता , त्याचे कोणाशी वाद असण्याची शक्यताच नाही." सागर म्हणाला.
" हम्म , पण कोण कशासाठी त्याचा खून करेन ? तेच समजत नाहीये. " जयंत म्हणाला.
" आणि त्याच्या घरच्याबद्दल काही माहिती ? ते पुण्याला असतात ना ? आणि त्याच्या घरात कोणकोण आहे ? जयंत ने प्रश्न विचारला.
" त्याच्या घरात आई बाबा आणि त्याचा भाऊ असतात एवढेच माहिती आहे. आणि तो अविवाहित आहे हे तर तुलाही माहीत आहेच. आणि हा...ते पुण्यात सदाशिव पेठेत कुठेतरी राहतात अस त्याच्याकडूनच ऐकलं आहे." सागरने माहिती पुरवली.
" ठीक आहे सागर , थँक यु , अजून काही मदत लागली तर तुला कॉल करेन " जयंत म्हणाला.
" हो हो नक्कीच , आणि संचित च्या खुन्याला शोधल्याशिवाय थांबू नको " सागर जड आवाजात म्हणाला.
" हो.....ब....बाय " जयंतने जड अंतकरणाने बोलत फोन ठेवला. पुन्हा संचितच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले.
तो डोळे पुसून उठला. तसा त्याचा फोन पुन्हा वाजला. त्याने फोन हातात घेऊन नाव पाहिले. साळवें चा फोन होता. जयंत फोन उचलून बोलू लागला.
" हॅलो " जयंत म्हणाला.
" सर , पोस्टमार्टेम आणि फिंगर प्रिंट्स रिपोर्ट आले आहेत. " साळवें म्हणाले.
" काय आहे रिपोर्टमध्ये? " जयंतने विचारले.
" सर , तुम्ही पोलीस स्टेशनला या मग बोलू." साळवें म्हणाले.
" ओके , मी पोहोचतो." एवढे बोलून जयंतने फोन ठेवला.आणि जायला निघाला.
हॉल मधून निघत असताना जयंतचे लक्ष भिंतीवरील फोटो कडे गेले. आणि नकळत त्याचे डोळे पाणावले. तो फोटो होता त्याच्या दिवंगत पत्नीचा समृद्धीचा...तिला अपघातात जाऊन जवळजवळ तीन वर्षे झालेली होती. मात्र जयंत अजूनही तिला विसरू शकलेला नव्हता...जयंतच्या डोळ्यासमोरून तिच्या आठवणी तरळल्या. लगेच भानावर येत त्याने डोळे पुसले आणि निघाला.
पोलीस स्टेशनमध्ये साळवे त्याच्या केबिनमध्ये रिपोर्ट आणि इतर काही कागद बघत विचारात गुंतला होता. तेवढ्यात जयंत तेथे आला आणि साळवेंकडे बघत खुर्चीत बसला.
" हे पोस्टमार्टेम रिपोर्ट , यात विशेष काही नाही. डोक्यात मार लागल्याने अधिक रक्तस्त्राव झाल्याने शर्मांचा मृत्यू झाल्याचे या रिपोर्टमध्ये आहे. " साळवेंनी पोस्टमार्टेम रिपोर्ट जयंतला सांगितला. जयंत बारकाईने रिपोर्ट बघत होता.
" मृत्यूची वेळ सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान आहे." एवढे बोलून जयंत काहीतरी विचार करू लागला. तसे त्याला अचानक काहीतरी आठवले.
" साळवें , जर आजूबाजूला कोणी राहत नाही आणि कोणीही आवाज ऐकला नाही , कोनाला पाहिले नाही , मग खून झाल्याचे समजले कसे ? जयंत ने आश्चर्याचे भाव चेहर्यावर आणत साळवें ना विचारले.
" त्यांच्या नोकराने त्यांना सकाळी तशा अवस्थेत पाहिले आणि मग पोलिसांना कळवले. आणि मला वाटत हे मी तुम्हाला सांगितले असावे सर. " साळवे स्पष्ट करत म्हणाला.
" तुम्ही मला कधी सांगितलं साळवे ? आणि तुम्ही अशा प्रकारे विसरू शकत नाहीत." जयंत आवाज चढवत म्हणाला.
" सॉरी सर." साळवे खजील होत म्हणाले.
एवढी साधी गोष्ट आपल्या आधी का लक्षात आली नाही याचा विचार करून जयंत मनात खजील झाला.
" आणि त्या नोकरची चौकशी केली ? का ते ही विसरलात ? " जयंत नि साळवेला खोचक प्रश्न विचारला. या प्रश्नाने साळवे मनातून चिडला. मात्र ही केस सोडवण्यासाठी आपणच जयंतला निवडले आहे , त्यामुळे आपल्याला शांततेने बोलावे लागेल हे साळवेच्या लक्षात आले आणि त्याने आपला राग चेहऱ्यावर दिसू दिला नाही.
" हो सर , हे बघा , नोकराचे आणि आजूबाजूच्या काही लोकांचे स्टेटमेंट." साळवें टेबलवरील एक फाईल जयंत कडे देत म्हणाला.
जयंतने पोस्टमार्टेमची फाईल खाली ठेवत स्टेटमेंट्सची फाईल हातात घेतली. आणी त्यात नोकराचे स्टेटमेंट वाचू लागला.
" मी जवळच्या गावात राहतो आणि रोज सकाळी संध्याकाळ जेवण व इतर कामे बघतो. आज असाच सकाळी 10 च्या दरम्यान आलो असताना साहेबांना दारात पडलेलं वर्तमानपत्र द्यायला गेलो , तर साहेब रक्ताने माखलेले खाली पडलेले....म्हणून लगेच घरातील फोन वरून पोलिसांना फोन लावला." नोकराचे स्टेटमेंट.
नोकराचे स्टेटमेंट वाचून झाल्यावर जयंत आसपासच्या लोकांचे स्टेटमेंट वाचू लागला. मात्र त्यात कोणीही काही पाहिले नसल्याचे संगीतले. संशय घेण्यासारखे स्टेटमेंट मध्ये काहीही नव्हते. स्टेटमेंटची फाईल ठेवत जयंत साळवेंकडे बघू लागला. तेवढ्यात एक हवालदार चहा घेऊन आला. जयंतने त्याला चहासाठी धन्यावाद दिले. साळवें चहा घेऊ लागला. मात्र जयंत साळवें कडे टक लावून बघत होता. साळवेंला काही समजेना. साळवे प्रश्नांकित नजरेने जयाबत कडे पाहत होता.
" तुम्ही पुन्हा काहीतरी विसरताय साळवे." जयंत पुन्हा आवाज चढवत बोलला.
जयंत ने अस बोलताच साळवे थोडा दचकलाच , मात्र पुन्हा काहीतरी आठवल्यासारखे करत साळवें नि बाजूच्या टेबलवरील फिंगरप्रिंटस रिपोर्ट उचलून जयंत कडे दिले. जयंतने रागाने साळवें कडे बघत ते रिपोर्ट हातात घेतले. आणि ते रिपोर्ट पाहू लागला. संपूर्ण घरातील वस्तूवर संचित आणि अजून कोणाचे तरी फिंगरप्रिंट्स होते. ते फिंगरप्रिंटस खुन्याचे असण्याची शक्यता होती. मात्र ड्रॉइंग रूममधील कोणत्याही वस्तूवर दुसऱ्या व्यक्तीचे फिंगरप्रिंटस नव्हते.
" हम्म , ड्रॉइंग रूममधील कोणत्याही वस्तूवर दुसऱ्या व्यक्तीचे फिंगरप्रिंटस नाहीत. म्हणजे ते खुन्याचे असण्याची शक्यता कमी आहे , काय वाटत साळवें? " जयंतने साळवे च्या डोळ्यात बघत प्रश्न विचारला.
" ह...हो सर , पण मग इतर वस्तूंवरील ते फिंगरप्रिंटस कोणाचे असतील ? " साळवेंनी प्रश्न उपस्थित केला.
" नक्कीच नोकराचे ! " जयंत सहजपणे बोलला.
" अरे हा , हे तर माझ्या लक्षातच नाही आले...!" साळवें उत्साहित होत म्हणाला.
" मानेsss , इकडे या." साळवें नि हवालदार माने यांना हाक मारली. तसे हवालदार माने ताडकन आत आला.
" सर. " हवालदार माने अदबीने म्हणाला.
" त्या शर्मांच्या नोकरचे फिंगरप्रिंटस घेऊन ते मॅच करून त्याचे रिपोर्ट्स लवकरात लवकर पाठवायला सांगा." साळवें उत्साहित होत हवालदार मानेंना ऑर्डर देत होता.
" येस सर " म्हणून हवालदार माने निघून गेला.
जयंत साळवें कडे बघून समाधानी हसत होता. साळवेंच्या चेहऱ्यावरही हसू उमटले.
" आता पुढे काय करणार आहात ? " साळवें नि जयंतला विचारले.
" हम्म , संचित च्या घरच्यांकडेच नक्कीच काहीतरी महिती मिळेल. आणि त्यासाठी मी उद्या चौकीशीसाठी पुण्याला चाललो आहे. " जयंत ने स्पष्ट केले.
" ठीक आहे मी सुद्धा त्यांच्या इतर मित्रांची चौकशी करतो. " साळवे म्हणाले.
" हम्म , चला येतो मी " अस म्हणून जयंत जाण्यास उठला. " शर्मांच्या घरच्यांकडे नक्कीच काहीतरी माहिती मिळेल , अशी मला खात्री आहे " साळवे उभे राहत म्हणाले.
" हो नक्कीच " एवढे बोलून जयंत निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी , जयंत त्याच्या खोलीतील बिछान्यावर झोपलेला होता. तेवढ्यात त्याच्या मोबाइल मधील अलार्मचा आवाज झाला. गाढ झोपेत असलेल्या जयंतची झोपमोड झाली. डोळे अर्धवट उघडून त्यानी अलार्म बंद केला आणि उठला. थोडावेळ बेडवरच बसून त्याने मोबाइल हातात घेतला. वेळ होती 5:04 AM
आणि त्याला एक नोटेफिकेशन दिसले. सागरचा काहीतरी मेसेज होता..त्याने तो ओपन करून पाहिला..." मी सुद्धा तुझ्यासोबत पुण्याला येतोय , सकाळी 6 वाजता मला पिकअप कर " अशा मजकुराचा मेसेज होता. जयंत तो मेसेज वाचून आवरायला लागला.
जयंतची गाडी सागरच्या घरासमोर येऊन उभी राहिली. जयंतने जोरजोरात हॉर्न वाजवला.
" अरे हळू... " वरून सागरचे वृद्ध वडील आणि ज्येष्ठ चित्रकार जयप्रकाश पाठक ओरडले.
" सॉरी काका " जयंत खजील होत म्हणाला.
तेवढ्यात सागर लगबगीने दुमजली घराच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली आला , आणि गाडीत बसला.
" च्यायला , तुला सांगितलं ना हॉर्न नको वाजवत जाऊ म्हणून , माझ्या वडिलांना मोठ्या आवाजाचा त्रास आहे " सागर समजावण्याचा स्वरात जयंतला म्हणाला.
" अरे हो हो , माझ्या लक्षात नाही आले. " एवढे बोलून जयंत गाडी चालवू लागला.
बराच वेळ कोणी काही बोलले नाही. बऱ्याच वेळाने सागरने बोलायला सुरुवात केली.
" संचितची हत्या कोणी आणि का केली असेल ? काही समजत नाही. मला तर वाटत आहे की ही हत्या पेंटिंग मधील स्पर्धेमुळे झाली असावी तशी शक्यताही नाकारता येत नाही." सागर म्हणाला.
" हम्म , त्याही बाजूने तपास करायला हवा , त्याबद्दल तुझ्या वाडीलांकडुनही काही कळू शकेल. " जयंत म्हणाला.
" माझ्या वडिलांकडून ? त्यांच्याकडून काय माहिती मिळेल ? संचित आणि ते वेगवेगळ्या काळातील चित्रकार....मग ? " सागरने आश्चर्यचकित होत जयंतला विचारले.
" दोघे वेगवेगळ्या काळातील जरी असले , तरी त्यांचे कॉमन फ्रेंड्स असतीलच....त्यांचा काळ वेगळा असला तरी क्षेत्र एकच आहे...आणि मला खात्री आज की तुझ्या वडिलांकडून काहीतरी माहिती मिळेलच. "जयंत आत्मविश्वासाने म्हणाला.
" हो , मग आताच का नाही केली चौकशी ? " सागरने प्रश्न उपस्थित केला.
" आता सध्या संचितच्या घरच्या व्यक्तींची चौकशी करणे जास्त गरजेचे आहे , त्यांना धीर देणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. " जयंतने स्पष्ट केले.
" तुझा कोणावर संशय ? आपल्या मित्रांपैकी कोणी ? " सागरने अजून प्रश्न केला.
" सध्यातरी कोणावर नाही , बाकी काय ते सर्वांच्या चौकशीनंतरच कळेल.

जयंतने पुण्यात सदाशिव पेठेत गाडी आणली आणि एका आडोशाला उभी केली. सागरने संचितच्या वडिलांना फोन लावला.
" हॅलो काका " सागर बोलला.
" हा पोरा बोल " पलीकडून संचितच्या वडिलांचा आवाज आला.
" काका मी आणि जयंत आम्ही पुण्यात सदाशिव पेठेत आलोय , तुम्ही इथे नेमके कुठे राहता ? " सागरने संचितच्या वडिलांना विचारले.
संचितच्या वडिलांनी पत्ता सांगितला.
" ओके काका , आलोच " एवढे बोलून सागरने फोन ठेवला.
सागर जयंतला गूगल मॅप वर बघून रस्ता दाखवत होता.
काही वेळाने ते प्रशस्त अशा मोठ्या बंगल्यासमोर येऊन थांबले. ' शर्मा हाऊस ' अस लिहिलेली पाटी गेटशेजारी लावलेली होती..सागर आणि जयंत गाडीतून उतरून गेटमध्ये गेले. सागरने दारावरची बेल वाजवली. बऱ्याच वेळाने कुणीतरी दार उघडले. दारावर संचितचे वडील सुधीर होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानी हास्य उमटले.
" अरे या या " संचितच्या वडिलांनी सागर आणि जयंतला आत येण्यास सांगितले. दोघेही आत येऊन सोफ्यावर बसले. संचितचे वडील सुधीर समोरच्या सोफ्यावर बसले.
" तुम्ही आलात तर फार धीर वाटला पोरांनो " सुधीर यांचा कंठ दाटून आला. त्यांच्या डोळ्यातील अश्रूंवरून त्यांना झालेलं दुःख स्पष्ट दिसत होतं.
" काका , धीर धरा " सागर संचितच्या वडिलांना धीर देत म्हणाला. संचितच्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते.
" काका , मी आपली परस्थिती समजु शकतो , पण संचितच्या खुन्याला शोधणे ही गरजेचे आहे , आणि यासाठी मला तुमची मदत हवी आहे. " जयंत म्हणाला.
" पोरा , मी तुला लागेल ती मदत करायला तयार आहे , पण माझ्या संचितच्या खुन्याला शिक्षा झालीच पाहिजे. " संचितचे वडील दुःखी होत म्हणाले.
तेवढ्यात संचितची आई कावेरी चहा घेऊन आली. त्यांनी ट्रे टेबलवर ठेवला. सागर आणि जयंत त्यांच्याकडेच बघत होते. मुलगा गेल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. जयंतने आजूबाजूला पाहिले. घरात अजून कोणीही दिसत नव्हते.
" घरात अजून कोणी राहत का ? संचितचा भाऊ ? " जयंत ने विचारले.
" संचितचा भाऊ कैलास आहे , वरच्या रूममध्ये असेल." संचितच्या वडिलांनी सांगितले.
" हे बघा काका , मला संचितच्या खुन्याला शोधण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न विचारणे गरजेचे आहे , त्यामुळे तुम्ही जे माहीत असेल ते सर्व सांगण्याचा प्रयत्न करा. " जयंत म्हणाला.
" विचार पोरा , काय विचारायच." संचितच्या वडिलांनी जयंतला प्रश्न विचारण्याची परवानगी दिली.
" घरी कोणाचे संचितबरोबर भांडण किंवा काही वाद ? " जयंतने प्रश्न विचारला.
" नाही , तसे काहीच नाही , आमच्यासोबत तसे काहीच वाद नाहीत." संचितच्या वडिलांनी स्पष्ट केले.
" त्याच्या भावाबरोबर काही वाद ? " जयंत आता खोलात जाऊन चौकशी करत होता.
" नाही पोरा , संचितच्या आणि कौशलचे तसे कधीच वाढ झाले नाहीत , दोघही आपापल्या कामांना जास्त महत्व देणारे. " बराच वेळेपासून शांत असणारी संचितची आई बोलली.
" हम्म , त्याचे पुण्यात कोणी मित्र होते ? त्यांच्याशी काही वाद ? " जयंत आता सर्व बाजूने चौकशी करत होता.
" हो , पुण्यातच वाढल्यामुळे त्याचे इथे अनेक मित्र आहेत. पण छोटेमोठे वाद सोडले , तर तसे काहीच आठवत नाही. " संचितच्या वडिलांनी सांगितले.
" हम्म , पण खून करणारा कोणीही असू शकतो , पूर्ववैमनस्यातूनही खून झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मला संचित च्या शाळेपासून तर कॉलेज मध्ये कोणाशी वाद होते का ते पाहावे लागणार आहे , आणि मला त्यात तुमची महत्वाची मदत होणार आहे." जयंत संचितच्या आई वडील आणि सागरकडे बघत बोलला.
" मला तुमच्याकडून संचित कोणत्या शाळेत होता , तो शाळेत असताना कसा होता , त्यांनतर तो कोणत्या कॉलेज मध्ये होता आणि त्यांनतर तो कुठे गेला , त्याने पुढे काय केले ही सर्व माहिती मला हवी आहे." जयंत संचितच्या वडीलांकडे पाहत म्हणाला.
संचितचे वडील मुलाच्या आठवणीने पुन्हा गहिवरले. संचितच्या आईने त्यांच्या पाठीवर हात ठेवला.
सागर आणि जयंत ही संचितच्या वडिलांकडे बघून भावुक झाले. संचितच्या वडील डोळे पुसत संचितचे बालपण आठवू लागले. आणि जयंत आणि सागरला ते सांगू लागले.

