.लग्न मंडपात लोक पोचले होते ..नवरदेव आगमन झाले सर्वाचे ..आनंदाने स्वगत केले . थोडया वेळाने साखरपुडा सुरू झाला जिकडेतिकडे लगबग सुरु झाली. रतन खुप सुंदर दिसत होती . सुंदर दागिने, सुंदर साडी, हिरवा चुडा , डोळ्यात समाव अस तिच रूप होत कोणालाही हेवा वाढवा अशी ती दिसत होती. रत्नांचा दादा तिच्या कडे पाहत होता. मनत म्हणत होता कधी माझी रतन मोठी झाली काळच नाही .इतर भावाशी बोलत होता की आपली रतन किती सुंदर दिसते .भावांच्या डोळयात पाणी आले, त्या मधला भाऊ म्हणला ती दिसायला सुंदर तर आहे पण गुणी सुद्दा आहे, स्वयंपाकात अगदी अन्नपूर्णा आहे.आता एकच सासरी तिला खूप सुख मिळावे .असा रतन चा दादा म्हणला. .......... साखरपुडा झाला आता हळदीला सुरुवात झाली .दुरी कडे जेवणाच्या पंगती सुरु झाल्या. मानपान, रीतिरिवाज झाले . आता मंगल अष्टका सुरु झाल्या . सगळे विधी पूर्ण झाले. .......... आता लाडकी लेक सासरी जाण्याची वेळ आली .सगळ्याची मने जड झाली आईचे मन भरू आले आईचा निरोप घेण्यास रतन आई जवळ तेव्हा दोघींच्या डोळयात पाण्याचा धारा लागल्या .रत्नांचा मामा पुढे आला व रतनाला समजवत पुढे घेऊन आला .दादाची व इतर भावाची पण तिच अवस्था होती. .रतन सासरी जाताना मगे वळून पहात होती, अस वाटत होत ती सांगते मी आता तुम्हाला परकी झाले . अखेर .. रतन सासरी निगून गेली. रतनाच्या आई, भाऊ इतर लोक परत घरी आले घरी आल्यावर आईला काही झोप येईना .आई देवा जवळ गेली व हात जोडून म्हणत होती माझ्या मुलीला सासर सांभाळण्याची ताकत दे तिच्या तिच्या हातून कोणती चूक होऊ न देऊ नको. रामू आईला म्हणला हे ग काय आई रतन इथे होती तेव्हा तु तिच्या लग्नाची काळजी करत होती .पण आता.....
... .... . .बाळ हे नात खूप वेगळ .असत थोडी पण चूक होऊ. , नये आपली मुलीची बाजू रतन च्या आठवण करत आई व रामू झोपी गेले. .. ... दुसऱ्या दिवस उजाडला रत्नांचा संसाराचा हा पहिला दिवस होता. घरातील लोकांनी तिचे शुभ सकाळ म्हणून स्वगत केले. रतन ने घरातील मोठ्या माणसाला नमस्कार केला, त्याच बरोबर देवाला व आपल्या पतीला पण केला... रत्नांचा हसत मुख पाहून सर्वाना खूप बरे वाटले . रतन कामाला लागणार.. तोच सासूबाईं म्हणल्या , अग काम तर करायचे पण सगळ्या देवाला जां व पूजा झाल्या नंतर काम करायचे .तुझी खूप दगदग झाली असेल आराम कर. .
