माझे जीवन - भाग 3 vaishali द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

माझे जीवन - भाग 3

रामू शहरात पोचला...पण त्याच कशात मन लागेना, त्याचा मित्र म्हणला , तु आल्यापासून गप्प का काही झाले का? काही नाही रामू म्हणला. दोघे थोडा वेळ गप्प बसले. मग पुन्हा रामू म्हणाला , घरची खुप काळची वाटते. अरे पण. तुझे भाऊ आता मोठे झाले असतील मित्र म्हणला, हो मी शहरात येताना, ते मला म्हणले,. दादा तु काळची करू नको. आईची आम्ही काळची घेऊ , व सुट्टी सुरु झाल्या वर आम्ही काम करणार आहे. तुला थोडी मदत. अरे पण आत काळजी करण्याचे करण काय ? मित्र म्हणला .मला त्यांच्या शिक्षणाची काळची वाटते. रामू म्हणला . बस येवटेच ना , सुट्टी आहे तो पर्यंत त्यांना कामाला कामाला जायला सांग. असे मित्र म्हणला. आता रमूला बरे वाटले. मित्रा तु नेहमी मला चांगले मार्ग दाखवतो. थँक्स , .... ... रतन व तिचा नवरा घरी आले. दोघांचा हसरा चेहरा पाहून घरातील मंडळीना खुप समाधान वाटले. शेवटी मुलाचे सुख तेच आपले सुख. दुसऱ्या दिवशी रतन आपल्या माहेरी आली. आईला तर काय अन काय नको असे झाले. रतन च्या मैत्रिणी घरी आल्या खुप गप्पा झाल्या .रतनला आईने गोड-धोंड केले. पण रत्नाला दादाची कमी जाणवत होती, का नाही..... दादाने वडिलांची कमी भासून दिली नाही. मोठ्या भावाचे कर्तव्य केले होते. चार दिवसराहून रतन सासरी जाण्यास निघाली. आईचे मन उदास झाले. रतनचे डोळे भरून आले. सासरी मुलीला किती ही सुख असले तरी माहेर खुप मोलाचे असते. ती जाताना दादा कधी ग भेटणार आई..... अस ...म्हणत पुढे निघून गेली. आई तिच्या पाठी कडे पाहत होती . . रतन सासरी पोचली सासूसासरे यांना नमस्कार केला आपल्या खोलीत गेली .तिथे तिचा नवरा कोणतरी .पुस्तक वाचत बसला होता .त्याकडे पाहून ती हसली. पण तिच्या पतीला ती थोडी उदास वाटली. थोडा वेळ झाल्या वर पतीने विचारले , काय झाले ? काही नाही अशी मान डोलावली .व रतन थोड्याच वेळात कामाला लागली . स्वयंपाक झाला जेवण्या साठी ताट तयार केली. गप्पा मरत जेवण जेवण झाले. रतन सर्वाना उदास वाटली. आजच माहेरून आल्यामुळे दिला उदास वाटत असावे. असे सर्वांना वाटले. सगळी कामे उरकून ती आपल्या खोलीत गेली. थोड्या वेळाने , रतन आपल्या पतीला म्हणली, तुम्ही शहरात कामाला जाणार .हो मग, मला खुप उदास वाटेल. मला आपल्या घरची काळची घेता येईल. तर या मुळे तु उदास आहे. पति म्हणला. मला वाटले तुला आईची आठवण येते. पण हे पण माझे घर आहे. रतन म्हणली. हो तर हे घर तुझे आहे. व घरातील माणसे पण तुझी आहे. माझे आई वडील खूपच चांगले आहेत. तु काही काळची करू नको . हो, मला पण त्याची खुप।सेवा करायची आहे. मि हे करू शकेल का? ''हो नकीच '' दुसऱ्या दिवशी रत्नांचा नवरा जाण्याची तयारी करत होता. रतनची जेवण बनवण्याची लगबग चालू होती. आई हे घेतले का ? ते घेतले का? विचारत होती. सर्वानी एकत्र जेवण केले. थोडावेळ गप्पा मारल्या. काही वेळेतच रतन चा पति शहरात गेले. सगळे आपल्या कामाला लागले. रतन घरचे सगळे काम करत होती. आपल्या सासू सासरे यांची काळची घेत होती. घरातील लोक पण रतन चे लाड करत होते. कोणाला हेवा वाटावा , असे रतन व रतन चे सासर होते . .............. रतन सासरी खूपच आनंदी होती. रतन च्या माहेरी पण चांगले दिवस आले होते. दादाला चांगला पगार, मधला चांगल्या कामाला ,आई पण अजून कमावत होती. त्यामुळे रतन चे माहेरी