भूतकाळ
--------------------------------------------------------------
" संचित , हे बघ मी काय घेउन आलोय. " संचितचे बाबा संचितला म्हणाले.
" अरे वा बाबा , नवीन स्केचबुक...! " छोटा संचित पळतच बाबांजवळ जात म्हणाला.
संचितच्या वडिलांनी त्याच्या कोवळ्या हातावर स्केचबुक ठेवली आणि त्याच्या चेहऱ्यवर निरागस हास्य पसरले. स्केचबुक घेऊन छोटा संचित पळतच आपल्या खोलीत गेला. त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
" आणली वाटत स्केचबुक , किती दिवसांपासून मागत होता " संचितची आई किचनमधून येत म्हणाली.
" हम्म , याला चित्रकलेची प्रचंड आवड आहे , हा असाच प्रगती करत राहिला तर नक्कीच एक दिवस मोठा चित्रकार बनेल. " संचितच्या वडील सुधीर समाधानाने म्हणाले. आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
इकडे छोटा संचित नवीन स्केचबुक घेऊन चित्र रेखाटू लागला. त्याच्या आईने हळूच डोकावून त्याच्या खोलीत पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

दुसरा दिवस

छोट्या संचित ला शाळेत सोडायला त्याचे बाबा आले होते.
पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये संचित शिकत होता.
" बाबा , बाय " छोटा संचित हात हलवत त्याच्या बाबांना बाय करत शाळेत गेला. संचितच्या बाबही त्याला बाय करून निघाले.
शाळेतून घरी आल्यावर संचित अभ्यासापेक्षा चित्रकलेकडे लक्ष द्यायचा , यामुळे त्याला इतर विषयात फारच कमी गुण मिळत असे , मात्र संपूर्ण शाळेत चित्रकलेमध्ये त्याचा पहिला क्रमांक असायचा. असेच दिवस जात होते , संचित हळूहळू मोठा होत होता. दहावीच्या परीक्षेत त्याला फारच कमी गुण मिळाले , मात्र चित्रकलेत त्याचा संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक आला. त्याचा सत्कारही करण्यात आला.
यानंतर त्याच्या वडिलांनी ठरवले होते की त्याला काहीही करून मोठा चित्रकार बनवायचेच. त्यासाठी एक साधारण मेडिकल शॉप चालवणाऱ्या संचितचे वडील त्याला काहीही कमी पडू देत नव्हते.
दहावी झाल्यानंतर संचित चित्रकलेचे अनेक कोर्स करू लागला. यासाठी त्याच्या आई वडिलांनी शक्य तेवढी काटकसर केली होती..संचितच्या छोट्या भावाला मात्र अभ्यासात रस असल्याने त्यांनी त्याचा छोटा भाऊ कौशलला चांगले शिक्षण देण्याचे ठरवले. आणि यासाठी ते शक्य ते प्रयत्न करू लागले.
संचितने अकरावी आर्टस् साठी 'महात्मा ज्योतिबा फुले' या महाविद्यालयात प्रवेश घेतला. अकरावीत असताना संचित चित्रलकलेच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला. प्रत्येक स्पर्धेत संचितचा पहिला नंबर जवळजवळ निश्चित असायचा. बारावी नंतर तो मुंबईला निघून गेला.
---------------------------------------------------------------
वर्तमान

संचित बद्दल सांगत असताना त्याच्या वडिलांना गहिवरून आले. सागर आणि जयंत त्यांनी जे जे सांगितलं ते लक्ष देऊन ऐकत होते. जयंत ने काही मुद्दे देखील लिहून घेतले. संचितच्या वडिलांनी त्यांना जे माहीत होते ते सांगितले. मात्र जयंतला यातून ठोस असे काही मिळाले नाही.
" काका , पुण्यातील कोणत्या मित्रांचे फोन नंबर असतील , तर आम्हाला द्या आम्हाला त्यांची ही चौकशी करावी लागेल." सागर म्हणाला.
" हो आहेत काही मित्रांचे नंबर " एवढे बोलून संचितचे वडील उठून आतल्या खोलीत गेले आणि हातात एक डायरी घेऊन आले.
" हे घे पोरा , यात त्याच्या काही मित्रांचे नंबर आहेत." संचितचे वडील जयंतला डायरी देत म्हणाले.
" यात संचितच्या कॉलेजला कोण कोण होते ? " डायरी बघत जयंत म्हणाला.
" नक्की काय आठवत नाही " संचितचे वडील म्हणाले.
" संचितच्या कॉलेजमध्ये आकाश नावाचा त्याचा कोणी जवळचा मित्र होता , तो बऱ्याच वेळा घरी सुद्धा यायचा." संचितच्या आईने आठवून सांगितले.
तसा जयंत डायरीमध्ये आकाशचा नंबर शोधू लागला. आणि त्याला आकाश शिंदे नावाचा नंबर दिसला.
" ठीक आहे काका , तुमची परवानगी असेल तर मी ही डायरी घेऊन जाऊ का ? मी पुण्यात असेपर्यंत मला ही डायरी लागणार आहे." जयंत संचितच्या वडिलांना म्हणाला.
" हो हो नक्कीच घेऊन जा " संचितचे वडील म्हणाले.
" धन्यवाद काका , चला येतो आम्ही " जयंत उठत म्हणाला.
" पोरांनो , तुम्ही आलात खरच खूप बरं वाटलं , आमचं दुःख हलक झालं " संचितचे वडील भावुक होत म्हणाले.
" काही काळजी करू नका काका , जयंत आणि मी संचितच्या खुन्याला शोधण्याचा शक्य तो प्रयत्न करु. " सागर संचितच्या वडिलांना धीर देत म्हणाला.
" चला येतो मावशी , काळजी घ्या " जयंत संचितच्या आईकडे बघत म्हणाला.
" हम्म , तुम्ही खरच माझ्या संचितच्या खुन्याला शोधून काढा , माझा विश्वास आहे तुमच्यावर " संचितची आई म्हणाली.
" जयंत आणि सागर उठून जाण्यास निघाले. बाहेर येताच जयंतने आजूबाजूला नजर फिरवली.
" सागर , त्या आकाश शिंदेला फोन लावून बघ त्याच्याकडून नक्कीच माहिती मिळेल. " जयंत सागरकफे बघत म्हणाला.
सागर त्या डायरीमध्ये आकाश शिंदेचा नंबर शोधू लागला.
जयंत त्याच्या गाडीजवळ येऊन थांबला.
इकडे सागरने आकाशचा नंबर शोधून त्यावर फोन लावला.
" हॅलो , कोण ? " पलीकडून आकाश बोलत होता.
" हॅलो , आकाश शिंदे बोलत आहेत का ? " सागरने विचारले.
" हो , मीच आहे , आपण कोण ? " आकाशने विचारले.
" मी सागर पाठक बोलतोय , आपण संचित शर्मा यांना ओळखता का ? " सागर आपली ओळख सांगून थेट मुद्द्यावर आला.
" संचित शर्मा ? मोठे चित्रकार ? " आकाश बोलला.
" हो तेच. ज्यांचा काही दिवसांपूर्वी मुंबईतील घरी खून झाला आहे. " सागर स्पष्ट करत म्हणाला.
" अं.....हो , मी त्यांचा मित्र आहे....क...काय झालं ? " आकाश बिचकत म्हणाला.
" मी सुद्धा त्यांचा मित्र आहे , मी आणि त्यांच्या अजून एका मित्राला तुम्हाला भेटायचे आहे. " सागर म्हणाला.
" हो , पण कशासाठी ? " आकाशने विचारले.
" आम्हाला संचितच्या हत्येसंबंधित काही चौकशी करायची आहे. " सागरने सांगितले.
" ठीक आहे , मी तुम्हाला माझ्या घराचा पत्ता पाठवतो , तुम्ही घरी माझ्या घरी या , मग बोलू." आकाश म्हणाला.
" ठीक आहे , आम्ही येतो " एवढे बोलून सागरने फोन ठेवला. आणि तो जयंत जवळ आला.
" काय म्हणाला ? " जयंतने आकाशला विचारले.
" तो घराचा पत्ता पाठवेल , घरीच भेटायला बोलावले आहे त्याने " सागर म्हणाला.
" ठीक आहे , चल " जयंत म्हणाला.
दोघेही गाडीत बसले. तेवढ्यात सागर च्या फोनवर नोटेफिकेशन आले. आकाशने पत्ता पाठवला होता.
सागर गूगल मॅप वरून रस्ता बघून जयंतला रस्ता सांगत होता. आणि जयंत त्याप्रमाणे गाडी चालवत होता.
काही वेळाने ते एका बंगल्यासमोर आले. सागरने जयंतला थांबण्यास सांगितले. दोघे गाडीतून उतरून बाहेर आले.
जयंतने बाहेरील बोर्डवर बंगल्याचे नाव पाहिले.' आईभवानी सदन ' आणि खाली ठळक अक्षरात आकाश शिंदे असे लिहिलेले होते... जयंतने सागरकडे बघितले. सागरने जयंतला 'चल' अशी खुण केली.
दोघेही गेटच्या आत शिरले. जयंतने बेल वाजवली. थोड्या वेळाने एका 30 - 35 वयाच्या महिलेने दार उघडले. ती बहुदा आकाशाची पत्नी असावी.
" कोण ? " त्या महिलेने दोघांकडे प्रश्नांकित नजरेने बघत विचारले.
" आम्हाला आकाश शिंदे यांना भेटायचे आहे. " जयंत म्हणाला.
" हो , आहेत ते , तुम्ही आत या " ती महिला त्यांना आत घेत म्हणाली. ते दोघे आत आले तेवढ्यात , आतल्या खोलीतुन आकाश आला. जयंत आणि सागरने आकाशकडे पाहिले.
" सागर पाठक आपणच का ? संचितचे मित्र ? " आकाशने दोघांकडे बघत विचारले.
" हो मी सागर पाठक आणि हे जयंत नवले. " सागर ओळख करून देत म्हणाला.
" या , या बसा " आकाश त्यांना बसण्यास सांगत म्हणाला.
सागर आणि जयंत सोफ्यावर बसले.
" काय घेणार आपण ? चहा , कॉफी ? " आकाशने दोघांकडे बघत विचारलं.
सागर काही बोलणार इतक्यात...जयंत मधेच बोलला.
" चहा घ्यायला आवडेल मला. " जयंत शांतपणे म्हणाला.
आकाशाची पत्नी किचनमध्ये निघून गेली.
" बोला , तुमचे माझ्याकडे काय काम ? आणि तुम्हाला माझ्याबद्दल...म्हणजे माझ्या आणि संचितच्या मैत्रीबद्दल कसे समजले ? " आकाशने सागर आणि जयंतकडे बघत विचारले.
" मिस्टर आकाश , तुम्हाला माहीतच असेल की , संचित चा काही दिवसांपूर्वी खून झाला आहे. आणि त्यासाठी मला पोलिसांनी डिटेक्टिव्ह म्हणून मदतिला नेमले आहे. आणि संचित माझाही जवळचा मित्र होता. त्यामुळे मला त्याच्या खुन्यापर्यंत लवकरात लवकर पोहचायचे आहे , आणि त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. " जयंत बोलला.
" मी तुम्हाला शक्य ती मदत करायला तयार आहे , पण मी तुम्हाला काय मदत करू शकतो ? मी संचितला जवळपास 10 वर्षांपासून भेटलेलो नाही " आकाश बोलला.
" संचितचा खून हा पूर्ववैमनस्यातून झाला असण्याची शक्यता आहे , कारण त्याचे मुंबईत कोणाशी तसे वाद नाहीत , आणि म्हणून मला त्यासाठी त्याचे कॉलेजमध्ये कोणाशी वाद होते का याबद्दल महिती हवी आहे." जयंत म्हणाला.
" तुम्ही संचितच्या कॉलेजमध्ये होतात अशी माहिती आम्हाला संचितच्या आईंनी दिली आहे , म्हणून तुमच्याकडून काही माहिती मिळते का हे पाहण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहोत " सागर म्हणाला.
तेवढ्यात आकाशाची पत्नी चहा घेऊन आली. ट्रे टेबलवर ठेऊन ती निघून गेली.
" घ्या , चहा घ्या " आकाश जयंतकडे बघत म्हणाला.
" तुमची आणि संचितची ओळख कशी झाली ? आणि त्याचे आणि तुमचे संबंध कसे होते ? " जयंतने हातात चहाचा कप हातात घेत आकाशाकडे बघत विचारले.
आकाश शून्यात नजर लावून बसला..आणि सांगू लागला.
" संचित मला ' महात्मा ज्योतिबा फुले ' महाविद्यालयात भेटला होता. अकरावीला आम्ही एकाच वर्गात होतो , त्यामुळे आमची ओळख होती. काही दिवसांनंतर आमची मैत्री अधिकच घट्ट झाली. आणि कॉलेज संपल्या नंतरही आम्ही बऱ्याच वेळा भेटलो होतो. मात्र नंतर कामामुळे आमची भेट झाली नाही. आणि काही दिवसांपुर्वीच त्याच्या हत्येची बातमी बघून धक्का बसला. " आकाशला संचितच्या आठवणीने गहिवरुन आले.
" कॉलेजमध्ये जयंतचे कोणाशी वाद ? " जयंतने विचारले.
" सुरवातीला कॉलेजमध्ये अमन नावाच्या मुलाबरोबर त्याचे वाद होते. मात्र त्यांनंतर संचित आणि अमन मध्ये पुन्हा कधी वाद झाले नाहीत." आकाश म्हणाला. अमनचे नाव ऐकुन सागर चमकला. त्याला अमनचे नाव यापूर्वी ऐकल्यासारखे वाटू लागले.
" त्याचे आणि संचितचे नेमके कशावरून वाद होते ? " सागर म्हणाला.
" त्यांचे एका चित्रकला स्पर्धेमुळे वाद झाले होते. " आणि आकाशच्या डोळ्यासमोरून भूतकाळ तरळू लागला.

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय

एके दिवशी एका स्पर्धेसाठी संचित कॉलेजच्या लायब्ररी मध्ये चित्रकाम करत बसलेला होता. तो त्याच्या कामात मग्न होऊन बसलेला असताना कोणतीतरी मागून त्याच्या डोक्यात टपली मारली. संचितने वर पाहिले , त्याच्याच वर्गातील अमन सिंग त्याच्या बाजूला उभा होता.
" काय यार , कधी तरी दुसऱ्यांना पण एक नंबर येऊन दे." अमन त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाला. लायब्ररीमध्ये मोठा आवाज झाल्याने सगळे अमन कडे बघू लागले. मात्र अमन ने त्याकडे लक्ष दिले नाही. संचित मात्र अजूनही त्याच्या कामात व्यग्र होता. अमन त्याच्याकडे बघत होता. संचितने त्याचे सर्व सामान आवरले. आणि अमन कडे बघत ' चल ' अशी खुण केली. अमन संचितच्या मागोमाग आला.
दोघेही येऊन कॉलेजच्या आवारातील झाडाखाली येऊन बसले.
" हा आता बोल " संचित अमन कडे बघत म्हणाला.
" काय बोलणार , तू तर दिवसभर तुझी पेंटिंग काढत बसतो , मला पेंटिंगसाठी मदत करु म्हंटल तर नाही.." अमन तोंड वाकड करत बोलला.
" हे बघ अमन , माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जर स्पर्धेत भाग घ्यायचा आहे , तर स्वतःच्या मेहनतीने काम करावे , दुसऱ्यांची मदत घेऊन नंबर मिळवणे. याला काय अर्थ आहे ? " संचित थोडा चिडून बोलला.
" ए बंद करा तुझं ते फडतूस प्रवचन..तुला मला पेंटिंगसाठी मदत करायची आहे की नाही ते सांग..नाहीतरी तुला फक्त स्वतःच्या नंबरची पडलेली आहे. दुसरा कोणी पुढे जाऊच मये असच तुला वाटत...!" अमन रागाच्या भरात बोलला.
" मी तुला शेवटचं सांगतोय , मी तुला पेंटिंग काढून देणार नाही , जर नंबर आणायचा असेल तर स्वतःच्या मेहनतीने आण...आणि जर जमत नसेल तर कशाला भाग घेतो स्पर्धेसाठी ? " संचित रागात बोलत होता.
" ए , तुलाही चांगलच माहिती आहे , मला चित्रकलेची आवड आहे ते... पण माझे घरचे पहिला नंबर आणला नाही तर मला चित्रकारितेसाठी मदत करणार नाहीत , आणि म्हणूनच मला पहिला नंबर आणायचाच आहे , आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे." संचितने स्पष्ट सांगितले.
" काहीही करायचं आहे तर मेहनत कर आणि मग मिळावं पहिला नंबर , आणि मी तुला सांगतोय मी तुला काहीही मदत करणार नाही." संचित संतापाने बोलला.
" ठीक आहे मग , तुला नाही करायची मदत मग नको करू , साल्या नीच , **मी , मित्र म्हणायच्या लायकीचा नाही तू..." अमन प्रचंड चिडला होता. संचितही त्याच्याकडे रागाने बघू लागला.
" अरे निघ , तू इथून पाहिले निघ " संचित रागाच्या भरात जवळजवळ ओरडलाच.
" अरे चाललो , काय गरज नाही तुझ्या सारख्या मित्राची , आणि स्पर्धेत तुला हरवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेव.." अमन प्रचंड संतापाने बोलून निघून गेला.
संचितही चांगलाच संतापला होता. आता स्पर्धेत पहिला नंबर आणायचाच असा दोघांनी निश्चय केला. दोन जिवलग मित्र मात्र आता वैरी बनले होते.
दोघेही स्पर्धेसाठी तयारी करू लागले. अमनने संचित ला हरवणारच असा निश्चय केला होता. तर दुसरीकडे संचित आपला पहिला क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत होता.
शेवटी स्पर्धेचा दिवस उजाडला. संचितने स्पर्धेसाठी निसर्गरम्य वातावरणाची पेंटिंग रंगवली होती. तर अमनने देखील निसर्गरम्य देखावा रेखाटला होता. इतर ही विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता , मात्र संचित आणि अमनचे चित्र हे बाकी विद्यार्थ्यांपेक्षा अतिसुंदर भासत होते. त्यामुळे अनेक जण तर संचितच जिंकणार अश्या चर्चा करत होते. सगळीकडे चालणाऱ्या चर्चा बघून अमन प्रचंड संतापला. काहीही करून आपला पहिला नंबर आलाच पाहिजे असे त्याला वाटत होते.
निकाल समारंभ सुरु झाला. सगळे स्पर्धक मंचावर बसले होते , इतर विद्यार्थी स्टेजसमोर बसून स्पर्धा कोण जिंकणार ह्याची वाट बघत होते. शाळेचे उपमुख्याध्यापक करुणेश कुलकर्णी माईक वर बोलू लागले.
" Good Afternoon Everyone , तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण दरवर्षी आपल्या कॉलेजमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करत असतो. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण ही स्पर्धा आयोजित केली. आणि मला आनंद वाटतो की आपण सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेला उत्तुंग प्रतिसाद दिला. तर या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेत आपल्या कलागुंणांना सादर करत , इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आणि इतरांपेक्षा सरस कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे , याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. तर पुरस्कार कोण मिळवणार आणि पहिला क्रमांक कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आणि म्हणूनच मी विजेत्यांची घोषणा करण्यासाठी आपले सन्माननीय मुख्यध्यापक सचिन देशपांडे यांना विनंती करतो." एवढे बोलून उपमुख्याध्यापक कुलकर्णी त्यांच्या जागेवर बसले. आणि टाळ्यांचा गडगडाट झाला. मुख्यध्यापक देशपांडे बोलायला उभे राहीले आणि पुन्हा एकदा टाळ्यांचा गडगडाट झाला.
" Good Afternoon Everyone Present Here , सर्वप्रथम मी आपल्या कॉलेजचे सर्व शिक्षक , विद्यार्थी आणि खासकरून उपमुख्याध्यापक कुलकर्णींनी धन्यवाद देऊ इच्छितो , कारण ही स्पर्धा आयोजित करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांनी उत्सुर्फ प्रतिसाद दिला , त्यामुळे मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील कलाकाराला बाहेर आणत वेगवेगळ्या प्रकारचे , वेगवेगळ्या विषयांवर चित्र रंगवली आहेत. आणि मला अभिमान वाटतो की आपल्या कॉलेजमधील विद्यार्थी इतके गुणवान आहेत. " सगळीकडे टाळ्यांचा गडगडाट झाला. सर्वांना आता कोण जिंकले आहे हे बघण्याची उत्सुकता होती.
" तर या चित्रकला स्पर्धेतील विजेते मी घोषित करत आहे.
या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला आहे........" सर्वांचे लक्ष आता कोणाचे नाव उच्चारले जाते याकडे होते. अमन दोन खुर्च्या सोडून शेजारी बसलेल्या संचितकडे रागाने बघू लागला. दोघेही एकमेकांकडे त्वेषाने बघत होते.
" संचित शर्माsssss" मुख्याध्यापकांनी मोठ्याने नाव उच्चारले. सगळीकडे टाळ्यांचा गडगडाट झाला. संचित उठून उभा राहिला , तसा आणखीनच जोरात टाळ्यांचा गडगडाट झाला. इकडे अमन चा मात्र चांगलाच जळफळाट झाला. तो रागाने लाल झाला. संचितला मुख्याध्यापकांनी ट्रॉफी देताना पाठीवर थाप मारली आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अमन मात्र प्रचंड संतापला होता.
" तर दुसरा क्रमांक पटकावला आहे......अमन सिंग याने " मुख्यध्यापकांनी अमन चे नाव घोषित केले. मात्र अमन ला जसे त्याचे काहीच महत्व नव्हते. त्याने उठून मुख्यध्यापकांकडून ट्रॉफी घेतली , मात्र त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेरही नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर फक्त राग आणि संताप दिसून येत होता. तो त्याच्या जागेवर येऊन बसला मात्र तो अजूनही संचितकडे रागाने बघत होता.
समारंभ संपल्यानंतर सर्व जण संचितचे कौतुक करत होते. मात्र अमनचा दुसरा नंबर येऊनही त्याचे कोणीही कौतुक करत नव्हते. सर्व जण संचित शेजारी गर्दी करून उभे होते. अमन मात्र एक कोपऱ्यात निराश होऊन बसला होता. तेवढ्यात त्याच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. अमनने मागे वळून बघितले. मागे संचित होता. संचितला बघून अमनच्या डोक्यात सनक गेली. तो संचितकडे रागाने आणि तिरस्काराने बघू लागला.
" नाराज का होत आहे ? दुसरा नंबर आला ही काही सोपी गोष्ट नाही , तू आनंदी व्हायला पाहिजे मित्रा." संचित शांतपणे अमन ला म्हणाला. मात्र अमन काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. तो निघून जाऊ लागला. मात्र संचित ने त्याचा मार्ग अडवला.
" पहिले जे झालं ते विसरून जा आणि तू काही माझा दुश्मन नाहीस " संचित अमन ला समजावत म्हणाला.
" तू मला अक्कल शिकवू नको , आणि परत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न ही करू नकोस , नाहीतर मी काही बरेवाईट करेल. " अमन रागाच्या भरात धमकी देत म्हणाला. संचित मात्र शांत उभा होता.
" तू तर लक्षात ठेव , तुझ्यापेक्षा चांगला चित्रकार बनवुनच दाखवीन. " अमन संचितला आव्हान देऊन रागाने निघून गेला. आजूबाजूचे सर्व मुले संचितकडे बघत होती. संचितच्या चेहऱ्यावर मात्र दुःखद भाव होते.
त्यांनंतर संचित आणि अमन कधीही एकमेकांशी बोलले नाही. संचित मात्र आता चित्रकारितेकडे जास्त लक्ष देऊ लागला. बारावी मधेही त्याला इतर विषयात कमी मार्क मिळाले. मात्र चित्रकलेमध्ये त्याचा नेहमी प्रमाणे पहिला नंबर आला. आता मात्र तो थांबणार नव्हता , तो आधीपेक्षा अधिक मेहनत घेऊ लागला. संचित आता मोठ्या कालाकारांपैकी एक झाला होता. तो अश्याच मोठ्या मोठ्या स्पर्धेत भाग घेऊ लागला. आणि प्रत्येक स्पर्धेत तो पहिला येऊ लागला. आणि त्याने काही पेंटिंग विकून मिळालेल्या पैशात पुण्यात आणि मुंबईत नवीन घर विकत घेतले. पुण्यात त्याचे आईवडील राहू लागले. मात्र तो त्याच्या कामासाठी मुंबईलाच राहू लागला.
दुसरीकडे संचित सुद्धा एक मोठा चित्रकार बनला होता. त्याने अपार कष्ट करून मोठी मजल मारली होती. मात्र अजूनही संचित ला त्याच्यापेक्षा मोठा चित्रकार समजले जात होते. तो अजूनही संचित वर जळत होता.
-----------------------------------------------------------------
वर्तमान
आकाशचे घर ,

