माझे जीवन - भाग 5 vaishali द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझे जीवन - भाग 5

रतन चे सासू-सासरेनी रविवार आपली सगळी कामे उरकली. सासूबाईंनी स्वयंपाक सुद्दा करून ठेवला होता. दुपारचे तीन वाजायला आले होते दोघे रतन व प्रकाशची वाट पाहत होते. जेवायचे पण थांबले होते. आत्ता त्यांना काळजी वाटू लागली.भूक जणू विसरून केले. नको तेविचार मनत येत होते.तीन चे पाच वाजले काही कळायला मार्ग नव्हता. अजून काळजी वाटू लागली. सगळी निघाली होती. आत्ता पोचायला हवी होती. प्रकाशच्या बाबांना कस तरी होत होते प्रकाशच्या आईने आल्याचा चहा करून दिला. खूपच उशीर झाला. तिनिसंजेचि वेळ झाली होती. प्रकाशच्या आईने देवा जवळ दिवा लावला. म्हणली, ''माझ्या बाळांना सुखी ठेव.'' काही वेळेतच रतन-प्रकाश दरात येताना दिसले, प्रकाश च्या बाबा म्हणाले, '' अग जोडी आली बघ,' आतून आवज आला, आले. दोघांना पाहून आनंद झाला.बाबा म्हणाले, जा हात पाय दुहुन घ्या. .... आई म्हणली, आत्ता जेवायला घेऊ, अरे तुमची वाट पाहत बसलो. जेवण केले नाही. सगळे जेवायला बसले, खूपच उशीर झाला. अग, गाडी मधेच बंद पडली. त्यामुळे उशीर झाला. बाबा म्हणाले,काळजी वाटत होती. हो , मी यांना म्हणाले, '' आई बाबा काळजी करत असतील.;' रतन म्हणली. ........... दुसऱ्या दिवशी रतन ची सासू म्हणली, आज दुपार नंतर दादा येणार आहे. मी तूझ्या साठी या वस्तु आणल्या आहे. पहा तुला आवडते का? सगळ्या वस्तु छान आहे. रतन म्हणली .रतन ने स्वतःची सगळी तयारी केली. रतन मस्त दिसत होती. शहरात राहण्याने रंग अजूनच गोरा झाला होता. तब्येत पण चांगली झाली होती. राहणीमान चांगले सुधारले होते, त्यामुळे ती खुप छान दिसत होती .सगळे दादाची वाट पाहत होते. ................................... ..........दादाला जरा उशीर झाला. दादा आल्यावर त्याने संगितले. नीताला माहेरी सोडवायला गेलो होतो. तिच्या वडिलांना आचनाक काही तरी काम आले. त्यामुळे उशीर झाला. रतन तुझे उरकले का?. हो, बाबा म्हणाले,आत्ता उशीर नको. चला, रतन व दादा मोठ्यांच्या पाया पडतात. घरा बाहेर पडतात...............रतन माहेरी येते सगळ्याना आनंद होतोय मायलेकी संध्याकाळच्या वेळी खुप गप्पा मरतात.रतन आईला म्हणत, ''वहिनी कशी आहे.''खुप छान आहे .''अगदी तूझ्या सारखी आहे.'' दुसऱ्या दिवशी संक्रांतिच्या सणसाठी रतन प्रकाशने घेतलेली लाल रंगची व तिला हिरवा काठ त्यावर छान अशी डिझाईन साडी नेसली. मोठी लांब अशी वेणी, हिरव्या बांगड्या, मेहंदि, ती खूपच सुंदर दिसत होती सासूबाई ने दिलेला व्वासा, साडी, तिळाचे लाडू,ओटि,सगळे कडून शेजारी बायका यांना बोलावून सगळ्यानी हळदी-कुंकु लाऊन रतन ची ओटि भरली. सगळ्यानी रतन व तिच्या सासरच्या लोकांचे कैतुक।केले. '' गरिबीत दिवस काढले पण आत्ता पोरीचे चांगले झाले,'' ''चांगला नवरा, चांगले सासू-सासरे. हवशी आहेत लोक.'' दिवस भर सनाची गडबड होती..... संध्याकाळी आईने रतन ची मीठ मोहरी ने दृष्ट काढली. '' माझ्या पोरीच्या संसाराला कोणाची नजर लागू नये.'' दोन दिवसानी प्रकाश रतन ला घ्यायला आला. जवायचे चांगले आदर सत्कार केला. रतन सासरी जायला निघाली. आईचा निरोप घेताना रतन च्या डोळ्यात पाणी आले .डोळ्यातील पाणी पूसतच ती पुढे चालत होती. आईने तिच्या पाठीला जणू काही हात केला. ........................... ...................काय ही रीत? कोणी काढली असेल रीत? आई-वडिलांनी कष्ट करून वाढवलेल्या मुलींना अस दुसऱ्या च्या स्वाधीन करायच . लग्नात कर्ज काढू ते फेडायचे. एकादा गरीब माणूस तर आयुष्यभर आपल्या मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडत बसतो. तरी कधी कधी मुलीगी सुखी नसते. या करणने आई-वडील पण दुःखी असतात. मुलीच्या चेहऱ्यावरच सुख हे च आई-वडिलाच सुख असत. मुलीने चूल आणि मूल हेच करवे का? तिला हि मन असत. हे का कळत नाही. माझी जिवा भावाची मैत्रीण विहिरीत पडून मेली . तिची लहान मुले उगडी पडली. बायका विहिरीत पडतात, पेटून घेतात, मुलीच्या हातून एकादी चूक झाली तर तिला माप केले जात नाही. कदचित या कारणामुळे मुलगी नको असे म्हटले जाते. खर तर देवाने पक्षपात केला .पण आत्ता थोडे समाधान वाटते. आमच्या पेक्षा आत्ता लोकांच्या विचारत सुधारणा झाली. म्हणून आमच्या लेकी थोड्या प्रमाणात सुखी आहे. या विचारारात रात्र कधी उलटून केली, हे रतन च्या आईला कळले नाही. .............सकाळी आईचे डोळे लाल पाहून, दादा म्हणला ,काय ग आई काय झाले. आई आपल्याच विचारत, काही नाही. हे बदलायला हवे................... नीता व तिचे वडील येतात. चहा-पाणी होतो. नीता चे वडील जायला निघतात. नीता वडिलांच्या व सासूच्या पाया पडते. रतन ची आई अजून हि त्याच विचारत असते. पण ती पड़कन म्हणते, हे बघ नीता तुला कधी आपल्या आई वडीलंना भेटावे वाटले तर तु जात जां कधी त्यांना आपल्या घरी बोलाव. त्याचा हि तुझ्यावर हक्क आहे.......हे सारे ऐकलं नीतचे डोळे भरून आले. रतन च्या आईने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. हे पाहून नीता चे वडिल म्हणाले, ''आत्ता मला काळजी नाही. येतो मी.... ...... ...... रतन व प्रकाश शहरात येऊन दोन दिवस झाले होते.कदचित गुरुवार असावा प्रकाश नेहमी प्रमाने कामावर गेला होता. प्रकाश।सकाळी लवकर कामावर जात असल्याने रतन तिचे बाकीचे काम जरा उशीरा उरकत असे. त्या दिवशी पण तसेच झाले प्रकाश गेल्यावर दोन तासाने आसवे दरावर टक-टक झाली. रतन ला वाटले शेजारी आसवे .तिने दर उगडले तर दरात प्रकाश च्या. बरोबर काम करणारे त्याच्या गावचे एक व्यक्ती उभी होती रतन काही बोलणार तोच ते म्हणाले '' ,प्रकाशला कामात अपघात झाला आहे. त्याला दवाखान्यात नेहले आहे. तरी मी तुम्हाला घेण्यास येतो. रतन ला काय करावे? कळतं नव्हते. कोणाला सांगाव, कोणाला हाका मारावी, जवळ चे असे कुणी नव्हते, डोक्यात मोठा दगड पडावा, असे डोके शून् झाले पाया खालची जमिन सरकली, घरात फेऱ्या मारत होती,डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या, डोळे पुसायला पण कोण नव्हते.