. . . आई इकडे रतनची खूप काळजी करत होती हे ,रामूच्या लक्षात आले. तो आई जवळ गेला, व म्हणला नको इतकी काळजी करू, सगळे छान असेल. दोन दिवसानी पूजा आहे मी व मधला आम्ही दोघे जाऊ , तु ऊगाच काळची करते . रतन व तिची संसाराची मंडळी पुज्याची तयारी करत होते. रतन तिच्या दादाची वाट पाहत होती. पूजा झाली , पण तिच्या माहेरचे कोणी आले नाही. इतक्यात तिचा दादा व मधला भाऊ आले, रत्नाला खूप आनंद झाला, दादाच्या डोळ्यात पहात होती जणू तिचे डोळे विचारत होते , आई कशी आहे ? तेव्हढ्यात तिच्या पतीने हाक मारली व ते दोघे तिकडे गेले . गप्पा मारण्यात वेळ गेला. रामू परत जाण्यास निघाला .रत्नांचा निरोप घेण्यास गेला. ती काही तरी काम करत होती ...पण तिच्या सासूने पहिले , त्यांनी लगेच रत्नाला सागितले दादा आले त्याची भेट घे , रतन लगेच आली , दादाला व मधल्या भावा जवळ आली, असे आहात ते म्हणले , तु कशी आहेस? मी अगदी ठीक आहे. माझी कोणती काळजी करू नका. आईला सांग, माझी मी खूप आनंदात आहे .पण, दादा मला घेण्यास कधी येणार .दादा म्हणला , दोन-चार दिवसानी भाऊजी म्हणाले ,दोन-तीन दिवस आम्ही बाहेर फिरण्यासाठी जाणार आहे. मग तुम्ही तिला घेऊन जा . बर आता आम्ही येतो. रत्नांचा चेहरा रडवेला झाला, .पण दादाने तिला डोळ्याने खून वत तिच्या डोक्यावरून हात फिरवला नीट राहा . ... ...... दादा व मधला भाऊ मनात आनंद घेऊ , परतले . दरात आई वाट पाहत.. होती मुलांचा चेहरा आनंदी पाहून समजली ,.माझी लेक तिच्या सासरी आनंदी आहे. पण...... ती आई होती, तिच ऐकल्या शिवाय थोडंच समाधान होणार होत. मुलांना बसून दिल्या न॑तर आई मुलांना विचारू लागली, कशी रे रतन, रामू म्हणला, खूप छान तर लगेच मधला म्हणला, तिच घर छान आहे. भावोजी खूप चांगले आहेत. रामू म्हणला , आई सासू-सासरे पण चांगले आहेत व इतर माणसे चांगली आहे. हे ऐकल्या वर आईचा जीव भांड्यात पडला. . . इकडे रतन व पती फिरायला जाण्याची तयारी करत होते. रतन ची छोटी नणंद रत्नाला व आपल्या भावाला खूपच चिडवत होती. रत्नाला म्हणत होती , तुम्ही कुठे जाणार आहे.. तेव्हड्यात रत्नांचा पती म्हणला तिला माहीत।नाही, तिच्या साठी सरप्राईज।आहे. उदया आपण फिरायला जाणार या विचारणे रतन खुश होती. थोडी भीती पण वाटत होती. मनत सुखावत होती. तिचा ..चेहरा आनंदने चमकत होता. नव वधुचे रूप अगदी खुलून दिसत होते .मनामधे नवीन विचार होते. ते मला काय विचारतील ,माला त्याच्या समोर बोलायला येईल का? असे ऐक ना दोन असे किती प्रश्न रत्नाला पडले होते. मनातल्या मनात असत होती. पाहू पुढच्या पुढे ..... ...रतणच्या सासू ने तिला जवळ घेतले . खूपच प्रमाने तीला काही गोष्टी सांगितल्या नंतर आपल्या मुलाला बोलवले . रतन हीच्या कडे नीट लक्ष दे, रतन तु पण त्याच्या कडे लक्ष दे. आता सगळ्याचा आशिर्वाद घ्या. सगळ्याचा आशिर्वाद घेतल्या वर , सगळे रतन व तिच्या पति ला सोडवायला गाडी जवळ ते दोघे निघून गेले.प्रवास सुरु झाला. रतन काही बोलेना, तिचा पति बोलू लागला हळु हळु मग रतन तिच्या पतीच्या बोलण्याला उत्तर देऊ लागली. गप्पा मारत हसत खेळत गोवा येथे पोचले . रतन चा पति म्हणला,. कस आहे सरप्राईज , ती खूपच गोड लाजली, तिच्या पतीला पण बरे वाटले, आपण जे काही करतो , रतन ला आवडत आहे. .मग फिरणे , .खरेदी .करणे स्विमिंग करणे ,असा खुप गोष्टी .केल्या . .. रतन च्या दादाला शहरात कामालाबोलावण्यात आले सुट्टी घेऊन , बरेच दिवस झाले व रतणच्या लग्नाला काही उचल घेतली होती. मग त्याला जावे लागणार . रतनची भेट... पण काय करणार , विलाज नाही.. ..रामू आईला म्हणला , रतन च्या कडील माणसांचा निरोप आला , की मधल्यला रत्नाला घेण्यास पाठव .रतन परत जाताना तीला साडी चोळी व येणाऱ्या पाहुण्यांना पोशाख कर, त्या साठी रामू ने आईला काही पैसे दिले. आई रमूला म्हणली , बाळ तु काळची करू नको. तु तुझी काळजी घे , वेळेवर जेवण कर. जस्त काम करू नको .हे सरे बोलणे रमूचे दोनी भाऊ ऐकत होते. ते म्हणले, दादा काळजी करू नको . आम्ही दोघे आईला मदत करू आमची आता सुट्टी सुरु होणार आहे .आम्ही कोठे तरी काम करणार आहे. तुला आदर होईल. रामू शहरात जातो.