" मग , तुम्हाला वाटत की या सगळ्यामागे अमन असेल ? " जयंत आकाशाकडे बघत म्हणाला.
" शक्यता असू शकते " आकाश जयंतकडे बघत म्हणाला.
" संचितचे कॉलेज मध्ये काही प्रेमप्रकरण वगैरे ? " जयंतने आकाशकडे बघत विचारले.
" नाही , तसे काहीच नाही , संचित कधी त्या फंद्यात पडलाच नाही , त्याचे लक्ष आशा गोष्टींकडे कधी गेलेच नाही...त्याचे लक्ष फक्त त्याच्या चित्रकारितेकडे असायचे. " सागर म्हणाला.
" अजुन कोणी आहे , जो संचितच्या हत्येमागे असू शकतो. " सागर म्हणाला.
" माझ्या माहितीप्रमाणे तर अजून कोणीच नाही , ज्याचे संचितसोबत काही वाद किंवा वाद होते. " आकाश म्हणाला.
" आणि हा अमन कुठे असतो ? काय माहिती ? " जयंतने विचारले.
" तो सध्या मुंबई ला असतो , अस ऐकलं आहे , तो सुद्धा एक चित्रकार आहे." आकाश म्हणाला.
" ठीक आहे , आम्ही येतो , मात्र काहीही आठवले तर आम्हाला नक्की सांगा , संचितच्या खुन्याला शोधणे गरजेचे आहे." जयंत उठत म्हणाला.
" हो , नक्कीच " आकाश म्हणाला.
सागरही उठून जयंत बरोबर निघाला.
" पण मिस्टर जयंत आणि सागर तुमची संचितशी ओळख कशी ?" आकाश निघालेल्या जयंत आणि सागरला थांबवत म्हणाला.
" ओह.....ते तर आम्ही तुम्हाला सांगितलेच नाही " सागर म्हणाला.
" माझे वडील देखील मोठे पेंटर आहेत , जयप्रकाश पाठक.
एकाच क्षेत्रात असल्याने माझे वडील आणि संचितची ओळख होतीच..म्हणून नंतर माझी आणि संचितचीही ओळख झाली. आणि जयंत ला एक पेंटिंग घ्यायची होती म्हणून मी त्याला संचितकडे घेऊन गेलो होतो. तेव्हापासून त्यांची ओळख आहे ." सागर आकाशकडे बघत म्हणला.
" हम्म , चला येऊ का ? की अजून काही विचारायचय ? " जयंत आकाशकडे बघत म्हणाला.
" न..नाही , काही नाही " आकाश गडबडत म्हणाला.
" हम्म , गरज पडली तर पुन्हा भेट होईलच आपली. " जयंत म्हणाला. आणि घराबाहेर पडला. त्याच्यामगोमाग सागरही निघाला. आकाश मात्र त्या दोघांकडे बघत होता.
जयंत गाडीजवळ येऊन थांबला. त्याने घड्याळात वेळ बघितली. आणि खिशातून मोबाईल काढला आणि कोणाला तरी फोन लावला.
" हॅलो साळवे " जयंत म्हणाला.
" बोला सर " साळवे म्हणाला.
" काही माहिती ? कोणाची चौकशी केली ? " जयंतने साळवेंना विचारले.
" सर , मुंबईतील काही मोठे पेंटर आणि संचितच्या काही मित्रांची चौकशी केली , मात्र काही नवीन माहिती मिळाली नाही. " साळवे म्हणाले.
" साळवें तपास करत रहा , आणि जे जे संचितच्या संपर्कात होते त्या सर्वांची चौकशी करा. नक्कीच काहीतरी माहिती मिळेल. " जयंत साळवेंना ऑर्डर देत म्हणाला.
" येस सर " साळवें मोठ्या अदबीने म्हणाला.
" हम्म " म्हणून जयंतने फोन ठेवला.
" यार , हा साळवें तुला काय सर सर करत असतो के समजत नाही " जयंत शेजारी उभा असलेला सागर हसत म्हणाला.
" त्यामागे एक वेगळी गंमत आहे , साळवेंचे वडील हवालदार म्हणून होते आणि माझे वडील इन्स्पेक्टर..साळवेंचे वडील माझ्या वडिलांना सर म्हणायचे. आणि माझी आणि साळवेंची लहानपणापासून ओळख , मग वडिलांसारखा तो मला सर म्हणू लागला. आणि मी डिटेक्टिव्ह झाल्यापासून तर अजूनच त्याला सर म्हणण्याचा चेव चढला." जयंत हसत म्हणाला. सागरही त्याच्या हसण्यात सामील झाला. जयंत मात्र लगेच भानावर येत पुढे काय करायचं याचा विचार करू लागला. मात्र त्याला आकाशवर संशय येत होता.
" मला तर , या आकाश वर संशय येत आहे , त्याच्याकडे बघून तो काहीतरी लपवत असल्यासारखे वाटते. " जयंत सागरकडे बघत म्हणाला.
" आकाशवर ?..... नाही.....मला तर तो अगदी खरा वाटला.
" नाही , तू लक्ष देऊन बघितले असेल , तर तो घाबरून बोलत होता. मी अनेक केस मध्ये काम केले आहे , त्यामुळे माणसं वाचायची सवय आहे मला..." जयंत सागराकडे बघत बोलला. जयंत त्याच्या बुद्धीची कीव करत आहे असच सागरला वाटले.
" नाही , तो खर बोलत आहे , कारण मी संचित कडून त्याचे अमन नावाच्या पेंटर सोबत वाद होते असे ऐकलं आहे." सागर म्हणाला.
" हम्म , कळेलच खर काय ते " जयंत म्हणाला.
" हम्म , पण आता पुढं काय ? आणि साळवे काय म्हणाला ? " सागरने जयंतला विचारले.
" काही विशेष नाही , अजून तपास चालू आहे." जयंत म्हणाला.
" पण पुण्यात अजून काही मिळेल अस वाटत नाही , आता मुंबईलाच जावे लागेल." जयंत आकाशच्या घराकडे बघत म्हणाला.
" ठीक आहे , चल मग " सागर जयंतला समर्थन करत म्हणला.
दोघेही गाडीत बसले. जयंत ड्रायविंग सीट वर बसला. आणि गाडी चालवू लागला.
" जयंत , मला तर वाटते आहे की संचितच्या खुनाचा मोठ्या पेंटर्सशी देखील संबंध असू शकतो." सागर ड्रायविंग करणाऱ्या जयंतला म्हणाला.
" का ? म्हणजे तो जरी मोठा पेंटर असला तरी , मोठमोठे पेंटर त्याचा खून करून स्वतःची इमेज का खराब करतील ? आणि संचितचे जास्त कोणाबरोबर वादही नव्हते.....पण तू म्हणतो ते खर देखील असू शकते." जयंत म्हणाला.
" हम्म , याला एक कारण म्हणजे , काही वर्षांपुर्वी संचितचा काही मोठ्या पेंटर्ससोबत वाद झाले होते. " सागर म्हणाला.
" कसले वाद ? " जयंत काहीतरी कल्यू मिळेल या आशेने म्हणाला.
" त्यावेळी मुंबईत एक मोठा पेंटिंग्सचा लिलाव आयोजित केला गेलेला होता. त्या लिलावात जगभरातून मोठमोठे पेंटर्स आले होते. आणि त्या स्पर्धेत संचितच्या पेंटिंग्स पैकी एक पेंटिंग गायब झाली. आणि ती पेंटिंग चोरी झाल्याचे आरोप केल्याने संचित आणि इतर कलाकारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली...आणि संचित संतापून त्या लिलावातून निघून गेला. पण नंतर संचित ते विसरूनही गेला होता. " सागर म्हणाला.
" पण ती पेंटिंग गेली कुठे ? ती अशी एवढ्या मोठ्या लिलावातून गायब कशी होईल ? आणि तुला हे सगळं कसं माहीत ? " जयंतने सागरवर प्रश्नांची बरसात केली.
" तुला सर्व पहिल्यापासून सांगतो." सागर म्हणाला. आणि तो काय घडले होते ते सांगू लागला.

मुंबईत एक मोठे आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन भरवण्यात येणार आहे आणि त्या प्रदर्शनात मोठमोठ्या कलाकारांच्या पेंटिंगचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी जगभरातून मोठमोठे कलाकार येतील , अशी माहिती संचितला कळाली होती. मात्र त्या लिलावात जाण्यात त्याला फारसा रस नव्हता. मुंबईतच त्याची सागर सोबत ओळख झालेली होती. सागरचे वडीलही मोठे पेंटर असल्याने त्याची सागर सोबत चांगली मैत्री जमली होती.
एके दिवशी संचित त्याच्या मुंबईतील घरी ड्रॉइंग रूममध्ये काम करत बसला होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला.
काम बाजूला ठेऊन त्याने फोन पहिला. मोबाइल स्क्रीनवर सागरचे नाव झळकले. त्याने फोन उचलला.
" हॅलो " संचित बोलला.
" हॅलो संचित , तुला एक बातमी द्यायची आहे." सागर म्हणाला.
" हा बोल , कसली बातमी ? " संचितने विचारले.
" अरे मुंबईत पेंटिंगचा एक मोठा लिलाव होणार आहे , मोठमोठे कलाकार जगभरातुन येणार आहेत." सागर उत्साहित होत म्हणाला.
" हो , मग ? तुला काय वाटत मला माहित नाही ? " संचित काही विशेष नाही अशा अविर्भावात म्हणाला.
" अरे , ही तुझ्यासाठी खूप मोठी संधी आहे , विदेशातील कलाकारांसमोर जर तुझी पेंटिंग विकल्या गेली तर तुझे खूप नाव होईल , आपल्या देशाचेही नाव होईल. " सागर समाजवण्याच्या प्रयत्नात म्हणाला.
" तुझं म्हणणं बरोबर आहे , पण सध्या मला पेंटिंग विकून करायचं काय आहे ? मला न पैशांची गरज आहे , आणि नाही मला पेंटिंग विकायची इच्छा आहे. " संचित ऐकायला तयार नव्हता.
" अरे यार , काय बोलावं तुला. सध्या हि वेळ पैशांपेक्षा प्रसिद्धीचा विचार करण्याची आहे. आणि माझे बाबा ही या लिलावात भाग घेत आहे , त्यांची इच्छा आहे की तू ही या लिलावात भाग घ्यावा " सागर म्हणाला.
" ठीक आहे , बघतो मी " संचित म्हणाला.
" हम्म विचार कर , आणि ठरव , पण तू आलाच पाहिजे." सागर म्हणाला.
" अरे हो , सांगतो मी तुला. " संचित म्हणाला.
" ठीक आहे , बाय " सागर म्हणाला.
" हम्म " म्हणून संचितने फोन ठेवला. आणि तो विचार करू लागला.
शेवटी संचित त्या लिलावाला जाण्यास तयार झाला..त्याने सागरला फोन लावला.
" हॅलो , बोल भाऊ , काय ठरवलं का नाही ? " सागरने फोन उचलल्या उचलल्या संचितला विचारले.
" अरे , तेच सांगायला फोन केला , मी त्या लिलावात भाग घेणार आहे , त्याची तयारीही मी सुरू केली आहे. " संचित म्हणाला.
" मला वाटलच तू येणार...." सागर उत्साहित होत म्हणाला.
" हो , पण तुझे वडील येणार आहेत ना ? " संचित म्हणाला.
" हो मग , माझ्या वडिलांचा खास आग्रह होता तुझ्यासाठी." सागर म्हणाला.
" हम्म ठीक आहे , ठेवतो , पेंटिंग बनवायची आहे. "
" ओके बाय " सागरने फोन ठेवला.

