माझे जीवन - भाग 6 vaishali द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

माझे जीवन - भाग 6

ज्या लोकांनकडे रतन गेली होती. तिथे ती आजची रात्र रहाणार होती. त्या ठिकाणची लोक प्रकाशला ओळखत होते.त्यामुळेत्यांना खूपच हळहळ वाटत होती.एकमेकांशी बोलत होते की, एवटे लागले, अस झाल,तस झाल रतन आत्ता पण गप्प होती.रात्री च्या जेवणच्यावेळी रत्नाला बळेच थोड जेवायले .सगळे झोपले खरं तर लगेच झोप कोणाला येत नव्हती.
रतन मनोमन देवाचा दावा करत होती. माझे सगळे असून माझ्या जवळ कोणी नाही.हि रात्र तिला भयानक वाटत होती. अस वाटत होत मोठ्याने ओरडावे कोणाच्या तरी गळ्यात पडावे मन मोकळे करावे. तिला आई व दादाची आठवण येत होती. रात्रीचे दोनच्या सुमारास तिला थोडा डुलकी लागली असावी. पण अचानक दचकून उठली. सकाळी पाच वाजता तिला उठवले सहा वाजता घरातून रतन आणि त्याच्या गावातील दोन माणसे मुंबईला निघाली. लॉंचने ते आले व नंतर ट्यक्शी ने दवाखान्यात पोचले. रतन चा जीव वरखाली होत होता. मन म्हणत होते काय असेल समोर. कसा सामना करावा. मनात खलमेल होत होती. देवाचा धावा करत होती .संसाराची स्वपन पूर्ण होतील का?त्यांच्या समोर गेल्यावर काय होईल. पण काही झाले तरी त्यांना त्रास होईल असे वागायचे नाही. मन घट्ट करायचे. ईतक्यात प्रकाशची रूम आली. बाहेर रतन ची मोठी नणंद व तिचा नवरा होता.नणंदेने एक कटाक्षाने रतन कडे पहिले. रतन ला आत्त पाठवले. समोरच प्रकाश आपले दोनी पायवर करून झोपले होते त्यांच्या दोनी पायांना लागले होते. रतन समोर जातच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण प्रकाशने रतन चे हसून स्वगत केले. प्रकाश म्हणला, '' अग मी बरा आहे.''
.. आपल्या वरच संकट टाळ त्या देवाची क्रूपा. .............. प्रकाशला भेटायला त्याच्या कामातील साहेब आले होते. ते म्हणाले, '' दे खो प्रकाश आप किशी बात की चिंता मत करना और सारा खर्च अपनी कंपनी करेगि तुम बस जल्दी ठीक हो जावो '' l काही पैसे देऊन ते गेले.
. थोडा वेळ बसून रतन ला तिच्या नणंदेच्या घरी नेहले तीन दिवस रतन मुंबईला होती पण परत तिची व प्रकाशची भेट झाली नाही. तिला गावी पाठवले. तिच्या सासूबाई मुंबईला गेल्या त्या तिकडे एक महिना होत्या. रतन आणि तिचे सासरे गावी होते. रतनला आपल्या पतिला भेटायला जाता आले नाही. कोणी गेले तर आत्त बरा आहे. सहा महिने तरी घरी येऊ शकत नाही. एतकीच खुशाली कळत असे . रतन कडे पहायचा दुर्ष्ति कोण बदला होता .घरातील माणस तिला दोषी मानू लागली.

