प्रेमगंध... (भाग - ४) Ritu Patil द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेमगंध... (भाग - ४)

( मागच्या भागात आपण पाहिले की, सकाळचा प्रसंग आठवून राधिका आणि अजय दोघेही गालातल्या गालातच हसत होते. 😊😊 दोघांचीही सारखीच अवस्था झाली होती. आता पुढे... )

थोड्या वेळातच शाळेची मधली सुट्टी झाली. पाऊस चालू असल्यामुळे सगळी मुलं वर्गातच बसून राहिली. राधिकाला तर सकाळचा प्रसंग आठवून स्टाफरूममध्ये जाऊच नये असं वाटत होतं. अजयच्या नजरेला नजर कशी द्यावी हेच तीला कळत नव्हतं. 😊😊 पण तिला भूक लागली होती म्हणून तो विचार झटकून ती जायला निघाली. ती स्टाफरूमजवळ आली तसं तिने खिडकीमधून हळूच आतमध्ये डोकावून पाहिलं तर अजयची खुर्ची तिला रिकामी दिसली. आणि अजयच्या बाजूला ती बसायची त्या खुर्चीत दुसरीच कोणीतरी नवीन शिक्षिका बसली होती. राधिका सावकाश आतमध्ये गेली, तीने पाहिलं तर अजय आतमध्ये नव्हता, तीला थोडं रिलॅक्स वाटलं. काही शिक्षक नाश्ता करण्यात गुंतले होते, तर काहीजण मात्र तिच्याकडे बघून गालातल्या गालातच हसत होते.😊😊 पण तिने त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं. आणि नवीन शिक्षिका बसली होती तिच्या बाजूला जाऊन ती बसली. राधिकाने तिच्याकडे पाहिलं तर रंगाने गोरीपान, लांबसडक काळेभोर केस अशी ती दिसायला सुंदर होती. आणि सहा ते सात महिन्यांची ती प्रेगनेन्ट वाटत होती. तीने राधिकाला छानशी स्माईल 😊 दिली आणि म्हणाली, "तू राधिका कदम हो ना, न्यू जाॅईन झालीस ना."
राधिका- "हो, पण तुम्हाला कसं कळलं माझं नाव ?"
ती- "अजय बोलला होता मला तुझ्याबद्दल, मी आले तेव्हा अंजली बाई आणि निलेश सर पण बोलले मला." राधिकाने तिला स्माईल दिली. 😊😊
ती- "माझं नाव अर्चना मोहिते."
राधिका- "तुम्ही इतके दिवस दिसला नाहीत शाळेत."
अर्चना- "हो, मी खुप आजारी होते ना, म्हणून रजेवर होते. थोडी जास्तच सुट्टी झाली ना माझी." आणि ती हसू लागली. 😀😀😊😊
राधिका- "मग आता कशी आहे तब्येत तुमची?"
अर्चना- "थोडा विकनेस जाणवतो पण ठिक आहे आता मी."

दोघींचं बोलणं चालूच होतं. तेवढ्यात अजय बाहेरून आला. आणि तो अर्चनाच्या बाजूच्या खुर्चीवर येऊन बसला.
अजय- "अरे वा, तुमची दोघींची खुप छान मैत्री झालेली दिसतेय." 😊😊
अर्चना- "हो मग, झाली आमची दोघींची मैत्री... हो ना राधिका." ती हसतच म्हणाली. तसे राधिका आणि अजय दोघेही हसू लागले. 😊😊

राधिकाला अर्चना खुप छान वाटली. दोघींनीही गप्पा मारत नाश्ता केला. आणि सगळे आपापल्या वर्गात निघून गेले. शाळा सुटल्यावर राधिका घरी निघून आली. पाऊस चालूच होता. घरात सगळं शांत होतं. आईपण झोपली होती. तिने जाऊन आधी चेंज करून घेतलं. आणि तीही आईच्या बाजूला जाऊन पडली. सकाळचा बसमधला घडलेला प्रकार आणि अजयसोबतचा प्रसंग सगळं तिच्या डोळ्यासमोरून जात होतं. त्यातच तीला कधी झोप लागली कळलंच नाही.

इथे अजयही आपल्या घरी येऊन पोहोचला. त्याने घरासमोर बाईक उभी केली. त्याच्या चेहऱ्यावर छानशी स्माईल येत होती. 😊 तो बोटात गाडीची चावी अडकवून गोल फिरवतच गाणं गुणगुणत घरात आला. तशी त्याची आई त्याला म्हणाली, "आज स्वारी, खुप खुश दिसतेय. काय रे माझी सुनबाई भेटली की काय तूला ?" तसा अजय हसू लागला. 😊😊😄
"आई मी येतो चेंज करून." एवढं बोलून तो आपल्या रूममध्ये निघून गेला.

अजयच्या घरी तो आणि त्याचे आईवडील राहत होते. त्याचे वडिल बस कंडक्टर म्हणून बस डेपोमध्ये काम करायचे. आई घरीच असायची. त्याला एक मोठी बहीण होती अमृता. तिचं लग्न झालं होतं. अधूनमधून ती येत राहायची.
अजय फ्रेश होऊन बाहेर आला. तो आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला आणि त्याने आईचा एक हात आपल्या डोक्यावर ठेवला. आई प्रेमाने त्याचे केस कुरवाळु लागली. अजयला खुप छान वाटत होतं.