काही दिवसांनंतर ,
संचित त्याची फोर व्हीलर घेऊन सागरच्या घरासमोर थांबला होता. तेवढ्यात सागर त्याचे वडील जयप्रकाश पाठक यांच्या सोबत आला. सोबत असलेली पेंटिंग सागरने मागच्या डिक्कीत अगदी अलगदपणे ठेवली.
" काय संचित , तु तर भारतातला मोठा चित्रकार झालाय. तुमच्यासारखी नवखी पोर तर आमच्या सारख्या ज्येष्ठांना पारच मागे टाकायला लागली. " जयप्रकाश गाडीत बसताना हसत म्हणाले.
" काका , तुमच्यासारखे कलाकारच तर आमच्या सारख्यांना प्रेरीत करतात , तुम्ही तर माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहात." सागर म्हणाला.
" ठीक आहे , कलाकारांनो चला." सागर हसत म्हणाला.
संचित गाडी चालवू लागला.
संचितची गाडी एका भल्यामोठ्या सभागृहाबाहेर येऊन थांबली. संचित आणि जयप्रकाश यांना बघून एक सिक्युरिटी गार्ड धावत पळत गाडीजवळ आला आणि कारचे दार उघडले. सागर आणि जयप्रकाश गाडीतून उतरताच त्यांच्या समोर भारतातील एक नामांकित चित्रकार हिरामण शहा आले.
" या , या जयप्रकाशजी , तुम्ही आल्याने या कार्यक्रमाची शान आणखीनच वाढली. " हिरामण शहा जयप्रकाश यांच्याकडे बघत हसत म्हणाले.
" अरे , हिरामण जी , तुम्ही तर फार दिवसांनी भेटलात , कुठे आहात सध्या ?...." जयप्रकाश शहांकडे बघून हसत म्हणाले.
दोघांचा संवाद सुरू असताना संचित गाडी पार्क करून आला होता. सागर त्या पेंटिंग्स मध्ये घेऊन जाण्यासाठी गार्डना मदत करत होता.
संचित गाडी पार्क करून जयप्रकाश यांच्या शेजारी उभा राहिला. शहांचे त्याच्याकडे लक्ष जाताच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
" अरे शर्मा जी , या या , तुम्ही तर युवा कलाकारांचे प्रेरणास्थान आहात. " शहा संचितचे स्वागत आणि कौतुक करत म्हणाले.
" शहा जी , आपल्या सारख्या महान कलाकारांचे आशीर्वाद असल्यावर मग काय ! " संचित म्हणाला.
यावर सर्वच हसले.
" चला , आत तर अजून बरेच जण वाट बघत असतील. " जयप्रकाश म्हणाले.
सर्व जण गप्पा मारता मारता आत गेले. सभागृह आतून चोहोबाजूंनी सजले होते.
सगळीकडे मोठ्या मोठ्या कलाकारांचे घोळके होते.
समोर स्टेजवर पेंटिंग लावण्याचे काम चालू होते.
काही पेंटिंग दुसऱ्या खोलीत ठेवण्यात आल्या होत्या.
सागर , संचित आणि जयप्रकाश हॉल च्या एका बाजूला बोलत उभे होते. समोर पेंटिंग खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांची वेगळी आसनव्यवस्था करण्यात आली होती..तर कलाकारांसाठी स्टेजसमोर आसनव्यवस्था करण्यात आलेली होती.
संचित आणि जयप्रकाश बोलत उभे असताना तिथे अमन सिंग आणि त्याच्याबरोबर अजून एक जण येतो.
" हॅलो , मिस्टर संचित शर्मा......" अमन संचित कडे येत मोठ्याने म्हणतो....तसा संचित त्याच्याकडे बघतो.....संचितला काही वेळ काय बोलावे सुचत नाही...तेवढ्यात जयप्रकाश बोलतात.
" अमन सिंग , अरे आपण तर भारताची शान आहात , आपली भेट होणे हे तर भाग्याचे काम..." जयप्रकाश अमनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात.
" सर , कितीही मोठा झालो , तरी आपल्यापेक्षा मोठा थोडीच आहे , नाहींतर काही जणांना मोठेपणा दाखवायची सवयच असते " अमन संचितकडे बघत म्हणाला.
संचितला त्याचा राग आला , तो तिरक्या नजरेनी अमन कडे पाहू लागला. अमन ही त्याच्या नजरेला नजर देत बघत होता.
" एक्सक्युज मी , अमन " मागून कोणीतरी अमन ला आवाज दिला.
" एक मिनिट सर , आलोच " अमन जयप्रकाश यांच्याकडे बघत म्हणाला.
" बाबा , हा कोण आहे , तुमच्या एवढ्या चित्रकार मित्रांना भेटलो , पण याला कधी पाहिले नाही. " सागर जयप्रकाश यांच्याकडे बघत म्हणाला.
" अमन सिंग , संचितसारख्या तरुण कलाकारांपैकी एक आहे , माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक...." जयप्रकाश सागरकडे बघत म्हणाले. संचित मात्र आतून संतापला होता.अमनशी झालेला वाद त्याला पुन्हा आठवू लागला. मात्र त्याने शांत बसण्यात फायदा आहे हे जाणले.
" एक्सक्युज मी , मी आलो " जयप्रकाश त्यांच्या इतर कलाकार मित्रांकडे गेले.
" काय रे , काय झालं ? एवढा शांत का झाला ? " सागरने बऱ्याच वेळापासुन शांत असणाऱ्या संचितकडे बघत विचारले.
" काही नाही , असच " सागर बिचकत म्हणाला.
" अरे , मला येडा समजतो का , काहीतरी झालं आहे , त्याशिवाय का अचानक इतका शांत बसला ? " काहीतरी झाल्या शिवाय संचित इतका शांत बसणार नाही हे सागरला ही माहिती होते.
" तू बाजूला ये मग बोलू " संचित सागरला बाजूला घेत म्हणाला. दोघे कोणीच नव्हते त्या कोपऱ्यात उभे राहिले.
" हम्म , बोल आता " सागर संचित कडे बघत म्हणाला.
" तो अमन सिंग , त्याच्यामुळे सगळा मूड खराब झाला. " संचित दात ओठ खात म्हणाला.
" अमन ? का , काय झालं ? " सागर आश्चर्य चकित होत म्हणाला.
" तुला माहीत नाही , पण तो माझ्याच कॉलेजमध्ये होता आणि त्याचात आणि माझ्यात वाद झाले होते. " संचित रागात म्हणाला.
" वाद कशावरून ? " सागरने प्रश्न केला.
संचित काही बोलणार तेवढ्यात तिकडून जयप्रकाश आले.
" अरे , संचित , सागर तुम्ही इकडे बोलत बसलाय आणि मी तुम्हाला पूर्ण हॉल मध्ये शोधतोय " जयप्रकाश हसत समोरून येत दोघांकडे बघत म्हणाले.
" अ....ते....आम्ही असच..." सागर बिचकत म्हणाला.
" अरे बोलत नंतर बसा , आता लिलाव सुरू होत आहे , संचित , लिलावाआधी काही प्रोसेस करायची आहे , जरा माझ्यासोबत चल. " जयप्रकाश संचितकडे बघून म्हणाले.
" हम्म चला." संचित जयप्रकाश यांच्यासोबत निघून गेला.
सागर मात्र विचारात पडला. अमन बरोबर संचितचा कशावरून वाद झाला असेल ? हा प्रश्न सागरला पडला होता.
इकडे जयप्रकाश आणि संचित सभागृहातील एक हॉल मध्ये इतर काही चित्रकारांशी बोलत होते. ते बोलत असतानाच तेथे विदेशातील एक मोठे चित्रकार जॉन वॉलसन तेथे आले.
( इंग्रजीमध्ये ) " हॅलो , मिस्टर जयप्रकाश " जॉन वॉलसन जयप्रकाश यांच्याकडे येत म्हणाले.
( इंग्रजीमध्ये ) " हॅलो , मिस्टर वॉलसन तुम्हाला भेटून आनंद झाला " जयप्रकाश वॉलसन यांच्याशी हात मिळवत म्हणाले.
( इंग्रजीमध्ये ) " तर तुम्ही तुमची पेंटिंग विकत आहात ?" जॉन वॉलसन जयप्रकाश यांच्याकडे बघत म्हणाले.
( इंग्रजीमध्ये ) " हो नक्कीच , आणि मला खात्री आहे की भारतीय कलाकार या लिलावात पुढे असतील " जयप्रकाश वॉलसन यांच्याकडे बघून स्मित करत म्हणाले.
( इंग्रजीमध्ये ) " अरे नाही जयप्रकाश , आम्ही अमेरिकन देखील कोणापेक्षा कमी नाही " वॉलसन चेहऱ्यावर स्मित करत म्हणाले.
( इंग्रजीमध्ये ) " ते तर लिलावात कळेलच " जयप्रकाश हसत म्हणाले.
" संचित , तू रजिस्ट्रेशनची प्रोसेजर करून घे , मी अलोच " जयप्रकाश संचितकडे बघत म्हणाले आणि वॉलसन यांच्या सोबत निघून गेले. संचित रजिस्ट्रेशन साठी आत निघून गेला.
इकडे सागर स्टेज वर लावलेल्या काही पेंटिंग्स बघण्यात गुंगला होता...दुसरीकडे संचितने रजिस्ट्रेशन पूर्ण केले.
( इंग्रजीमध्ये ) " सर , प्लीज माझ्यासोबत या " एक कर्मचारी संचितला म्हणाला. संचित त्याच्यामगोमाग दुसऱ्या एका हॉलमध्ये गेला. त्या हॉलमध्ये सगळीकडे पेंटिंग्स ठेवण्यात आलेल्या होत्या. काही कर्मचारी पेंटिंग्स उचलून स्टेजवर लावण्यासाठी घेऊन चाललेले होते. तर काही मोठे चित्रकार त्यांच्या पेंटिंग्स वर डिटेल्स असलेला छोटासा कागद चिपकवत होते...संचित त्या हॉल मध्ये सगळीकडे नजर फिरवत होता. मात्र त्याला त्याची पेंटिंग कुठेही दिसत नव्हती.....! तेवढ्यात मागून तो मघाचा कर्मचारी पुन्हा बोलला.
( इंग्रजीमध्ये ) " सर आपली पेंटिंग कोणती आहे , आम्हाला त्याबद्दल डिटेल्स हव्या आहेत...." कर्मचारी अदबीने म्हणाला.
संचित मात्र पुन्हा संपूर्ण खोलीत पाहू लागला. त्याला त्याची पेंटिंग कुठेही दिसत नव्हती...! संचित आता मात्र पुरता चक्रावला.....तो इकडून तिकडे नजर फिरवत होता , मात्र त्याला त्याची पेंटिंग कुठेही दिसत नव्हती.
( इंग्रजीमध्ये ) माझी पेंटिंग कुठंय ? मला माझी पेंटिंग दिसत नाहीये..! " संचित गोंधळलेल्या नजरेने इकडे तिकडे बघत मोठ्याने म्हणाला...त्याच्या बोलण्याने सर्व कर्मचारी आणि इतर कलाकार त्याच्याकडे बघू लागले.
( इंग्रजीमध्ये ) माझी पेंटिंग कुठे आहे ? मी तुला विचारतोय स्टुपिड..." संचित त्या कर्मचाऱ्याकडे बघत मोठ्याने ओरडला. त्याचा आवाज ऐकून इतर कलाकार बुचकळ्यात पडले. बाहेर उभे असणारे देखील आत बगू लागले. तेवढ्यात जयप्रकाश आणि सागर देखील आत आले.
" काय झालं संचित ? " जयप्रकाश लगबगीने आत येत म्हणाले.
" माझी पेंटिंग.......माझी पेंटिंग इथे नाहीये...! संचित जयप्रकाश यांच्याकडे बघत म्हणाला.
" काय......! हे कसं शक्य आहे , पेंटिंग अशी कशी गायब होऊ शकते ? " जयप्रकाश गोंधळून म्हणाले.
" अस कस होईल ? ( इंग्रजीमध्ये ) यांची पेंटिंग कुठाय , अशी कशी गायब होईल...." सागर संतापून एका कर्मचाऱ्याला म्हणाला.
इतर लोकांना मात्र काय झाले आहे ते कळत नव्हते.
( इंग्रजीमध्ये ) काय झालं मिस्टर ? आपली पेंतूनग गायब झाली ? " एक मोठे विदेशी चित्रकार पुढे होत म्हणाले.
( इंग्रजीमध्ये ) हो , माझी पेंटिंग गायब झालीये , आणि आताच्या आता आपण ती शोधलीच पाहिजे....." संचित सर्व कर्मचाऱ्यांकडे बघत रागाने म्हणाला.
जमलेले सर्व कर्मचारी लगबगीने त्या खोलीमध्ये शोध घेऊ लागले. प्रत्येक जण कोपऱ्यात , पडद्यामागे सगळीकडे शोध घेऊ लागले. त्या खोलीमध्ये टेबल वर सर्व पेंटिंग मांडल्या असल्याने , पेंटिंग अशी गायब होणे चकित करणारे होते. त्या खोलीत टेबल व्यतिरिक्त अजून काहीही नसल्याने पेंटिंग कुठे लपवली असल्याची शक्यताही नव्हती.
सर्व कर्मचारी पेंटिंग शोधत असताना , संचित राग आणि चिंतेने शून्यात नजर लावून बसला होता.
" पेंटिंग इथेच कुठे तरी असेल....सापडेल , काळजी करू नको " सागर संचितच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला.
" काळजी करू नको संचित , पेंटिंग कुठेही जाणार नाही , तू धीर ठेव " जयप्रकाश संचितला म्हणाले.
" पण अशी पेंटिंग गायब कशी होऊ शकते ? , पेंटिंग स्टेजवरही नाही , मग पेंटिंग गेली कुठे ? " सागर चिंतेने इकडेतिकडे बघत म्हणाला.
" सागर पेंटिंग कारमधून तूच काढली होती ना ? मग ? " जयप्रकाश सागरकडे बघत मोठ्याने म्हणाले.
" बाबा , मला चांगलं आठवत आहे , मी काही गार्ड्स सोबत येऊन तुमची आणि संचितची पेंटिंग घेऊन याच हॉल मध्ये ठेवली होती. " सागर म्हणाला.
" काका , मघाशी तुम्ही या खोलीत आला होतात , तेव्हा तुमच्या पेंटिंग सोबत माझी पेंटिंग होती ? " संचितने जयप्रकाश यांना विचारले.
" अ....मघाशी....." जयप्रकाश आठवण्याचा प्रयत्न करत होते.
" आय एम सॉरी संचित , पण मी तुझी पेंटिंग कोणती आहे ते मी नीट पाहिलं नाही , मी इथे अनेक पेंटिंग्स पहिल्या पण नक्की तुझी कोणती हे मला काय माहीत नाही....." जयप्रकाश चेहऱ्यावर चिंतेचे भाव आणत म्हणाले.
संचित मात्र अजूनही निराशेत होता.
तिकडे लिलावाच्या आयोजकांना देखील याबद्दल कळाले. एवढ्या मोठ्या कलाकाराची पेंटिंग अशी अचानक गायब होणे , यामुळे सर्वच टेन्शन मध्ये दिसत होते. त्या प्रसंगामुळे लिलाव अजून सुरू करण्यात आलेला होता.
बाहेर पेंटिंग्स विकत घेण्यासाठी किंवा फक्त लिलाव बघण्यासाठी आलेले लोक सभागृहतील खुर्च्यांवर बसुन लिलाव सुरू होण्याची वाट बघत बसलेले होते....इकडे काय चालू आहे याबद्दल त्यांना काही कल्पना नव्हती.
इकडे सभागृहाचा मॅनेजर देखील पेंटिंग्स ठेवलेल्या होलमधे पोहोचला. संचित एका खुर्चीवर बसून शून्यात नजर लावून बसला होता. त्याशेजारी जयप्रकाश आणि इतर काही मोठे कलाकार त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होते.
" माफ करा मिस्टर शर्मा , जे काही झालं आहे , त्यासाठी मी आपली माफी मागतो... आमच्याकडून पेंटिंग शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत...." मॅनेजर खाली मान घालून संचितकडे बघत म्हणाला. संचित मात्र अजूनही शून्यात नजर लावून बसला होता.
" तुम्हाला काय म्हणायचे आहे मॅनेजर ? तुमच्या सभागृहातून एवढ्या मोठया कलाकाराची लेंटिंग गायब होतेच कशी ? " जयप्रकाश मॅनेजरकडे रागाने बघत म्हणाले. तसा मॅनेजर चांगलाच खजील झाला. उभे असलेले विदेशी कलाकार मात्र फक्त बघ्याची भूमिका घेऊन होते.
काही वेळ सर्वजण शांत होते. तेवढ्यात काही सिक्युरिटी गार्ड्स आत आले. मॅनेजरने त्यांच्यावर रागाने नजर फिरवली.
" या सरांची पेंटिंग आणायला कोणी मदत केली होती ? सांगा लवकर....." मॅनेजर त्या गार्डसवर मोठ्याने ओरडत म्हणाले.
" स.....सर मी आणि हा...." एक सिक्युरिटी गार्ड घाबरत दुसऱ्या एका गार्डसकडे हात दाखवत म्हणाला.
" ती पेंटिंग गेली कुठे ? " मॅनेजर रागाने लाल झाला होता.
" इ....इथेच.....ठेवली होती सर , हे साहेब पण होते तेव्हा " तो सिक्युरिटी गार्ड सागरकडे हात दाखवत म्हणाला.
" पेंटिंग इथे ठेवली होती , तर इथे लक्ष ठेवता आले नाही का ? " सागर संतापत म्हणाला.
" साहेब , आम्ही फक्त पेंटींग ठेऊन बाहेर गेलो होतो. इथे इतर काही कर्मचारी होते लक्ष ठेवायला. " दुसरा सिक्युरिटी गार्ड घाबरत म्हणाला. बोलताना मात्र तो घामाने पूर्ण भिजला होता.
" इथे या हॉलमध्ये पेंटिंगवर लक्ष ठेवायला कोण होत ? " मॅनेजर तेथे उभे असलेल्या कर्मचाऱ्यांवर ओरडत म्हणाले.
" सर , आम्ही पाच जण या हॉल मधेच होतो , पण एवढ्या पेंटिंग आणि चित्रकारांचे हॉल मध्ये येणे जाणे चालू होते , त्या पेंटिंग बद्दल काही माहीत नाही " एक महिला कर्मचारी म्हणाली.
" माहीत नाही म्हणजे ? तुम्ही काय झोपा काढत होतात का ? " मॅनेजर आता प्रचंड संतापला होता.
सर्व कर्मचारी माना खाली घालून ऐकत होते.
" सभागृहाचा कोपरा कोपरा बघा , सर्व लोकांकडे चौकशी करून सर्वांच्या गाड्यांची झडती घ्या , पण लवकरात लवकर पेंटिंगचा शोध लावा , आणि हा...जो पर्यंत पेंटिंग सापडत नाही , तोपर्यंत लिलाव सुरू होणार नाही , स्टेज वरून तशी घोषणा करा , मात्र खरे कारण कोणालाही कळू देऊ नका. " मॅनेजर रागातच सर्व कर्मचाऱ्यांना आदेश देत म्हणाला.
( इंग्रजीमध्ये ) हे बघा मॅनेजर आपण सीसीटीव्ही कॅमेरे बघितले पाहिजे आपल्याला नक्कीच काहीतरी कल्यू मिळेल...." जॉन वॉलसन मॅनेजरकडे बघत म्हणाले.
वॉलसन अस म्हणताच सर्वच जण चमकले. इतक्या वेळ सिसिटीव्ही कॅमेराबद्दल कोणाच्या लक्षात कसे आले नाही , याचे सर्वांना आश्चर्य वाटले.
" येस , मॅनेजर , आपण सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहू , नक्कीच काहीतरी समजेल.
" हम्म ठीक आहे , आपण कन्ट्रोल रूम मध्ये जाऊन बघू या " मॅनेजर म्हणाले.
संचितने आजूबाजूला पाहिले , त्या खोलीतील छतावर डोकं कोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले दिसले.
" कम ऑन संचित , आपल्याला सीसीटीव्ही बघून नक्कीच काहीतरी कळेल " जयप्रकाश संचितकडे आशावादी नजरेने बघत म्हणाले.
संचित खुर्चीतुन उठून उभा राहिला. त्याने एकदा जयप्रकाश यांच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही निराशच होती. जयप्रकाश यांनी त्याला 'चल' अशी खुण केली.
जयप्रकाश , संचित , सागर आणि वॉलसन आणि काही कर्मचारी मॅनेजर मागे चालु लागले. इतर कलाकार मात्र तेथे उभे राहून पेंटिंगबद्दल कुजबुज करु लागले.
मॅनेजर जयप्रकाश , संचित , सागर आणि वालसन यांना घेऊन जिथे पेंटिंग ठेवली होती , त्या खोलीच्याच रांगेत एकदम कोपऱ्यात असणाऱ्या खोलीत घेऊन गेला.
इकडे बघायला आणि पेंटिंग खरेदी करायला जमलेले सर्व लोक लिलाव सुरू होण्याची वाट पाहत होते. काही मोठ्या चित्रकारांना मात्र काय घडले आहे याबद्दल कळले होते. त्यामुळे स्टेजवर बसलेले चित्रकार त्याबद्दलच कुजबूज करत होते...मात्र लिलावाला उशीर का होत आहे ? हे तिथे बसलेल्या लोकांना काही काही कळत नव्हते. कोणत्या तरी चित्रकाराच्या प्रतीक्षेत या कार्यक्रमाला उशीर होत असावा , अशा चर्चा बसलेली काही लोक करत होती.
एका बाजूला अमन त्याच्या काही मित्रांबरोबर चर्चा करत होता , काही मित्रांकडून त्याला संचितच्या पेंटिंग बद्दल कळाले होते. ते ऐकून अमनला मात्र चांगलेच समाधान वाटत होते.
इकडे मॅनेजर आणि त्याच्यासोबतचे कंन्ट्रोल रूममध्ये शिरले. आत मात्र ऑपरेटर गायब होता. तेथील भिंतीवरील एलईडी स्क्रीन वर सर्व सिसिटीव्ही कॅमेराचे फुटेज दिसत होते.
" ऑपरेटर कुठे आहे ? जा...आणि त्या ऑपरेटरला लवकरात लवकर घेऊन या " मॅनेजर कर्मचाऱ्यांकडे बघत हाताच्या मुठ्या आवळून जोरात ओरडून म्हणाला. मॅनेजर आता रागाने थरथर कापत होता. ते कर्मचारी निघून गेले. वॉलसन त्या एलईडी स्क्रीनवर बघत होते..एकूण 18 सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज दिसत होते. जयप्रकाश आणि संचित देखील स्क्रीनवर पाहू लागले.
" एकूण किती सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ? " जयप्रकाश यांनी सीसीटीव्ही फुटेज कडे बघत मॅनेजरला विचारले.
" एकूण अठरा कॅमेरे आहेत , स्टेज वर दोन , स्टेज समोर बसण्याची जागा आहे तिथे चार , चार रूम आहेत त्या प्रत्येक रूममध्ये दोन , वॉशरूममध्ये एक , पार्किंग स्लॉटमध्ये एक आणि सभागृहाच्या प्रवेशद्वारावर दोन असे एकूण 18 आहे. " मॅनेजर स्पष्ट करत म्हणाला.
मॅनेजर बोलत असताना संचित मात्र फुटेजकडेच बघत
होता. ज्या खोलीत पेंटिंग ठेवण्यात आलेल्या होत्या त्या खोलीत अजूनही काही चित्रकार बोलत असताना दिसत होते , त्यात अमनही शामिल होता. स्टेज समोर बसलेले लोक मात्र अजूनही कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहत होते. सभागृहाच्या प्रवेशद्वारावर काही लोकांची अजूनही ये-जा चालू होती , कोणत्याही ठिकाणी मात्र संशयास्पद काहीही वाटत नव्हते.
सर्व जण फुटेजकडे लक्ष देत होते मात्र तेवढ्यात तिथे ऑपरेटर आणि त्याला बोलावण्या साठी गेलेले कर्मचारी तेथे आले. ऑपरेटर कडे बघून मॅनेजर चांगलाच संतापला.
" कुठे होता तू ? इथं सिसीटीव्ही बघण्याऐवजी कुठे तरफडला होता ? " मॅनेजर चांगलाच संतापला होता.
" सर........मी......ते.....बाहेर कामासाठी गेलो होतो.." ऑपरेटर अडखळत बोलला.
" बाहेर ? बाहेर कुठे ? आणि तू काम सोडून असा कुठे गेला ? " मॅनेजर अजूनच संतापला.
" सर , माझ्या वडिलांना तातडीने दवाखान्यात न्यायचे होते , त्यामुळे मला तुम्हाला सांगण्यासाठी वेळ नव्हता , म्हणून मी असच काम सोडून बाहेर गेलो." ऑपरेटर मॅनेजरकडे न बघताच म्हणाला.
" अरे *** , इथे एवढी मोठी पेंटिंग गायब होत आहे , आणि तू असली कारणं देतोय ? " मॅनेजरची रागात आता भाषाही घसरली...तो ऑपरेटर कडे बघत रागाने थरथर कापत होता. तिकडे बाकीचे अजूनही स्क्रीनवर काही संशयास्पद दिसते का ते बघत होते , मात्र संशय घेण्यासारखं काहीही दिसून येत नव्हतं.
" मॅनेजर , सध्या तरी काही संशयास्पद दिसत नाही , आपल्याला मागच्या एक - दोन तासाचे फुटेज बघावे लागेल." सागर म्हणाला.