पण खूपच लाड होत. रतन आनंदाने संसार करत होती. रतनाची आई ची काळजी मिटली होती. हा , हां म्हणता रतन च्या लग्नाला सहा महिने झाले होते . एक दिवस सासूने रत्नाला बोलवले , व त्या म्हणल्या , तुझ्या दादाचे लग्न ठरले आहे, व ते तुला न्यायला येणार आहे. तुला जायचे का? असे म्हटल्यावर रतन ने मान खाली घातली. सासू व सासरे हसू लागले. सासरे म्हणले, तुझी तयारी कर ते उदया येणार आहे. मग काय विचारता ? '' जशी दुधात साखर पडवी , '' असे रत्नाला वाटले. ती माहेरी गेली .आईला व भावला खुप आनंद झाला. वहिनी कशी आहे, कोणा सारखी दिसते, असे किती प्रश्न. आई म्हणली , अग तुझ्या सारखी आहे . मग काय? रतन चा अदिकच तोरा. सगळीच गडबड देवाचे सगळे करेक्रम नातेवाईकांच्या घरी जेवणाचे आमंत्रण दादा व मधल्या भावाने काढलेली सुट्टी .हे सरे सुख त्यानां पहिल्यादा मिळत आहे. त्यामुळे सगळे खुप आनंदी होते. नवरी साठी लागणारे दागिने, सुंदर-सुंदर साड्या वेगवेगळी खरेदी आईसाठी सुंदर साडी, रतन साठी छान अशी पैठणी , जावई यांच्या साठी पोशाख दोनी भावांना कपडे आणि दादा साठी नवरदेवला शोभून दिसेल असे सुंदर ड्रेस . बाकी काही खरेदी. . आई सगळ पाहत होती. व तीला आनंद ही होत होता आणि जुन्या आठवणी डोळ्या समोर।येत होत्या. डोळ्यात पा णी आल. तेवढ तिन आवरलं. दिवस जात होते. लग्नाचे दिवस।जवळ येत होते. रतन खुप आनंद होती. मेंदी चा कार्यक्रम संगित म्हणत , डान्स , हसत-खेळत पर पडला. .. उदया . सकाळी लवकर उठा आईने सागितले. रतन ची सासर ची माणस लग्नात येणार होती, करण रतन च्या नवऱ्याला जस्त सुट्टी मिळत नव्हती. सकाळी ठीक नऊ वाजता नवरदेव व नवरी लग्न मंडपात आली. थोड्याच वेळेत साखरपुडा सुरु झाला. नवरी मंडपात आली, सुंदर, सुकुमार' साजिरी अशी नववधू जेव्हा मंडपात आली तेव्ह सगळ्याच्या नजर तिच्या कडे होती. किती सुंदर आहे. रतन तर खुप खुश झाली, येवढी सुंदर वहिनी मिळाली. रतन पण खुप सुंदर दिसत होती. हळद सुरु झाली. रतन ची नजर तिच्या माणसाकडे लागली होती. काही वेळात ती आली. रतन व तिच्या मधल्या भावाने त्याचे स्वागत केले. रतन ने सगळ्या बरोबर त्याची भेटकरून दिली. लग्न झाले. सगळे लोक एकमेकांच्या भेट येऊन परतले. रतन ची सासर ची माणस पण परतली. रतन च्या सासूने रतन च्या आईला संगितले, चार दिवस झाले की रतन ला पाठवा कारण प्रकाश रतन ला आपल्या बरोबर शहरात घेऊन जायच म्हणतो. आई म्हणली थोड्या दिवस तुमच्या जवळ ठेवावी, काही गोष्टी शिकायला मिळतात .हो, पन त्याच्या जेवणाचे हाल होतात. नवरा-नवरी घरि आली. दुसऱ्या दिवशी विधी झाले. सगळ्या देवांचे दर्शन घतले. पूज्या झाली. दादा- वहिनी एकाद्या चांगल्याठिकाणी फिरायला जा. तेवढ्या आई म्हणली,रतन शहरात राहण्यास जाणार आहे. सगळ्याना आनंद झाला, आणि काळजी पण वाटू लागली. .....शहरात ती एकटी ते तर दिवसभर कामाला जातील. रतन ने सर्वांना समजावले. आई ने सागितले उदया रतन ला तिच्या सासरी पोचवायला कोण जाणार. दादा तु.......... नही मी जातो छोटा भाऊ म्हणला. रतन सासरी जाण्यास निघाली. आई परत कधी..... .वहिनी सगळ्यांची काळजी घे. आई तु वहिनीला सांभाळुन घे, अग, अस समज तिच तुझी रतन आहे. सासरी पोचली की, पाहते तर सासूबाई ची भराभर झाली होती. त्या रतनला म्हणल्या, उदया प्रकाश आला की थोड्या वेळाने तुम्हाला निघायचे आहे. रतन तिच्या खोलीत गेली. आपला नवीन संसार मांडण्याचा विचार करत झोपी गेली.