,काही वेळात मालकीण काकू व शेजारी आले. त्यांनी कसा तरी गोड भर चहा प्यायला लावला सकाळचे अकरा वाजले काही कळेना मग शेजारील दोन माणसे रतन ला येऊन जवळ पास असलेले दवाखाने पाहण्यासाठी गेले पण काही कळेना शेवटी कळले त्यांना मुंबईला नेहले पुन्हा सगळे घरी आले.. ............

निरोप घेऊन आलेली व्यक्ती व त्यांच्या बरोबर अजून एक माणूस आला होता. ते रतन ला घेऊन जायला आले होते. काय झाले? कसे झाले? सगळे विचारत होते. रतन सार गप्प ऐकत होती ''तसा बरा आहे बोलत आहे, पण येथे चांगली सोय नाही म्हणून मुंबईला नेले., ' ''तुम्ही रतन ला कुठे येऊन जाणार. '' काकू म्हणल्या. त्यांना आम्ही आमच्या घरी घेऊन जाणार व उदया मुंबईला घेऊन जाणार. काकू म्हणल्या रतन तुझे काही कपडे घे. रतन ने मिळतील ते कपडे घेतले. जात-जात तिने भिंतीवर लावलेल्या भगवान शंकर यां च्या फोटोकडे पहिले. व एक नवस बोलली तो म्हणजे, ''माझा संसार पुन्हा याच ठिकाणी करावा,'' आणि घराबाहेर पाऊल टाकले. सगळ्यानी तिला समजावलं. काकूंनी डोक्यावरून हात फिरवला, काळजी करू नको सगळे ठीक होईल. उतर द्यायला रतन कडे शब्द नव्हते. त्यामुळे ती तशीच गेली. देवाने आपल्या पुढे काय वाटून ठेवले.तिला वाटले आत्ता फक्त ते बरे झाले पहिजे. कोणाशी जास्त बोलत नव्हती. त्या लोकांनी तिला व्यवस्थित आपल्या घरी नेहले. कोणी परिचयाचे नव्हते.