" बरोबर , आता 8:30 वाजत आहेत , आपल्याला 7 वाजेपासूनचे फुटेज बघावे लागेल. " संचित म्हणाला.
" येस राईट " वॉलसन म्हणाले.
" तोंड काय बघतोय ? सात वाजल्यापासूनचे फुटेज दाखव " मॅनेजर ऑपरेटरला खडसावत म्हणाला.
तसा ऑपरेटर त्याच्या टेबल जवळ आला आणि त्याने लॅपटॉप मध्ये काही तरी केले. तसे स्क्रीन वर चालू असणारे सर्व फुटेज ब्लँक झाले , स्क्रीन वर 7:00 असा टाइम दाखवत होते मात्र फुटेजच्या जागी फक्त काळी स्क्रीन होती. ऑपरेटर लॅपटॉप वर आणखी काही तरी खटपट करू लागला. इकडे संचित मात्र चांगलाच संतापलेला दिसत होता. जयप्रकाश यांच्या चेहऱ्यावरही आश्चर्य आणि निराशा असे भाव पसरले.
" सर , मागचे फुटेज डिलीट झाले आहे " ऑपरेटर कचरत म्हणाला.
" काय ?........डिलीट झाले म्हणजे ? असे कसे डिलीट होईल ? " मॅनेजर आता चांगलाच संतापला होता.
" माहीत नाही सर , पण मागचे फुटेज दिसत नाही आहे " ऑपरेटर घाबरत म्हणाला.
" पण फुटेज कोण डिलीट करेल ? ज्याने पेंटिंग चोरली किंवा गायब केली , हे त्याचेच काम आहे " जयप्रकाश मॅनेजर कडे बघत म्हणाला.
" हो , हे त्याचेच काम असणार , ऑपरेटर ही इथे नव्हता याचाच त्याने फायदा उचलला. " सागर म्हणाला.
संचित आता चांगलाच संतापला. मॅनेजर ऑपरेटर कडे बघून चांगलाच संतापला होता.
" पण आता काय ? सीसीटीव्ही हा एकच मार्ग होता आपल्याकडे..." संचित संतापाने म्हणाला.
( इंग्रजीमध्ये ) माफ करा , पण मला वाटत की ही पूर्वनियोजित चोरी आहे , आणि मला नाही वाटत की आपल्याला इतक्या सहजपणे पेंटिंग मिळेल " वॉलसन जयप्रकाश यांच्याकडे बघत म्हणाले.
" मला तर वाटते यामागे इथे आलेल्या पेंटर्स पैकीच कोणाचा तरी हात असावा " संचित चिडलेल्या आवाजात म्हणाला.
( इंग्रजीमध्ये ) " तुम्ही अस कुणावरही काही पुरावा नसताना काहीच बोलू शकत नाहीत...विसरून जा त्या सामान्य पेंटिंगला... "
( इंग्रजीमध्ये ) " सामान्य पेंटिंग ? तुम्ही याला सामान्य पेंटिंग म्हणताय ? ती पेंटिंग माझ्या एका महिन्याची मेहनत आहे "
" आणि मला माहिती आहे , यामागे कोण असू शकत ते..." संचित रागात बोलून रूम मधून बाहेर पडला.
" संचित....." सागर त्याला आवाज देत त्याच्या मागे गेला.
जयप्रकाशही त्याच्या मागोमाग आले.
संचित रागात बाहेर आला , तितक्यात त्याला समोरून अमन येताना दिसला. संचित त्याच्याकडे चिडलेल्या नजरेने बघत त्याच्या दिशेने चालू लागला. अमन मात्र संचितला बघून जागेवरच त्याच्याकडे बघत उभा राहिला...संचितने रागाने अमनची कॉलर पकडली. " अरे संचित हे काय करतोय " मागून येत जयप्रकाश मोठ्याने ओरडले.
" बोल माझी पेंटिंग कुठे लपवली ? बोल......! " संचित रागाने थरथरत मोठ्याने बोलला.
" पेंटिंग ? कुठली पेंटिंग ? आणि मला काय माहीत ? " अमन ही मोठ्याने ओरडत म्हणाला.
तेवढ्यात जयप्रकाश आणि सागर मागून येऊन अमनला संचित पासून सोडवू लागले. मात्र संचित अमनला सोडायला तयार नव्हता.
" ह***र , मला माहित आज , माझी पेंटिंग तूच गायब केली आहे , बोल कुठे आहे माझी पेंटिंग ?" संचित अजून आवाज चढवत बोलला.
" अरे चू** , मला काय घेणं आहे तुझ्या पेंटिंगशी , तुझी ती फालतू पेंटिंग चोरून काय भेटणार आहे मला...." अमन संचितला जोरात धक्का देत म्हणाला.
संचित काहीही न बोलता रागाने अमन कदे बघत होता.
अमन रागाने थरथरत संचितकडे दात ओठ खत बघत होता.
" संचित , तू हे काय म्हणतोय ? अमन पेंटिंग चोरेल ? के बोलतो संचित , मी अमनला 2 वर्षांपासून ओळखतो , तो अस कधीच करू शकत नाही " जयप्रकाश अमनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. अमन संचितकडे जळजळीत कटाक्ष टाकून निघून गेला. संचित मात्र अजूनही रागाने थरथरत होता.सागर त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत होता. जयप्रकाश यांनी संचितकडे नाराजीने बघितले. त्यांना संचितचे वागणे आवडले नव्हते , हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. जयप्रकाश वॉलसन यांच्या सोबत निघून गेले.
" सॉरी सर , पण आता नाईलाजाने आम्हाला लिलाव सुरू करावा लागेल , याव्यतिरिक्त आमच्याकडे काही पर्याय नाही " मॅनेजर संचितकडे बघत म्हणाला.
संचित मात्र चांगलाच निराश झालेला होता. त्याने हाताने चेहऱ्यावरचा घाम पुसत सागरकडे पाहिले. आणि तो निघून गेला. सागर मात्र तेथेच विचारात उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरही आपल्या मित्रासाठी काळजी आणि निराशा स्पष्ट दिसत होती.
इकडे संचित रागाच्या भरात सभागृहाबाहेर निघून आला.
सागर जयप्रकाश आणि मॅनेजर यांबाबरोबर पेंटिंग ठेवलेल्या रूममध्ये उभे होते. मॅनेजरने लिलाव सुरू करण्याचे सांगितल्यामुळे सर्व पेंटिंग्स स्टेजवर नेण्यात येत होत्या. जयप्रकाश यांनी सागरकडे पाहिले , तो निराश झालेला दिसत होता.
" डोन्ट बी अपसेट सागर , मला महिती आहे की तू संचित साठी नाराज झाला आहे , पण सध्या तरी आपण खि करू शकत नाही. " जयप्रकाश सागरच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले.
" संचित कुठे आहे ? " जयप्रकाश यांनी सागरला विचारले.
" तो रागारागाने बाहेर निघून गेलाय , त्याला सध्या तरी त्याला एकट्यालाच राहू देणे चांगले आहे. " सागर म्हणाला.
" हम्म , तो फारच निराश झालेला आहे , पण त्याने अमन बरोबर जे केले ते फार चुकीचे आहे " जयप्रकाश नाराजीच्या सुरात म्हणाले. काही वेळ कोणी काहीही बोलले नाही.
" चला , लिलाव सुरू होत आहे " जयप्रकाश सागर कडे बघत म्हणाले. ते निघणार तेवढ्यात एक कर्मचारी तेथे आला.
" सर , पूर्ण सभागृहात शोधून पाहिले , पण पेंटिंग कुठेही नाही , सर्वांच्या गाड्या देखील पहिल्या पण कुठेही काही संशयास्पद दिसले नाही " कर्मचारी म्हणाला.
" हम्म.....ते ठीक आहे , पण अजूनही शोधत रहा , सीसीटीव्ही कॅमेरे चालू होतात का ते पहा , त्या पेंटिंग बद्दल नक्कीच काहितरी समजेल. " मॅनेजर यावेळेस शांत आवाजात म्हणाला. त्याने पेंटिंग मिळण्याची आशा सोडली आहे , हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते.
इकडे मंचावर सर्व कलाकार आपल्या पेंटिंग शेजारी खुर्चीवर बसलेले होते. देशविदेशातील अनेक नामवंत व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्व कलाकारांच्या पेंटिंग एकापेक्षा एक उत्तम भासत होत्या , यामुळे कोणाच्या पेंटिंगला चांगली किंमत मिळेल याकडे सर्व दर्शकांची नजर होती. सर्व कलाकार आणि प्रमुख पाहुणे आल्यानंतर अँकरने बोलण्यास सुरू केले.
स्टेजवरील सर्व प्रमुख पाहुण्यांची नावे घेऊन आणि त्यांचे आभार मानून अँकरने लिलाव प्रमुखांना माईक सोपवला.
लिलाव प्रमुखांनी मंचावरील सर्वांचे आभार मानून लिलावाला सुरुवात केली. सर्वप्रथम जॉन वॉलसन यांच्या पेंटिंग पासून सुरुवात झाली. जॉन वॉलसन यांनी उभे राहून आपल्या पेंटिंगबद्दल सांगू लागले. सर्व माहिती सांगून झाल्यानंतर लिलाव प्रमुखांनी बेस प्राईज पासून सुरुवात केली , अनेक जणांनी बोली लगवण्यास सुरुवात केली.
इकडे लिलाव सुरू झाला होता , मात्र संचित बाहेर त्याच्या कारमध्ये ड्रायविंग सीट वर विचार करत बसला होता. पेंटिंग कुठे गेली असेल ? यामागे अमनचा हात असेल का ? असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात येत होते. तो विचारात असतानाच त्याचा फोन खानानला. त्याने मोबाईल स्क्रीनवर नाव पाहिले , त्याच्या वडिलांचा (सुधीर) फोन होता. संचित ने फोन कट केला. आणि परत आपल्या विचारात गुंतला. मात्र काहीवेळाने पुन्हा फोन वाजला. संचितच्या वडिलांचा होता.
यावेळेस संचितने नाराजीनेच फोन उचलला.
" हॅलो " संचित बारीक आवाजात बोलत होता.
" हॅलो संचित , कामात आहे का ? " संचितचे वडील म्हणाले.
" नाही बोला , काय म्हणता " संचित बारीक आवाजात म्हणाला.
संचितच्या आवाजातील बदल त्याच्या वडिलांच्या लक्षात आला होता. नक्कीच काहीतरी घडले आहे हे त्यांना समजले.
" काही झालं आहे का संचित ? सगळं ठीक आहे ना ? "
" हो......सगळं ठीक आहे " संचित काही झाले नाही अशा आवाजात म्हणाला.
" हे बघ काय झालं आहे ते मनमोकळेपणाने सांग , मनात काही ठेऊ नको , मला तुझ्या आवाजावरून जाणवत आहे की काहीतरी घडले आहे " संचितचे वडील संचितला धीर देत म्हणाले.
" बाबा , ते पेंटिंग....." संचित जड आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत होता.
" पेंटिंग ? पेंटिंगचं काय , संचित ? " संचितचे वडील म्हणाले.
" मी एका मोठ्या लिलावात पेंटिंग घेऊन आलो होतो , पण इथून माझी पेंटिंग गायब झाली " संचित जड आवाजात म्हणाला.
" पेंटिंग गायब झाली ? अशी कशी गायब होईल ? " संचितचे वडील गंभीर आवाजात म्हणाले.
" काहीच माहीत नाही , शोधण्याचा प्रयत्न केला पण....." संचितला पूर्ण वाक्य बोलल्या गेले नाही.
" पण तुला लिलावात पेंटिंग विकायची काय गरज आहे ? तुला आता पैशांची सुद्धा गरज नाहीये मग ? " संचितचे वडील म्हणाले.
" बाबा , मला पैशांची काहीच गरज नाही ,पण मी माझ्या मित्राच्या म्हणण्यावरून लिलावाला आलो होतो , पण इथे तर....." संचित कसाबसा बोलण्याचा प्रयत्न करत होता , त्याच्या डोळ्यातून अश्रू टपकत होते. संचितचे वडील थोडावेळ काहीच बोलले नाही , त्यांच्या चेहऱ्यावरही मुलासाठी दुःख दिसून येत होते.
" धीर सोडू नको पोरा , पेंटिंग नक्कीच मिळेल , आणि एक पेंटिंग गेल्याने काही फरक पडणार नाही , तू तशा शेकडो पेंटिंग बनवू शकतो याचा मला विश्वास आहे.......फोन ठेवता पोरा , काही अडचण आली तर लगेच कॉल कर." संचितचे वडील संचितला धीर देण्याचा प्रयत्न करत म्हणाले.
" हम्म " म्हणत संचितने फोन ठेवला. फोन ठेऊन तो पुन्हा विचारात गुंतला.
इकडे लिलावात जयप्रकाश यांची पेंटिंग मोठ्या किमतीत विकल्या गेली. सर्व पेंटिंग मोठमोठ्या व्यक्तींनी जास्तीत जास्त किमतीत विकट घेतलेल्या होत्या.
लिलाव पूर्ण झाल्याननंतर जयप्रकाश आणि सागर बाहेर पार्किंग मध्ये आले. संचित अजूनही कारमध्ये विचार करत बसला होता. जयप्रकाश यांनी काचेवर टकटक केलं तेव्हा तो भानावर आला.
" बाहेर ये संचित " जयप्रकाश शांत आवाजात म्हणाले.
संचित कारचे दार उघडून बाहेर आला. जयप्रकाश त्याच्याकडे चेहऱ्यावर स्मित करत बघत होते.
" चल थोडावेळ तिकडे जाऊया " जयप्रकाश संचितच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.
" पण.....आपल्याला जायला उशीर होईल " संचित म्हणाला. संचित अजूनही टेन्शन मध्ये आहे हे जयप्रकाश यांना समजले.
" मला तुझ्यासोबत बोलायचे आहे संचित , चल " जयप्रकाश संचितच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले.
संचितने जयप्रकाश यांच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही दुःख होते. जयप्रकाश त्याला पार्किंग शेजारी असणाऱ्या एका मोकळ्या जागेत घेऊन गेले. तिथे सागर आधीपासूनच त्यांची वाट बघत उभा होता.
संचित जवळ येताच सागरने त्याच्या पाठीवर हात ठेवला.
" मित्रा , विसरून जा त्या पेंटिंग बद्दल , जे झालं ते झालं " सागर संचित कडे बघत म्हणाला. संचित मात्र शून्यात नजर लावून बघत होता.
" हे घे " सागरने आपल्या पँटच्या खिशातून मद्याची छोटी बाटली काढून संचित समोर धरली. संचितने काही वेळ विचार करत त्याच्या हातातून बाटली घेतली आणि झाकण खोलून एक सीप घेतला. जयप्रकाश यांनी देखील सागरने ऑफर केलेली बाटली घेऊन एक सीप घेतला.
" संचित , मला तर वाटते आहे की यामागे वॉलसन यांचा हात असू शकतो , मला तशी शंका आहे " जयप्रकाश एक सिप घेत म्हणाले.
" ज्याचा कोणाचा हात असेल तो जर सापडला तर मी त्याला सोडणार नाही " संचित शांत आवाजात दात ओठ खातात म्हणाला.
" बाबा , पण तुम्हाला का वाटत की यामागे वॉलसन असतील , कारण ते तर पूर्ण वेळ आपल्यासोबतच होते , आणि ते आपल्याला मदत करायला ही तयार होते , हा पण नंतर जे झालं ते चुकीचं होत " सागर जयप्रकाश यांच्याकडे बघत म्हणाला.
" सागर , त्यांनी नंतर संचितसोबत वाद घातला , यावरूनच मला त्यांच्यावर संशय आहे , आणि तुम्हाला माहीत नसेल , पण वॉलसन यांचे भारतातील कित्येक मोठमोठ्या कलाकारांशी वाद आहेत , अनेक कलाकारांशी त्यांनी वाद घातलेला आहे आणि याला मुख्य कारण म्हणजे त्यांना भारताविषयी असणारा द्वेष " जयप्रकाश सागर आणि संचितकडे बघत म्हणाले.
" भरतीयांबद्दल द्वेष ? का ? " संचित प्रश्नांकित नजरेने जयप्रकाश यांच्याकडे बघत म्हणाला.
" बरीच जुनी गोष्ट आहे , जवळजवळ 10 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. तेव्हा देखील असाच एक लिलाव लंडन मध्ये आयोजित करण्यात आलेला होता. आणि तो लिलाव जगभरातील सर्वात मोठा लिलाव समजला जातो , त्या लिलावात आपल्या देशातून 5 चित्रकार निवडले जातात , आणि त्यांपैकीच मी एक होतो. आणि वॉलसन अमेरिकेतील चित्रकारांपैकी एक होते. लिलाव सुरू असताना वॉलसन यांनी भारतीय चित्रकार रामविलास उपाध्याय , जे त्यावेळी भारतातील उत्कृष्ट आणि माझे आवडते कलाकार होते , त्यांच्या पेंटिंग ची अवहेलना केली. " बोलत असताना जयप्रकाश यांच्या चेहऱ्यावर दुःख पसरलेले दिसत होते.
" आणि उपाध्याय यांना ते सहन झाले नाही , त्यांनी सर्वांसमोर वॉलसन यांच्या सोबत वाद घातला , आणि नंतर उपाध्याय यांची पेंटजनग वॉलसन यांच्या पेंटिंग पेक्षा दुप्पट किमतीत विकल्या गेली , यामुळे वॉलसन प्रचंड संतापले आणि त्यांनी थेट लिलाव आयोजित करणाऱ्या संघटना भारतीयांच्या पेंटिंग विकल्या जाण्यासाठी खरेदी करणाऱ्यांना आर्थिक लाच देतात असा खोटा आरोप केला , तेव्हा वॉलसन यांच्यावर प्रचंड आरोप झाले , मात्र अमेरिकन चित्रकार यांनी वॉलसन यांना पाठींबा देत , थेट उपाध्याय यांच्यावर आरोप लावले. आणि यामुळेच वॉलसन आणि भारतीय कलाकारांचे पटत नाही. " जयप्रकाश यांनी जे घडले होते ते सागर आणि संचितला सांगितले. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होते.
" पण मग वॉलसन या लिलावाला का आले ? त्यांचा जर भारतीय कलाकारांना विरोध आहे , मग त्यांनी लिलावात तरी का सहभागी व्हावे ? " सागर प्रश्नांकित नजरेने जयप्रकाश यांच्याकडे बघत म्हणाला.
जयप्रकाश यांनी एक सिप घेत चेहऱ्यावर हलके स्मित केले.
" आपण जरा तेथे बसूया " जयप्रकाश बाजूला असलेल्या बाकड्याकडे हात करत म्हणाले. जयप्रकाश यांनी बाकड्यावर बसत वर आकाशाकडे बघत निश्वास सोडला. संचित आणि सागरही त्यांच्या बाजूला बसले.
" तुझे म्हणणे बरोबर आहे सागर , पण वॉलसन यांना भारतीय कलाकारांसमोर मोठेपणा दाखवायचा होता , आणि म्हणूनच ते या लिलावसाठी आले. आणि म्हणूनच त्यांनी संचितची पेंटिंग गायब केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही , पण आपल्याकडे पुरावा असल्याशिवाय आपण पण काही करू शकत नाही. " जयप्रकाश आकाशकडे बघत म्हणाले.
" काका " संचित खाली मान घालून बोलत होता. जयप्रकाश त्याच्याकडे पाहू लागले.
" मला सर्वात आधी अमन सिंग वर संशय आहे " संचित शून्यात बघत म्हणाला. जयप्रकाश यांच्या चेहऱ्यावर मात्र गंभीर भाव पसरले.
" अमन ? मला समजत नाही तुला अमन का दोषी वाटतोय , त्याचा आणि तुझा काही संबंध तरी आहे का ? " जयप्रकाश रागात संचित कडे बघत म्हणाले.
" खूप जुना संबंध आहे " संचित जयप्रकाश यांच्याकडे बघत म्हणाला.
" कसा ? " जयप्रकाश संचितच्या डोळ्यात बघत म्हणाले.
संचितने दीर्घ श्वास सोडत सागरकडे पाहिले. सागरलाही लक्षात आले की मघाशी संचित त्याला अमन बद्दल सांगता सांगता राहिला होता.
" काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे " संचित सांगू लागला , मात्र मधेच सागर फोन वाजला. त्याने खिशातून मोबाईल काढून स्क्रीनवर नाव पाहिले आणि उठून बाजूला निघून गेला.
" अमन आणि मी एकाच कॉलेजला होतो , पहिले जवळचे मित्र मात्र नंतर वैरी.." संचित समोर बघत म्हणाला.
" पण मग असे काय झाले की तु त्याचा इतका द्वेष करतो ? " जयप्रकाश संचितकडे बघत म्हणाले.
" त्याने एका स्पर्धेसाठी मला पेंटिंग बनवून द्यायला लावली होती , मात्र मी नकार दिला.....कारण मला ते योग्य वाटले नाही , आज नंतर यामुळेच आमची मैत्री तुटली.....मी त्यांनतर अनेक वेळा त्याच्याशी मैत्री करायचा प्रयत्न केला , मात्र त्याने त्याच्या मनात माझ्याविषयी तीव्र द्वेष होता , आणि त्यामुळेच मलाही त्याच्याविषयी तिरस्कार वाटू लागला. " संचित बोलुन थांबला. जयप्रकाश मात्र शून्यात नजर लावून बसले.
" हं....पण मला एका गोष्टीचा आनंद वाटतो , त्याने चित्रकारितेमध्ये फारच प्रगती केली.....आणि.....आणि मला एक प्रतिस्पर्धी मिळाला. " संचित चेहऱ्यावर हलकेसे स्मित करत म्हणाला.
" हम्म , पण जेवढं मी अमन ला ओळखतो , मला नाही वाटत तो अस काही करेल , मात्र त्याच्यावर संशय राहीलच " जयप्रकाश म्हणाले.
" पण जो कोणी यामागे असेल तो फारच चतुर असणार , सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्ड डिलीट करणे , एवढे कर्मचारी असूनही पेंटिंग गायब करणे आणि तेही सभागृहाच्या बाहेर ! हे सगळं नक्कीच मोठा प्लॅन करून करण्यात आलेल आहे " जयप्रकाश म्हणाले.
" हम्म , पण हे जे कोणी केले असेल त्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी , वेळ प्रत्येकाची येते , एक दिवस त्याच्यासोबतही असेच काही घडेल " संचित दुःखी होत म्हणाला.
" धीर नको सोडू , नक्कीच त्या राक्षसाला देव शिक्षा देईल " जयप्रकाश त्याला धीर देत म्हणाले.
तेवढ्यात तिथे आकाश आला.
" बाबा , आपण निघायला पाहिजे , उशीर झालाय " सागर जयप्रकाश यांच्याकडे बघत म्हणाला.
" अरे , बराच उशीर झालाय " जयप्रकाश घड्याळ बघत म्हणाले.
" चल संचित , जास्त विचार करू नको " जयप्रकाश संचितच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.
" हम्म " म्हणत संचित त्यांच्याबरोबर गेल. पार्किंगमध्ये आल्यावर संचित गाडीचे दार उघडणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने मोबाईल काढून स्क्रीनवर नाव पाहिले. त्याच्या बाबांचा फोन होता. त्याने फोन कट केला.
" कोणाचा फोन होता ? " सागरने संचितकडे बघत विचारले.
" बाबांचा , मी त्यांच्याशी बोलायच्या मूडमध्ये नाही " संचित सागरकडे बघत म्हणाला.
" हम्म......गाडी आता मी चालवतो , तू मागे बस " सागर संचितला म्हणाला. संचितने काहीच प्रतिक्रिया न देता गाडीचे मागचे दार उघडले. त्याने जयप्रकाश यांच्याकडे पाहिले , ते लांब उभे राहून फोनवर कोणाशी तरी बोलत होते. संचित गाडीमध्ये जयप्रकाश यांची वाट बघत बसला.
काही वेळाने जयप्रकाश गाडीत येऊन बसले.
" चल सागर , हे मित्र एकदा बोलायला लागले की...." जयप्रकाश हसत संचित कडे बघत म्हणाले. संचित कसबस हसला. सागरने गाडी सुरू केली.
-------------------------------------------------------------------
वर्तमान

