माझे जीवन - भाग 8 vaishali द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझे जीवन - भाग 8

🌹 रतन च्या घरातील वातावरण अतिशय आनंदीहोते. रतन चा चेहरा आदिक खुलून दिसत होता. सासूबाई रतन ची काळजीघेत होत्या.बाबा जमेल तेवढ लाड करत होते. रतन चे नववधू जे रूप होते. ते तर सुंदर होते. पण आत्ता........तिचे रूप काही वेगळेच होते. त्याचे कारण म्हणजे, घरातील ऐकोपा एकमेकांवरचे प्रेम .....................घरत पैसा कमी असताना सुद्दा सगळे प्रेमाने राहत होते. या वरून तरी, अस वाटत कि पैसा म्हणजे सुख नवे. एकमेकांशी प्रमाने रहने, घरातील सुख व दुःख एकमेकांशी बोलून ती वाटून घेणे , थोर मोठ्यांच्या मान व आदर करणे, जीवनात येणारे छोटे छोटे आनंद सेलिब्रेट करणे , ............
.. 🌱 ''जसा चैत्र महिन्यात कडक ऊन असते,तरी पण ,पान। गळी झालेल्या झाडाला नवीन कोवळी कोवळी सुंदर नुकतीच जन्मला आ लेली सोनेरी पालवी संपूर्ण झाड सुशोभित करते.;'' 🌱🌲🌲 त्या प्रमाणे ''समाधान हा एक दागिना आहे. तो ज्या कोणा जवळ आहे. तो नकीच थोड्या पैशात आनंदी असतो ? ''
......... ..............हेच सुदंर अनुभव रतन च्या घरी आनुभवतात. बाळाच्या येण्याने रतन चे दुखाला आत्ता तरी पूर्ण विराम मिळाला होता. सुखा बरोबर प्रकाशला कामाची चिंता होती. रतन ला चार महिने झाले होते. रतन ची आई दादा ला घेऊन आपल्या लाडक्या लेकीला पहिला आली होती. आईला पाहतच रतन ने मिटी मारली. तिचा आनंद तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूत। दिसत होता. आईने अगदी प्रेमाने. तिच्या कपाळचे चुंबन घेतले. दादाकडे पाहताच... त्याने तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला.मोठा भाऊ हा वडीलांप्रमाणे च असतो. हे या वरून स्पष्ट दिसत होते . .... .. . ''आपली मुलगी आपली मुलगी आई होणार
या सुखा पेक्षा मोठे सुख ते कोणते '' ?तिच्या चेहऱ्यावरचे मत्रूत्व, चा आनंद तिला अनुभवायाच होता. येताना रतन साठी आईने, तिला आवडणारे पदार्थ, करंज्या, चकली, साजूक तूपातले लाडू, बदाम,मनुके, रोज दुधात थोडे केशर टाकून पिल्यास बाळ गोरे होते. या कल्पनेने त्यांनी केशर पण आणले होते. ..........

तशी रतन च्या आईची परस्थिती बेताची. पण आई वडिल गरीब वा श्रीमंत असो. आपल्या मुली साठी कर्ज बाजरी होऊन ती फ़क़्त सासरी सुखी राहावी. सासरी तिला चांगली वागणूक मिळवी. तिचा चेहरा आनंदी दिसावा. म्हणून आयुष्यभर कष्ट करतात,आणि या गोष्टीची वाट पाहतात. हेच असत का सासरी गेलेल्या मुलीच्या आई वडिलांच्या नशिबी.?काही तर आई वडिल या क्षणाची वाट पाहून हे जगच सोडून जातात. .. ... ..''.कधी बदलेन ''............................. रतन ची आई परत घरी जाताना रतन च्या सासूबाई नां म्हणली,; तुमची हरकत नसेल तर, रतन चे ओटीभरन सातव्या महिन्यात करावे. आणि बाळंतपणासाठी पाठवावी.
त्या थोड्या गप्प होत्या ,नंतर म्हणल्या, आहो मी घेईल कि काळजी, आणि हात जोडत मागे माझ चुकल......... हे बोलण्या अगोदरच रतन च्या आईने त्याचे हात आपल्या हातात घेतले. व म्हणाल्या, ते एक वाईट स्वप्न समजून विसरून जाऊ. दोघींच्या डोळयात पाणी आले...

रतन च्या सासूने आपली चूक कबूल केली. अशी चूक जर प्रत्येक सासूने, नव्हे-नव्हे ईतरानी कबूल केली. तर सासरी नांदणाऱ्या मुलीचे आई वडील नकीच सुखाने जगू शकतील .

रतन ची आई व दादा घरी आल्या-आल्या नीता ने ''ताई 'अशा आहे '' विचारले, रतन च्या आईने तिला जवळ बोलवले, व म्हणाल्या, अगदी सुखात,मला तूझ्या कडून गोड बातमी हवी आहे. नीता लाजून गोड गालात हसली. आपल्या खोलीत गेली. आईने दादा कडे पहिले,तो ही गालात हसून निघून गेला. आई रतन च्या काळजीतून थोडी निवांत होती. आज गुरुवार रतन च्या सासू-सासरे यांचा उपवास, चार वाजले असावेत, प्रकाशने, अग रतन चहा कर संगळ्यासाठी रतन आतून म्हणते, हो, हो करते. थोड्या वेळेत रतन चाहा घेऊन आली. सगळे एकत्र. . चाहा घेतात.. रतन आज फ्रेश दिसत नव्हती. ती आपल्या खोलीत गेली. हे प्रकाश च्या लक्षात आले. त्याने आईला व बाबांना विचारून तिला एका छान बागेत आणले.