आई- "काय रे आज खुप खुश दिसतोस तू. उत्तर नाही दिलंस माझ्या प्रश्नाचं. कुणी आवडते का तुला, असेल तर सांग. लगेच तिच्या घरी जाऊन लग्नाची मागणी घालू." तसा अजय हसू लागला. 😊🤗😄 त्याच्या डोळ्यासमोर राधिकाचाच चेहरा येत होता.
अजय- "असं काही नाही गं आई, तू पण ना काहीही बोलतेस."
आई- "खरंच बोलतोयस ना... खरंच असं काही नाही ना ?"
अजय- "हो गं, खरंच सांगतोय असं काही नाही. आणि जर कुणी आवडली ना तर सगळ्यांत आधी तुलाच येऊन सांगेन बस."
आई- "बरं ठिक आहे."
अजय- "आई एक विचारू का गं तुला ?"
आई- "हो विचार ना."
अजय- "आई, मला आवडलेली मुलगी जर तुला नाही आवडली तर मग काय करशील ?"
आई- "असं काही नाही रे बाळा, तुझ्या आनंदातच आमचा आनंद आहे कळलं का. शेवटी संपूर्ण आयुष्य तुला काढायचं आहे तिच्यासोबत. मग तुला आवडेल अशीच हवी ना मुलगी. तु खुश तर आम्ही पण खुश. आम्ही काय पिकलं पान कधीही गळून पडणार. तुझी बायकोच साथ देणार आहे तुला शेवटपर्यंत. म्हणून तू पसंत केलेली मुलगी आवडेल मला, कळलं." 😊😊
आईचं असं बोलणं ऐकून अजय लगेच उठून बसला. आणि आईला बोलला, "आई असं निर्वाणीचं का ग बोलायला लागलीस तू ? तू आणि बाबा आयुष्यभर आमच्यासोबतच राहणार आहेत कळलं का. तुम्हाला दोघांनाही मी काही होऊ देणार नाही समजलं का." अजय आईचे दोन्ही गाल खेचतच बोलला. तसं आईने त्याच्या हातावर एक फटकाच दिला आणि दोघेही हसू लागले. 😀😀😊😊

संध्याकाळचे पाच वाजले होते. राधिका आणि आई दोघीपण चहा पीत बसले होते. थोड्या वेळाने मीरा, मेघा आणि सोनाली पण घरी आले. मेघा राधिकाजवळ जाऊन बसली आणि तीने राधिकाच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तसं तीच्या डोक्याला हात लावत राधिका म्हणाली, "काय गं काय झालं, बरं वाटत नाही का तूला आज ?"
मेघा- "नाही गं ताई, आज खुप थकायला झालंय मला."
मीरा- "हो ताई खरंच, आज खुप कंटाळा आलाय मला पण." सोनाली शांत गप्प बसून त्यांना बघत होती.
आई- "काय गं काय झालं दोघींना पण कंटाळायला ?"
मेघा- "ताई आज खुप अभ्यास दिलाय गं, लिहून हात दुखायला लागलेत आमचे." 🙁🙁
मीरा- "हो ना ताई, खरंच मेघू बरोबर बोलतेय."
राधिका- "यंदाचं बारावीचं वर्ष तुमचं... आताच सुरुवात झालंय अभ्यासाला आणि लगेच कंटाळलात तुम्ही ? अजून तर खुप अभ्यास करायचा आहे तुम्हाला कळलं का.... असं कंटाळून चालणार नाही..."
मेघा- "हो गं ताई, कळतंय आम्हाला ते. करू आम्ही अभ्यास नको काळजी करू तू."
राधिका- "आणि सोनू (सोनाली) तू पण लक्षात ठेव गं, नववीचं वर्ष आहे तुझं. व्यवस्थित लक्ष दे अभ्यासाकडे कळलं का.... आणि काही अडलं तर मला विचार."
सोनाली- "हो ताई."
थोड्या वेळाने राधिकाचे बाबा घरी आले. तसे सगळे आतमध्ये जाऊन आपापल्या कामाला लागले. राधिका आईला जेवणात मदत करू लागली. तिघीजणी अभ्यासाला बसल्या. जेवण तयार झालं तसे सगळे जेवायला बसले.
बाबा- "राधी, शाळेत सगळं ठीक आहे ना गं. नवीनच नोकरी आहे ना तुझी, काही अडचण तर नाही ना ?"
राधिका- "नाही काहीच अडचण नाही बाबा, सगळं छान चाललंय."
बाबा- "बस वेळेवर येते का गं सकाळी ? पावसाचे दिवस चालू आहेत ना, कधी कधी उशीरा येत असेल बस, हो ना."
राधिका- "हो बाबा, कधी कधी पाच दहा मिनिटे होते लेट."
आणि राधिकाने सगळ्यांना सकाळचा बसमध्ये घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून सगळ्यांच्या चेहर्‍यावरचे हावभाव बदलत होते. सगळ्यांनाच राग येत होता. 😠😠
बाबा- "बरोबरच केलंस तू. अशा माणसांना अद्दल घडवायलाच हवी. बरा चोप द्यायला हवा अशांना, जेवढं घाबरून राहिलं तेवढी त्यांची हिम्मत वाढते." 😠😠
आई- "हो ना खरंच, पण सांभाळून राहा गं पोरी. तुम्हाला पण तिघींना सांगते कळलं का...." आई काळजीने म्हणाली. मीरा- "हो गं आई नको काळजी करू आमची."
मेघा- "ताई, बरं झालं सगळ्यांनी त्याला झोडपून काढलं ते, परत कुठल्या मुलीकडे वाकड्या नजरेने बघायची त्याची हिंमत पण होणार नाही." तसे सगळेच हसू लागले.
😀😀😂😂😅😅😀

क्रमशः-

(बघुया कथेमध्ये पुढे काय घडते ते पुढच्या भागात...)

🌹💕 @Ritu Patil 💕🌹

💕💕 प्रेमगंध... 💕💕
-------------------------------------------------------------