जयंत गाडी चालवत सागर काय सांगतो ते लक्ष देऊन ऐकत होता.
" पण जर तुला अमन बद्दल काही कल्यू होता तर पाहिले का नाही सांगितलं " जयंत सागरकडे रागाने बघत म्हणाला.
" तुला सांगितलं ना , मला अमन बद्दल जास्त काही माहीत नव्हतं , आता आकाशने त्याच नाव घेतल्यावर माझ्या लक्षात आले " सागर म्हणाला.
" आणि वॉलसन , त्यांच्या बद्दल ? " जयंत रागाने बोलत गाडी चालवत होता. सागर मात्र खजील झाला. आपल्याला एवढ्या गोष्टी माहीत असूनही त्या वेळेवर आठवल्या नाहीत या भावनेने सागरला वाईट वाटले. जयंतला आता मात्र कल्यू मिळाला होता. त्यामुळे पुढे काय करायचे याचे त्याच्या डोक्यात चक्र फिरू लागले.
" आता पुढे काय ? " सागरने जयंतकडे बघत विचारले.
" उद्या सकाळी पहिले अमनला गाठायचा , त्यांनतर पुढचा तपास.... " जयंत गाडी चालवत म्हणाला.

दुसऱ्या दिवशी ,
सागर त्याच्या खोलीत झोपलेला होता. सूर्यप्रकाशाची बारीकशी किरणे त्याच्या चेहऱ्यावर पडली. तसा त्याचा फोन व्हायब्रेट झाला. सागरने त्याच्या उशाजवळील फोन हातात घेऊन किलकिल्या डोळ्यांनी पाहिले. जयंतचा फोन होता. सागरने फोन कट केला आणि डोळे चोळत उठला. काही वेळाने पुन्हा त्याचा मोबाईल व्हायब्रेट झाला. सागरने पुन्हा फोन हातात घेऊन स्क्रीनवर पाहिले. जयंतचा मेसेज होता. सागरने मेसेज ओपन करून पाहिला.
" दहा वाजता तुला घ्यायला येतो , तयार रहा " अशा मजकुराचा मेसेज होता. सागरने मोबाईल वर वेळ पहिली 9:03. वेळ बघून सागर ताडकन उठून आवरू लागला.

इकडे जयंत पोलीस स्टेशनला साळवें च्या केबिनमध्ये त्यांची वाट बघत बसला होता. त्याच्या डोक्यात अनेक विचारांचे थैमान सुरू होते. अमन च खरा गुन्हेगार असेल का ? की वॉलसन यांचा यामागे हात असेल ? असे अनेक विचार त्याच्या मनात चालू होते. तो विचारांच्या गुंगीत असतानाच साळवें आत आले.
" गुड मॉर्निंग सर " साळवें त्याच्या खुर्चीत बसत म्हणाला.
" हम्म " जयंत विचारांच्या तंद्रीतुन बाहेर येत म्हणाला.
" काय सर , काय माहिती मिळाली ? " साळवें जयंतकडे बघत म्हणाले.
" हम्म , बरीच महत्वाची माहिती मिळालीय " जयंत साळवें कडे बघत म्हणाला.
" काय सर ? के महिती मिळाली ? " साळवें जयंतकडे बघत म्हणाले.
" पहिले तुम्ही सांगा , तुमच्या हाती काही लागले का ? " जयंत साळवें कडे बघत म्हणाला.
" सर , आता तरी संचितचे कोणत्या तरी चित्रकारांबरोबर वाद होते , एवढंच कळलं आहे , पुढचा तपास अजून चालू आहे " साळवें म्हणाले.
" आणि मीडियाच काय , बाहेर तर मिडियावाल्यांनी पोलीस स्टेशन घेरून ठेवलं आहे. " जयंत म्हणाला.
" त्यांना रोज रोज तेच उत्तर देऊन वैताग आलाय , रोजची कटकट " साळवें हात झटकत वैतागाणे म्हणाला.
" हम्म , मला एक महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे " जयंत मागे खुर्चीवर आरामात बसत म्हणाला.
" काय माहिती मिळालीय " साळवें टेबलवर हात ठेवत उत्सुकतेने म्हणाला.
" ते मी तुम्हाला आता सांगू शकत नाही , मी त्याचा तपास करीन , तुम्ही फक्त एक काम करा " जयंत साळवें कडे बघत म्हणाला. साळवें मनातून चिडलाच , एक तर तपास पुढे जात नाही , आणि हा माणूस माहिती मिळाली तरी आपल्याला सांगत नाही या विचाराने साळवें चिडला.
" कोणतं काम ? " साळवेने चेहऱ्यावर राग न दाखवता प्रश्न केला.
" तुम्ही अमन सिंग या प्रसिद्ध चित्रकाराची महिती काढा , त्याचे कोणत्या गुन्हेगारांशी संबंध होते का , आणि त्याच्या ओळखीतील लोकांची माहिती काढा " जयंत म्हणाला.
" अमन सिंग ? हा कोण ? आणि त्याचा या केसशी काय संबंध ? " साळवेंनी प्रश्न केला.
" तुम्ही फक्त मी सांगितलेलं काम करा , बाकीच नंतर कळेलच " जयंत म्हणाला.
" हो " साळवें म्हणाला.
" ठीक आहे , येतो मी " जयंत खुर्चीतून उठत म्हणाला.
साळवें त्याच्याकडे बघत राहिला.
जयंत बाहेर येताच मीडियाने त्याला घेरले , मात्र त्यांच्या एकही प्रश्नाला उत्तर न देता जयंत कसाबसा गर्दीतून बाहेर पडला. आणि गाडी काढून सागरच्या घराकडे निघाला.

सागर आवरून जयंतची वाट पहात बसला होता. त्याचे वडील (जयप्रकाश) हॉलमध्ये सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत बसले होते. सागर त्यांच्यासमोरील सोफ्यावर बसला.
" सागर , संचितच्या केसचा काही तपास ? " जयप्रकाश सागरकडे बघत म्हणाले. सागर काहीवेळ काहीच बोलला नाही.
" बाबा , मलातरी असा संशय आहे की , काही वर्षांपूर्वी संचितची पेंटिंग गायब करण्यात आली होती , त्याचा या प्रकरणाशी संबंध असू शकतो " सागर म्हणाला.
" हं....मलाही तेच वाटते , पण माझ्या माहितीप्रमाणे तरी , यात अमेरिकन चित्रकारांचा हात असू शकतो , मी तुला पहिलेच सांगितलं आहे जॉन वॉलसन यांच्याबद्दल...." जयप्रकाश गंभीर आवाजात म्हणाले.
" हम्म " म्हणत आकाश काहीतरी विचारात गुंतला.
" ते कोणीही असो....पण जो कोणी असेल त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे , संचितचा खुनी पकडला गेलाच पाहिजे.....आणि त्यासाठी मला तुझ्यावर आणि जयंत वर पूर्ण विश्वास आहे." जयप्रकाश दुःखी होत सागरकडे बघत म्हणाले.
" नक्कीच , संचितचा खुनी लवकरच पकडला जाईल बाबा...धीर ठेवा " सागर जयप्रकाश यांना धीर देत म्हणाला.
तेवढ्यात त्याचा फोन वाजला. जयंतचा मिस्ड कॉल होता.
" येतो बाबा " म्हणत सागर घरातून बाहेर पडला.
बाहेर जयंतची गाडी उभी होती. सागर दार उघडून आत बसला. जयंतने सागरकडे पाहिले , तो थोडा दुखावलेला दिसत होता.
" काय झालं ? तुझा चेहरा का पडलाय ? " जयंत ने सागरकडे बघत विचारलं.
" काही नाही रे संचित ची आठवण झाली " सागर दुःखी स्वरात म्हणाला. जयंत ने त्याच्या कडे पाहिले. सागरच्या बोलण्याने त्याला देखील संचितची आठवण झाली. मात्र तो लगेच भानावर आला.
" आपण त्याच्या खुन्याला शोधून शिक्षा करणे , हेच आता आपल्या हातात आहे , आणि तेच आपल्याला करायचंय " जयंत सागरकडे पाहत म्हणाला. सागरने "हं" करत जयंतकडे पाहिले. जयंतने गाडी चालू केली.
काही वेळाने जयंतची गाडी एका मोठ्या आलिशान बंगल्यासमोर येऊन थांबली. सागरने गाडीतून उतरत गेटबाहेरील पाटीवर नाव वाचले. ' स्वीट होम ' आणि खाली अमन सिंग असे मोठ्या अक्षरात लिहिले होते. जयंत ने पती वाचत घरावरून नजर फिरवली. राजेशाही महाल वाटावा , एवढे आलिशान घर दिसत होते.
" च्यायला , मोक्कार हौशी माणूस दिसतोय , एवढा आलिशान बंगला...." सागर बंगल्यावरून नजर फिरवत म्हणाला.
" हम्म , चल चौकशी केल्यावर समजेलच किती हौशी आहे ते " जयंत गेटमध्ये शिरत म्हणाला. गेटमध्ये वॉचमन खुर्चीत बसून होता. जयंतने त्याच्या कडे पाहिले , वॉचमन त्यांच्याकडे संशयाने बघत होता. सागर आजूबाजूला बघत होता बाजूला पार्किंग मध्ये दोन मोठ्या कार उभ्या होत्या. आजूबाजूची फुलझाडे आणि सुंदर बाग न्याहाळत दोघेही दरवाज्याजवळ आले. जयंत ने पुढे होत बेल वाजवली. दरवाजा उघडल्यावर समोर एक गावाकडील वेशातली व्यक्ती उभी होती. घरातील नोकर असावा , हे जयंतच्या लक्षात आले.
" कोण ? " त्या नोकराने प्रश्न केला.
" आम्ही पोलिसांकडून आलो आहे , आम्हाला अमन यांना भेटायचे आहे " जयंत म्हणाला.
" या या , तुमी बसा म्या सायबांना बोलावून आणतो " नोकराने सोफ्याकडे हात करत त्यांना बसण्यास सांगून आतल्या खोलीत गेला. जयंत आणि सागर सोफ्यावर बसले. घर जसे बाहेरून आलिशान दिसत होते तसेच आतूनही होते....हॉलमध्ये तीन मोठे सोफा , समोर भलामोठा स्मार्ट टीव्ही , भिंतींवर काही पेंटिंग्स , आणि वर भलामोठा झुंबर....यावरूनच श्रीमंतीची प्रचिती येत होती.
सागर आणि जयंत घर न्याहाळत बसले होते. तेवढ्यात मघाचाच नोकर आतल्या खोलीतून बाहेर आला.
" साहेब येत्यात , जरा वेळ दम काढा " नोकर त्याच्या गावाकडील भाषेत म्हणाला.
" बलवंत , हे कोण ? " आतल्या दुसऱ्या खोलीतून येत एक महिला नोकरकडे बघत म्हणाली.
" हे , सायबांना भेटाया आल्यात , साहेब येत्यातच " नोकर अदबीने त्या महिलेला म्हणाला.
त्या महिलेने नोकराला ' जा ' असं मानेनेच खुनावल. तो नोकर निघून गेला.
" आपण कोण ? काय काम आहे " त्या महिलेने दोघांकडे बघत प्रश्न केला.
" मी....मी सागर पाठक आणि हे जयंत नवले , हे डिटेक्टिव्ह आहेत , आम्ही संचित शर्मांच्या खुनाची चौकशी करायला आलोय " सागर म्हणाला.
" संचित शर्मा.....तेच ज्यांचा काही दिवसांपूर्वी खून झाला " ती महिला सागरकडे बघत म्हणाली.
" हो तेच , त्यांच्याच खुनासंदर्भात अमन यांच्याकदे चौकशी करायचीय " जयंत त्या महिलेकडे बघत म्हणाला.
" हो पण त्यांच्या खुनाचा आणि अमनचा काय संबंध ? " ती महिला बाजूच्या सोफ्यावर बस्त म्हणाली.
" संबंध आहे की नाही ते चौकशी नंतर कळेलच " जयंत शांत आवाजत म्हणाला.
" माफ करा , पण आपण ? " सागरने त्या महिलेकडे बघत विचारले.
" अं....मी अमन यांची पत्नी मोनिका सिंग " ती महिला म्हणाली.
" कोण आहे मोनिका ? " आतल्या खोलीतून येत अमनने त्याच्या पत्नीकडे पाहत विचारले.
" या बसा , आपली चौकशी करायची आहे " त्याच्या पत्नीने काही बोलण्याआधीच जयंत अमनकडे बघत म्हणाला. अमन ने सागर कडे पाहिले. तसे त्याच्या चेहऱ्यावर काहीच समजत नसल्याचे भाव पसरले.
" चौकशी कसली ? आणि सागर तू इतक्या दिवसांनी कशी आठवण काढली ? " अमनने मोठ्या आवाजात विचारले.
" पहिले बस अमन , मग बोलू " सागर म्हणाला.
अमन सोफ्यावर बसला. आणि त्याने त्याच्या पत्नीला ' जा ' अशी खून केली. त्याची पत्नी आतल्या खोलीत निघून गेली.
" बोला , आपण कोण ? आणि कसली चौकशी ? " अमनने जयंत कडे बघत विचारले.
" मी जयंत नवले , संचित शर्मांच्या केसमध्ये डिटेक्टिव्ह म्हणून काम करतोय " जयंत अमन कडे बघत म्हणाला.
संचितचे नाव ऐकताच अमन च्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव पसरले. जयंतच्या नजरेने ते लगेच हेरले.
" संचित शर्मा ? त्याच्या खुनाचा आणि माझा काय संबंध ? आणि सागरलाही माहीत आहे , त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही " अमन चढ्या आवाजात बोलत होता.
" तुमचा आणि संचित चा संबंध असणाऱ्या बऱ्याच गोष्टी आम्हाला कळल्या आहेत , तुम्ही आणि संचित एकाच कॉलेजमध्ये होतात , आणि तुमच्यामध्ये कशावरून वाद झाले ते ही आम्हाला कळले आहे " जयंत अमन कडे बघत म्हणाला. अमनच्या चेहऱ्यावर कपटी हास्य तरळले.
" तुम्हाला काय वाटते , एवढ्याश्या गोष्टीवरून मी दहा - पंधरा वर्षांनंतर खून करेल ? आणि जर तुम्हाला तसे वाटत असेल तर तुम्ही चुकताय मिस्टर नवले." अमन कपटी हसत म्हणाला.
" हो मला तसा संशय आहे , आणि सागरने सांगितलेल्या माहितीवरून तो संशय अजूनच बळावला आहे " जयंत म्हणाला.
" कसली माहिती ? " अमन सागरकडे बघत म्हणाला.
" पाच वर्षांपूर्वी एका लिलावात संचितची पेंटिंग गायब झाली होती , आठवत असेलच " सागर अमन कडे बघत म्हणाला.
" हो आठवतंय , मात्र माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही , आणि सागर तुला आठवतच असेल , संचितने माझ्यावर पेंटिंग गायब करायचा खोटा आरोप लावला होता. " अमन सागरकडे बघत म्हणाला.
" हम्म , कॉलेजमध्ये झालेल्या भांडणाचा बदला तुम्ही संचितची पेंटिंग गायब करून घेतला , आणि आता त्याचा खून केलात " जयंत अमनकडे रागाने बघत मोठ्या आवाजात म्हणाला.
" हे बघा मी तुम्हाला सांगितले माझा आणि संचितच्या पेंटिंगचाही काही संबंध नाही आणि त्याच्या खुनाशीही नाही , तुम्ही उगाच खोटा आरोप करू शकत नाही " अमन रागाने जयंतकडे बघत मोठ्या आवाजत म्हणाला.
" ठीक आहे तुमच्यावर विश्वास ठेऊयात , तपास करताना कळेलच खर काय ते " जयंत अमन च्या डोळ्यात बघत म्हणाला.
" अमन , खरा खुनी कोण आहे त्याला आम्ही लवकर शोधूच , पण ज्यांचा संचितशी संबंध आहे ते सर्वच संशयाच्या फेऱ्यात आहेत " सागर म्हणाला.
" ज्या दिवशी संचितचा खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात ? " जयंतने अमनला प्रश्न केला.
" कोलकताला , तिथे एका कार्यक्रमाला मला बोलावले गेले होते. विश्वास बसत नसेल ते फ्लाईट चे तिकीट बघू शकता " अमन जयंतच्या नजरेला नजर भिडवत म्हणाला.
" नाही , त्याची गरज नाही.....ठीक आहे येतो आता , पुन्हा गरज पडली तर भेट होईलच आपली " जयंत सोफ्यावरून उठत म्हणाला. अमनच्या चेहऱ्यावर पुन्हा कपटी हास्य उमटले.
" चल येतो अमन , भेटू लवकरच " सागर अमन कडे बघत म्हणाला. आणि बाहेर निघाला. अमन च्या चेहऱ्यावर मात्र कपटी हास्य कायम होते. जयंत आणि सागर बाहेर गाडीजवळ येऊन थांबले.
सागरने जयंतकडे पाहिले. ' आता पुढे काय ' हेच सागरला विचारायचे होते हे जयंतला समजले.
" मला नाही वाटत की अमन खून करेल " जयंत त्याच्या गाडीला टेकून उभं राहतं म्हणाला.
" का ? त्याच्याकडे बघून कोणालाही तोच खुनी वाटेल , आता तर मला त्याच्यावरचा संशय चांगलाच बाळावलाय " अमन रागात बोलत होता.
" मला त्याच्या बोलण्यावरून समजले , जर त्याने खून केला असता तर तो घाबरून बोलला असता , मात्र तो इतक्या आत्मविश्वासाने बोलत होता......मला नाही वाटत तो खुनी असेल " जयंत सागरकडे बघत म्हणाला.
" पण पेंटिंग गायब करण्यामागे तर त्याचा हात असू शकतो ना , ती शक्यता नाकारता येत नाही " सागर म्हणाला.
" आता जॉन वॉलसन यांच्याबद्दल माहिती काढावी लागेल , तुझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तेही यात सामील असू शकतात " जयंत म्हणाला.
" आणि अजून एक , आपल्याला संचितच्या भावकडेही चौकशी करावी लागेल , आपण त्याच्या घरी गेलो तेव्हा तो दिसला नाही.....कदाचित तो अजूनही दुःखात असावा." सागर म्हणाला.
" हा लक्षात आहे माझ्या , पण आता तरी वॉलसन यांच्याबद्दल चौकशी करणे जास्त महत्वाचं आहे " जयंत म्हणाला.
" पण त्यांच्याबद्दल कसा तपास करणार ? " सागर म्हणाला.
" त्यांच्या भारतातील मित्रांकडून , नक्कीच काहीतरी कळून मिळेल " जयंत आशावादी होत म्हणाला.
" हम्म , त्यासाठी माझे वडील नक्कीच मदत करतील " सागर म्हणाला.
" चल , तुझ्या घरी , तुझ्या वडिलांना भेटून काहीतरी अजून कळेलच " जयंत सागरकडे बघत म्हणाला.
सागरने मानेनेच होकार दिला. जयंत गाडीचे दार उघडून ड्रायविंग सीटवर बसला. सागर गाडीत बसताच जयंतने गाडी सुरू केली.
गाडी सागरच्या घरासमोर येऊन थांबली. दोघेही गाडीतून उतरुन दरवाज्यावर आले , सागरने बेल वाजवली. काहीवेळाने सागरच्या आईने दार उघडले. सागरच्या आईने दोघाना हसत हसत आत घेतले.
" आई , बाबा कुठे आहेत ? " सागरने त्याच्या आईकडे बघत विचारले.
" आतल्या खोलीत आहेत , तुम्ही बसा मी जेवायला वाढते "
सागरची आई जयंत कडे बघत म्हणाली.
" नाही नको काकू , जेवण नंतर , आता काकांशी काही महत्वाचं बोलायचं आहे " जयंत म्हणाला.
" चल " सागर जयंतला जयप्रकाश यांच्या खोलीत घेऊन गेला.
जयप्रकाश आपल्या खोलीत एक अल्बम बघत बसले होते. तेवढ्यात त्यांना समोर सागर आणि जयंत उभे दिसले.
" अरे जयंत , ये बस " जयप्रकाश बेडवरील अल्बमचा पसारा आवरत म्हणाले. "
जयंत बेडवर बसला. आकाशही त्याच्या बाजूला येऊन बसला.
" बाबा , कसले अल्बम पाहताय ? " सागरने विचारले.
" हं.......माझ्या आयुष्यातील अनेक प्रसंग कैद आहेत या अल्बम मध्ये , लहानपण , तारुण्य , वेगवेगळ्या स्पर्धा , अनेक कार्यक्रम या सर्वांच्या आठवणी या अल्बम मध्ये आहेत " जयप्रकाश जड आवाजात बोलत होते.
अल्बम बघून जुने दिवस आठवून ते भावुक झाले.
सागर त्याच्या वडिलांना पहिल्यांदाच एवढे भावुक झालेलं बघत होता. जयंतने त्याच्या पाठीवर हात ठेवला.
" संचित चा तपास कुठपर्यंत आला पोरा " जयप्रकाश यांनी डोळे पुसत जयंतला विचारले.
" त्याच्याच तापासासाठी मी तुमच्याकडे आलोय , मला तुमची मदत हवी आहे " जयंत म्हणाला.
" जे काही महत्वाचं आहे , ते सागरने तुला सांगितलंच असेल , त्याव्यतिरिक्त माझ्याकडे विशेष काहीच नाही " जयप्रकाश म्हणाले.
" ते सगळं मी जयंतला सांगितले आहे बाबा , पण आम्हाला अजून काही माहिती हवी आहे आणि त्यासाठी तुम्हीच आम्हाला मदत करु शकता " सागर म्हणाला.
" संचितच्या खुन्याला शोधण्यास लागेल ती मदत मी करेल , पण संचितला न्याय मिळालाच पाहिजे " जयप्रकाश भावुक होत म्हणाले.
काहीवेळ कोणीच काही बोलले नाही. जयप्रकाश यांनी डोळे पुसले. जयंत आणि सागर त्यांच्याकडे बघत होते.
" बोल काय मदत पाहिजे ? " जयप्रकाश जयंत कडे बघत म्हणाले.
" मला सांगा की , वॉलसन यांची भारतातील कोणत्या कलाकारांशी घट्ट मैत्री होती ? आणि तुम्हाला वाटते की संचितच्या खुनामागे ते असतील ? " जयंतने जयप्रकाश यांच्याकडे बघत विचारले.
" संचितच्या खुनामागे वॉलसन असतील नसतील ते मला माहित नाही , पण त्याची पेंटींग चोरण्यामागे नक्कीच त्यांचा हात असनार हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो " जयप्रकाश बोलताना त्यांच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता.
" आणि वॉलसन यांच्या सर्वात जवळचा मित्र हा अनिरुद्ध त्रिपाठी , तो मुंबईतच असतो " जयप्रकाश दोघांकडे बघत बोलत होते.
" ते दोघे घट्ट मित्र आहेत , जवळजवळ भावासारखेच...... अनिरुद्ध यांचे देखील अनेक भारतीय कलाकारांशी पटत नाही " जयप्रकाश म्हणाले.
" अनिरुद्ध आणि संचितचे काही संबंध ? " सागरने विचारले.
" नाही.....अनिरुद्ध आणि संचितचा फार काही संबंध नाही , आणि मी देखील त्याला काही जास्त ओळखत नाही " जयप्रकाश बोलत होते.
" त्याच्या व्यतिरिक्त वॉलसन यांच्या जवळ असे कोणीही नव्हतेच " जयप्रकाश म्हणाले.
" चला येतो मी , संचितच्या खुन्याला लवकरात लवकर शोधून काढेलच " जयंत दृढ निश्चयी आवाजात म्हणत बेडवरून उठला. आणि खोलीबाहेर गेला , सागरने त्याच्या वडिलांकडे पाहिले , त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होते.