पाच वाजले असावेत उतरतीच ऊन होत. म्हणून ती एका झाडाखाली असलेल्या बाका वर बसली. बागेत जस्त गर्दी नव्हती. दोघे ही शांत होते. रतन ईकडे-तिकडे पाहत होती. बागेत दोनी बाजूने सुंदर अशी फुलझाडे होती. काही फुले उमलेली, तर काही टपोरी कळी, काही छोट्या कळ्या, लाल पिवळी, अशा सप्त रंगली फुलेली बाग . लाल भडक टपोरे गुलाबाचे फुल. फुलाचा राजा असल्यागत ऐटीत बसले आहे. ईतर छोटी-छोटी फुले स्वागताला उभी आहेत. हळूच वाऱ्याच्या झूकेने डोलुन, नाचून स्वागत करत आहे. मध्येच भुंगा आपला वेगळा डान्स करत आहे. . ........................... .........तेवड्यात मुलाची किलबिल कानी पडली,रतन भानावर आली. प्रकाश....... '' अग कुठे हरवली.,,'' रतन...... ती बाग पहा. हो , ग खरच.... प्रकाश. आणि ते गुलाबाचे फुल ,पांढरा शुभ्र मोगरा, पिवळा सोनचाफ्याची गोष्ट न्यारी. किती सुंदर ठेवली बाग. ते आहेत बघ, माळी काका. प्रकाश म्हणला. हे बघ किती छान आहे ही मुलगी. आपल्याला अशी मुलगी झाली तर............... मला बाई , मुलगाच हवा. रतन.... . .... ...... मुलगाच का? प्रकाश ........................... ..अग मुलगी ही दोनी घरची शान असते. सासर-माहेर जोडणारा धागा आहे. वडिलांची मुलगी होऊन काळजी घेते. भावाची बहीण, सासऱ्याची मुली प्रमाणे,पतीची पत्नी म्हणून मुलाची आई म्हणून. अशी ती मुलगी आम्हा पुरुषांच्या किती उपयोगी पडते. मी तर म्हणतो , ''धन्य ती माता जिच्या पोटी अशा संस्कारी मुली जन्मला येतात. ''

रतन ने प्रकाशला येवढे बोलता पहिल्यांदाच पहिले, व तिला आपल्या पतीच्या विचारानाचा अभिमान वाटला. ती म्हणली, किती छान आहेत तुमचे विचार. या वर प्रकाश म्हणतो, ''हे सारी तुझी देन आहे.'' ते कस ?रतन।............जेव्हा तु तुझे विचार मला सांगत होती, घरात ऐकोपा, आई-बाबांची काळजी,माझ्या अपघातात दिलेली साथ, पैसा नसताना काढलेले दिवस, सीमची घेतलेली काळजी, कंपनी कडून मिळाली आपली हक्कची रकम कर्ज म्हणून देणे .आपल्या माहेरी वाईट वाटेल म्हणून काही न सांगणे. ही फ़क़्त आणि फ़क़्त एक आजची मुलगी व उद्याची स्री करू शकते. ......................आणि म्हणूनच , ''मी देवाला मुलगी दे असे नकीच म्हणेल.'' . प्रकाशाचे हे सारे बोलणे, नजिक बसलेले वयस्कर आजी-आजोबांनी ऐकले ते त्याच्या जवळ आले. किती चांगले विचार आहेत म्हणत. त्याचे दोनी हात आपल्या हातात घेऊन त्याचे चुंबन घेतले. आणि तुमची जोडी नेहमी सुखी राहावी. असा आशिर्वाद दिला. रतन चे मान खुप खुश झाले.आणि आनंदने घरी परतले. खरं तर त्यांना यायला खूपच उशीर झाला होता. घरी आल्यावर आई लगेच म्हणली, जला हात-पाय धुऊन घ्या आणि जेवायला चला. बाबांना खुप भूक लागली. पण स्वयंपाक रतन म्हणली. .........अग खा एक दिवस मझ्या हातच तुला आवडते तेच बनवले. ..... सगळे खुप आनंदाने गप्पा मरत जेवण करतात. रतन ला सातवा महिना सुरु झाला होता. तिच्या आईचा निरोप आला. या महिन्यात रतन चे ओटी भरण करू. आपले काय मत आहे. व एक छान मौहरत पहावा. बाबांनी लगेच हो म्हटले व उदया जातो. आपली कामे उरकून रतन आपल्या खोलीत जाते. प्रकाश जरा रोम्यटीक स्वरात बोलतो, '' आत्ता काय बाबा एक माणूस आपल्या माहेरी जाणार'' माज्या आहे बुवा!! रतन लडिवाने त्याला धक्का देत,जा बाई, आणि दोघे ही नवीन स्वप्न पाहत झोपी जातात.