.....................,........कोण म्हणे तिचा पायगुण चांगला नाही. तर तिच्या मुळे अपघात झाला. कोणी म्हणे लग्नाची वेळ चांगली नाही. अजून एक वर्ष झाले नाही तर असे झाले. जगाचा अनुभव नसलेली रतन काही बोलत नव्हती कोणाला हि कसले उत्तर देत नव्हती. रतन चे आई दादा पण काही बोलत नव्हते. करण आपली मुलगी तिथे नांदणार आहे. रतन चे सुखाचे व आनंदचे दि वस संपले होते. रतन ला दिवस जाता जात नव्हते. पण देव आहे मानतात ना ते अगदी खर ! रतन चे सासरे मात्र म्हणायचे ''ति च कुंकू बळकट म्हणून जीवावरचे पायावर निभावले . ........... रतनची आई तर खचून गेली. आपण जे दिवस काढाले तेच आपल्या पोरीच्या वाट्याला येऊ नये. म्हणून देवाला विनवण्या करत होती. तिला भेटावे तिच्याशी बोलावे .तिच्या डोक्यावरून मायने हात फिरवावा. पण दादा नको म्हणत होता. करण त्याला मुंबईची काही महिती नव्हती., तो दुसऱ्या बरोबर प्रकाशला भेटायला गेला होता, आणि गावी जावे तर तिच्या सासूबाई घरी नव्हत्या त्यांना ते आवडणार नव्हत. रतनच्या सासूबाई मुंबईवरून येऊन आपल्या माहेरी लग्नासाठी पुन्हा एक महिना गेल्या होत्या. रतनला फक्त तिच्या सासऱ्याचा वडिलांन प्रमाने आधार होता. असेच काही दिवस गेले. सासू पण घरी आल्या. काही करणने त्या रतनला बोलत असे. तीन महिने झाले प्रकाश दवाखान्यात होता. रतन घरातील सगळे काम करत होती. तिची जुळत जावू तिची नेहमी मदत करत असे. रतन व प्रकाशची एकदाच भेट झाली होती. प्रकाश मध्ये सुधारणा झाली होती. कडक उन्हाळा होता. रतनच्या चुलत सासूबाईचे पापड करण्यास रतनला बोलवले होते.
.... दुपारचे तीन वाजले होते. रतन पापड सुकत घालत होती. तिच्या कानावर रिक्षाचा आवाज पडला .तिची जाऊ म्हणते, कोण आले रिक्षात. तेव्हाच रतन खाली रस्त्याकडे पाहते. साक्षात देव समोर दिसावा.ईतका आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. तशीच घरी गेली. सासू-सासरे बसले होते. रतन त्यांना संगत होती पण तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. सासूबाई जरा जोरात बोलल्या '' ,अग सांग काही तरी '' पण त्यांच्या जोरात बोलण्याकडे तिचे लक्ष नव्हते. आप ली सगळी ताकत एकत्र करून ती म्हणली, ते आले आहेत. '' अग काही काय बोलते ''बाबा म्हणाले. '' आहो खरच ते पहा ''रतन म्हणली. आणि खरच प्रकाश कुबड्या घेऊन येत होता. त्याच्या बरोबर त्याचे धाकटे भावोजी त्याला आदर देत होते. प्रकाशला समोर पाहून प्रकाशच्या आईच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. तिला कोण समजावनार ती आई होती ? प्रकाशने एक नजर रतन कडे टाकली. डोळ्यात पाणी येण्याअगोदर त्याने नको अशी मान हलवली. ती गप्प होती. आईने प्रकाशला जवळ घेतले. प्रमाने डोक्यावरून हात फिरवला. प्रकाशाचे मान भरून आले. आईच्या हातात व आशिर्वाद यात खुप ताकत असते. रतन ने पटकन खायला केले. शेजारी प्रकाशला पाहिला आले. सगळ्याचा चेहरा आनंदने फुलाला होता. ...प्रकाशची काकी म्हणली,... ,'' रतन अग, तुझे कुंकू बळकट... म्हणून तुझा घर धनी वाचला........ अखंड सैभग्यवती राहा''. हे ऐकल्यवर रतनाचे डोळे भरून आले. पण चहा देण्याच्या निमिताने घरात गेली. प्रकाशला भेटण्यासाठी नातेवाईक येत होते. रतनची आई व नातेवाईक पण येत होते. रतनच्या दोनी नंदा पण आल्या होत्या त्याची मुले . .... ..... ..घरात कमावत प्रकाश होता. त्यामुळे येणारा पैसा बंद झाला होता. त्याचा भाऊ जस्त कमावत नव्हता. आणि तो घरी लक्ष देत नव्हता. प्रकाशाचे बाबा कर्ज कडून घरचा खर्च भागवत असे. .... रतन प्रकाशाचे सर्व करत असे त्याला गोळ्या देणे, त्याच्या जेवणाची काळजी घेणे, या बरोबर देवाचे पण नामस्मरण करत असे .सासू नंदा किती बोलल्या तरी , ती व प्रकाश त्याकडे दुर्लक्ष करत असे. तिला आपला पति कधी बरा होतो याची काळजी होती. प्रकाशची तब्येत सुधारत होती. पैशाची चणचण त र भासत होती. आणि त्यात तिच्या धाकट्या नंदूबाई बाळंतपनासाठी आल्या होत्या. रतनचे नवलाईचे दिवस संपले होते. घरातील सगळे काम, मिळेल ते खाणे आणि गप्प राहणे. कधी ना आई ना दादा ना कोणी ईतर कोणाला काही संगत नव्हती, कोणाकडे काही मागत नव्हती. कोणाला उलट उत्तर देत नव्हती. मात्र प्रकाश तिला काही बोलत नसे. एक दिवस सगळे काही कामानिमित बाहेर गेले होते तेवढच त्या दोघांना मन मोकळे करण्यास वेळ मिळाला. प्रकाश रतनला म्हणला , ''खरच माझ्यामुळे तुझे खुप हाल होतात.'' मला हि कळते घरातील लोक तुला बोलतात, पण काय करणार... रतन म्हणते, घरातील लोक म्हणजे कोण आहेत? ते सगळे आपलेच आहे. त्यांना तुमची काळजी वाटते. म्हणून बोलतात. कोणी तरी समजून घेतले पहिजे. मला फ़क़्त तुमची साथ पहिजे. खरच हे सगळे माझ्यामुळे झाले असेल का? अस काही नसत. प्रकाश म्हणतो. ''अग रतन पुढे आपले आयुष्यच काय? '; रतन म्हणते.................