इकडे जयंत सागरच्या घराबाहेर त्याच्या गाडीजवळ येऊन उभा राहिला. त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरूच होते.
" आता पुढे काय ? " सागरच्या आवाजाने जयंत भानावर आला.
" अं.....तोच विचार करतोय , त्या अनिरुद्धला ही भेटणे गरजेचे वाटते , त्याच्यावर देखील संशय आहे " जयंत म्हणाला.
" पण...." जयंत बोलत होता.
" पण काय ? " सागर म्हणाला.
" मला काहीतरी सुटल्यासारखं वाटतंय , आपण आतापर्यंत इतक्या जणांची चौकशी केली , पण प्रत्येक चौकशीत एखाद नवीन नाव समोर येतंय , आणि पुन्हा चौकशी ! मला नाही वाटत की नुसतच चौकशी करून आपण खुन्यापर्यंत पोहचू , काहीतरी पुरावा किंवा कोणतीतरी लिंक सापडलीच पाहिजे " जयंत विचार करत बोलत होता.
" पण , आपल्याला अजून पर्यंत काही कल्यू सापडलाच नाहीये , यामुळे चौकशी करण्याखेरीज आपण काहीच करू शकत नाही " सागर म्हणाला.
" सागर , तू अनिरुद्ध बद्दल माहिती काढ , त्याचे कोणाशी संबंध होते आणि त्याच्या विरोधात कोण होते ते सगळंच , मी आता निघतो " जयंत सागरकडे बघत बोलून गाडीत बसू लागला.
" पण....तू कुठे चाललाय ? " सागरने जयंतला प्रश्न केला.
मात्र जयंत लगबगीने गाडी चालू करून काहीच न बोलता निघून गेला. सागर मात्र जयंत च्या मनात काय चालू असेल या विचारात पडला.

जयंतने गाडी चालवत असतानाच कोणालातरी फोन लावला.
" साळवें " जयंत गाडी चालवत फोन कानाला लावत बोलत होता.
" सर , बोला " साळवें अदबीने म्हणाला.
" सर , अमन सिंग ची माहिती काढण्यास खबऱ्यांना सांगितले आहे....आणि...."
" साळवें , ते सोडा , तुम्ही आताच्या आता संचितच्या घरी पोहोचा , मी येतो लगेच " जयंत साळवेंनी वाक्य पूर्ण करायच्या आधीच मोठ्याने बोलला.
" संचितच्या घरी ? का , काय झालं सर ? " साळवेंनी जयंतला विचारले.
" तुम्ही तिथे पोहोचा , मग समजेल " जयंतने मोठ्या आवाजात बोलून फोन कट केला.
साळवें ताडकन काही हवालदार सोबत घेऊन निघाले.

अमन त्याच्या खोलीमध्ये घुटमळत होता. त्याने रागारागाने फोन हातात घेतला. आणि कोणालातरी फोन लावला.
" माझ्याबद्दल पोलिसांना आणि त्या पागल सागर आणि त्याच्या सोबतच्या **या डिटेक्टिव्हला माझ्यावर संशय आलाच कसा , आणि हे बघा मी तुम्हाला सांगतोय मला माझे पैसे पाहिजे , नाहीतर मी सगळं खरं सांगितलं तर तुम्ही , मी आणि बाकीचे सगळे जेलमध्ये जाऊ , हे लक्षात असुद्या " अमन रागारागाने फोनवर बोलत होता.
समोरची व्यक्ती काही बोलणार इतक्यात अमनने फोन कट केला. अमनच्या चेऱ्यावर राग आणि पश्चाताप अशी संमिश्र भावना पसरली.

इकडे जयंत संचितच्या घराबाहेर कार लावून घाईघाईत आत जाऊ लागला. तो आत जाताना मिडियावाले हातात माईक घेऊन प्रश्न विचारत मागे जाऊ लागले. मात्र त्यांच्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता तो थेट आत गेला. जयंत मध्ये येताच साळवें लगबगीने पुढे आला. साळवें काही बोलणार इतक्यात.....जयंत साळवें कडे न बघताच घरात शिरला.....आपल्याला काही किंमतच नाही अशी भावना साळवेंच्या मनात आली....मग साळवें देखील जयंतच्या मागोमाग आत शिरले..
जयंत थेट संचितच्या ड्रॉईंगरूम मध्ये शिरला...आणि त्याच्या ड्रॉईंग टेबलच्या कप्प्यांमध्ये काहीतरी शोधू लागला....
" सर , काय झालं.... काय शोधताय ? " साळवें जयंतकडे आश्चर्यकारक नजरेने बघत म्हणाले.
" डायरी....साळवें तपासणीदरम्यान डायरी सापडली ? " जयंत चिंताग्रस्त नजरेने साळवें कडे बघत म्हणाला.
" डायरी ? नाही सर , पूर्ण घरात कुठेही अशी डायरी नाही मिळाली.....! आपण कोणत्या डायरी बद्दल बोलताय ? " साळवें बाकीच्या हवालदाराकडे बघत म्हणाला.
यावर जयंत मात्र काहीच बोलला नाही....तो कमरेवर हात ठेऊन काहीतरी विचार करू लागला...साळवें आणि बाकीचे हवालदार काय चाललंय आशा अविर्भावात उभे होते.....काहीवेळाने जयंतने काहीतरी आठवल्यासारखे ताडकन उजव्या बाजूच्या भिंतीवर असणाऱ्या छोट्या आरशाकडे पाहिले...जवळ जाऊन त्याने अलगद खिळ्यात लावलेला आरसा अलगद काढला....त्याने हळूच मागच्या बाजूने आरसा ओपन केला......आणि त्याच्या चेहऱ्यावर त्याला जे पाहिजे होते ते सापडले असल्याचे भाव पसरले.....त्याने हळूच आरशात ठेवलेली छोटीशी डायरी बाहेर काढली....आणि आरसा बाजूला ठेवला.....बाकीचे सगळे मात्र काहीच उमजत नसल्यासारखे उभे होते.....जयंतने डायरी उघडुन पाहिली....' संचित शर्मा..... पर्सनल डायरी 2020 ' असा मजकूर पहिल्या पानावर होता.....जयंत ने बाकीची पाने चाळून पहिली , मात्र त्याच्यावर रोजच्या कामाव्यतिरिक्त अजून कसल्याही नोंदी नव्हत्या...जयंत ने पुढची पाने पलटली....आणि त्यावरचा मजकूर वाचून त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि आश्चर्य असे मिश्रीत भाव पसरले....' 1 मार्च - आज मला माझी सर्वात आवडती पेंटिंग गायब करण्यामागे कोण होतं ते कळाल....उद्या मी माझा बदला पूर्ण करणार , धन्यवाद सुजाता पाटील ' असा मजकूर त्या पानावर होता...
" सुजाता पाटील.....ही कोण ? साळवें.....सुजाता पाटील कोण ? " जयंत साळवें कडे बघत म्हणाला...त्याच्या डोळ्यात काहीतरी मोठी गोष्ट होती लागल्याचे भाव होते...
" सुजाता पाटील ? ही तर......म्हणजे.....या...मोठ्या मोठ्या चित्रकार आहेत....यांची देखील चौकशी केलीये....पण त्यांचा आणि संचितचा काही संबंध नाही , अस त्या स्वताच म्हणाल्या..." साळवें घाबरत म्हणाला.
" त्या कुठे असतात ? " जयंत ने प्रश्न केला
" मुंबईतच असतात , पण काय झाल.....सर ? " साळवें अजूनही घाबरत बोलत होता....
" साळवें त्यांचा पत्ता मेसेज करा....मला आताच्या आता जावं लागेल.." जयंतने लगबगीने खिशातून फोन काढुन त्या डायरीच्या पानाचा फोटो काढला , आणि ताडकन बाहेर पडला....पुन्हा एकदा मिडियावाल्यांनी त्याला घेरण्यास सुरुवात केली.....मात्र यावेळेस सुद्धा तो पाहूच न बोलता लागबगीने गाडीत बसला , आणि गाडी सुरू केली....

" हवालदार मोरे , सुजाता पाटील यांचा पत्ता ताबडतोब पाठवा " साळवेंनी फोनवर सांगितलं....आणि त्यांनी ती डायरी हातात घेत त्यावरचा मजकूर वाचला...आणि जयंतचा खुनी जयंतला जवळजवळ सापडलाच असे त्यांच्या मनात आले.

जयंत रस्त्याच्या कडेला उभा राहून बाटलीने पाणी पीत उभा होता. त्याच्या मनात अजूनही विचार चालू होता.. सुजाता पाटील चा आणि संचित चा के संबंध असेल ? संचितने डायरीमधी बदला घेईन असं लिहिलेलं , त्याचा अर्थ काय ? अशे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात चालू होते....मधेच त्याच्या मोबाईलवर नोटेफिकेशन आले..जयंत ने मोबाईल हातात घेऊन पाहिले..साळवेंनी सुजाता पाटील यांचा पत्ता पाठवला होता...जयंतने पत्ता पाहून लगेच गाडीत बसत गाडी चालू केली...त्याची गाडी सुसाट वेगाने रस्त्यावरून धावू लागली..

काही वेळाने त्याची गाडी एका मोठ्या बंगल्याबाहेर येऊन उभी राहिली...त्याने गाडी गेटबाहेर लावून गेटजवळचा बोर्ड बघितला..' सुजाता पाटील , स्केच आर्टिस्ट ' ....
तो ताडकन आत शिरला...त्याने दारावरची बेल वाजवली...एका तरुण मुलीने दरवाजा उघडला..
" कोण ? " त्या मुलीने जयंतकडे बघत विचारले....
" सुजाता पाटील आहेत का ? " जयंत ने त्या मुलीकडे बघत विचारले..."
" हो आहेत , पण आपण कोण ? " त्या मुलीने पुन्हा विचारले.
" मी डिटेक्टिव्ह जयंत नवले , मला सुजाता यांच्याकडे काही चौकशी करायची आहे " जयंत म्हणाला...त्या मुलीच्या चेहऱ्यावर गंभीर भाव पसरले...
" अ...तुम्ही आत या...आई आहे घरात..." त्या मुलगी जयंतला आत घेत म्हणाली...जयंत हॉलमधील स्कफ्यावर बसला..ती मुलगी आतल्या खोलीत जाणार तेच समोरून एक महिला आली..
" काय गं ? हे कोण ? " त्या महिलेने जयंतवरून नजर फिरवत त्या मुलीला विचारले..
" यांना तुलाच भेटायचे आहे , तुम्ही बसा येथे , मी जाते " एवढे बोलून ती मुलगी घराबाहेर पडली....
" कोण आपण ? आणि मी तुम्हाला पहिल्यासारखे का वाटतेय ? " ती महिला काहीतरी आठवत म्हणाली...
" नक्कीच टीव्हीवर पाहिले असेल....मी डिटेक्टिव्ह जयंत नवले..."
" अरे हो हो......मी तुम्हाला सकाळीच टीव्हीवर पाहिले....आपण संचितच्या केसचा तपास करताय....पण आपण माझ्याकडे का आलात ? माझा आणि संचितची तशी ओळख सुद्धा नाही.." सुजाता जयंतकडे बघत म्हणाल्या..
" हो मी संचितच्या केसबद्दल विचारायलाच तुमच्याकडे आलोय...आपण आणि संचित कधी भेटला होतात ? " जयंत ने सुजाता यांच्या डोळ्यात रोखून पाहत विचारले.
" नाही....कधीच नाही " सुजाता अडखळत बोलल्या..हे जयंतने लगेच हेरले...
" खर सांगा , माझ्यापासून काहीही लपवू नका " जयंत अस म्हणताच सुजाता यांना घाम फुटला..
" मी खर बोलत आहे " सुजाता चाचरत म्हणाल्या...
" ठीक आहे , तर तुम्ही खर सांगणार नाहीत , पण एकदा हा फोटो बघा " जयंत खिशातून मोबाईल काढत म्हणाला...त्याने मोबाईल मध्ये सुजाता यांना काहीतरी दाखवले..तसा त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला...
" जर तुम्ही संचितला कधी भेटलाच नाहीत , मग संचित तुमचे नाव डायरीत का लिहिलं ? " जयंत रागाने सुजाताच्या डोळ्यात बघत मोठ्याने बोलत होता....सुजाता घामाने थरथर कापत होत्या..." मी संचितला भेटले नव्हते.....मी त्याला फोन केला होता..." सुजाता थरथरत बोलत होत्या..." कशासाठी फोन केला ? आणि तुम्ही त्याला पेंटिंबद्दल काय सांगितले ? कोण होते त्या पेंटिंगच्या घटनेमागे ? " जयंत ने सुजातावर प्रश्नांची सरबत्ती केली..." खर संगण्यासाठी...त्याची पेंटिंग गायब करण्यामागे कोण होते ते संगण्यासाठी...." सुजाता बोलताना अजूनही थरथरत होत्या...."
" पेंटिंग गायब करण्यामागे कोण होत , आणि संचितचा खून कोणी केला...हे सगळं खरं खर सांगा...नाहीतर खोट बोललात तर नंतर पस्तावण्याची वेळ येईल.." जयंत अत्यंत रागात बोलत होता...सुजाता मात्र अजूनही भितिने थरथर कापत होत्या.

जयंत त्याच्या रूममध्ये बेडवर काहीतरी विचारात पडलेला होता...सुजाता पाटील ने जे काही सांगितलं त्यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता...संचितसोबत एवढा मोठा विश्वासघात होईल असे त्याला कधीच वाटले नव्हते..त्याने आपल्या उशिशेजारील मोबाईल हातात घेतला..त्यावर सागराचा मेसेज आणि 2 मिस्ड कॉल होते...त्याने मेसेज ओपन करून पाहिला...
" कुठे आहे ? अनिरुद्ध बद्दल काही खास माहिती नाही...बाकीचं उद्या बोलू " मेसेज वाचून जयंत ने त्याला काहीतरी मेसेज केला..आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला.

दुसरा दिवस ,
सकाळचे आठ वाजलेले होते..जयंत आवरून निघण्याच्या तयारीत होता...त्याने कोणालातरी फोन लावला आणि बोलून झाल्यावर तडक घराबाहेर निघाला..

दुसरीकडे आकाश डोळे चोळत झोपेतून उठला..त्याने वेळ पाहण्यासाठी मोबाईल हातात घेतला...आठ वाजून तेरा मिनिट...आणि जयंतचा काहीतरी मेसेज होता...त्याने मेसेज ओपन करून पाहिला..." उद्या 9 वाजेपर्यंत तुझ्या घरी येतोय , खऱ्या गुन्हेगारांना घेऊन..." जयंतचा मेसेज वाचून सागर ताडकन उठला..आणि त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले..
आकाश आवरून हॉल मध्ये बसला होता , मात्र त्याच्या डोक्यात सतत विचार चालू होते...खरा गुन्हेगार कोण असेल आणि जयंत ने त्याला कसे पकडले ? या विचारांनी त्याच्या डोक्यात घर केले होते...तो विचारांच्या तंद्रीत असतानाच त्याचे वडील जयप्रकाश हॉल मध्ये वर्तमानपत्र घेऊन सोफ्यावर बसले...जयप्रकाश यांनी सागरकडे पाहिले...काहीतरी झाले आहे हे त्यांना समजले....मात्र ते सागरला काही बोलणार इतक्यात दारावरची बेल वाजली...सागर हळूच उठून दरवाज्याजवळ गेला आणि दार उघडले..समोर जयंत आणि त्याच्यासोबत काही हवालदार सुजाता , अमन यांना बेड्या टाकून घेऊन आले..सागरला काय ते समजले. त्याने काही न बोलता जयंतला घरात घेतले...त्याला बघताच जयप्रकाश उठून उभे राहिले...." गुड मॉर्निंग काका , आजचा दिवस फारच चांगला आहे " जयंत हसत म्हणाला....जयप्रकाश यांनी अमन आणि सुजाता यांना बेड्या घातलेल्या बघताच त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला..
" काय झालं काका , असे काय बघताय ? अहो , हेच आहेत संचितची पेंटिंग गायब करणारे महान कलाकार...हेच आहेत खरे गुन्हेगार...." जयंत मोठ्या आवाजात अमन आणि सुजाता कडे बघत म्हणाला...
त्याचा आवाज ऐकून सागर ची आई देखील हॉल मध्ये आल्या त्यांना देखील काय चालले आहे ते कळेनासे झाले.
" अ...पण...या को....कोण ? " जयप्रकाश अडखळत बोलत होते..." या कोण ? काका खोट बोलू नका....तुम्ही यांना चांगलंच ओळखता....हो की नाही..." जयंत मोठ्याने जयप्रकाश आणि सुजाता यांच्याकडे बघत म्हणाला....जयप्रकाश हाताने चेहऱ्यावरचा घाम पुसू लागले...." म्हणजे ? तुला म्हणायचे काय आहे जयंत आणि तू असा का बोलतोय ? " सागरला काय चाललंय ते कळेनासे झाले...
" तुला मी म्हणालो होतो खऱ्या गुन्हेगारांना घेऊन येईल , हेच आहेत ते ज्यांनी संचितची पेंटिंग गायब केली....आणि मला खात्री आहे की या तिघांपैकीच एकाने संचितचा खून केलाय " जयंत संतापाने बोलत होता...
" तिघांपैकी ? कोण तिघे ? " सागरला जयंत कोणा तिसऱ्या बद्दल बोलत आहे हे समजले नाही...
" अमन सिंग , सुजाता पाटील आणि.......जयप्रकाश पाठक....." जयंत जयप्रकाश यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलला...त्याच्या या वाक्यावर मात्र सागरचे डोकं सुन्न झाले...शेजारी उभी असणारी त्याची आई देखील सुन्न झाली... " काय ? तू माझ्या बाबांवर कसा संशय घेतो ? तुला समजतंय का तू कोणावर आरोप लावतोय ते.." सागर जयंतवर ओरडून बोलत होता.
" हे काय बोलतोय पोरा , तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना " सागरच्या आई जयंत वर ओरडत म्हणाल्या...
" तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नसेल , पण काकांवर विश्वास बसेल.....तर काका तुम्ही खर सांगताय का....तुम्हाला बोलतं करावं लागेल ? " जयंत हवालदारांकडे बघत म्हणाला...." जयंत हे जरा जास्त होतंय...बाबा , तुम्ही बोला सांगा , की हे सगळे खोटे आरोप आहेत....बोला तुम्ही गप्प का बसलायत...बोला..." सागर संतापाने जयप्रकाश यांच्याकडे बघत बोलत होता...मात्र जयप्रकाश शून्यात नजर लावून उभे होते.
" ठीक आहे आपण बोलणार नसाल तर.....अमन बोलेल " जयंत अमन कडे बघत म्हणाला....अमन रागाने जयंत कडे बघत होता...." बोला साहेब.....कबूल व्हा " जयंत अमन च्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला.
" हो...हे खरं आहे संचितची पेंटिंग चोरण्यामागे मी , सुजाता आणि जयप्रकाश आहोत...मात्र मी खर सांगतो , जयंतचा खून मी केला नाही...." अमन रागाने जयंतकडे बघत बोलत होता...सागर मात्र मानसिक धक्का बसल्यासारखा उभा होता....त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की त्याचे वडील इतका मोठा विश्वासगजात करू शकतात..." सागर....अमन बरोबर बोलतोय..." जयप्रकाश सागरकडे बघत म्हणाले...." मी माझा गुन्हा कबुल करतो , जयंत " जयप्रकाश यांच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसून येत होता.
" का ? बाबा का ? संचित ने काय बिघडवले होते तुमचे ? " सागर प्रचंड संतापाने बोलत होता..
" बदला , अमनचा आणि माझा " बोलताना जयप्रकाश यांच्या डोळ्यात राग दिसून येत होता.
" अमन आणि संचितबद्दल तर माहीत आहे , पण आपले आणि संचितचे काय वाकडे होते ? आणि कसला बदला ? " जयंत लालबुंद नजरेने जयप्रकाश यांच्याकडे बघत होता.
" संचित मुळेच मी एका मोठ्या स्पर्धेत पराभूत झालो होतो....ज्या स्पर्धेत 2 वर्ष मला कोणी हरवू शकत नाही त्या स्पर्धेत संचित सारखा तरुण मला हरवून जातो.....हे मला सहन झाले नाही..आणि अमन सोबत त्याचे जे काही वाद होते ते माहीत पडल्यानंतर तर मी ठरवलेच.....की संचितचा काटा काढायचा.... आणि म्हणून अमन आणि मी त्याची पेंटिंग चोरण्याचा प्लॅन केला..." जयप्रकाश बोलताना केलेल्या गुन्ह्याचा काहीच पश्चाताप त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत नव्हता..
" या अमन च्या म्हणण्यावरून तुम्ही इतका मोठा घात तुम्ही कसा करू शकता बाबा , लाज वाटते तुम्हाला बाप म्हणायची " सागरला जयप्रकाश यांचा प्रचंड राग आला होता...आपले वडील एवढा मोठा अपराध करू शकतात यावर त्याचा विश्वास करणे कठीण होते.
" पेंटिंग कशी गायब केली तेही सांगा , आणि सुजाता या मध्ये का आल्या ? " जयंत अमनकडे बघत म्हणाला.
" संचितची पेंटिंग पूर्वनियोजित प्लॅन ने गायब केली..सागर गार्डसोबत पेंटिंग हॉलमध्ये ठेऊन बाहेर आल्यानंतर मी संचितच्या पेंटिंग ठेवत असणाऱ्या दोन गार्ड्स ना बाजूला घेऊन पैशांची लालच दाखवून विश्वासात घेतले...आणि जयप्रकाश संचित आणि बाकीच्यांना मध्ये घेऊन गेल्यावर त्या गार्ड्स सोबत सुजाता यांनी ती पेंटिंग व्यवस्थित झाकून सभागृहापासून जवळच उभी केलेल्या सुजाता यांच्या गाडीत ठेवली....आणि सुजाता यांनी ती पेंटिंग त्यांच्या ड्रायव्हरला सांगून त्यांच्या घरी लपवली.." अमन ने एका दमात सगळे सांगून टाकले.
" आणि सीसीटीव्हीचे काय ? " जयंत अमन कडे बघत म्हणाला.
" त्या गार्ड्सनी सीसीटीव्ही ऑपरेटरला पैशांची लाच देऊन त्याच्या वडिलांच्या अपघाताच खोटं कारण सांगून निघून जाण्यास सांगितले....आणि कोणताही पुरावा राहू नये म्हणून जुने सीसीटीव्ही फुटेज सुद्धा क्लिअर करण्यास सांगितले....यामुळे आमच्यावर कोणालाही संशय आला नाही...संशय येऊ नये म्हणूनच जयप्रकाश यांनी वॉलसनवर खोटा आरोप लावला.." अमन पुन्हा एकदा दमात बोलला..
" मी त्याआधी मुंबईच्या एका कार्यक्रमात अमन आणि जयप्रकाश यांना संचितबद्दल बोलताना ऐकलं होतं , मात्र कोणालाही काहीही न सांगण्याच्या मोबदल्यात त्यांनी पेंटिंग विकून येणाऱ्या पैशांतून एक वाटा देण्याचे वचन दिले होते...मात्र ते त्यांनी पाळले नाही आणि म्हणूनच मी संचितला त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी सगळं खरं सांगितलं..." इतक्या वेळ गप्प असणाऱ्या सुजाता घाबरत बोलत होत्या.
" एवढे सगळे कबूल केलं आहे , तर हे पन सांगा की संचितची हत्याही तुम्हीच केली आहे ते " जयंत अमन कडे रोषाने बघत म्हणाला..
" नाही मी कोणाचीही हत्या नाही केली " सुजाता घाबरत म्हणाल्या.
" मी तुम्हाला पहिलेच बोललो आहे मी संचितच्या मृत्यूच्या दिवशी कोलकताला होतो " अमन म्हणाला.
" आपण कुठे होतात जयप्रकाश जी ? " जयंत जयप्रकाश यांच्याकडे बघत म्हणाला.
" संचितचा खून मीच केला आहे " जयप्रकाश हतबलतेने बोलत होते.." तो एक अपघात होता...त्या दिवशी सुजाताने सगळं संचितला सांगितलं त्यामुळे मला सुजाता च प्रचंड राग आला...त्याचदिवशी संचितने फोन करून मला त्याच्या घरी बोलावले होते...मात्र मला माहित होते की संचितला सर्व कळले आहे..म्हणून मी त्याला दुसऱ्या दिवशी येतो असे सांगितले...आणि दुसऱ्या दिवशी मी त्याच्या घरी माफी मागण्यासाठी गेलो होतो...मात्र...." जयप्रकाश मध्येच बोलायचे थांबले...त्यांना दरदरून घाम फुटला होता...त्यांच्या पत्नीने त्यांना सोफ्यावर बसवून पाणी दिले..शांत झाल्यावर जयप्रकाश पुढे सांगू लागले...

भूतकाळ
-------------------------------------------------------------
1 मार्च ( संचितच्या हत्येच्या आधीचा दिवस )

" मला माझा वाटा पाहिजे , तुम्ही काहीही करा पण मी माझा वाटा घेतल्याशिवाय राहणार नाही.. " सुजाता रागारागात फोनवर बोलत होत्या.
" मी तुम्हाला पेंटिंग विकून मिळालेल्या पेंटिंगमधून एक कवडीही देणार नाही , तुम्ही पाहिले आमच्या प्लॅन मध्ये नव्हता आणि आता जास्त पैसे मागता..तुम्हाला ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे मागू शकत नाहीत.." जयप्रकाश फोनवर चिडून बोलत होते.
" मी जास्त पैसे मागत नाहीये तुम्ही ज्यांना पेंटिंग विकली ते फर्ग्युसन मला स्वतःच बोलले आहेत की त्यांनी ती पेंटिंग 4 कोटी मध्ये घेतली आहे , आणि तुम्ही मला 3 कोटी सांगताय ! "
" फर्ग्युसन खोट बोलताय आमची डील 3 कोटींनाच झालीये.." मोठ्या आवाजात बोलून जयप्रकाश यांनी सुजाता काही बोलणार इतक्यात फोन बंद केला.
सुजाता यांनी रागाने फोन बेडवर फेकला..काही विचार करून त्यांनी पुन्हा फोन हातात घेत कोणालातरी फोन लावला.
" हॅलो " पलीकडून संचित बोलत होता.
" हॅलो संचित....मी सुजाता पाटील " सुजाता घाईघाईत बोलत होत्या.
" हो बोला " संचित शांत आवाजात म्हणाला.
" मला तुम्हाला काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे....ती तुमची पेंटिंग....जी....जी गायब झाली होती त्याबद्दल..." सुजाता घाबरत बोलत होत्या...पेंटिंगबद्दल ऐकताच संचित चमकला.
" पेंटिंगबद्दल काय ? तुम्हाला काय सांगायचंय ? " संचित आता सुजाता काय सांगतात ते लक्ष देऊन ऐकू लागला...
" तुमची मुंबईतील लिलावातून पेंटिंग चोरण्यामागे मी , अमन सिंग आणि जयप्रकाश पाठक आमचा तिघांचा प्लॅन होता...."
" काय ? जयप्रकाश पाठक !!!! " संचित जवळजवळ किंचाळलाच..
" हो , आम्ही तिघांनी तुमची पेंटिंग चोरून ती दुसऱ्या देशात विकण्याचा प्लॅन केला.." सुजाता यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
" एवढा मोठा विश्वासघात !!! जयप्रकाश यांना मी सोडनार नाही... ! " संचित प्रचंड संतापाने बोलत होता.
" पण तुम्ही हे आता मला का सांगताय ? आणि मी तुमच्यावर का विश्वास ठेवू की तुम्ही खर बोलताय ? " संचितला धक्का बसला होता , मात्र त्याचा अजूनही यावर विश्वास बसत नव्हता.
" मी खरंच बोलतेय , पेंटिंग विकून येणाऱ्या पैशांतून आम्ही तिघे वाटणी करणार होतो...पण...अमन आणि जयप्रकाश यांनी...माझ्याशी खोटेपणा करून मला कमी पैसे दिले आणि ते इतर पैसे द्यायला नकार देतायत , आणि म्हणूनच....म्हणूनच....मी तुम्हाला सगळं सांगत आहे..."
" तुम्ही पेंटिंग कोणाला विकली ?? तुम्ही घोर अपराध केला आहे... मी तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही , हे लक्षात ठेवा...." संचित आता संतापाने लालबुंद झाला होता..
" माफ करा....माझी चूक झाली...पण माझा यात काही संबंध नाही...मी हे फक्त पैशांसाठी केले...आणि पेंटिंग न्यूझीलंड मधील व्यापारी जॉन फर्ग्युसन यांना विकली..." सुजाता यांच्या बोलण्यात पश्चाताप जाणवत होता..
" मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही...एका कलाकाराला त्याची कलाकृती एका दागिन्यासारखी असते , आणि तुम्ही....तुम्ही सुद्धा एक कलाकार असून अशी चोरी करता....लाज वाटायला पाहिजे तुम्हाला.." संचितने रागाच्या भरात बोलून फोन जोरात बाजूला फेकला...
" हॅलो संचित....हॅलो...." सुजाता इकडून फोनवर बोलत होत्या मात्र संचित रागाच्या भरात खुर्चीवर बसून धुसमुसत होता.

" हॅलो , संचित बोल " जयप्रकाश वाजत असलेला फोन घेत म्हणाले.
" मी तुम्हाला सोडणार नाही...तुम्ही माझ्यासोबत विश्वासघात केला आहे...माझी पेंटिंग चोरून विकण्याची तुमची हिम्मत कशी झाली...." संचित रागाने जळफळत होता.
" संचित हे तू काय म्हणतोय ? मी आणि तुझी पेंटिंग चोरेल ? " जयप्रकाश घाबरले होते....हे संचित ने बरकबर ओळखले आणि त्याला सुजाता खर बोलत असल्याची खात्री पटली..
" सुजाता पाटील यांनी मला सगळं सांगितलं आहे , त्या अमनवर तर मला पाहिल्यापासून संशय होता....पण तुम्ही...मी माझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही...." रागाने बोलत संचितने फोन कट केला..जयप्रकाश यांना सुजाता वरफार राग आला...आता पुढे काय होईल या विचाराने त्यांना अस्वस्थ करून सोडले..आता संचितची माफी मागून त्याला शांत करण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे काही पर्याय उरला नव्हता..

2 मार्च ( संचितच्या हत्येचा दिवस )
सकाळी जवळपास 9 ची वेळ

संचित त्याच्या ड्रॉईंग रूममध्ये काहीतरी विचार करत बसला होता...त्याच्या डोळ्यात सूड घेण्याची आग स्पष्ट दिसत होती...तेवढ्यात दारावरील बेल वाजली...संचितने दार उघडले..आणि त्याची तळपायाची आग मास्टमत गेली...त्याच्यासमोर जयप्रकाश उभे होते...जयप्रकाश काही बोलणार इतक्यात संचितने त्यांची कॉलर पकडून रागाने त्यांच्या डोळ्यात पाहिले..
" हरामखोर.....तुम्हाला मी काय समजले होते आणि तुम्ही माझ्यासोबत इतका मोठा दगा..." संचित जयप्रकाश यांची कॉलर घट्ट पकडून रागाने फणफणत बोलत होता...
" संचित....मला माफ कर....पण...." जयप्रकाश कसेबसे बोलण्याचा प्रयत्न करत होते..
" पण ? पण काय ? तुला तर...." संचितने रागाने जयप्रकाश यांना जमिनीवर ढकलून दिले...आणि शेजारच्या ड्रॉवर मधून हॅण्डग्लोव्ज काढून घालू लागला..मात्र ते करायच्या आधीच जयप्रकाश यांनी संचितला मागून लाथ घातली...संचित बाजूच्या भिंतीवर जाऊन धडकला....जयप्रकाश यांनी अजून एक जोरात लाथ संचितच्या पोटात घातली..आणि घाईघाईने संचितच्या हातून खाली पडलेले ग्लोव्स घालून शेजारि ठेवलेला फ्लॉवर पॉट हाती घेऊन भिंतीचा आधार घेऊन उठण्याच्या प्रयत्नात असलेल्या संचितच्या डोक्यात घातला......संचित वेदनेने विव्हळत जमिनीवर कोसळला....जयप्रकाश काही वेळ स्तब्ध उभे राहत कोसळणाऱ्या संचितकडे बघत राहिले....आपण काय चूक केली हे लक्षात येताच जयप्रकाश मटकन जमिनीवर बसले...झालेल्या चुकीचा पश्चाताप त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता... काही वेळाने भानावर येताच जयप्रकाश यांनी खाली पडलेला फ्लॉवर पॉट आणि त्याचे तुकडे हातात घेत काही पुरावा राहू नये म्हणून सर्व संशयास्पद वस्तू सकबत घेतल्या आणि चालत जाऊन संचितच्या घरापासून लांब असणाऱ्या ओसाड जागेत फ्लॉवर पॉट आणि हातातील ग्लोव्स काढून फेकले..

वर्तमान ( 8 मार्च )
सागर / जयप्रकाश यांचे घर

जयप्रकाश यांनी संचितच्या खुनाचा गुन्हा कबूल केला...सागरला अजूनही विश्वास बसत नव्हता.
" काका , पैसा आणि प्रतिष्ठेच्या लोभापायी तुम्ही खूप मोठी चूक केली...गुन्हेगाराला शिक्षा तर होणारच " जयंत ने बाजूला उभ्या असणाऱ्या हवालदाराकडे पाहिले..हवालदाराने पुढे येऊन जयप्रकाश यांना बेड्या घातल्या...आणि त्यांना घेऊन गेले...त्यांच्या पत्नीला याचा धक्का बसून त्या जमिनीवर बसून रडू लागल्या...मात्र जयंतने त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला...त्याने बाजूला बसलेल्या सागरकडे पाहिले...तो शून्यात हरवलेला होता..जयंतने त्याच्या पाठीवर हात ठेवत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला..सागरने त्याच्या कडे पाहिले...आणि आपल्या अश्रूंना बांध फोडला..

जयंत सागर सोबत काही हवालदारांना थांबण्यास सांगून बाहेर आला..बाहेर साळवें उभा होता..
" सर , धन्यवाद तुमच्या मदतीशिवाय ही केस सोडवणे शक्य नव्हते..."
" त्यात काय धन्यवाद साळवें , मी माझे मैत्री निभावण्याचे आणि गुन्हेगाराला शोधण्याचे काम केले...आणि संचितला न्याय मिळवून दिला..." जयंत च्या चेहऱ्यावर संचितच्या आठवणींचे दुःख स्पष्ट दिसत होते..
" पण सर , एक गोष्ट कळाली नाही , तुम्हाला कसं माहीत की ती डायरी आरशामागेच असेल.. " साळवें जयंतकडे बघत म्हणाला.
" डिटेक्टिव्हची नजर आहे साळवें.....पहिल्यांदा जेव्हा मी संचितच्या घरी गेलो होतो...तेव्हा त्या आरशाच्या खालचा भाग तुटलेला होता...आणि त्यात मला एका पुस्तक किंवा डायरी ठेवलेली दिसली होती....यामुळेच मी अंदाज लावला की संचित तिथेच त्याची पर्सनल डायरी ठेवत असेल.." जयंत म्हणाला...साळवेंला मात्र त्याच्या निरीक्षणाचे कौतुक वाटले..

सागर आणि जयंत गॅलरीत निवांतपणे खुर्ची टाकून बसलेले होते..
" बरोबर एक वर्ष झाले...संचितला जाऊन...पण आजही त्याची आठवण येते रे..." जयंत रात्रीच्या शांत आकाशात बघत म्हणाला...
" हो...पण मला आजही माझ्या वडीलांनी जे केले त्यावर विश्वास बसत नाही.." सागर जयंतकडे बघत म्हणाला..
" आयुष्य असेच असते रे...आपल्यांकडूनच धोका मिळतो..आणि कधी कधी परके आपल्यासारखे वाटतात..." जयंत आकाशाकडे बघत म्हणाला..
" तुला समृध्दीची आजही आठवण येते ? " सागर जयंतकडे बघत म्हणाला..
" हम्म " जयंत सागरकडे बघत बोलू लागला..
" माझे आयुष्य असच आहे , पाहिले आई वडिलांना गमावलं , नंतर समृद्धी आणि मग संचित...." जयंत दुःखी स्वरात बोलत होता..
" आता फक्त तू सोडून जाऊ नकोस " जयंत सागरकडे बघत म्हणाला..
" नाही " सागर शांततेत म्हणाला..
" इसी बात पर एक जाम हो जाये " जयंत म्हणाला..
" हम्म " म्हणत सागरने समोर टेबलवर ठेवलेल्या वाइनच्या बोटलने दोन ग्लास भरले...आणि दोघांनी चिअर्स करत एक - एक घोट घेत निरभ्र आकाशात पाहिले...चमकणाऱ्या ताऱ्यात त्यांना संचित आपल्याकडे बघतोय असा त्यांना भास झाला....

समाप्त..
****************************************

.....................................................................
प्रस्तावना :- ही एक सायकॉलॉजीकल , क्राईम , ड्रामा , सस्पेन्स , थ्रिलर अशी कथा आहे , यात सर्व घटना , व्यक्ती काल्पनिक आहेत , जर काही संबंध आढळून आला तर निव्वळ योगायोग समजावा. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे असतील.
.......................................................................

दि लॉस्ट पेंटिंग
........................................................................

एका प्रशस्त बंगल्यासमोर लोकांची गर्दी जमलेली होती..पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या...काही पोलीस बाहेर तैनात होते...बंगल्याच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचे बॅरिकेड लावून मध्ये कोणालाही जाऊ देण्यात येत नव्हते...जमलेले लोक गेटबाहेर उभे राहुन मध्ये काय चालू आहे ते चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवत बघत होते. तेवढ्यात तिथे एक कार येऊन थांबली.. तसा एक पोलीस हवालदार पळत गाडीजवळ पोहोचला आणि त्याने गाडीचे दार उघडले. गाडीतून सुटबुटातील एक व्यक्ती आत शिरली , त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. ती व्यक्ती आत शिरताच पोलीस इन्स्पेक्टर गजानन साळवी लगबगीने त्या व्यक्तीजवळ आले...आणि त्या व्यक्तीला मध्ये घेऊन जाऊ लागले.